एकदा एका मुंगीने भुंग्यावर केल खुळ प्रेम
भुंग्यानेही तिला पाठीवर नेलं केली मस्त चैन

भूंगा फुलांवर बागडत होता, मुंगी ऐटीत बसली होती
मध्येच भूंगा भरारत होता मुंगीला वाटत होती भिती

या फुलावर त्या फुलावर मध शोधत भूंगा फिरत होता
पाठीवर आपल्या मूंगी आहे क्षणा क्षणाला विसरत होता

कुठे खोड नरम दिसताच हावरट भूंगा पोखरत होता
पाठिवरच्या मुंगीच मरण पण भूंगा आता सुरात होता

नाराज होत मुंगी म्हणाली मोहात पाडून इथवर आणलं
तू मकरंद खाल्ले मध प्यायला सांग मला तू काय दिलं?

भूंगा तिला हसून म्हणाला ते बघ कमळ मी तुला मध देतो
त्याच्या पाकळ्यांचा झुला करुन मस्त उंच झोके देतो

मुंगी हिरमुसली, म्हणाली तू स्वार्थी, मी प्रयत्ने पोट भरीन
तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा मी वारूळाचा रस्ता धरीन

मुंगीने झाडावर उडी मारली आणि हळूहळू ती खाली गेली
त्या झाडाखाली तीचे शहर होते,बापान कान धरून नेली

आई रागे भरत म्हणाली मुली खरे सांग दिवसभर कुठे होती?
सर्व आपल्या नियमित कामात असताना तूच का दिसत नव्हती?

मुंगी डोळ्यात आसवं आणून म्हणाली मी केल एका भूंग्यावर प्रेम                         
कोणत्याही नराचा, विशेषतः स्वार्थी पुरूषांचा कधीच नसतो नेम

आई समजावत म्हणाली अविचाराने पाहू नयेत मोठी, खोटी स्वप्नं
आपल्या कष्टकरी, मेहनती प्रजेच्या राज्यात आपला ईश्वर यत्न

तिथपासून मुंगी सावध झाली, खरे खरे शहाणपण शिकली
राज्यात फिरली,अनुभवाची पुंजी जमवली पडली उठली

प्रेमात मात्र नाही अडकली ती बनली कष्टकरी प्रामाणिक मुंगी
प्रयत्नाने मिळते यश, मोहात पडता धाडसी होतो उगा जायबंदी

Tags:

2 Comments

  1. छान रचना सर
    आयुष्याचे तत्वज्ञान सांगणारी

Comments are closed.