”सर येऊ? ”  ती आत आली. माझ्या समोरची खुर्ची ओढत ती बसली. माझी  नजर प्रश्नार्थक. ”सर  ऍडमिशन हवय मुलाला ” “तुम्ही यादव सरांकडे जा कि, सांगा त्यांना “मी उत्तरलो “. सर,त्यांनी तुमच्याकडे पठवल ”  माझ्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्नार्थक भाव. “दाखवा पाहू मार्कलिस्ट ,अहो हा तर २ ०१ ० साली एस एस सी झालाय आणी  आता अकरावी प्रवेशाला म्हणजे?  “नाही सर, तो दोन वश कामाला जात होता घरची परिस्थिती र बेताची होती पण आता त्याला  ओटोमोबाईल  शिकायचय”  अहो बाई तीन वर्ष gap झाली शिवाय मार्क बरेच कमी आहेत ,नाही प्रवेश देता येणार , sorry,”  “सर नाही म्हणू नका मला मुलाला इंजिनियर त्याला करायचाय. त्याला ऑटोच काम आवडत .”अहो खूपच कमी गुण आहेत शवाय gap  मोठी ”  ” सर तुम्ही ठरवल तर देवू शकता  तुमच्या हातात आहे यादव सर म्हणाले तस” मी मोबाइल  वरून यादावशी बोललो. “अरे यादव ह्या  बाईना माझ्याकडे का पाठवलस? तू manage कर, उगाचच माझा वेळ मोडतो” तिथून उत्तर सर ती ऐकायला तय्यार नाही हैराण केल तिने म्हणून …. “त्या बाई प्रवेशसाठी अगतिक आणि आम्ही प्रवेश द्यायला असाहाय्य. शेवटी त्या बाईनी ठेवणीतल अस्त्र काढल  ” सर मी तुमच्या बहिणी सारखी आहे एवढी भिक घाला  नाही म्हणू नका सर मला त्याला शिकवायचं ,आम्ही नाही शिकलो पण …।  “बाईंच्या शब्दांनी अंतकरण पिळवटल  पण….., पण वाईट असतो.  कायद्याच्या  चौकटीत  बाईंचा मुलगा बसत नव्हता. त्याला प्रवेश दिल्यावर कार्यालयास आणि मला उदभवणारया अडचणी मला दिसत होत्या . मी शांत पंणे म्हणालो  “माफ करा मला नाही प्रवेश देता येणार  त्याला प्रवेश देवून नियमात बसवण कठिण  आहे.”  बाईंच्या डोळ्यात पाणी तरारल. “सर काय लागतील ते पैसे घ्या मी देते, पण नाही म्हणू नका.  परत कशी जाऊ? ं    मुलगा पायऱ्या उतरायला तयार नाही, म्हणतो मी घरीच येणार नाही .”
वाटल तोडून टाकावे नियम आणि देऊन टाकावा प्रवेश ,पण…. पण नाही देऊ शकलो . मी त्या बाई  पेक्षा  असाहाय्य .. वाईट  वाटल  एका बहिणीला एका बहिणीला भाऊबीज न घालताच रिक्त हस्ते परत पाठवण्याच पाप मी केल होत.  खरच पद आणि अधिकार असला तरी त्याच्या वापरावर सीमांच कुंपण असत हेच सत्त्य…..

Tags: