शेवंता भाग १

शेवंता भाग १

शेवंता शाळेच्या वाटेला लागली, तेव्हा सात सुध्दा वाजले नव्हते. शनिवारी शाळा सकाळी असल्याने, दर शनिवारी तिची अशीच गडबड उडत असे. तिची चुलती केस विंचरून द्यायची पण आताशा ते तिच्या मना येत नसत. तिच्या आईला तिचं काही करायची परवानगी नव्हती. शेवंता जरी वसंत वराडकर यांची मुलगी असली तरी तिच्यावर हक्क मात्र थोरल्या शरद आणि त्याची पत्नी शारदा यांचाचा  होता. शेवंताला कळायला लागलं तेव्हा पासून ती पहात होती. तिची चुलतीच तिचं सगळं करायची, खरं तर ती चौथीत जाईपर्यंत चुलतीलाच आई म्हणून हाक मारायची, तिलाच आई समजायची. ती तिसरीत असताना एकदा एक गृहस्थ पावशीहून त्यांच्या घरी आला, तिच्या आईबरोबर जिला ती काकी समजत होती, तिच्याशी त्याच संभाषण तिने अंगणातून ऐकले, तिची खरी आई त्या गृहस्थाला, म्हणजे आपल्या भावाला, शेवांताच्या मामाला सांगत होती.

“पोरग्याक मी जनम दिलंय पण माझ्या वाऱ्याक दिकूल ठेवणा नाय, काय उपेग जनम देवन, ता पोरग्या दिकूल तिकाच आई आई म्हणान हाक मारता, आपल्या बापसाकव वळकणा नाय, त्याका आबा म्हणून साद घालता. घरात सारो अधिकार जावेचो आणि दिराचो, आम्ही त्यांचे पैरे. हे मजुरीचे पैसे आणतत आणि ती फौजदारीण मागून घेता. ह्या बापयाक कळणा नाय! आपल्या बायलेकव अडी नडीक पैसे लागतले ते कोण देतलो? माझो वर गेलेलो बापूस?” तिच बोलणं ऐकून तो खूप दुःखी झाला पण त्याच्या घरीही अठरा विश्व दारिद्रयच होत. तो तिला काय सांगणार. तरी तो बहिणीच सांत्वन करण्यासाठी म्हणाला, “आत्ता, भावजींका आपलो संसार कळणा नाय त्याका काय करशीत? त्यांनी भावजयीक सांगूक व्हया, आमच्या पोरग्याचा आमी बघू म्हणान, नाय पेक्षा येगळा बिऱ्हाड करा, काय होईत, भांडाण करतीत, घरातसून भायर काढतीत ह्याच मा? काडू दे भायर खोप बांधून रवा, मगे बांधूक येइत पाठसून, हयांची फुकटची बाजीरावकी कित्याक? माका जमात तशी मजतव करीन”.

ती चिडून म्हणाली,” घर काय त्यांच्या एकट्याच्या बापाशीचा हा? माझो घोव काय आणलेलो हा!” शेवंती बाहेर बसून अभ्यास करत होती. तिने ते ऐकलं, तिला पूर्ण समजलं नाही तरी तिला हे नक्की कळलं की आता काकी आणि तो माणूस ,ज्याला आपण मामा हाक मारतो ते बहीण भाऊ आहेत आणि त्यांचं बोलणं आपल्या विषयी आहे. जिला ती आपली आई समजत होती, आई म्हणून हाक मारत होती ती आई नसून काकी आहे आणि आई बिचारी मोलकरणी प्रमाणे राबत आहे.





ती तिच्या आईला नव्हे काकीला हे विचारणार होती. पण ती कुडाळला बाजाराला गेली होती. तिला आपल्या आईचा स्वभाव माहीत होता आई काय हवं नको ते आणून देई पण चुकूनही ती काकीकडे गेली किंवा “गे काकी खय आसस ?”अस तिने विचारले की म्हणे, “तुका कित्याक व्हयी ती बया? दुद पाजतली, का मांड्येवर घालतली? मी काय कमी करतय तूका?” याच उत्तर खरच तिच्याकडे नव्हतं. जिला ती आई म्हणत होती तिने शेवंतीसाठी आई करेल ते सर्व केलं होत, तिला जन्मदात्या आई पासून दूर ठेवण्यात ती यशस्वी झाली होती, मग आपली खरी आई कोण? हे तिला समजण्याचा मार्ग होताच कुठे? 

घडला प्रकार शेवंताने मनात ठेवला, ना सख्ख्या आईला  विचारलं ना खोट्या आईला म्हणजे चुलतीला विचारलं. तिला माहीत असलेले गुपित तिने मनात ठेवल पण त्या दिवसा नंतर ती अबोल झाली. तिच्या आईने म्हणजे काकीने लाड केले तरी तिच्याशी लगट नाही की काही हवे म्हणून हट्ट ही नाही.

तिच्या स्वभावात झालेला बदल चुलती, तिची आई पहात होती, एक दिवस तिने रागावून शेवंताला विचारले, “गो शेवत्या तुका झाला हा काय? नीट जेवणस नाय, की बोलण नाय. बरा हा मा?” ती काही बोलली नाही. तिला तिच्या आई विषयी सत्य कळाले तेव्हा पासून ती मूकपणे घरातील व्यवहार पहात होती. तिचे आईबाबा राब राब राबत होते पण होणाऱ्या अन्ययाबाबत त्यांनी एकदाही नापसंती दर्शवली नाही. हे खरच विचित्र होतं. हाडा मासाची माणसं असूनही  का म्हणून अन्याय सहन करतात ते तिला कळेना. आई आणि त्या व्यक्ती मधील संवाद तिने ऐकला त्यानंतर लगेचच योग जुळून आला तिला तिच्या शिक्षकांनी एकदा त्यांच्या कपाटातून हजेरी पुस्तक आणायला पाठवलं, ती वहीवर स्वतःचं नाव शेवंती वसंत वराडकर लिहीत होती आणि शाळेच्या हजेरी पुस्तकात तेच नाव लिहिल होत शेवंती वसंत वराडकर, आज पर्यंत तिने याचा कधी गांभीर्याने विचार केला नव्हता. तिचं वयही हसण्या खेळण्याचं होत, तिला लहानपणीच काकी ने स्वतःला आई आणि काकांना बाबा म्हणायची सवय लावली होती. ते तिचे सर्व काही पहात होते त्यामुळे तिला आपले आई बाबा हे नव्हेत अस वाटण्याची शक्यताच नव्हती. जर तिने तिची जन्मदाती आई आणि तिचा मामा यांच्यातील संवाद ऐकला नसता तर तिला आपल्या वडिलांचे नाव नक्की काय हे मुद्दाम पाहण्याची गरज भासली नसती.

हजेरी पुस्तक पाहिल्यामुळे तिची खात्री झाली की ज्यांना ती काका समजते तेच तिचे जन्मदाते आहेत. हजेरी पुस्तक  पाहिल्या पासून तिच मन आक्रंदत होतं, पण घरात तिच्या खऱ्या काकी व्यतिरिक्त कोणाला अधिकारच नव्हता, अगदी काकालाही. “ह्या असा आसा तर आये तिका कित्याक नाय सांगणा की माझा चडू माझ्याकडे झोपात म्हणान, कित्याक व्हयतो अन्याय सहन करता?” ती स्वतःशी बोलली.





तीच घरातलं वागणं तुटत गेलं. तिची काकी खरं तर तिच्याशी अतिशय चांगलच वागत होती. तिला कोणतंही काम सांगत नव्हती. आपल्या जावेकडून आणि दिराकडून काम करून घेण्यातच तिला धन्यता वाटे. शेवंता लहान असल्यापासून पहात होती की आपली आई घरातील सर्व कामे चुलती आणि काका यांच्याकडून करुन घेत होती. आई आणि बाबा मात्र आराम करत असतात हे ती पहात होती. पण तिला सत्य कळल्यापासून, ती तिला जमेल तशी चुलतीला म्हणजे जन्मदात्रीला मदत करत होती. अर्थात शेवंताच्या खऱ्या काकूला याचा राग येत होता. ती शेवंताला म्हणे “गो, तुझो अभ्यास कर, घरातला काम जन्मभर करूचाच हा, आता तुझ्या मदतीची त्यांका गरज नाय”. जशी शेवंता मोठी होत होती वर्गात शिकवलेल गुलामी, अन्याय हे ऐकून तिच्या मनात काकी विषयी चीड उत्पन्न होत होती. आपली काकी आई आणि बाबा यांना गुलामा प्रमाणेच वागवते हे तिला कळत होत. काकी तिला वाढत्या वयानुसार  लागणाऱ्या सर्व वस्तू पावडर,चप्पल, टिकल्या, नेलपॉलिश, मेहेंदी सगळं तर देत होती पण मुलगी आणि आईबाबा याचं रक्ताचं नात तोडण्याचं जे वाईट काम तिने केलं होत त्या बद्दल गेले पाच वर्ष शेवंताच्या मनात आग धुमसत होती. तिच्या काकी एवढी आई सुद्धा दोषीच होती. अन्याय करणाऱ्यापेक्षा  अन्याय सहन करणारा जास्त दोषीच अस तिने तरी वाचलं होत,आज ती अनुभवत होती.

शेवंता आता नववी इयत्तेत शिकत होती. समाजशास्त्र शिकताना ती गुलामगिरी, बहिष्कृत करणे, उठाव असे शब्द ऐकत होती. अन्याय सहन करणं हा ही गुन्हाच असं आंबेडकर म्हणाल्याबाबत तिने वाचलं होतं. त्या साठीच बाबा साहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. समता, बंधुता, प्रेम, संम्यक मार्ग याची शिकवण देणारा धर्म स्वीकारून माणूस दुसऱ्याला माणूस म्हणून जगू देत नव्हता. हे याच घरात सुरू होत. मग बाबासाहेबांची शिकवण यांना कळली नाही हेच खरे. या घुसमटीत शेवंता जास्त समजूतदार झाली. 

शेवंता नेहमी वर्गात पहिल्या पाच मुलात असे, शाळेतील विविध स्पर्धात ती भाग घेत असे. त्यांच्या शेजारी राहणारी नेत्रा काकी ही मालवण येथे शिकली होती ती तिला काही अडलं तर मदत करत असे. ती काकी अंगणवाडीत शिक्षिका होती. प्रेमळ होती. एक दिवस तिने आपली वेदना तिला सांगितली. ती म्हणाली “शेवंता, मी तुका अभ्यासात काय व्हई ती मदत करीन पण तुमच्या घरगुती भांडणात नको गे बाय, तुझी काकी खाऊन टाकीत माका, तू आपला, तुझ्या गुरूजींका सांग ते तुका नक्की मदत करातीत”. तिने ठरवलं घरातील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे नाहीतर आपण शिकूनही काही फायदा नाही. आपल्या घरात होणाऱ्या अन्यायविरुद्ध जर आपण लढू शकलो नाही, तर शिकायचं कशाला? तिला स्वतःची लाज वाटू लागली. आपण आपल्या आईला मानाने जगता येत नाही या विषयी बोलू शकलो नाही तर शिक्षणाचा उपयोग काय?

