उध्दव आणि राज शहाणं कोण?

उध्दव आणि राज शहाणं कोण?

महानगर पालीकेची सत्ता स़ोन्याच अंडे देणारी कोंबडी आहे असा सत्ता धाऱ्यांचा विश्वास आहे.. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक आराखडा आणि मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक आराखडा यात फार तफावत नाही. मग ही सोन्याची कोंबडी आपल्या हाती रहावी असा प्रयत्न एखाद्या पक्षाने केला नसता तर नवल!  दसरा मेळावा, गूढी पाडवा ,महापरीनिर्वाण दिन, आंबेडकर जयंती, शिवजयंती, आणि आत्ता अगदी अगदी गणपती,दहीहंडी हे प्रत्येक सण वा ऊत्सव हे गर्दी जमवण्याच हुकमी माद्यम आहे.  

लोकमान्य टीळकांनी गणेशजयंतीला ,शिवजयंतीला  सार्वजनिक ऊत्सवाच स्वरुप प्राप्त करून दिल. समाज जाग्रुती करण्याच आणि चळवळ ऊभारण्यासाठी ते करण गरजेचे  होते. समाजातील वेग वेगळ्या घटकांना संघटित करण इंग्रजी सत्ता ऊलथवून टाकण्यासाठी ते आवश्यक होते.

आत्ता मात्र आप आपली संस्थान टिकवण्यासाठी सार्वजनिक ऊपक्रम राबविण्यात जो तो स्वतः ला धन्य मानतो.माझ्या विभागातील  ऊत्सव कसा मोठा, हे सिद्ध करण्यासाठी चांगले मानधन देऊन सेलिब्रेटी आमंत्रित करण्यापासुन ते कार्यक्रम कव्हर करण्यासाठी वाहिन्यांचा वापर करेपर्यंत अमाप पैसा खर्च केला जातो. हा पैसा येतो कुठून? पगारदार माणसाला आयकर वेळेत भरूनही नोटीस येते पण ह्या धेंडांना कोणी विचारतही नाहीत.अगदी ध्वनी प्रदूषण करूनही न्यायालयात ते नामानिराळे राहतात.फारच फार तर प्रतिज्ञापत्र सादर करुन मोकळे होतात. त्यांना ना समाजसमाजाची भिती ना न्यायालयाची, पैसे खर्च केले की वकील त्यांची बाजू मांडायला तयार! कोणत्या नेत्याकडे विश्वासाने पहावे ?

जे समाजाच्या ऊन्नतीच्या प्रश्न घेऊन लढतील अशा नेत्याबाबत जनतेला आपुलकी असते. मनसे आणि राज ला लोकांनी पाठिंबा दिला तो काही बदल घडेल हया अपेक्षेन पण घडल भलतच ,केजरीवाल आप पक्षासह निवडणूक रिंगणात ऊतरले ते जनतेच्या कल्याणासाठी ,सिसोदिया,यादव, भुषण,किरण बेदी आणि अगदी अण्णाही केजरीवाल यांना साथी हात बटाना म्हणत येवून मिळाले,  जेथे तेथे मै अण्णा हू टोप्या नाचत होत्या पुढे काय झालं ते सर्वांना ज्ञात आहे .” पक्ष म्हणजे मी ,मै ही आप हू। “ या समजूतीन केजरीवाल कारभार करत आहेत. 

लालूनी जशी भारतीय  रेल्वे नफ्यात आहे अशी खोटी न्यूज पसरवून स्वतः चा ऊदो ऊदो करून घेतला तशीच सवंग लोक प्रियता फुकट पाणी, स्वस्त विज अशा निर्णयांनी केजरीवाल अनुभवत आहेत. 

तामिळनाडूत जयललीता यांनी दुरदर्शन आणि सायकल तसेच संगणक फुकट वाटुन सत्ता ऊपभोगली, महाराष्ट्र राज्य अजुन तरी अशा फूकटच्या गोष्टीना सरावलेल नाही. जेव्हा राज्यकर्ते फुकट च्या घोषणा करु लागतात तेव्हा त्यांची लोकांवरची पकड ढीली झाली म्हणायल हरकत नाही.आघाडी काय आणि यूती काय दोन्ही पक्षांनी तोच प्रयत्न  केला. दहा लाख घरे फुकट वाटणारी सेना आता फडणवीस योजनेस विरोध करत आहे. 

एस.आर.ए, आणि झोपू योजनेत ज्यांनी बक्कळ कमवले तेच फडणवीस सरकारच्या योजनेत खो घालत आहेत.

राजच्या मनसेचे नक्की काय चालू आहे  ते त्यांना समजलेले नाही, राजे स्वतः संभ्रमित असल्याने नक्की काय कराव तेच सैन्याला  कळेनासे झाले आहे.निवडणूक जवळ येत आहे.गेल्या वेळेस बऱ्याच जागी दगाफटका झाला, गड राखता आला नाही तर तोंडाचा बारुद काय कामाचा? कोणी विचारले , का म्हणून वेगळे झालात ? काकांच्या पाठीत खंजीर खुपसुन काय मिळवले? सामान्य माणसं  संवेदनशील असतात ते एखाद्या व्यक्तीला सेलीब्रेटी ठरवून डोक्यावर घेऊन नाचतात किंवा खलनायक ठरवून धिंडवडे काढतात.नेते भ्रमात असतात ,सार काही मँनेज करू शकू अशी त्यांना खात्री असते, नेहमी तुम्हाला दान पडेलच असे नाही. नेते असल्याची झुल ऊतरून थोडे  सामान्य माणूस म्हणून जगून पहा.

