तिचं-माझं नेमकं काय नातं होतं ते ती गेल्यावर मला समजलं. तिला सर्वजण ‘राणीची आई’ नावाने हाक मारायचे, मला समज आल्या पासून मीही तिला राणीची आई नावानेच हाक मारू लागलो. तिने मला तशी हाक मारण्याला विरोध केला नाही. घरातील सगळी वरकड कामे ती न थकता करत असे. घरात माझा थाट राजकुमार असल्याप्रमाणे असे. मला कळायला लागल्या पासून काका, काकी, आत्या, आजी सगळेचजण माझी खूप काळजी घेत. मला काय हवे ,काय नको हे पाहताना कोणीही हयगय करीत नसे. अर्थात याची जाणीव मला दहावीत असताना झाली. मी अभ्यास करायला बसलो की सुमाआत्त्या मला पाणी हवंय की चहा हवाय याची काळजी घ्यायची. कुणी घरात मोठ्याने बोलू लागलं तर समज द्यायची, “स्नेहलची परीक्षा जवळ आली आहे, त्याला त्रास होता कामा नये”. काका कामावरून येताना रोज काहींना काही खाऊ घेऊन यायचे, माझ्या काकांची मुले माझ्या मागच्या इयत्तेत शिकत होती. माझ्याशी ती खेळत. आम्ही कधीकधी एकत्र बसूनही अभ्यास करत असू परंतु काका त्यांच्यापेक्षा माझ्या अभ्यासावर जास्त लक्ष द्यायचे. दहावी इयत्तेत मी सोळा वर्षांचा होतो. विचार करण्याची पुरेशी समज मला आली होती. माझ्या चुलतभावंडापेक्षा माझ्यावर घरातील प्रत्येकाचे बारीक लक्ष आहे असं मला जाणवत होतं, पण मी नक्की कोणाचा कोण? माझे आई बाबा कुठे आहेत हा प्रश्न विचारला की सारेच जण निरुत्तर होऊन माझ्याकडे पाहत रहात. आत्या तर मला जवळ घेऊन गोंजारत म्हणायची “बाळा, ज्या गोष्टी आपल्या हाती नाहीत, भाग्यात नाहीत त्याचा विचार करू नये. तरीही माझा ‘मी’ चा शोध जारी होता. मला आजपर्यंत  कधीही कुणीही कळू दिले नाही की माझे आई-बाबा  कुठे आहेत? त्यांचं  काय झालं? माझ्या आई वडिलांचं अस्तित्व काय, हे रहस्य, त्याच ओझे वागवत मी वाढत होतो. मी समाधानी रहावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या कोणाकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते याचे मला आश्चर्य वाटत होते आणि ते पटतही नव्हते. राणीच्या आईला देखील हा प्रश्न मी विचारला, “राणीची आई, माझे आई-बाबा कुठे गेले? माझी आई कुठे आहे?” ती निःश्वास टाकत आणि माझ्या केसातुन हात फिरवत म्हणाली, “स्नेहल, राजा मला खरंच ठाऊक नाही”.

माझ्या नावा पुढे भरत पंडित लिहिलं जातं याचा अर्थ भरत पंडित हेच माझे बाबा. पण त्यांच्याविषयी कोणीच का सांगत नाही? काय झाले त्यांचे? कुठे आहेत ते? हे कोडं उलगडलं नाही. ही राणीची आई कोण? ती इथे का राहते? ह्याच उत्तर कोणी दिलं नाही. मी हाच प्रश्न एकदा संध्याकाळी आजीला विचारला, तिला सांगण्याविषयी शपथ घातली तर आजी सुस्कारे टाकत मला घट्ट मिठी मारून किती तरी वेळ रडत होती पण तिने ते गुपित उघड केले नाही. काकांना विचारायचे धाडस माझ्यात नव्हते. माझ्या प्रत्येक यशाचे स्वागत आणि सेलिब्रेशन काका जसे करत होते ते पाहता त्यांचे माझ्यावर किती प्रेम असावे ते मी समजू शकत होतो. त्यामुळे असेल कदाचित पण काकांना दुःखी करायची हिम्मत माझ्यात नव्हती. मी माझे सांत्वन करत होतो. मी आता मोठा होत होतो दीर्घ काळ ही बाब आता लपून राहणार नव्हती.