विचार करता करता तिला रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी तिला उठायला नेहमीपेक्षा उशीर झाला. तो शनिवार होता. शाळा सकाळची आणि अर्धा दिवस होती. ती सकाळपासूनच अस्वस्थ होती. काल तिला नेत्रा काकी म्हणाली ते आठवले. आपण आज नक्की या बाबत सरांच मार्गदर्शन घेऊ अस तिने मनोमन ठरवलं. पाच तास झाले आणि प्रार्थना झाली. शनिवार म्हणजे मुलांचा आवडीचा वार, प्रार्थना संपते कधी आणि घरच्या वाटेला लागतो कधी असे सगळ्या मुलांना झालेले असते. शेजारी असणाऱ्या दुकानातून पेप्सी घेतली की वाट भर ती चोखत वाटेला लागत. कुणी कुरकुरे पाकीट तर कुणी वेफर्स घेऊन खात. गप्पागोष्टी करत वाटेला लागायची. काकी तिलाही पैसे द्यायची. आज तिचा अजिबात मूड नव्हता.





सर्व मुले मुली लगबगीने घरी जायला निघाली.एक एक करत शिक्षकही मुख्याध्यापक कक्षातून बाहेर पडले. मुख्याध्यापक पाटील सर सकाळी सभेला गेले होते त्यामुळे त्यांच्या कार्यालयात, मोठ्या आवाजात शिपाई काका बोलत होते. ती बाहेर उभी होती. सामंत सर सगळ्यात शेवटी बाहेर पडले, त्यांनी तिला पाहिले आणि म्हणाले, “काय गो तू घराक जावक नाय? हय कित्याक उभी? कोनाक भेटूचा हा?” “सर, माका तुमका काय तरी सांगूचा हा.” ती त्यांच्या पायाकडे पहात म्हणाली.” सांग, काय सांगत, धडो कळाक नाय काय?” “तसा नाय सर माका घरगुती अडचण सांगूची हा.” शेवंता च बोलणं ऐकून सर म्हणाले, “गो सोमवारी भेटीनास मधल्या सुट्टीत, स्टाफ रुमात ये, आता माका जावक उशीर जातलो, चलात मा!” तिच्याशी बोलून त्यांना वेळ घालवायचा नव्हता.

“सर, पाचच मिनिटा.” ती अगतिक होत म्हणाली. ” बरं, सांग झटपट, उगाच वेळ काढू नको”. ते म्हणाले “सर,माझ्या घरात आई-बाबा, चुलते-चुलती आणि मी पाच जणा आसव, माका कळाक लागला तित पासून मी काकीक आई म्हणतय. माका आजुबाजूच्या कोणीच कधी त्या बद्दल सांगूक नाय की विचारुक नाय. सर मी चौथीत असताना माका माझ्या मामाच्या बोलण्यातसून कळला की जिका मी काकी म्हणतंय तीच माझी आवस आसा आणि काका म्हणतंय ते माझे बाबा आसत.” सामंत सराना कळत नव्हते की तिला काय सांगायचे आहे, पण आता तिचे पूर्ण ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता, पालक सभा असेल तेव्हा तीच तर यायची, अगदी रुबाबात असायची. मुद्दाम थांबून तिच्या प्रगती विषयी चौकशी करायची त्यामुळे येणाऱ्या बाई ह्याच तिची आई असावी असा त्यांचा समज होता. वेळ जात होता त्यांनी घड्याळ पाहिले. “बर मगे काय झाला, आजव एकत्र रवतास मा? का तुझ्या आवशीक वेगळा काढल्यानी?”

“सर, माका कळल्यापासून गेले चार पाच वर्षा मी  विचार करण्यात घालवलय, माझी चुलती माझ्यावर अधिकार गाजवता आणि माझ्या आवशी आणि बापाशी कडसून घरातली सगळी कामा करून घेता. अगदी छळ करतत. माझे आवस बापूस गुलाम असल्यावरी दिवसभर राबतत आणि माझी चुलती मात्र मालकीणीवरी वागता. माझ्या बापाशीकडसून त्याची मजूरीव मागून घेता. सर, आज पर्यंत मी गुपचूप सहन केलंय पण आता माका सहन नाय जाणा,सर काय करू मी? तुम्ही करशात माका मदत?”

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

35 thoughts on “शेवंता भाग १

  1. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    छान! दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे!

  2. Mangesh kocharekar
    Mangesh kocharekar says:

    Thanks for complement. Next part will be on next Monday.

