रेल्वे  स्टेशनवर पोचलो तर प्रचंड गर्दी होती नेहमीच्या आठ त्रेचाळीस साठी मी आलो होतो .
अजूनही आठ बत्तिसचा  इंडिकेटर होता ज़िना उतरताना  असा भरलेला प्लाटफॉर्म  पहिला कि छाती दडपून जाते , गाड्या सोडाव्या लागणार कोणास ठावूक असे नकळत मनात येते ज़िना उतरतांना पहिले पटेल गप्पा मारत होता मला  पाहताच त्याने हात केला .”आवो बैठो प्रोफेसर अभी बत्रिस नही गया अपने गाडी को टाइमं हैं ।”  मी बर्याच वेळा त्याला सांगून पाहिलं “अरे  पटेल मैं प्रोफेसर नाही हू
कॉलेज मी हेडमास्तर हु . तो हसला अरे दोनो सारिकाच छे . त्याला काही फरक पडला नाही .
गाडी लेट झाल्याने मी अस्वस्थ . एक मेल धडधडत निघून गेली . कोणी तरी रागान म्हणाला “यांच्या आयला यांना आताच मेल काढायला वेळ मिळतो का ?   एव्हाना गर्दी खूपच वाढली कोणीतरी मोठ्यांनी ओरडले “गाडी आली रे “गाडी प्लाटफॉर्मला  लागली तसे सगळे गाडीत चढायला रेटारेटी करू लागले .दोन तीन माणस आत जावू शकली .प्रतॆक डब्याच्या दारावर पाच सहा माणस उभी होती ,चक्क लोंबकळत होती . गाडी थोडी हलली इतक्यात मोठ्यांनी किंकाळी ऎकु  आली . माझ्यासह सगळ्यांच्या नजरा तिथे वळल्या .एकच जागी तीन महिला डब्यातून प्लाटफोर्मवर पडल्या होत्या . दैव बल्वतर म्हणून कोणालाही मोठी दुखापत झाली नव्हती . दुसरी गाडी चुकायला नको
म्हणून मी पवित्रा  घेत होतो . त्या पडलेल्या महिलांचं पुढे काय झाल याचा विचार करण्यासाठी ही  वेळ नव्हता माझ मन जणू मेल होत . कदाचित त्या पैकी एखादी महिला माझ्या परिचयाची असू शकली असती कदाचित नाट्य गोत्याची  पण मला वेळ नव्हता..!! क़ामावर पोचण हि माझी प्रायारीटी होती .काळ ,काम वेग हे प्रकरण कधीतरी मी शिकवलं होत पण या काळाच्या वेगाने माझी मती बिघडली होती.माझी मानसिकता स्वतःच्या पुढे काही जग आहे हे मानायला तयार नव्हती..
     एखाद्या वृद्धाला।रस्ता ओलांडायला माझी पावले  थांबतील का?एखादा लहान मुलगा रस्त्याच्या मधोमध आल्यास त्यला  वहाना पसुन वाचवायला माझी पावले पळतील का ?एखादे  वृद्ध आजोबा लोकल मध्ये माझ्याच सीट समोर आल्यास मी माझी सीट  त्यांना देईन का ? या प्रत्येक  का?च उत्तर होकारार्थी  याव यासाठी मला झगडाव लागेल ?  चांगल्या संस्कारांना जगवाव लागेल . .
या प्रत्येक वळणावर मी स्वतःला विचारेन खरच माझ्याशी कुणी असच  वागल तर मी काय करेन ? “तुझ्या बाबतीत कुणी चांगुलपणा कुणी दाखवत का” अस विचारणार तर नाही ना ? लोकलच्या प्रवासात काही प्रवासी तासभर बसूनही उठण्याची तसदी घेत नाहीत हा मनाचा बोथटपणा आपल्या  चांगुलपणाने संपेल का ?
      बदल घडायलाच हवाय ,पण हा बदल मी एकटा  घडवू शकत नाही म्हणून थांबलो तर … माझ्या मनातल वादळ घोघावत असतांना मी गाडी येत्तांना पहिली आणि स्वतःला आत झोकून दिल  एक भैया सामानासह प्यासेज मध्ये उभा होता प्रतेकजण  स्वतःला सावरत मार्ग काढत असतो मी वाट काढ्त माझ्या ग्रुपमध्ये पोचलो . माझ्या ओळखीच्या ग्रुप मधला रोहन खार्दीवरून बसून यायचा तो आज उभाच होता .”अरे रोहन आज उभाच ” नाही काका मला जागा मिळाली होती पण ह्या बाई  इथच आल्या म्हणून ……!!! मी त्याला काही जाणवू न देता त्याची पाठ थोपटली .परिवर्तनचि छोटी ठिणगी पेटत होती.
       मी माझ्यातल्या माणसाला समजावले होय अजून माणुसकी जिवंत आहे माझ्या ओठावर हसू होते त्याचे कारण फक्त मलाच ठाऊक होते…!!

Tags: