कोणता पक्ष चांगला हा विचारच फसवा अविचार
पक्ष कोणताही असो, उडदा माजी काळे गोरे हेच सार

आम्ही सत्यवादी, असा वृथा नकोच कुणाचा अहंकार
कुणी आपल्याला दिला असे बिरुद मिरवण्याचा अधिकार

प्रत्येक दिव्याखाली असतो त्याच्या आत्मस्तुतीचा अंधकार
तरीही हवा हवासा होतो त्यांना जाणत्या प्रकाशाचा आधार

दुसऱ्याच हसू व्हावं असा तुमच्या मनी नकळत येतो विचारं
तुमचं खवचट बोलणं, त्याला गंजल्या तलवारीची मिंधी धार

ज्याने दाखवला रस्ता अन केली सोबत त्यालाच जाच देणार
विसरला कसे? गणगोत सोडून गेल्यावर त्याचाच होता शेजार

कसे कोणी म्हणावे की तुम्ही सुशिक्षित अन आहात समजदार?
राजकारण असो की युद्ध निशस्त्र माणसावर नको बेसावध वार

तुमचे तांबारलेले डोळे, अन तुमचे घायाळ बोलणे हेच हत्यार
खोटी सहानुभूती दाखवून, मदतीने कुणाला करू नये लाचार

नेहमी नेहमी तुमच्या या चकव्याला जनता नाही भुलणार
तुम्ही भासवा स्वतःला सज्जन कर्तव्यनिष्ठ तर तुम्हाला मिळेल जनाधार

पण स्वतःच्या मनाला विचारा एक एक मतासाठी हात जोडून होता ना लाचार?
खर तर तो असतो स्वतःच्या जागत्या मनाशी केलेला स्वैर व्यभिचार

करा असे काही असामान्य जनतेने ताठ कण्यानेच करावा तुम्हाला नमस्कार
जसे युध्दात एक हवालदार धारातीर्थी पडण्यापूर्वी शत्रूच्या शेकडोंना करतो ठार

मित्रहो ध्येयवेड्या, निस्वार्थी, कर्तबगार माणसाला असतो मावळ्यांचा आधार
जिजाऊसारखी आई, मावळ्यांसारखे पाठीराखेच देत असतात स्वप्नांना आकार

Tags:

1 Comment

Comments are closed.