विसरू पाहातो, ते दिवस ती सांज अन तो डुंबणारा सुर्य
रोजचीच भेट, मुक संवाद, फुलणारा श्वास अन विरह

मी मंत्रमुग्ध होत होतो, जुईचा गजरा तुझ्या केसांत माळताना
नजरेत तुझ्या अनामिक भिती बावरत होतीस, ते सुख भोगतांना

तुझा हळूवार स्पर्श, माझे रोमांचीत मन, स्वप्नात तिच धुंदी
तुझ्या मृदुल स्पर्शाचा गंध रोमारोमात त्या नशेत मी बंदी

तुझे ते मदमस्त अधर, अन डोळ्यांत निळा संयमी सागर
अस्ताची खट्याळ किरणे ओठांवर,तो राक्तिमा कवळी गाजर

तुझ्या गालावरची खळी अन ओठावरचे ते मधुर मंद स्मित
तू न बोलता मज कळते, तव हृदयीचे कोमल भाव अन संगीत

तुझी प्रतिमा मज मनी त्याचे प्रतिबिंब मी पाहतो तव नयनी
तूच व्यापून राहिली विचारात, तू सदैव छायेसम असशी जीवनी

तू विभ्रम की भ्रम फिरतेस श्वास होऊनी, रक्तात येशी फिरुनी
घेतेस मनाचा ताबा, न कुठेही त्याचा थांबा, मंत्रमुग्ध मज करुनी

कितीही वेळ तुझ्या सवे घालवला तरी भरतच नाही माझं मन
तू म्हणजे माझी प्रतिभा, माझा श्वास, ध्यास अन मौलिक धन

तूझे रूप जणू शक्तीची मशाल, माझ्या प्रतिभेचा तूच महाल
तूच माझी प्रेरणा, तूच देतेस कल्पना, तू माझ्या मनावरील मायाजाल

Tags:

5 Comments

Comments are closed.