मित्रांनो स्वतःला सुशिक्षित म्हणवता तर एवढं तरी ठरवा
प्रत्येक गोष्ट मनाला पटतय का? विचारूनच रान पेटवा

हे असं फारसा विचार न करता Forward करणं कृपया थांबवा
तुमच्या निराधार बातमीने कोणाचा जीव जाईल तो तरी वाचवा

कोणीही काही करतो Tweet, आम्ही ते पेरतो क्षणात वित वित
पाहता पाहता गावा खेड्यात पोचतं, प्रत्येक जण जगतो भित भित

एखादा नेता उठतो, भलतेच विचार वाटतो, मग जमाव हिंसक बनतो
लाठ्याकाठ्या, दगड, बाटल्या, रस्त्यावर खच, सामान्य त्यात मरतो

आमचे राष्ट्रीयत्व एकता, समता, बंधूता तरी आरक्षणासाठी भांडतो
आमचा देश महान, कायद्याला सारे समान कोणत्या तोंडाने सांगतो?

जागतिक पातळीवर तुमची जात नव्हे तर कामी येईल तुमचे कर्म
शिक्षण क्षेत्रात एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही का आणावा धर्म?

कोणी काय खावे? कोणी काय ल्यावे याचा नका घेऊ तुम्ही अधिकार
जात, धर्म, भाषा, प्रांत यानेच का करणार राजकारण आणि व्यापार?

कोणी? कुठे? कसं राहावं? हे ही तुम्ही उपटसुंभांनी मिळून ठरवावं!
आमच्या वस्तीत तुला स्थान नाही हे ठोकशाही हुकमतीने तुम्ही सांगावं

कोण काय काम करतो? कोणत्या रंगाचे कपडे घालतो? हा हीन विचार
बुध्दी आणि क्षमतेने ठरवावी योग्यता, नागरिकतेला हवा डोळस आधार

कोणतीही कृती करण्यापूर्वी एक भारतीय म्हणून इतकच इमाने करा
जात, धर्म, विषमतेचं विष पसरवण्यापूर्वी स्वतःला डोळस मार्ग धरा

राष्ट्र महान बनवायचे तर पेटून नष्ट होण्यापूर्वी विझवा विषमतेचा वणवा
चला एक होऊन संपवून टाकू, आता भाऊबंधात फुट पाडणाऱ्यांना जळवा

Tags:

2 Comments

Comments are closed.