मुंबईच शांघाय बनवूया, मुंबईला एक नवी ओळख देवूया हे पालुपद कोणाच सांगायची गरज नाही. काही राजकारण्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच आश्वासन दिल आहे. खुब वर्षपुर्वी  एका पक्षान हमे गरिबी हटानी है। चा नारा दिला आणि पाहता पाहता सगळ्या गरिबांनाच हटवून टाकल. “आले लाडोबाच्या  मना तिथ सामान्याच चालेना!” अस म्हणायची पाळी  आली आहे. ह्या मुंबईमधून कोणे काळी सोन्याचा धूर निघत होता. हा धूर राजकारण्यांच्या डोळ्यात गेला त्यांनी विडा उचलला ह्या गिरण्या बंद केल्याशिवाय पर्याय नाही. झाल दिल्लीचा आदेश सुटला काहीही करा हा धूर बंद करा. भोंगे बंद झाले. धड धड थांबली. गरीबाचा श्वास थांबला. जागा मोकळ्या झाल्या इमले  उभे राहिले गिरण कामगार आधीच बाहेर होते आता रस्त्यावर आले. गिरण्यांची जागा पाहता पाहता हवेत विरून गेली. गिरणी कामगाराला घराचे दिलेले आश्वासनही हवेत विरून गेले. चार दोन गिरणी कामगारांना घरे मंजूर झाली पण तेच्रे हयातच नाहीत मग हक्क सांगायला येणार कुठून ?  ह्यांच्या पथ्यावर  पडले ह्या जागा त्यांनी आपल्या पिट्ट्या लोकांना वाटल्या.किती दयाळू किती कनवाळू झोपडीत राहणाऱ्या लोकांची ह्या महोदयांना इतकी दया आली कि सांगता सोय नाही. ह्यांनी विशेष अधिसुचना जारी  केली. झोपडपट्टी निर्मुलन योजना रातो रात लागू झाली. झोपडपट्टीत राहणारा भलताच खुश झाला चला आता आपणही इमारतीत राहायला जाणार,घरात धो धो पाणी असणार ,सार्वजनिक संडास ऐवजी कमोड असणार, इमारतीला लिफ्ट असणार. किती स्वप्न त्या रात्री रंगवली असावी. बिच्चाऱ्या लोकांना झोपडपट्टी निर्मुलांचा अर्थ सांगणार तरी कोण त्यांचे नेते मोठ्या नेत्याच्या दावणीला. नेता बोले भाट चाले ,त्यांच्या चमचे मंडळीचा डोळा कमिशनवर,एखादी झोपडपट्टी बिल्डरच्या स्वाधीन केली कि ह्यांच्या साहेबाचे भले आणि ह्यांचे भले मगगरीब रहिवाश्यांचा विचार ह्यांनी का म्हणून करावा?
    पाहता पाहता एस आर ए नावच भूत मानगुटीला बसलं झोपड्यांच्या चवकटी जेसीबी नामक राक्षसाने अल्लद उखडून टाकल्या,मुहूर्ताचा नारळ बड्या साहेबांन  वाढवला. टिकावाचा पहिला घाव जमिनीवर घातला गोड गोड अश्ह्वासानच पुडक जमलेल्या गरीबासमोर टाकून त्यांना स्वप्नात सोडून गेला.गरीब अडाणी जनतानेत्याच्या भाषणाला भुलली “चला  आपला जल्म झोपडीत गेला पण आपली पोर आता इमारतीत राहणार,नळावर भांडण नको कि संडासला रांग  नको ” पाहता पाहता जेसीबीन झोपड्यांच अस्तित्वच पुसून टाकल. पोर टोर त्या धड धडणाऱ्या जेसीबीकडे कुतूहलान पाहत होती. त्यांच्या खेळायच्या चिंचोळ्या गल्लीत कामगारांच्या शेड उभ्या राहिल्या. मोठ्या माणसांनी पोरांची समजूत काढली अरे मुलानो आता कि नाही आपण मोठ्या इमारतीत राहायला जाणार. लोकांनाच कळेना खरच का इथ आपण राहायचो ? बिल्डरनि दिलेल्या पर्यायी जागेवर फुकट राहायला मिळत होत त्यामुळे भोळी माणस  खुश होती. वर्ष वर्ष पाठी पडत होत मोकळ्याजागेवर अजुन इमारतीचा पत्ताच नव्हता. बिल्डरचा माणुस अर्ध भाड  वसूल करायला येऊ लागला  अर्ध भाड भरतांना पायाखालची जमीन सरकल्याचा भास होऊ लागला. आत्ता फारच उशीर झाला होता परतीच्या दोऱ्या केव्हाच कापल्या गेल्या होत्या. फारच ओरड झाली तेव्हा इमारत उभी राहिलीही.