राणीची आई स्वभावाने सालस, सोज्वळ आणि शांत होती. ती घरातील सर्व काम आनंदाने करत राही. कोणते काम तिने करावे आणि कोणते नाही असे काही निर्बंध नव्हते. आजी कधीकधी तीची वेणी फणी करीत असे. तीची वेणी फणी करतांना आजी अगदी शांत आणि एकाग्र दिसे. राणीच्या आईवर कधीही कुणाला रागावलेले मी पाहिले नव्हते. तरीही राणीची आई इतर वेळेस तिच्या खोलीत बसून कधी गोधड्या शिव, तर कधी तोरण विण असली कामे करत बसे. नियमित सकाळी राणीची आई तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालून, डोळे मिटून नमस्कार करत असे. तिच्या कपाळी ठसठशीत कुंकू लावल्यामुळे तीची गोरी कांती उजळून दिसे. पण ही राणी कोण? याचाही थांग पत्ता मला आज पर्यंत कुणी लागू दिला नव्हता. कधीकधी वाटे मी आणि राणीची आई दोघेही अभागीच, तिलाही कदाचित स्व चा शोध असेल.मी दहावी बोर्ड परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आलो, तर काकांनी सर्व शिक्षकांना पेढे वाटले. घरी नातेवाईक बोलावून पार्टी दिली. मला जवळ घेत म्हणाले, “स्नेहल,, आता तू मोठा झालास, तुझी अभ्यासाची जबाबदारी वाढली”.तेव्हा मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटला, “काका मी मोठा झालो हे खरं ना, तर माझे आई बाबा कोण ते मला सांगायला काहीच हरकत नाही”, पण शब्द ओठातच राहिले, ज्या काकांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी घेतली त्यांना नको असा प्रश्न विचारून दुःख देणं मला बर वाटेना. मी इतके वर्ष अज्ञात उत्तराच्या शोधात होतो, अजुन थोडे थांबण्याची माझी तयारी होती.

मी नावाजलेल्या कॉलेज मध्ये जाऊ लागलो. सगळे नवे वातावरण, नवे मित्र पण त्या मित्रांची देखील मला भीती वाटत असे. जर कुणी विचारले की ‘तुझे बाबा काय करतात? कुठे जॉब करतात?’ तर काय सांगायचे? माझ्या नशिबाने कॉलेज मध्ये सर्व नवीन असल्याने आणि अद्यापि तेवढी गाढ मैत्री कुणाशी झाली नसल्याने कुणी नसते प्रश्न विचारण्याच्या फंदात पडले नव्हते. दोन-महिने झाले आणि एक दिवस क्लास मध्ये parent meeting ची नोटीस आली. मी घरी काकूला त्याबद्दल सांगितले. माझे काका काकूला म्हणाले शनिवारी मला असाही half day आहे, तू क्लास जवळ थांब मी परस्पर तिथे येतो. मी हे माझ्या study room मधून ऐकलं तेव्हा मला पुन्हा त्यांना विचारावं अस वाटलं. “कोण आहेत माझे बाबा? की मी अनाथ आहे? मला इथे  कोणी आणले?” पण सर्व प्रश्न घशात अडले. काय केलं नाही या काका आणि काकूंनी आपल्यासाठी? स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त काळजी घेतात, हवी असणारी प्रत्येक गोष्ट न मागता देतात आणि आई वडील यांची आठवण होऊ नये इतकं प्रेम देतात. तरीही माझ्या मनात माझ्या जन्मदात्याविषयी असणारी ओढ मला शांत राहू देत नव्हती. एक दिवस मी माझ्या आत्याला थांबवून विचारलं, “आत्त्या, मी आता लहान राहिलो नाही, माझ्या पासून तुम्ही किती दिवस हे लपवून ठेवणार आहात? मला माझ्या आई-बाबांचे काय झाले हे समजून घेण्याचा हक्क आहे ना?” तेव्हा ती मला गोंजारत म्हणाली “हे पहा, आम्ही काही लपवून ठेवत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या वेळ येईल तेव्हाच कळणे योग्य असते”.

