आणि वादळ माणसाळले भाग ३

आणि वादळ माणसाळले भाग ३

चार पाच दिवसांनी त्यांका पुन्हा चक्कर इली. मी रिक्षा सांगलय. झील, मी आणि ते रिक्षा केलव मालवण गाठलव. डॉक्टरांनी रिपोर्ट काडूक सांगल्यांनी. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट बघीतल्यानी, सांगितल्यानी, “ह्यांना माईल्ड अटॅक येऊन गेला आहे. मी देतो ती औषधे सुरू ठेवा, त्यांना टेन्शन होईत अस काही करू नका. जड काम करू देऊ नका. पंधरा दिवसांनी आणून दाखवा.”

समीर, डॉक्टरांनी दिलेलो पेपर घेऊन औषधा आणूक गेलो,औषधा घेऊन इल्यावर, दुसऱ्या डॉक्टरान डोस कसे ते औषधावर पट्टी चिकटवून लिहून दिले. घरी जायसर तीन वाजले. जेवण करूक ठेवलेलो पोरगो खराच गुणी. जेवण घेवन इलो, ह्यांची चौकशी करत म्हणालो, “जेवण बनवलय. काकू, वरण भात, बटाटा भाजी, पापड जेवण जेवन घेवा.” तो परकी त्याका कोणी काय सांगूक नाय पण आपल्या डोक्यान तो चललो. दोन दोन घास जेवलो, हे पलंगावर पडले,डोळो लागत होतो, इतक्यात शरू इली. माझ्या वांगडा भांडली, “गे वयनी माझ्या भावशीक बरा नाय, दोन पावटी डॉक्टरकडे घेऊन गेलास तरी कळवणास नाय ह्याचो अर्थ काय? मी हय गावात आसान ही तऱ्हा, खय बाहेर गावी असतंय तर कळलाच नसता.”

मी तिची माफी मागलय, “बाय गो, आमी व्यापात होतव, आमका खराच सुचला नाय, तुका काय म्हणाचा ता म्हण, आत्ताच डॉक्टर कडसून इलव त्यांचो डोळो लागलोहा. डॉक्टर म्हणाले, “माईल्ड अटॅक येऊन गेलो. काळजी घेऊक व्हयी.” “पण असा झाला तरी काय? चार सहा दिवसापाठी येवन गेलेलंय, तेवा तर ठणठणीत होतो. धंद्यात काय गडबड नाय मा जावक?” “नाय गे बाय, तुझ्या भाच्याक विचार काय झाला ता? तो आता मुबंय गाठतलो, थय नोकरी करुची हा त्याका. हय रवीन सा वाटणा नाय.”

“समीर, व्हय रे! आवस काय सांगता ता खरा हा! रे मेल्या, बापाशीन हाडाची काडा करून हो धंदो उभो केलोहा, देव दयेन चांगलो चलता. थय मुंबयत बिना शिक्षणाचो काय हमाली करतलस? आपण बामण. आरक्षण, सरकारी नोकरी आपल्याक न्हय, शाणो अश्शीत तर माझा ऐक, बापाशीक मदत कर, तुझा काय डोक्या आसा ता लाव आणि धंदो वाढव. कोणाची नोकरी करुक नको की खय जावक नको, वाडवडिलांनी राखून ठेवला ता बघालास तरी खूप झाला आणि बापाशीक त्रास देव नको. तो देव माणूस, त्याका दुःख दिलास त तो विठ्ठल तुमका माफ नाय करुचो ह्या लक्षात घे. बापाशीक काय झाला तर मेल्यानू कोण बघीत?”



affiliate link

समीर गुपचीप होतो, माका भिती वाटा होती न जिणो आतेकव काय तरी बोलून जाईत. त्याका न कळण्या इतको तो लहान नव्हतो. आता कॉलेज नाय आणि धतींग नाय, आप्पा नोकरी सोडून बसले, इले ते पैसे हय धंद्यात टाकले, धंदो नाय बघितलो त खावची पंचाईत होयत, लोक हसतीत ता वेगळा. आत्याचे पाय धरले , “आत्या, माका माफ कर, माझीच चुकी, सगळी मित्र मंडळी मजा करतत, म्हणान मी पण —–“

“रे खुळ्या त्यांची आणि आपली बरोबरी होयत काय? आमी कोण? तुझो आजो वाटेक चलाक लागलो की सगळे राम राम करीत. त्यांच्याकडे वर नजरेनं बघण्याची, मोठ्या आवाजत बोलण्याची कोणा मायझयाची टाप नाय होती आणि तुम्ही त्यांची नातरा एक एक पराक्रम करतास. तुका काय वाटला आत्याक ठाऊक नाय? रे आमी गुठखो आणि दारू खाऊक लागलो म्हणजे फरक काय रवलो, त्याच्यात आणि आपल्यात. ते पैसे जिवाक खा, जरा आरशासमोर उभो रव आणि बघ. गालफडा बसलीहत, टी.बी. होता तशी तब्येत झालीहा. खुळ्या वाईट नाद सोड. तुझे काका बामण न्हय पण कोणाची माय व्यालीहा त्यांच्या समोर सिगरेट ओढूची. जे मित्र ह्या व्यसन करूक पैसै खर्च करतत ते मित्र घरात शिरूक कमी नाय करुचे! जा, पुन्हा बापाशीक त्रास देव नको.”

“आत्या, खराच, चुकलय मी ,पुन्हा नाय करुचय,आईचान!” “खरा सांगतस ना? ठेव माझ्या कपळावर हात, घे शपथ, ह्या उपटसुंभ मुलांवांगडा जावचय नाय, व्यसना करुचय नाय.” “घेतय,आत्या तुझी शप्पथ. आज पासून आप्पा आणि आवशीक त्रास होयत, त्यांका वाईट वाटात असला काय एक करूचय नाय.” तिने त्याला जवळ घेत थोपटले. “गुणाचो तो, बापाशीक दुःख देऊ नको रे. आमचो बापूस लवकर गेलो. तुमचो आसा तर त्याका जपा, त्याचा ऐका, तो जा काय करता तुमच्यासाठीच मा. राणीकव सांग, आत्यान शाण खाल्ला, अशी आजी म्हणा. मी चूकलय पण तुमी तिच चूक करू नकात रे. इतिहास उगाळूकच व्हयो काय?’





दुसऱ्या दिवसापासून समीर सकाळी उठून झाड लोट करुक लागलो. कस्टमर इले की त्यांका काय व्हया नको बघूक लागलो. बहीण आणि तो मिळून काय सुधारणा करून व्हयी यावर बापाशी बरोबर बोलूक लागले. आठ पंधरा दिवसात झिलान रिसॉर्टचो चेहरो मोहरो पार बदलून टाकलो माडात दोरीचे झोपाळे बांधले. मोठो फ्रीजर स्कीम वर आणलो. डायनिंग टेबला माडाखाली मांडली,पिण्यासाठी बिस्लेरी पाण्याचे बाटले, Pepsi, , Sprite, Duke चे बाटले मोठ्या फ्रीजरमध्ये ठेवले. दही, कॅडबरी विकूक ठेवली. हॉटेल समोर, झिळमिळी लावली. लाईट तोरणा टाकली. कस्टमर वाढले. महिन्याकाठी दोन लाख रुपये येवक लागले. खर्च भागवून साठ सत्तर हजार पाठी पडत होते. कधी पोलीस तर कधी कस्टम तर कधी महसूल ची माणसा फुकट जेवन जाईत, समीर त्यांच्या मड्यावर पाकीटव घाली, पण सगळा बिन बोभाटा होयत होता.

