खरच लक्ष्मी पावेल !

खरच लक्ष्मी पावेल !

नेहमी प्रमाणे मी काम आटोपून घरी निघालो होतो,रस्त्याला लागल कि पहिला विचार येतो तो आज तरी लोकल वेळेवर असेल ना !आज ऑफिस मधून निघायला  उशीरच झाला होता.नेहमी उशिरा येणारी लोकल जर वेळेवर आली असेल तर मला मिळणार नव्हती म्हणूनच मी भर भर चालत होतो.मी कबुतर खान्यापाशी पोचलो आणि माझा वेग मंदावला स्टेशनच्या दिशेने जाणारा रस्ता गर्दीने फुलला होता.रस्त्याच्या मधो मध फुल विक्रेत्या आणि ग्रामीण भागातील बायका हिरव्यागार  पानांच्या जुड्या घेवून विकायला बसल्या होत्या तेव्हा लक्षात आल, अरे ! उद्या  मार्गशीष महिन्याचा पहिला गुरवार.लक्ष्मीपुजन व्रताचा पहिला दिवस.मुंबईतील तमाम महिला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या पूजेच साहित्य खरेदी करायला दादरला मैत्रिणींसह डेरेदाखल होतात.विविध फुल आणि फळ, झाडांची पत्री या पुजेसाठी लागते आणि हि पत्री हमखास मिळण्याच मुंबई नगरातील  एकमेव ठिकाण म्हणजे दादर.शिकल्या सवरल्या,सुसंकृत म्हणवल्या जाणाऱ्या महिला  मार्गशीष महिन्यातील गुरवारी लक्ष्मीच पुजन करण्यासाठी लागणार पुजेच साहित्य खरेदी करायला दादरला येतात आणि हि पत्री खरेदी करतात पण एकाही महिलेच्या मनात हा विचार येत नाही की  निसर्गाची हानी करून, झाडांना नग्न करून आणलेली पाने पुजेसाठी वापरल्यास लक्ष्मी देवी पावन होईल कि कोपित होईल?       कोणत्या देवतेला तिच्या अधिवासाची,तिच्या निवासी जागेची केलेली हानी आवडेल? पण दुर्दैव ! शिकल्या सवरल्या महिलाच अशा जुन्या रिती रिवाजच पालन करतांना आजच्या आधुनिक युगात व्रत वैकाल्पांना चिकटून आहेत, ह्या मागे लक्ष्मीदेवतेची पुजा  मनोभावे की दिखाऊपणासाठी हे त्यांनाच ठाऊक. विशेषतः वन आणि जंगल संपत्ती नष्ट होत असतांना अशी पाना , फुलांनी पूजा करणे किती संयुक्तिक आहे.जर शहरातल्या महिलांनी समजुतदारपणे ह्या लक्ष्मी पूजनाचा नव्यान विचार केला आणि वनस्पतीच्या डहाळया,हिरवी पान यांच्या ऐवजी मर्यादित स्वरुपात फुल वापरली तरी लक्ष्मी माता त्यांच्यावर नक्कीच  कोपणार नाही.कोणीतरी लिहिलेल्या पोथीचा आधार घेत उगाचच जुन्या प्रथेप्रमाणे पाच झाडांच्या फाद्या ,पाच प्रकारची पाने यांचा स्वैर वापर केल्यास शेकडो नव्हे लक्षावधी महिलांकडून निसर्गाची किती हानी होत असेल? ह्याचा अंदाजच केलेला बरा. किती हानी निसर्गाची होते हे पहायचं असेल तर मार्गशीष महिन्यात शुक्रवारी शहरातल्या तळ्याच्या काठी विसर्जन केलेल्या पूजेच साहित्य पाहिल्यावर नक्कीच कळेल.ह्या पुजेन तळी अस्वच्छ होतातच,याच बरोबर रस्त्यावर गाईला म्हणून दाखवलेला नैवेद्य तसाच पडून राहिल्याने रस्ताही अस्वच्छ होतो.एकीकडे निसर्गाची हिरवाई कमी होत असतांना आणि शहरातल प्रदूषण वाढल असतांना झाड लावण्या एवजी छाटून टाकण्यात कोणता शहाणपणा आहे?    शिकल्या महिला म्हणतील आम्ही थोडीच झाड तोडायला जातो?बाजारात येतात म्हणून विकत घेतो,आमची काय चूक, आम्हाला बोल का लावावे? पण हे लक्षात घ्यायला हव आपण खरेदी केलीच नाही तर ह्या महिला ह्या पाना-फांद्यांच भल थोरलं बोचक गावातून शहरात आणतीलच कशाला ! लक्ष्मी पुजन करावस वाटत, तर ह्या फांद्या ,नको तितक्या फळांची खरेदी करून ती संपवता न आल्याने  दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कचर कुंडीत फेकून देण्यापेक्षा हॉस्पिटल मध्ये गरिब रुग्णांना तितक्याच पैशांची फळे वाटली तर पैसे सत्कारणी लागतील.