कळेना मनाला ठाव हृदयाचा
कधी स्फोट होतो मनी भावनांचा
संशयी मनाला समजही पटेना
दुःखी राहण्याची हौस ही फिटेना

नजरेस कोणी का द्यावा दिलासा 
चोरुनी पहूनिया भरती उसासा
जीव लावण्याला सखा सापडेना
भाव अंतरीचा मलाही कळेना

मदतीस नाही सखी ओळखीची
 समजुन घेते मीच व्यथा माझी
बोलते स्वतःशी स्पंदन मनाचे
श्वासात भरते अमृत प्रेरणेचे

मलाच वाटे मी एकालाच आहे
परी कोणी मजला दुरूनीच पाहे
संवाद मनाशी कधी कधी होतो
दुरावा थोडा कमी दूर होतो

बिनसले जेव्हा मीच अधीर होतो
पुन्हा सांधताची मला धीर येतो
परी मनी येते जेव्हा उदासी
अलिप्त मी पाहतो मला माणसांशी

जुळती न सुर कुणाशी न माझे
हृदय ही विव्हल म्हणे नको थांबू येथे
टाकुनी कात मी धरतो नवी वा
थांबतो एकांती जिथे वाटे शांत

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags:

2 Comments

 1. I have been exploring for a bit for any high quality
  articles or blog posts in this kind of area . Exploring in Yahoo
  I eventually stumbled upon this web site. Studying this info So i
  am happy to convey that I’ve a very just right uncanny feeling I found out exactly
  what I needed. I most indubitably will make sure to don?t omit
  this web site and provides it a glance on a constant
  basis.

Comments are closed.