स्पेस

स्पेस

संदीप आईवर खेकसला, “अगं आई काय करतेस? माझा मोबाईल तुला कशाला हवा? तुझा आहे ना?” “अरे माझ्या मोबाईलच नेट गेलंय, जरा रेसिपी बघत होती रे, तुम्हाला गिळायला काही तरी नवीन करेन म्हणते. हे बघ, हा मोबाईल, मेला सुरू होत नाही, पासवर्ड टाकला आहेस का? जरा YouTube सुरू करून दे.”
“अग,चार्जिंगला लावला होता ना? मला न सांगता काढलास?” संदीप आईवर कुरकुरला. “का रे मेल्या, तुझा मोबाईल घ्यायला मला तुझी परवानगी घ्यायला हवी होती की काय? मी आई आहे तुझी, जन्म दिलाय. आधी त्याच YouTube सुरू कर आणि दे.”

संदीपने आईला मोबाईलवर Anita’s Recipe सुरू करून दिलं आणि ती तो मोबाईल घेऊन किचनमध्ये गेली. मुलगा आणि आई मधला हा संवाद काय सांगतो, काय सूचित करतो? संदीप हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे,त्याच एक वेगळं अस्तित्व, वेगळ भावविश्व आहे. त्याचा मोबाईल हा वैयक्तिक विषय आहे त्यामुळे अगदी जन्मदात्री असली तरी तिने त्याच्या वैयक्तिक वस्तूला हात लावणं त्याला मान्य नाही. इतकेच काय परंतु पालकांचे सततचे Do, Don’t ऐकून त्याला चिड येते.

असे बरेच संदिप समाजात आहेत, त्यांचं भावविश्व वेगळं आहे. आता या मोबाईलच्या जमान्यात घरात कोणालाच कोणाशी बोलायला वेळ नाही. कोणत्याही मुलाला, मुलीला तिच्यासाठी आलेला मेसेज कोणी दुसऱ्या व्यक्तीने पाहणे किंवा तिचा कॉल घेणे रुचत नाही मग त्या व्यक्ती घरातील भाऊ बहीण वा आई बाबा असले तरी तिचे मत तेच असते. तिचा किंवा त्याचा कॉल किंवा मेसेज ही त्यांची खाजगी बाब असते त्यात कोणी डोकावणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा वाटते.





प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या planning नुसार त्याच काम, मोबाईलवर होणारे वेगवेगळे व्यवहार करण्यात व्यस्त आहे. मर्यादित मित्रांच्या परिघात त्यांच्याशी chatting करण्यात,काही discuss करण्यात आणि Week End celebration ठरवण्यात व्यस्त आहे, या चर्चेत प्रत्येक वेळी घरातील कुणी असेलच असे नाही. सर्व प्रोग्राम ठरल्यावर घरून निघताना formality म्हणून मी निघतो अस सांगेल किंवा तसा मेसेज ठेवेल. तुम्ही तुमचा किती वेळ त्याला देता यावर ते ठरते. त्यांच्या भावविश्वात जास्त दखल दिलेली त्यांना रुचत नाही.

आताची पिढी खूप शार्प आहेत, बारा चौदा वर्षांची झाली की त्यांचं व्यक्तिगत जीवन वैयक्तिक होऊ लागते. त्याच्या आवडी निवडी, त्याची अभिरुची भिन्न असणार ह्यात वाद नाहीच. त्याच्या आयुष्याचा एक स्वतंत्र कप्पा याच वयात निर्माण होऊ लागतो. चाळीस वर्षांपूर्वी वय वर्षे पंधरा पर्यंतच्या घरातील मुलांच्या कपड्यांची खरेदी पालक करत होते, बऱ्याच वेळा घरातील मुलांचे कपडे एकाच रंगातील कपड्याने शिवले जात आणि ही “फडक्यांची” मुले अस केवळ कपडे पाहून सांगता येई. अर्थात बँडवाल्या प्रमाणे एकच युनिफॉर्म असणे हास्यास्पदच. पण त्या वेळेस असणारे मर्यादित उत्पन्न पाहता पालकांकडे अन्य मार्ग नव्हता. कापड वाचवणे किंवा कमी खर्च हाच उद्देश तेव्हा होता.

आता या वयातील मुलांचे कपडे ते स्वतः खरेदी करतात, त्यांना रंगसंगती कळते, त्यांना कोणत्या ब्रँडचे कपडे चांगले ते कळते ही चांगली बाब आहे. परंतु हे कपडे ठेवण्यासाठी त्यांना स्वतंत्र कपाट, किमान कप्पा लागतो आणि हा कप्पा ही त्यांची private property असते. त्यात कोणी चुळबुळ किंवा अतिक्रमण केलेलं त्यांना खपत नाही. इतकाच काय तर त्यांच्या या कप्प्यात त्यांनी कोणत्या वस्तू ठेवाव्यात? कश्या ठेवाव्या हे ते स्वतः ठरवतात. याचा साधा अर्थ Space च फॅड छोट्या मुलांमध्ये पोचलं आहे. जर ही लहान मुलं गप्पा मारत असतांना तुम्ही गेलात तर ते आपल्या गप्पा अचानक थांबवतात. त्यांना त्यांच्या गप्पा किंवा तो विषय सोशल करायला आवडत नाही किंवा सुरक्षित वाटत नाही. आता अगदी सातवी आठवीच्या मुलांनासुध्दा प्रायव्हसी लागते. त्यांची फ्रेंडशीप होते आणि नाही पटलं तर ब्रेक अप होते. तुम्हाला वाटेल हे जरा अती होतय, पण हेच वास्तव आहे.

