कोणी दिला गंध फुलांना कोण देतसे रंग ?
कोणी शिकवली गाणी तुक्याला कोण शिकवी अभंग?

कोणी दिला हा स्वर खगांना कोणी दिले हे पर ?
शिकवले कुणी काड्या वेचून बांधण्यास त्यांना घर?

कोणी दिली नभास निळाई कोणी निर्मिले हे ढग ?
काळ्या मातीतून हिरव्या पाचूचे कसे येते हो पिक?

गगन ठेवले कुणाच्या पाठीवर, कोण देई त्यास आधार?
कोण पाठवी भास्करास धरणी हटविण्या मिट्ट अंधार?

जंगलातील पशू प्राण्यांना कोणाचा असे शेजार?
गाठीस नसले धन तरी गरीबाचा चाले कसा व्यवहार?

कोणी ओतला कुडीत जीव या कसा चालतो श्वास ?
नजरेस हरि दिसेना कूणा मग कुठे करी निवास?

काय म्हणावे मायेला या कसे ओळखावे त्याचे रूप?
कशी करावी भक्ती तुझी मी ना मंत्र तंत्र मज माहित

परी भजीन मी मुक जीव्हेने ना गंधधूप ना दीप
श्रध्देने मी पूजीन तुजला मज दे तुझा फक्त आशीष

Tags:

1 Comment

Comments are closed.