माणसाच्या जथ्याला म्हणावं का समाज?
जाती, धर्म, पंथ यांचा का उगाच बाळगावा माज?
एकत्रित आले की झुंड शाही, अन चालतों नंगा नाच
एकटे असताना कंठातून फुटत नाही खुला आवाज

मी ब्राह्मण मी मराठा असा जातीचा गंड उशाला
मी शूद्र, मी दलित असा न्युनगंड बाळगाच कशाला
काशीद अन बाजी दोघे सारखेच वाटेकरी यशाला
सर्व धर्म समभाव राजे पहात सैनिकाच्या जिगरीला

मेळावे भरवून आणि इतिहास आठवून प्रगती होईल?
मनातील मलीनता, दंभ फोटो पूजन करून जाईल?
कशासाठी कुणाचा सांगता वारस व्हा तूम्हीच शिल्पकार
पूर्वजांचे पराक्रम नको, द्या वर्तमानाला खंबीर आकार

मी अमक्या तमक्याचा वारस हा फूकाचा जूना रिवाज
धमन्यात असेल रग तर मारा मैदान घडवा वैभव आज
पूर्वजांच्या पूण्याईवर बडेजाव याला भुलत नाही समाज
सामान्य माणसाच्या प्रश्नांशी भिडतो त्याचाच उरे आवाज

कोणत्या जातीचे, धर्माचे याचा नकोच आता सात बारा
काय मर्दुमकी गाजवलीत यालाच भुलतो इथला वारा
खरे वीर असाल तर जनता देईल तुमच्या नावाचा नारा
समाजाचे प्रश्नच तुमचे होतील तेव्हाच ती पूजेल कर्तृत्वाला

Tags:

11 Comments

 1. आजच्या वर्तमान काळातील वास्तववादी कविता आहे. खूपच छान सर. तुमच्या प्रतिभाशक्तीला माझा सलाम

 2. भोसले सर,पाटील सर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

 3. वर्तमान समाजातील खरे वास्तव आहे. आजच्या तरुण पिढीला स्व कर्तृत्वाची नितांत आवश्यकता आहे.

 4. Takipçi satın almak sadece gelir elde etmek isteyen kişilerin değil hesaplarındaki takipçi
  sayısını
  yükselterek popüler bir profil oluşturmak isteyen kullanıcılarında tercih ettikleri bir yöntemdir
  . Instagram fenomeni olmak için İnstagram takipçi sayınızı
  megatakip adresi ile güvenilir sekilde takipci alabilirsiniz

 5. I don’t know if it’s just me or if everyone else encountering issues with your
  site. It appears as though some of the written text in your posts are running
  off the screen. Can someone else please provide feedback and let me
  know if this is happening to them too? This may be a problem with my web browser because I’ve had this happen previously.
  Many thanks

 6. Türkiyenin en iyi markası olan şampuanlar ile bir adım önde giden hc careye bir
  de a href=”https://www.lekekremim.com/”>leke kremi satışı eklenmiştir.
  Cilt lekeleri doğum lekeleri gibi
  bir çok lekelere karşı kesin çözüm sunmaktadır en iyi leke kremi sitesi lekekremim.com dan leke kremi satın alabilirsiniz

Comments are closed.