मित्रा तिच्या सवे पुन्हा येत आहे तुझ्या शायरीला बहर
तुझ्या लेखणीला आहे अदृश्य डोळे त्यांची तेज नजर

तुझी लेखणी फिल देते षौडशीचे कोमल थरथरते अधर
तु स्वप्नातही पाहतोस, खरंच तुझ्या लेखणीचा कहर

ती भिती, ते अश्रूत ओथंबलेले डोळे करतात पाठलाग
मन हळव होत तुझ्यासाठी पण आणत नाही तुला जाग

तुझ्या शायरी वर्णनात तिच्या सौंदर्याची पूर्ण नजाकत
सगळे सुस्पष्ट नजरेस दिसावे अशी तुझ्या शब्दांची हिमाकत

तुझ्या काव्यातली वळण अन चढ उतार यालाही आकार
वाटत तुझी अन तिची रोजचीच ठरलेली भेट अन मग नकार

तू डोळ्यात साठवतोस तिच रूपड अन शब्दांत गुंफतो
कधी तिची भेट न होताच झाल्याचा आभास तू रंगात मांडतो

नकार पचवण सोप्प नाहीच पण शब्दांत उतरवणही अवघड
तुला सवयच आहे कुंचल्यातून बोलायची आम्ही मठ्ठ, पापड

एक एक रेषा मारत तू विणतोस मनातील विस्कळीत वस्त्र
डोळस असूनही कळत नाही तुझ्या रंगातील वेदनांचे अस्त्र

तुझ्या प्रत्येक काव्यात लपलेली असते असिम अखंड वेदना
तुला आनंदाची उर्मी कधीच का येत नाही, कर की मनी कल्पना

चांदण्या रात्री तू विसवला आहेस झाडाखाली तिच्या मांडीवर
तुमच्या गुजगोष्टी एकत होत्या तारका अन तू आलास भानावर

तुमच ते अद्वेत साधणार प्रतिबिंब दिसत होतं नितळ पाण्यावर
सार नभोमंडळच हळू हळू उतरत होत तिच्या रेशमी साडीवर

तुझं चित्र पाहतांना नकळत मी त्या चित्राचा एक भाग झालो
तिचं लावण्य अनुभवता गेलो गोठून अन खरचं बरबाद झालो

Tags:

1 Comment

  1. तुम्ही स्वप्नात चांगलेच रमलात की.छान मनाचा तरूणपणा पुढील पंचवीस वर्षे तरी असाच असू द्या.

Comments are closed.