गरीब आणि सामान्य जनतेला आपण मसिहा आहेत आणि जनतेच्या भल्यासाठीच झटतोय अशी बतावणी बंद करा, राजकरणाच तुमचे दुकान चालवण्यासाठी तरुण मुलांना संभ्रमित करू नका अन्यथा त्यांच्या रोषाची ठिणगी तुमचे घर  चेतवुनच शांत होईल.

कधी काळी महाराष्ट्र राज्याचा विकास आराखडा माझ्याकडे आहे म्हणत रोज कुठेतरी सभा घेऊन नाशिकच्या विकासाच्या कथा सांगणारा राज अचानक मौनात गेला. पक्षाकडे कोणतही योग्य धोरण नसल्याने आणि भविष्यात काही वेगळ घडण्याची हमी नसल्याने अनेक आमदारांनी पून्हा स्वगृही जाण्याचा मार्ग पत्करला. त्यांचीच री ओढत नगरसेवकही पक्षातून रफा-दफा  झाले तरीही परिक्षण कराव अस राजना वाटेना!

कोणावाचून माझै काही अडत नाही माझा पक्ष त्यामुळे संपणार नाही अशी खोटी मनीषा बाळगत राज आपल्या गडावर निवांत होता. ज्याला वडिलांच्या कर्तृत्वावर जगता येणार नाही असे राज हिणवत होता तो ऊध्वव मात्र एका वेळेस सहा नगरसेवकांच दूध पिऊन गेला. ऊध्धवने नक्की राजला चारी मुंड्या चित केले.

 आता पून्हा एकदा राज विधान सभेच्या निवडूकीत आपले भविष्य आजमावण्यासाठी उभा आहे मात्र   प्रबळ विरोधी पक्षा करिता तुम्ही माझ्या उमेदवरांना निवडून द्या असे आवाहन करत जगो जागी सभा गाजवत आहे. जनता त्यांना गांभीर्याने घेईल का हाच कळीचा प्रश्न आहे?

लोकसभेची निवडणूक असताना राजचा मनसे निवडणुकीत प्रत्यक्ष उतरला नाही. मात्र भाजप आणि शिवसेना यांना उघड पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 

व्यासपीठावरून झोड उठवली संपूर्ण राज्यात अठरा पेक्षा जास्त सभा घेतल्या तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही उमेदवाराला त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता पुन्हा एकदा सर्व आयुधं घेवून राज सभा गाजवत आहे सभेला बघ्यांची गर्दी जमत आहे.युतीला झोंबतील असे अनेक योग्य मुद्दे मांडण्यात राज यशस्वी झाला आहे पण पक्षाकडे स्वतःचा अजेंडा नसल्याने लोक राजला कसे घेतात हाच प्रश्न आहे.

कोणत्याही पक्षाकडे खऱ्या अर्थाने विकासाचे मुद्दे नाहीच आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागेल .तीनशे सत्तर कलमाचा चावुन चोथा झाला. बँकिंग, रोजगार, विषमता ,गरिबी असे अनेक मुद्दे आहेत मात्र त्यावर ठोस उपाय एकही पक्षाकडे नाही .कर्ज माफी हा काही उपाय होवू शकत नाही. फुकट शिक्षण , आरक्षण हे उपाय समाजाच्या विकासासाठी तसे पोषक नाहीतच .

राजकडे महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा आहे अस प्रत्येक सभेत तो म्हणतो त्यासाठी वारंवार नाशिकच्या विकासाचे दाखले देतो तेव्हा सुज्ञ नागरिकांनी एकदा नाशिक पॅटर्न समजून घेतला पाहिजे म्हणजे याच्या त्याच्या दावणीला बांधून घेण्यापेक्षा राज समोर शरण जाऊन आता तूच रे वाली असा म्हणत विकासासाठी साकडं घालता येईल. उध्दव साहेबांना मुंबईचा विकास असाही जमत नाही आणि मग मनसेला खड्डे बुजविण्यासाठी घराबाहेर पडावं लागते एवढे करून खड्डे बुजतील तर शप्पत. मग कोणत्या पातीला शरण जायचं हा प्रश्न उरतोच . असो आता दोघांना एकत्र येणे शक्य नाही तर राजने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दाखवली हे ही काही कमी नाही. प्रश्न आहे सत्तेत राहून उध्दव राजला मात देतो की  राज विरोधी बाकावर बसून देवेंद्र आणि उध्दव यांना कामाला लावतो. फक्त चोवीस तास बाकी आहेत पाहूया राजला विरोधी नेतेपदी नेमण्याचा कौल जनता देते का? की मग राज स्वतः ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतो. 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar