गत वर्ष संकटात गेले पून्हा पून्हा म्हणू नका
नव वर्षाचे स्वागत करा पण उन्मादात चूकू नका

त्याने शिकविले बरेच काही, बदलवल्या आपल्या सवयी
माणूसकी अन आत्मनिर्भरता, सयंम बाळगू नकोच घाई

काटकसर अन स्वच्छतेची भेट दिली, ती नजरचुकीने सोडू नका
काळ न जाणे तुमची श्रीमंती, वृथा अहंकार मनी बाळगू नका 

कवेत घ्या उद्याची स्वप्ने, संकल्प,आशा, उद्याचा सूर्य तुम्हीच व्हा
गाडून टाका तम् मनीचा, श्रम,विश्वास,श्रध्दा, शीतल चांदणे तुम्हीच व्हा

क्षितिज तुमचे,अवकाश तुमचे, प्रकृती देई साद, तुम्ही प्रतिसाद द्या
ध्येय गाठण्या बलशाली बाहू, मनही प्रफुल्लित, संधी कवेत घ्या

चला टाकू विश्वासाने पाऊल, सूर्यास गाठण्या तुम्ही प्रकाश व्हा
दिवस उद्याचा चैतन्याचा, संकल्पाचा अन सिद्धीचा, शुक्राचा तारा व्हा

करू चला नववर्षाचे स्वागत, सूरात मिळवूनी सूर, यशोगीत गाऊया
शिशिरातील तो शितल चंद्रमा, तेजस्वी उद्याचा सूर्य आनंदे पाहूया

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

2 Comments

Comments are closed.