ह्यांका आनंद झालो. दर महिन्याक पन्नास हजार बँकेत पडू लागले. राणी भावाशीक मदत करी. काय व्हया नको ता वेंगुर्ले, कुडाळ वरून घेवन येय. समीरची मेहनत आणि ह्यांचो बारीक लक्ष दोन वर्षात, टाकलेले पैसे वसूल झाले. कस्टमर वाढले. समीरच्या डोक्यात टेंट टाकूची कल्पना इली. “आप्पा, मी काय म्हणी होतंय, आपण दोन तीन टेंट टाकले तर गिऱ्हाईक वाढात, आज काल टेंटचा फॅड आसा. प्रयत्न करून बघूक काय हरकत!”

“रे थय MTDC चे टेंट असतांना आमच्या तंबूत कोण येईत? तंबू काय स्वस्त असतीत? उद्या आसत ते पैसे टाकून बसलस तर खरेदीचे पैसे वाशील जाऊक नको? आसा ता काय वाईट हा?” बापूस काय ता बडबडलो तरी आठ दिवसात मेल्यानं सगळी म्हायती गोळा केली. हो नाय म्हणता दोघानी बापाशीक तयार केल्यानी, त्यांनी दोन तंबूची ऑर्डर दिली. उद्घाटन करुक टीव्ही स्टार हाडली, तिका कशाक बोलवूक व्हयी? ती काय फुकट येतली? पण सांगतला कोण? पैशांचा कसा भागवतत हो त्यांचो प्रश्न पण, दणक्यात उदघाटन झाला. तरुण भारत आणि रत्नागिरी टाइम्स मध्ये बातमी छापून इली.

किती खर्च केलो तो त्यांकाच ठाऊक पण आठवड्यात पुढच्या पंधरा दिवसाचा टेंटचा बुकिंग झाला. चला पैसे टाकल्यान ते कारणी लागले मुंबयसून आते भावाचो ह्यांका फोन इलो. म्हणालो, “रे पुरषा कायव म्हण तुझ्या झिलान कमाल केली, टि.व्ही स्टार हाडूची झाली तरी काय साधा काम नाय. माका त्याची डेरींग आवाडली.”, ह्यानी त्यांका विचारल्यांनी, “रे भाई, तुका कसा कळला?” तेवा सांगल्यांनी, तुझ्या झिलान उद्घटनाचो व्हिडिओ यूट्यूब वर टाकलोहा, तुका नाय ठाऊक? आवशिक खाव हय कोण पादला त घाण वास मुंबईत जाता आणि आमका पत्तोच नाय.”



affiliate link

गजबज वाढली. आधी दोन माणसा कामाक होती. धंदो वाढलो तशी चार माणसा कामाक ठेवली. दिवस कसो जाय कळेना. सकाळ पासून खोलये, टेन्ट, बाग, ए.सी.बॉक्स रूम, यांची साफसफाई. त्यांचे चादरी, बेडशीट धुणे. ‘रात्र थोडी सोंगा फार’ अशी तरा झाली. तरी कपडे धूवूक वाशींग मशीन होती म्हणान बरा. याक बाईमाणूस ह्याच कामावर होता. जेवण खाण बनवून देणे झिलगो सांभाळी, बुकिंग घेवक आणि येणाऱ्यांची बडदास्त ठेवूक आणि कस्टमर अटेंड करुन समीर मेटाकुटीक येय. समीर रात्री थकून जाय, तरी आमचे हे तब्बेत बरी नसून सकाळी कस्टमर अटेंड करीत. किचनमध्ये काय व्हया नको बघीत, ती खरेदी ते स्वतः करीत, पण दुपारी तासभर निजल्याशिवाय ह्यांका काय सुचा नाय. समीर थकून जाय, राणी शनिवार, रविवारी मदत करी पण तिची ती पुस्तका आणि कानाक हेडफोन. कस्टमर बोंबाललो तरी हिचो लक्ष मोबाईलवर, काय कपाळ सर्विस देतली?

