गोरा साहेब गेला तेव्हा स्वातंत्र्य मिरवत नाचलो होतो
तिरंग्यासह मिरवणुकीत रस्त्यावर मुक्त फिरलो होतो
स्वातंत्र्य गाणी गुणगुणत उपासपोटी जागलो होतो
पारतंत्र्य संपलं म्हणत आनंदात खुळा रडलो होतो

गोरा साहेब गेला अन लोकशाहीची ठोकशाही आली
सच्च्या स्वातंत्र्य सैनिकांची लोकशाहीला अडगळ झाली
नव्या दमाची नेतेमंडळी गवता प्रमाणे उगवून आली
आता सारे पेटवू रान म्हणणारी, बुजुर्ग अश्रुत चिंब भिजली

राष्ट्रीय शाळा गेल्या अन स्कॉटिश सीबीएससी आल्या
सुटा बुटात अन टाय लावलेले स्टुडंट ऐटीत फिरू लागले
येस, नो, नेव्हर माईंड म्हणत ते मातृभाषेला पारखे झाले
गरिबांची मुलं नगरपालिका शाळेत आता टॅबसह डोले

आता प्रत्येक निवडणुकीत गल्ली, बोळ रक्तात भिजते
नोटांची पुडकी अन पार्टी देत मत सहज विकत मिळते
सत्तेच्या बाजारात लोकशाही रस्त्यावर बेवारस फिरते
बापू तुमच्या देशात पाणी नसेल पण गावठी कुठेही मिळते

नेते मंडळी उघडपणे कुठेही शासनाची लूटमार करतात
विहीर, धरण, रस्ता,शाळा यांचा पैसा ठेकेदार खातात
घरात शिरून कुणाही तरुणीचे दिवसा अपहरण करतात
अत्याचार करूनही शिक्षेविना, भर चौकात निर्धास्त फिरतात

बापू इतकं स्वस्त स्वातंत्र या देशात गुंड, नेत्यांना आहे
करोडोचा हप्ता या देशात मंत्री, अधिकारी, साहेबांना आहे
अब्रू लुटण्याचा अधिकार रोमियो अन खादी नेत्यांना आहे
तरीही उजळ माथ्याने सभागृहात बसण्याचा हक्क आहे

या देशात बेईमानी खपते पण प्रामाणिक टिकत नाही
आरक्षणाचा बागुलबुवा करत नोकर भरती होत नाही
BEd बेकार, इंजिनिअर बेकार राजकारण पार मोकार
बापू सांग का देशात लोकशाही आंधळी अन बहिरी ठार?

गोरा गेला, पण लोकशाहीत, टोपीधारी नेताच गुंड झाला
सामान्य माणूस भिके कंगाल चिरडा झोपडीतच त्याला
भारत स्वतंत्र देश आहे हे सांगूनही कुणाला पटत नाही
तुझ्या या स्वतंत्र देशात बापू गरिबाला स्वातंत्र्य उरत नाही

बापू देश स्वतंत्र झालाय हे खरंच सांगूनही पटत नाही

Tags:

2 Comments

Comments are closed.