तक्रार

तक्रार

तू भेटलास अचानक अन नकळत सूर जुळले
कल्पनेचे चित्र मनाच्या बागेत आपसूक फुलले
तुझा बांधा, तुझा रंग, तुझे नाक, तुझे केस अन डोळे
तुझी छबी, माझ्या मनातील राजकुमार, मला कळले
दोन चार भेटीतच भुरळ पाडलीस, मन तुझ्यावर जडले

आपले भेटणे, खाणे, फिरणे, भन्नाट जगणे आवडले
प्रेमाच्या गप्पांच्या ओघात तूला पूरते मनी ओतले
दिवस, महिने मजेत, अन पहाता पहाता वर्ष सरले
सुखाचे फुल आमच्या नकळत अलगद नाभीत फुलले
मी त्याचा सूर पहात कुजबुजत त्याच्या कानी घातले

तो सावरत म्हणाला “राणी” अद्याप यासाठी मी नाही तयार
अग,एवढ्या लहान वयात,ओळख पटल्या शिवाय कसला संसार?
आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ,तासा भरात ते उतवतील भार
ती अबोल, या आबोलीची कळीच खुडताना डोळ्यासमोर अंधार
चूक तर तिचीही होती प्रेमाच्या पायऱ्या चढताना नव्हता आधार

भावना आवेगात तिने स्वतःचे केस जोराने ओरबाडले
तो तटस्थ तिला समजावत,पाहता पाहता त्याचेही डोळे भरले
जोराने रडावे असेही वाटले, त्याने तिला मायेने जवळ घेतले
राणी मी नाहीच तुला फसवणार, पण हे अघटीतच घडले
गर्भा शप्पथ, विश्वास ठेव, तिनेही मग त्याला बाहुपाशात ओढले

संभ्रम मनातील संपला तरी ती मात्र फारच दुखावली
कळी खुलण्यापूर्वीच कोमेजून स्वतःत अकाली हरवली
आता ते भेटतात तेव्हा मुक ऋदन, मनोमिलन होतच नाही
त्या दोघांचे निस्सीम प्रेम तरीही तो तिला उमगत नाही
कोणी कोणाकडे करावी तक्रार हे दोघांनाही उमगत नाही

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “तक्रार

  1. Pratima Deo

    खुप कठीण प्रसंग छान मांडवात.

  2. भोसले राजेंद्र
    भोसले राजेंद्र says:

    Nakki dosh kunacha? Chanach…sir.

  3. Kocharekar mangesh
    Kocharekar mangesh says:

    Dev Madam ,Bhosale thanks for
    Complement.

  4. cheap wigs

    Very satisfied, I bought it for the second time. I don’t see it as a wig

Comments are closed.