शेवटी शरयूक मदतीक घेवचो विचार केलो. कोणा परक्याक सांगण्यापेक्षा तिकाच विचारलेला काय वाईट,शरूक समीर स्कूटर वरसून घेऊन इलो, ह्यांनी विषय कानावर घातलो तर म्हणाली, “नाय रे बाबा,आमच्या ह्यांका पटाचा नाय, आमच्या धंद्यात मी कधी बघणय नाय,त्यांची फॅक्टरी आणि ते, वीस वर्षा लग्नाक झाली, एकदाव त्यांका धंद्याचा, काय म्हणान विचरूक नाय. ह्या विचारलंय त म्हणतीत, घोवाचो धंदो कसो चलता कधी बघूक फुरसत झाली नाय आणि आत्ता—” समीर म्हणालो,”आते मीच काकांका विचारू काय? फार तर नाय म्हणतीत.”

“नको रे बाबा, त्यांची गजाल नको, काय तसाच अडला तर माका कॉल करीत जा, येवक जमला तर मी नक्की येयन, माका घराकडे बगूचा लागता हे कायव बघणत नाय. इला गेला, पै पावणो सगळा माझ्याकडे. श्रेयस आणि पूनम सारखी मागावर असतत. तेंका सारखी आवस होई जाता.
त्यांकाच घे मदतीक बघ मदत जाता काय!” शरयू थोडो वेळ थांबान वाटेक लागली, तसा मी ह्यांका म्हटलंय, “अहो, शरूक खय वाटता मी काय नोकर म्हणान तुमच्याकडे येव काय? नायतर तिची पोरा काय आवशीपाठी रवाक लहान हत काय? आणि घोवान ह्याका विचारूक घराकडे असताच खय? सासू बिचारी आपल्यातच असता.”

हे म्हणाले, “तो तिचो प्रश्न, ये गे बाय म्हणून सांगून बगलय, घरातला माणूस असला तर फरक पडता, परको मजूर, सांगकामो, सांगशीत ता काम करतलो. धंदो टिकलो की बुडालो त्याका देणे घेणे काय नसता, म्हणान तिका विचारी होतंय. तिच्या पाया पडूक कोण जाणाहा नाय. नायतर असा कित्याक नाय करण, तुझ्या भावाशिक विचारून तर बघ. दोन भावस घराकडे आसत, घराकडे इतक्या काम खय हा. शेतीक पुन्हा घराकडे जातीत, त्याका चार पैशाची मदत होईत. बग शरदो काय म्हणता तो!” मी भावाशिक विचारल्याशिवाय काय सांगतलय, संसार त्यांचो, उद्या ते सुद्धा ह्याच म्हणतीत, आक्का आमका कामाक बोलवता. तुम्ही म्हणतास तर आपला विचारतंय. काय म्हणतीत ता म्हणतीत या विचारान फोन केलय.



affiliate link

“रे सुदया ! किती दिवसात तुझो फोन नाय, हयची वाट शी सांडलास? मागे तुझ्या भावोजींका बरा नाय होता. पण कोणाक सांगूक नाय. आई बरी हा मा? वैनी काय करता?” तो माझ्यावरच घसरलो, “आप्पांका बरा नव्हता ता आमका काय वाऱ्यान कळतला? तुच आमका साप इसारलंस, आमचा मरांदे, आवशीक बघीन असा सुद्धा तुका वाटणा नाय? खरा मां? आणि आप्पांका काय बरा नाय होता कळला नाय? काय झाला त्यांका? “नाय रे बाबा,आईक कशी विसरीन? पण कामा धंद्यापुढे फुरसत नाय. काय करू? तुच माझ्या गजालीक आईक चार दिवस सोडीनस, मी मगे आणून सोडतय. बघ कसा जमता ता. ह्यांका छातीत दुखत होता. आता साधारण बरा आसा, जड काम करता नये डॉक्टरांनी सांगल्यानी. औषधा सुरू आसत. त्यांका भेटूक म्हणान तरी ये.”

