अहंकाराचा पिंजरा त्यातील राघू गोजीरा
मी पण त्यागून जाता फुले जीवन मोगरा

चेहऱ्यावर हासू फुलेल जीवन तरु बहरेल
हितगूज करु पाहता आनंद घन बरसेल

कस्तुरी तुमच्याच पाशी परी तुम्ही अजाण
मदतीस जा धावून येईल नकळत जाण

द्यावे याचकास सारे, विसरून क्षणीक देहभान
दीगंता जाईल किर्ती, लूटू द्यावे पंचप्राण

विसरुन जावे अस्तित्व, मिटून टाक मी पणा
नको अहं दातृत्वाचा, नको दात्याची भावना

तुझे नव्हे यात स्वतःचे काही, ही ईश्वरी प्रेरणा
त्यानेच दिले तोच घेतो, तुला असावी कल्पना

शुद्ध भाव मनी ठेव, संकेत देईल तो निर्गुणी
तो सगुण, बिंदूरूप, विश्वरूप, तोच वसे कल्पनी

कुठे नसे परी दिसे, भास तो आभास तो या मनी
चिंतनात, दस दिशात, तो हसतो बागेत फुलातुनी

चैत्यन्यास, अर्पावे सुमन नतमस्तक अश्रूतुनी
येईल प्रचिती अंतरातम्या, समाधान भक्तीतूनी

भाव तेथे देव, ठेवावा विश्वास अन मनी असावी श्रद्धा
माणूसकी हाच मानवाचा धर्म तो नव्हे जगण्याचा धंदा

Tags:

7 Comments

 1. Thank you for another informative website.
  Where else may I get that type of information written in such an ideal approach?
  I’ve a venture that I’m simply now operating on, and
  I have been on the glance out for such information.

 2. माणुसकी हाच धर्म!
  हे समजेल सगळ्यांनाच,तो सोनियाचा दिन!
  असेच विचार पेरत रहा.

Comments are closed.