माझ्या गावाची पायवाट, लाल तांबडी सडक
नका घालुनी डांबर, तिला करू रे विद्रूप

तिला पहा विचारून, का तिचा रंग असा भडक
प्रेमाखातर तुमच्या, तिने किती गाळले नित्य रक्त

रोज लाथाडून जाता, परी ती नाही कुणा काही सांगत
गाड्या, टांग्याचे आसूड छातीवर, परी नाही ती कण्हत

तिने सांभाळली किती पदचिन्हे तिचे तिला माहित
चोर, सावकार, कुणी कष्टकरी,कुणी संत, थोर पुण्यवंत

वृक्ष जन्म घेती तिच्या कुशीत, देती आम्हा छाया
केली सोबत त्यांनी सडकेला, तिच्यावरती माया

परी आम्ही अतिशहाणे झालो जुलूम तिच्यावर केला
मातीच्या वाटे ऐवजी, डांबरी सडकेचा आग्रह धरला

सर्व्हेअर मग आला आणि तो निरीक्षण करून गेला
चार दिवसांनी जेसीबी ने सारा रस्ता सपाट केला

गेली डांबरी खाली माझी माझी प्रिय तांबडी वाट
काळतोंड्या डांबरीचे मला सांगू नका कौतुक

आता येता मध्यान्ही चुकून, पाय जाळते डांबरी निर्दय
नाही कुणाची दया, छकुल्यांच्या तळव्याची गत काय?

माझ्या स्वप्नात तांबडी वाट येते दावते पाऊल खुणा
मज विचारते अश्रूने, पिल्ला सांग काय झाला गुन्हा

समजावून सांगितले तिजला, हि नव्या युगाची किमया
भावनेला इथे न थारा, सूखाची लागते किंमत मोजाया

दिर्घ उसासा सोडून तिने, कवटाळून घेतले निज वदन
बदल घडणे क्रमप्राप्त आहे, जूने जाई मरणा लागून

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

7 Comments

  1. अगदी खर सर. डम्बरी रस्ते झाल्याने मातीचे रास्ते झाकले गेले व त्यामुळे उष्णता वाढली. माटिवर चलने नेहमीच चांगले. परंतु कालानुरूप बदल झाले. परंतु मातीचे रस्ते नेहमी अथावनार

  2. छान… कविता
    अशी असा आमच्या कोकणची माती,आणि त्या तांबड्या मातीचे रस्ते.

  3. कुलकर्णी मॅडम,अब्दुल रहीम,नेहा तेंडोलकर अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  4. I can’t wait to try it when I receive it. It’s very natural to bring it. The buckle is very firm. I’ve been wearing it for two days and I don’t have to worry about the volume anymore~ I’m very satisfied😻

Comments are closed.