  3. exact replica watches

    very nice looking watch for the money.

  4. john wick

    You should take part in a contest for one of the most useful websites online. Lilla Dirk Ashien

  5. canli tv

    Wonderful post! We are linking to this particularly great post on our site. Keep up the great writing. Imojean Leonardo Agosto

  6. erotik

    I really like it whenever people get together and share ideas. Kelli Quentin Breanne

  7. erotik

    Wow because this is very excellent job! Congrats and keep it up. Mallissa Robers Timoteo

  8. bahis

    Very nice post. I just stumbled upon your blog and wished to say that I have truly enjoyed browsing your blog posts. Brianna Lucius Anatole

  9. erotik

    Major thanks for the blog article. Really thank you! Great. Elnora Edvard Ardolino

  10. erotik

    You beget a very interesting website. I like the whole word that you accommodate with every article. Christan Francisco Pinkerton

  11. sikis

    These are actually enormous ideas in on the topic of blogging. You have touched some nice factors here. Any way keep up wrinting. Dael Price Nadaba

  12. erotik

    This site truly has all of the information and facts I wanted about this subject and didn at know who to ask. Joycelin Chas Caresse

  13. bahis

    Every weekend i used to pay a visit this web page, as i wish for enjoyment, since this this web page conations truly nice funny information too. Karalee Mord Harv

  14. erotik

    I really liked your blog. Thanks Again. Really Great. Kyrstin Lovell Lazarus

  15. sikis

    Your style is unique in comparison to other people I have read stuff from. Myrilla Price Rog

  16. yify

    Please take a look at the internet sites we stick to, which includes this a single, because it represents our picks in the web. Bessy Caleb Eckmann

  17. indir

    I am genuinely thankful to the holder of this web page who has shared this fantastic piece of writing at here. Rana Kristoforo Antonina

  18. torrent

    Good article! We are linking to this particularly great content on our website. Keep up the great writing. Uta Kalvin Edmanda

  19. indir

    Im obliged for the article post. Really thank you! Much obliged. Lilian Julian Stenger

  20. torrent

    Great post. I will be going through some of these issues as well.. Lorita Brnaba Fabien

  21. bedava

    I am extremely impressed with your writing skills as well as with the layout on your weblog. Junette Frederick Dasha

  22. web-dl

    Excellent article. I am dealing with many of these issues as well.. Jasmina Ruttger Jacy

  23. yify

    Very good post! We will be linking to this particularly great article on our website. Keep up the great writing. Lucilia Donnell Claudio

  24. bluray

    The clarity in your post is just nice and I can tell you are an expert in the subject matter. Korney Lek Jaala

  25. dizi izle

    Great delivery. Great arguments. Keep up the amazing spirit. Caril Von Laughlin

  26. 1080p

    Please see the top of this website, you can order it on line. Giulietta Ferdy Ruffo

  27. access

    Hi there. I discovered your website by way of Google while looking for a comparable subject, your website got here up. It appears good. I have bookmarked it in my google bookmarks to come back later. Selina Shermy Rox

  28. vampir gunlukleri

    Very good post. I am facing some of these issues as well.. Wandis Boony Jairia

  29. turkce

    TRADER is the safest cryptocurrency that exists in the market. Danielle Laurence Aluino

  30. 123helpme

    Yes! Finally something about Mary.

  31. page

    Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could add to my blog
    that automatically tweet my newest twitter updates. I’ve been looking for a
    plug-in like this for quite some time and was hoping maybe
    you would have some experience with something like
    this. Please let me know if you run into anything. I truly enjoy reading your blog and I look forward to your new updates.

  32. page

    I am curious to find out what blog system you have been using?
    I’m experiencing some minor security problems with my latest blog and I’d like
    to find something more safeguarded. Do you have any recommendations?

  33. page

    Thank you for any other informative web site. The place else may just I
    get that type of info written in such a perfect method?
    I have a challenge that I’m simply now running
    on, and I have been at the look out for such information.

Comments are closed.