तो हसलो, “आप्पा सासवेक बघूक कितीदा येऊन गेले? गेल्या दोन वर्षात आप्पांची भेट जावक नाय, त्यांका सांग मी रागावलंय.” कोणाचा काय तं कोणाचा काय !
कशी बशी समजूत काढलंय, तेवा खय शांत झालो. आवशीची चौकशी केली, भाचवंडा काय करतत विचारणा करुंन झाली. परडा काय केलास? बरा होता काय ? विचारलंय. हे खुणावत होते शेवटी धीर करून विषयाक हात घातलो, “रे सुदया, मी काय म्हणी होतंय, तु आणि शरद दोघे परड्यात वावरतास तर कितीसा काय मिळता? आप्पा म्हणतत आणि मी पण म्हणतंय आमच्या मदतीक इलस तर आमची धांदल वाचात आणि तुकाव थोडी मदत होईत, तुझी शेतीची कामा असतीत तेव्हा जा. बघ शरद्याक विचारून आणि झिलाक चार दिवस है आणून सोड हवा पालट होईत.”

तो काय बोलाक नाय,त्याका राग इलो की काय ता कळाक मार्ग नव्हतो. मीच बोललय, “रे सुदया, तुका येवचा नसला येव नको, पण आईक आठ पंधरा दिवस आणून सोड.” तसो म्हणालो, बघतय शरद्याक विचारून, त्याका इच्छा असली तर त्याका धाडतय.” एक आठ्वडयांनी आई आणि तो इले. येताना वाली,ओली मिरची, तवशी, वांगी असा कायमाय घेऊन इलो. हे सासूच्या पाया पडले, तिका साडी दिली, सुदयान ह्यांची खुशाली घेतल्यान. तासभर आराम करून ,सुदयाक नवीन बांधलले खोलये तंबू, किचन फिरून दाखवल्यानी.त्या दिवशी रापण नव्हती, दोघे स्कुटरवरून बाजारात जावन मासे घेऊन इले. दुपारी जेवणखाण झाल्यावर हे माडाच्या सावटिक बसले. आपली इच्छा त्याका सांगितल्यानी.

तो म्हणालो. “मी एकटो काय सांगू, शरदो म्हणालो तर मी येयन. त्याका घराकडला जमाक व्हया. नाय म्हटला तरी चार सा गोरवा. दुधाची म्हस, रोज टायमाक डेरयेक दूध घालूचा लागता उशीर झालो तर दूध रवता. बाजार करणा आसाच.” तसे हे बोलले, “तुका जमण्यासारख्या नसात तर त्याका धाड. सिजन असता तेवाच चार महिने मदत व्हयी, घरचोच विश्वासू माणूस व्हयो म्हणान तुका विचारलय. तुका चार महिन्यात दहा वीस हजार मिळतीत, धंदो चांगलो झालो तर समीर अधिकव देयत. खय जावचा नाय आसा. सावटीचा काम, बहिण असतलीच आणि काय सांगू.”

सुदो जावक निघालो तेव्हा घराकडे न्हेवक, भाजलले मासे, पन्नास नारळ थोडे बेडे दिले. भाजयेचो फणस पिशवीत घातलय. समीर येवन भेटलो. त्येणा मामाक हजार रुपये दिले. नको नको म्हणी होतो पण समीर म्हणालो, “रे मामा, मी तुका देणय नाय, सौरभ आणि सायलीक खावक कायतरी घेवन जा. आणि पुढच्या वेळेक येशीत ते व्हा त्यांका घेऊन ये.”, हे त्याका एस.टी.वर सोडून इले.

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग ३

  1. zovrelioptor

    I like this web blog very much, Its a really nice place to read and obtain information.

  2. आणि वादळ माणसाळले भाग १ - प रि व र्त न

    […] १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग […]

Comments are closed.