आत्या मला निरुत्तर करून निघून गेली. माझे मन मात्र मला स्वस्थ बसू देईना. काका-काकू घरात नसतील तेव्हा मी वेड्यासारखा कोsहम?च्या शोधास लागे, माझ्या दुर्दैवाने त्यात मला कधीही यश लाभले नाही. मी कॉलेजला गेलो त्याच्या दुसऱ्या महिन्यात काकांनी मला मोबाईल घेवुन दिला. आज पर्यंत मला शिकवणी ठेवण्यात आली नव्हती. आत्या तिचा जॉब सांभाळून आम्हा मुलांचा अभ्यास घेत असे, पण आता मी सायन्सला प्रवेश घेतल्याने आणि घरी मार्गदर्शन करणारे कोणी नसल्याने मला खाजगी शिकवणी ठेवण्यात आली. मी नेटाने अभ्यास करत होतो. मला लवकर मोठे होऊन माझ्या प्रश्नांच्या शोधात बाहेर पडायचे होते. मी बारावी नव्वद टक्क्यांनी उत्तीर्ण झालो तेव्हा काकांनी आजूबाजूच्या घरी पेढे वाटले. काही निवडक मंडळींना पार्टी दिली, या पार्टीत कुणीतरी म्हणालं, “भरतचा मुलगा त्याच्यासारखाच हुशार निघाला. आनंद झाला. आज भरत हवा होता”. तेव्हा पहिल्यांदा मला समजलं की माझे बाबा हयात नाहीत. आता वडिलांच्या शोधाची मोहीम हाती घ्यायची हे मी ठाम ठरवलं. मी नव्वद टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो हे राणीच्या आईला समजलं तिथंपासून ती सारखी ओठातल्या ओठात हसायची. स्वतःशी पुटपुटायची. मला पाहिलं की माझ्या गालावरून हात फिरवत बोट कडाकडा मोडायची. मात्र मला तरीही त्याचा अर्थबोध होत नव्हता. आता सत्य दीर्घ काळ लपून राहणार नाही याची खात्री होती. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला त्यासाठी लागणारी भली मोठ्ठी फी काकांनी भरली तेव्हाही आश्चर्य वाटलं. नवे शूज, नवी सॅक आणि नवे कपडे देखील. कोणाविषयी नाराजी व्यक्त करायला कारण नव्हतंच. काका इतका खर्च माझ्यावर का करत आहेत? हा प्रश्र्न मला अनेकदा पडला पण  काकांशिवाय पुढे शिकण्याचा अन्य मार्गही मला नव्हता.पहिली सेमीस्टर परीक्षा झाली, मी आमच्या वर्गात पहिला होतो. मी घरी काकूला सांगितलं तेव्हा तिचेही डोळे पाणावले, काकांनी मला जवळ घेत शाब्बासकी दिली. काकू म्हणाली आमच्या कष्टांचे चीज झाले. तरीही त्यांच्या बोलण्याचा अर्थ बोध मला झाला नाही. त्या वर्षभरात माझ्या सहवासात जे मित्रमैत्रिणी आल्या त्यांनी माझ्या आईवडिलांना भेटण्याचा आग्रह धरला.

एक दिवस मी काकांचा मुड पाहून विषय काढला, “अरुण काका, मला एक विचारायचं आहे सांगाल ना?” काकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली, “हं, विचार, काय हवंय?” “काका, मी खरंच मी कोण आहे?” ते हसले, “तू एक गुणी अभ्यासू मुलगा आहेस आणि आमचा पुतण्या देखील, मला तुझा अभिमान आहे”. इतके बोलुन ते निघून गेले. त्यांना अडवून विचारावं अस तेव्हाही मला वाटलं पण जमलं नाही. आठ पंधरा दिवस गेले,मी पुन्हा तोच प्रयत्न काकुकडे केला, “काकू तुम्ही माझ्यावर अलोट प्रेम करता, मला ठाऊक आहे संजू आणि शर्विका यांच्यापेक्षा तुमचा माझ्यावर अधिक जीव आहे हे मला समजतंय पण खरंच मी कोण आहे? का माझ्यावर कुणी रागावत नाही? का तुम्ही सर्व माझी इतकी काळजी घेता?” काकू हसली, तिने मला जवळ घेऊन गोंजरावं इतका लहान राहिलो नव्हतो. मला अठरा वर्ष झाली होती. ती हसली आणि म्हणाली, “तू आमचा मोठा मुलगा आहेस, आणि आमच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तू आमच्या अपेक्षा पूर्ण करणार ना?”  प्रश्नाचं उत्तर टाळून तिने मलाच मलाच प्रश्नाच्या गुहेत सोडलं. मी हसून प्रॉमिस दिलं. मी पुढे तिला काही विचारणार तो ती निघून गेली. मी ठरवले कदाचित राणीच्या आईकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे  असतील. पण राणीच्या आईकडे पाहिलं की ती स्वतःच एक कोडं वाटायची. कधी कुठेतरी टक लावून पहात राहायची तर कधी देवासमोर बसून अस्पष्ट गुणगुणत टाळया वाजवत रहायची. तरीही मी राणीच्या आईला एक दिवस विचारले, “राणीची आई, मी कोण आहे? तुला माहित असले ना?” ती हसत म्हणाली “मला ठाऊक आहे पण मी नाही सांगणार”. ती  खळाळून हसली, तिचं ते हसणं मला उपरोधिक वाटलं, ती कोण? हे तिला माहीत नव्हते आणि मी माझी ओळख तिला विचारत होतो.

मी दुसऱ्या सेमीस्टर मध्ये गेलो तेव्हा माझा मित्र परिवार वाढला, प्रत्येकाला माझा सहवास हवाहवासा वाटू लागला, प्रीतम याला अपवाद नव्हती. खरं तर मी स्वतःच्या शोधात होतो. मित्र असले तरी मी वाजवीपेक्षा त्यांच्या जवळ जात नसे. माझ्यात भयगंड निर्माण झाला होता.कुणी विचारलं तुझे बाबा काय करतात? तर काय सांगायचे? मी कोण? चा माझा शोध संपलाच नव्हता. खरं तर प्रीतम हेगडे ही काही माझी प्रॅक्टिकल पार्टनर नव्हती, केवळ ठराविक विषयाच्या अनुषंगाने आम्ही एकत्र येत होतो. ती अनेक वेळा काही प्रॉब्लेम, काही difficulty मला विचारायची आणि मी तिचा प्रॉब्लेम सोडवला की Thanks Yaar, असं म्हणायची.Girfriend  म्हणून मी तिचा कधी विचार केला नव्हता. प्रितमने एक दिवस मला गाठलं आणि Let’s have a coffee असा आग्रह केला. काका मला पॉकेटमनी म्हणून दोनशे रुपये द्यायचे. कधीतरी मी कॅन्टीन मध्ये जायचो, पण कॅन्टीनमध्ये मित्र मैत्रीणी सोबत जाऊन खर्च करणं मला परवडणार नव्हतं. प्रितामला नकार द्यावा असच मला वाटलं, पण नाही जमलं. माझी पावलं तिच्या मागोमाग कॅंटीनकडे वळली. तिने कोपऱ्यात असलेलं टेबल गाठलं. खरं तर तिच्या बरोबर असं कोपऱ्यात बसून गप्पा मारणं किंवा कॉफी पिणं मला मान्य नव्हतं. पण मी नकार दिला असता तर माझ्यावर बावळट असल्याचा शिक्का बसला असता. कॉफी पिता पिता डॅडी व्होल्टास कंपनीत पर्सनल मॅनेजर आणि ममा हेक्स्टफार्मा मध्ये पर्सनल सेक्रेटरी असल्याचं सांगितलं. माझी छाती दडपून गेली. आत्ता ती नक्की आपली माहिती विचारणार याची जाणीव झाली. मी माझी सॅक उचलली आणि “बाय प्रीतम मला एका फंक्शनला फॅमिली बरोबर जायच आहे. सी यू देन”. असं म्हणून बाहेर पडलो. “अरे स्नेहल थोड थांब ना, आपण बरोबर जाऊ”. तिने रिक्वेस्ट केली पण मला पुढचा प्रसंग टाळायचा होता. “साॅरी यार, सम अदर टाईम”. मी सॅक पाठीवर टाकून निघालो, कॅम्पसबाहेर येई पर्यंत माझ्यावर दडपण होत, ती माझ्या मागोमाग आली तर! पण नाही आली आणि मी निःश्वास सोडला.

