स्मरू नको भेट ती, नको स्मरू दिवस तो
परी मनास सांगना, तव गीताचा भाव तू

नको स्मरू प्रेमलाप, नको गुंतू मज सवे
एकांती घे परी, तव भोळ्या मनाचा ठाव तू

भेटीचा उपयोग काय? आठवून रडू नको
जीव जडविला समजुन, आता एकांती बसू नको

कशास हवी खुणगाठ, मेळ ना जिचा लागला नीट?
चटका जिव्हारी बसण्यास, का आठवावी प्रीत?

चांद अन् चांदणी भेट सहज नसे कधी प्राप्त
साहुनी विरह पून्हा पून्हा, पाहती भेटीची वाट

मज न ठाऊक सखे, नियतीचा का असे शाप?
दैवाचे फासे असे, होणार का पुनरपी भेट?

परी तुला सांगू कसे? मजसाठी थोडे थांब तू
बोट भरकटली माझी त्यात जीव टांग तू

विसरून जा सखे, नको पून्हा विरही जाळणे
नकोच येऊ स्वप्नी पून्हा, नको पून्हा कुरवाळणे

घे निरोप स्वप्नीच या, भ्रम मनास पाडू नको
पूस ते अनमोल अश्रू, उगा असे सांडू नको

विनंती इतकीच खास, मोहजळी गुंतू नको
विरह गीत गाऊनी, शब्दात मज बांधू नको

Tags:

2 Comments

  1. I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both
    educative and amusing, and let me tell you, you
    have hit the nail on the head. The issue is something which not enough folks are speaking intelligently
    about. I am very happy I found this during my search for something relating
    to this.

Comments are closed.