लक्ष्मी पुजनासाठी पोथ्या आणून आणि ह्या पोथ्या इतर महिलांना वाटून लक्ष्मी पावन होईल हा भ्रम आहे. त्या पेक्षा तितक्याच किमतीची पुस्तके सार्वजनिक वाचनालयाला भेट दिल्यास वाचकांचे धन्यवाद मिळतील. वान  म्हणून कंगवे, प्लास्टिकच्या वस्तू ह्या गोष्टींवर वायफळ खर्च करण्यापेक्षा ते पैसे समाजासाठी उपयुक्त ठरेल अश्या उपक्रमाला देणगी द्या, मग एखादा अनाथाश्रम असेल वृदाश्रम असेल,बालसंगोपन केद्र असेल,किंवा महिला संगोपन नी सुधार गृह असेल.आपला पैसा योग्य कारणासाठी वापरला जातो आहे ना ह्याची खात्री करा. याच कारण लक्ष्मी पुजनापेक्षा या प्रकारे खर्च केलेला पैसा नक्कीच समाजाच्या सुधारणेसाठी उपयोगी ठरू शकतो.पूजाच करायची तर दरिद्री नारायणची,रंजल्या गांजल्यांची करा, ती  देशसेवा, देव आणि दैव सेवेपेक्षा मोठी ठरेल.अर्थात हे पटण   महा कठीण, पण कठीण वाटणाऱ्या गोष्टीच महान ठरतात.      पुढच्या गुरवारी लक्ष्मी पुजन करण्यासाठी एखाद बालसंगोपन केद्र,एखादा अनाथाश्रम,एखादा वृदाश्रम गाठा. त्यांची खुशाली घ्या,त्यांना शक्य ती मदत करा,त्यांच्याशी गप्पा मारा,पहा तुम्हाला कस वाटतंय. एक दिवस,एक गुरवार  अस वेगळ लक्ष्मीव्रत करून पहा आणि जरूर जमल्यास तुमच्या भावना कळवा.तो पर्यंत तुमची राजा घेतो,तुम्हाला गाईच पान घेवून तिच्या शोधात जायला उगाचच उशीर व्हायला नको,अर्थात गंमतीन  बर का! नाही तर सिर्यसली नैवेद्याच पान  घेवून गाईच्या शोधात नवरोबाला घेवून निघालही आणि तो बिचारा कुणी गाय दाखवता का गाय ! म्हणत उपासपोटी तुमच्या बरोबर रस्ता धुंडाळत बसेल आणि मनातून तुम्हाला काय ह्या बाईचे वेडे चाळे अस ही म्हणेल.पहा माझ म्हणण पटतंय का?    तुम्ही मॉडर्रन आहात,क्युट दिसता हे ऐकायला आवडेल ना ! पण मग मॉडर्रन महिलेन जुनाट विचार दूर नको का सारायला? आपण काही तरी वेगळ आणि समाजाच्या हिताच करतोय ह्याचा तुम्हाला अभिमान वाटावा अस हातून काही घडावं अस वाटतंय ना !, मग मनाशी नक्क्की निर्णय करा, येत्या गुरवारी किमान दहा महिलांना बोलावून व्रत कसे करू नये हे त्यांच्या कलाने समजून सांगायचे.नेहमीच्या पूजेऐवजी त्यांच्यासह एखाद्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावून रुग्णांची विचारपुस करायची.त्यांना धीर द्यायचा,शक्य झाल्यास प्रत्येक रुग्णाला एखादे आणि वेगळे वेगळे फळ द्यायचे.रुग्णांची काळजी घेणाऱ्या सिस्टर आणि आया यांची विचारपुस करायची आणि त्यांना त्याच्या सेवेबद्दल धन्यवाद देवून परतायचे.मला खात्री आहे हॉस्पिटल मधुन निघतांना तुम्हाला खूप बर वाटेल, स्वतः बद्दल आदर वाटेल.पैसा लक्ष्मी पूजनाने नाही तर तुमच्या कष्टानेच आणि हुशारीने मिळतो,तो असा फांद्या,आणि अन्य गोष्टीत वायफळ खर्चू नका.तो वाचावला म्हणजेच कमावला.मला खात्री आहे.ह्या गुरवारी अगली वेगळी लक्ष्मी पुजा आपण नक्की कराल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “खरच लक्ष्मी पावेल !

  1. Demetria

    Spot on with this write-up, I absolutely think this website
    needs much more attention. I’ll probably be returning to see more,
    thanks for the info!

  2. Irwin

    Hello, i think that i noticed you visited my website thus i came to
    return the desire?.I am attempting to find things to improve my site!I suppose its adequate to make use of
    some of your ideas!!

Comments are closed.