मी घरी पोचलो तरी मी विचारात होतो. कधी कधी जेवणाकडे माझ लक्ष नसायचं आणि काकू माझ्या लक्षात आणून द्यायची. तर कधी मी राणीच्या आईवर रागवयाचो. विशेषतः माझी पुस्तकं मला मिळाली नाही तर, राणीची आई माझी रूम स्वच्छ करून ठेवायची, पुस्तके लावून ठेवायची. मला घाईत पुस्तक मिळालं नाही की मी तिच्यावर ओरडायचो देखिल पण ती कधी माझ्यावर रागावली नाही. तिने कधी नाराजी व्यक्त केली नाही. ती फक्त ओठात हसायची. त्या रात्री मी अभ्यास करत होतो.जर्नल, ड्रॉइंग पूर्ण करताकरता वेळ पुरत नव्हता. ती माझ्या मागे येऊन उभी राहिली, माझ्याकडे एक टक पहात राहिली. जवळ येत तिने केसातुन हात फिरवला. तिच्या अश्या वागण्याने मला भीती वाटू लागली. 

घरात सगळे झोपले होते. काका किंवा काकू नियमित माझ्या अभ्यासाची चौकशी करायचे. कधी कधी संजू आणि शार्विका मी असे फिरायला जायचो. माझी दोन्ही चुलत भावंडे हुशार होती, कधी कधी difficulty असेल तेव्हा request करायची दादा जरा help करशील का? येऊ का आम्ही?तुला distrub नाही ना होणार? मला त्यांच्या या प्रश्नांची मोठी गम्मत वाटायची. दोघंही धम्माल करायची, त्यांचं एकमेकाशी दिवसातून चारदा भांडण व्हायचं पण फार काळ ते रुसून राहिले किंवा त्यांनी  अबोला धरला अस सहसा होत नसे. मलाही त्यांच्याशी खेळावं,गप्पा माराव्या अस वाटे पण जसा मी मोठा होत गेलो माझ्यावर असणाऱ्या जबाबदारीने मी घुमा बनत गेलो. 

राणीची आई माझ्या केसातुन हात फिरवते पाहून मी दचकलो.मी किंचित रागावत म्हणालो, हे ग काय राणीची आई! मला अभ्यास करू दे ना?” माझा आवाज ऐकुन काका तिथे आले आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, “तू झोप जा, त्याला अभ्यास करू दे त्याचा”. ती काही न बोलता निघून गेली. काका माझ्याकडे येत म्हणाले, “स्नेहल, बाळा झोप आत्ता, साडेबारा वाजून गेले. इतका वेळ जागा राहिलास तर तुला त्रास होईल”. काका निघून जाताच मी पुस्तके आवरून ठेवली, बेडवर पडलो. पण राणीची आई अस का वागते? ती का जागत बसते ते कळेना?

