गर्भातला अंकुर हूंकारत म्हणाला मला काही सांगायचं
जन्मा आधिच,वाट्याला यातना, हे अघोरी कृत्य थांबवायचं

मी मुलगा की मुलगी! हे जाणून तुम्हाला काय साधायचं?
मुलगा म्हणून मी जन्मलो, तरच कौतुक, हे मला संपवायचं

मुलगी म्हणून मी जन्मले तर, संपवून टाकणे हे का सोसायचं?
गर्भ अवस्थेत माझी लिंग चाचणी, हे सैतानी सुत्रच चुकवायचं

बुद्धी असुनही भेदभाव, हा लिंगभेदी खेळ कुठवर खेळायचा?
सोनोग्राफी करताच शहाणपण, गर्भ स्त्रीलिंगी म्हणून पाडायचा

नवऱ्याला हवा कुलदीपक म्हणून बाईनेच भार का उचलावा?
माता म्हणून फक्त मुलासाठी, तिने नवू महिने भोग  भोगावा

मी जर मुलगी जन्मले तर भविष्यात करालच ना माझा  उध्दार?
स्त्री जन्म म्हणजे  कुटूबात कलंक,नशिबात काळा मिट्ट अंधार

खरे वाटते का तुम्हाला कुलदीपक म्हणजे होईल घराचा आधार?
किती उदाहरणे पहाल तुम्ही, खरच आपण का  अंध, बहिरे ठार?

कुणी दिला आपल्याला तिच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार?
खुले आम होतो, अगदी लग्नातही, स्त्रीचा सोज्वळपणे व्यापार

हुंडा दिला नाही  म्हणून तिच्या खानदानाचा का करावा उध्दार?
स्त्री जन्मच नसेल तर  कलीयूगी नर जन्म आणि कुठला संसार

स्त्री असते अबला,असाह्य, हा पशूतुल्या कोत्या मनाचा विचार
काबाडकष्ट उपसुन,सुख देताना, का बरे खावा तीने लत्ता प्रहार?

या पूढे हे  मी सहन करणार नाही मी घडवीन एक निश्चयी आई
बाळ “ती” असो वा “तो” आई करील सांभाळ ती होईल प्रेमळ माई

मी ‘तो’ आहे की ‘ती’ ,डॉक्टर तुम्ही कुणालाही  सांगणार नाही!
पेशाची तुम्हाला शपथ अडचणी शिवाय चाचणी करणार नाही

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

4 Comments

  1. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.

Comments are closed.