इमारतीत खोल्यांचा ताबा घेतांना लक्षात आल अरे ह्या पेक्षा झोपडीतली जागा मोठी होती पण आत्ता उपाय नव्हता, ज्या लोकांच्या खोल्या अगदीच लहान होत्या त्यांना  मात्र दिलासा मिळाला.अर्ध भाड  भरतांना झालेली दमछाक लोक विसरले. नव्या ब्लॉकचा ताबा घेतांना ह्याच विस्मरण झाल.  भोग संपले. वर्ष दिड वर्ष सुखात गेल अन मग हाती मेंटेनन्स बिल हाती पडल. महिन्याला दिड हजार प्रमाणे दीड वर्षाचे जवळ जवळ तीस हजार भरायचे होते अनेकांना कळेना एव्हडे पैसे भरायचे कुठून ? काही खोली मालकांनी सावकार गाठला खोलीवर कर्ज काढल पर्यायाच नव्हता. कोणे काळी हक्काच्या खोलीत राहतांना भाड  भरायची भुणभुण नव्हती आत्ता भाड्या एवजी भराव लागणार मेंटेनन्स इतक होत कि झक मारली आणि इमारत पहिली अस म्हणायची पाळी लोकांवर आली.        
 हळू हळू काढलेल्या कर्जाच  व्याज फुगत गेल. जिथे घरात महिन्याकाठी आठ दहा हजार येत होते त्यांना दर महा दोन तीन हजार मेंटेनन्स परवडणार कसा?इतके करूनही लोक तग धरून होते. आपल्याला राहायला हक्काच  घर तेही शहरात आहे हे समाधान होत. चार वर्षातच प्लास्टर खराब झाल,बाथरूम ,संडासची गळती सुरु झाली.ईमारतीला  अवकळा आली. दुरुस्ती करून घ्यावी तर अर्ध अधिक लोकांचे खिसे खाली. काही लोकांनी कंटाळून रूम विकून  पळ काढला. इमारतीच्या दुरुस्तीमधून मतभेद वाढले. झोपड्या असतांना जो
समजूतदारपणा होता जे प्रेमच नात होत तेच बंद खोल्या झाल्यावर नाहीस झाल. काही ह्या बदलाने हळहळले पण काहीच मार्ग नव्हता. पक्क्या घरात आणि इमारीत राहायच्या मोहापाई स्वताची हक्काची जागा लोक गमावून बसलेच होते पण इमारतीत राहायला गेल्या पासून माणुसकीच हरवून गेली.चांडाळ  इमारतीन घर घरात फुट पाडली. सारी माणुसकीच खोल्यांचा कपाटात  बंद झाली. इमारतीत राहण्याचं सुख बोचू लागल. धनदांडग्या बिल्डर आणि राजकारण्यांनी डाव साधला इमारतीच्या पक्क्या खोल्यांचं गजर दाखवत जागा हडप केल्या.      
आत्ता न चैतन्य ना , जिव्हाळा इमारतीतही श्वास नाही मोकळा.

Tags:

1 Comment

Comments are closed.