एकीकडे राणीची आई, तिथे प्रीतम हेगडे हे कमी की काय म्हणून माझ्या वर्गात असणारा अभय रानडे एक दिवस मला म्हणाला, “स्नेहल यार, प्रीतम तुझ्यावर भारी जीव टाकते. लक्की आहेस तू”. मी त्याच्या बोलण्याने खूप डिस्टर्ब झालो. मला या गोष्टी कळत नव्हत्या असे नव्हे, पण या गोष्टीपेक्षा माझ्यासाठी अभ्यासच महत्त्वाचा होता. कधी कधी माझ्या मनात यायचं का सारखं अभ्यासात गुरफटून घ्यायचं? इतर मुलं जशी मोकळी वागतात, एन्जॉय करतात तसे का वागू नये? त्यांनाही अभ्यास आहेच ना,  मग ती कुठे अभ्यासाचं ओझं घेऊन सारखं फिरतात? परंतु जेव्हा काका आणि काकुची आठवण होई, ते माझ्यासाठी करत असलेला खर्च आणि माझ्यासाठी घेत असलेली मेहनत आठवे तेव्हा माझे भरकटलेले  मन ताळ्यावर येई. स्वतःसाठी नसला तरी काका – काकुसाठी मला चांगला अभ्यास करावाच लागेल, मला भरकटून चालणार नाही, माझ्या लहान भावंडांना मी चुकीचा रस्ता दाखवणार नाही.

क्रमशः

Tags:

34 Comments

 1. Hey terrific blog! Does running a blog similar to this take a large amount of work?

  I’ve virtually no knowledge of computer programming however I
  was hoping to start my own blog in the near future.
  Anyways, if you have any recommendations or tips for new blog owners please share.
  I understand this is off subject nevertheless I simply needed to
  ask. Appreciate it!

 2. Way cool! Some very valid points! I appreciate you writing this post plus the rest of the website
  is also really good.

 3. Do you mind if I quote a couple of your articles
  as long as I provide credit and sources back to
  your website? My blog site is in the exact same niche as yours and my visitors would definitely
  benefit from some of the information you provide here. Please
  let me know if this ok with you. Thank you!

 4. Hello, i think that i saw you visited my web site so i
  came to “return the favor”.I am attempting to
  find things to improve my site!I suppose its ok to use a few of your ideas!!

 5. An impressive share! I’ve just forwarded this onto a
  co-worker who was doing a little research on this.
  And he actually ordered me dinner simply because I found it for him…
  lol. So let me reword this…. Thank YOU for the meal!!
  But yeah, thanks for spending some time to discuss this issue here
  on your web page.

 6. Does your site have a contact page? I’m having problems locating it but, I’d like to shoot
  you an email. I’ve got some suggestions for your
  blog you might be interested in hearing. Either way,
  great website and I look forward to seeing it expand over time.

 7. When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox
  and now each time a comment is added I get three e-mails with the same comment.
  Is there any way you can remove me from that service? Thanks a lot!

 8. You actually make it seem so easy with your presentation but I find
  this matter to be actually something which I think I would never understand.

  It seems too complicated and extremely broad for me.
  I’m looking forward for your next post, I will try to get the hang of it!

 9. Hey! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and say I truly enjoy reading through
  your blog posts. Can you suggest any other blogs/websites/forums that deal with the same subjects?
  Thanks for your time!

 10. I am sure tһis paragraph has toicheⅾ alll the internet peopⅼe, its really really nice paeagrapһ on buіlding up new webpage.

 11. I have been browsing on-line more than three hours these
  days, yet I never found any attention-grabbing article like yours.

  It’s beautiful worth sufficient for me. In my opinion, if all website owners
  and bloggers made good content as you probably did, the web will likely
  be much more helpful than ever before.

 12. Oh my goodness! Amazing article dude! Thanks, However I am
  going through issues with your RSS. I don’t know the reason why I cannot join it.
  Is there anybody having similar RSS problems?
  Anyone that knows the answer will you kindly respond? Thanx!!

 13. May I just say what a relief to uncover somebody who really understands what they are discussing over the internet.

  You definitely understand how to bring an issue to light and make it important.
  A lot more people should read this and understand this side of your story.
  I can’t believe you are not more popular because you surely have the gift.

 14. Hi, Neat post. There’s an issue together with your website in web explorer, would check this?
  IE nonetheless is the market leader and a good portion of other folks will omit your wonderful writing due to this problem.

Comments are closed.