पूर्वी लोखंडी कपाट, वॉर्डरोब अस काही नसायचं, एखादं लाकडी फडताळ किंवा कपाट असे, त्यात सर्व कुटुंबाचे कपडे एकत्र गुण्या गोविंदाने राहात. अगदी दहा बारा माणस, काका, काकू, आत्या, चुलत भाऊ, बहीण एकत्र एकाच घरात रहात दिवाणखान्यात किंवा एका खोलीत झोपत. आज माहोल बदलत आहे, मुलांना त्यांचं स्वतंत्र कपाट, स्वतंत्र टेबल, आणि Bed हवा असतो. त्यांच्या Bed वर केलेलं अतिक्रमण त्यांना रुचत नाही. कुटुंबात कुणी पाहुणे आले की आपण सन्मान म्हणून बेड त्यांना देतो. पण आता पिढीला असा बेड पाहुण्याला देणे वा बेडरूम share करणे पसंत नसते. त्यांच्या दिनक्रमात त्यांना अडचण वाटते. स्वतःची Space असणं याला आजची पिढी खूप महत्व देते. या Space मध्ये आई,बाबा,भाऊ,बहीण हिला जागा असेलच ह्याची शास्वती नसते. त्या Space चा हक्कदार कदाचित कोणी वेगळा असू शकतो.





नवीन पिढी तिच्या मूड नुसार जगते कधी मित्रमैत्रिणींच्या गराड्यात तर कधी अगदी एकटी. त्यांची मानसिकता समजून घेणे तसे अवघडच. अगदी त्यांच्या,आनंदाचे वा दुःखाचे कारणही ते कुणाही बरोबर share करत नाहीत. त्यांचा मूड खराब असला तरी त्याचे कारण कदाचित ते जन्मदात्रीला सांगतील ह्याची हमी नसते. बिच्चारी आई, तिचा आपला गोड समज असतो की माझ मुलं माझ्यापासून काही लपवणार नाही. पण वाढत्या वयाबरोबर हे अंतर वाढते हे नाकारून चालणार नाही. ह्या Space चा मालक कोणी वेगळा असतो ज्याच्यात त्यांची भावनिक गुंतागुंत असते. तो मित्र असेल मैत्रीण असेल वा कुणी अन्य. पण तुम्ही नक्कीच नाही.

मुल मोठी झाली की त्यांचे मित्र त्यांना कुटुंबातील व्यक्तीपेक्षा जवळचे वाटू लागतात, त्यांच्याकडे ते आपलं मन मोकळ करतात. त्यांची भावनिक गरज ही भिन्न असते. कदाचित मुले आणि पालक यांच्या वयातील अंतरामुळे आणि लवकर समज आल्यामुळे किंवा जनरेशन गॅप मुळे त्यांच्यातील भावनिक अंतर वाढत असावे ते Comfortable feel करत नसावे. अर्थात असे बदल घडणारच पण हे पालकांना मान्य असले तरी मनाला पटत नसते. अरे काल परवा पर्यंत हा माझ्या भोवती घोटाळत होता. अगदी आई आई करायचा आत्ता याला काय झालं? असं आईला वाटण स्वाभाविक आहे.

पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता समजून घेणं थोडं अवघड आहे. हार्मोनल ग्रोथमुळे जे शारीरिक बदल होतात त्याचा परिणाम म्हणून मूल स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतो याचा परिपाक वैचारिक मतभेद वाढण्यात होतो. “तू हे करू नको.” अशी मुलांना केलेली सूचनाही, का? या प्रश्नाला जन्म देते. थोडक्यात मन चौकस होत, तुला कळणार नाही इतकं स्पष्टीकरण पुरेसा नसत. गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. कोणत्याही क्षणी मन बंड करून उठते. म्हणून वाढत्या वयात त्यांना समजून घेताना या नाजूक कळ्याना जपले पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे. तर मतभेद होणार नाहीत.

काही कुटुंबात मात्र अजूनही मुले आणि पालक यांच्यात संवाद सुरू असतो. ज्या कुटुंबात आई आणि मुले असा संवाद सुरू असतो ती मुलं एककल्ली, घुमी होत नाहीत, आपली विवंचना ते कदाचित वडिलांना सांगणार नाहीत मात्र आई जवळ ते व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या कुटुंबात आई आणि पालक यांच्यात विसंवाद नसतो तिथे स्वतःची Space सांभाळूनही दुसऱ्या व्यक्तीच्या मतांचा आदर होतो. अर्थात हे दोन्ही बाजूनी संबंध कसे आहेत त्यावर अवलंबून असते. पालकांनी मुलांच्या नाते संबंधात अतिउत्साह दाखवू नये किंवा जहाल शब्दात नाक खुपसू नये हेच योग्य.

कॉलेज गोइंग मुलं, मुली यांच्या बाबतीत हे प्रश्न गंभीर असतात, त्यांचे आदर्श बदलतात, त्यांची आवड निवड बदलते, त्यांची स्टाईल बदलते. काही तरी वेगळ करून पहाव मनाला वाटू लागतं. टापटीप राहावं, कोणाच लक्ष वेधून घ्यावं. लोकांनी कौतुक करावे अस वाटू लागते.
स्वतःची छाप पडावी यासाठी वाट्टेल ते करायला ते तयार असतात. या पुढे आपल्या पालकांनी शिक्षणा बाबत सल्ले देऊ नये. त्यांच्या वेळेची शिक्षण पद्धती कालबाह्य झाली त्यामुळे अभ्यास कसा करावा? ते त्यांचे त्यांना ठरवू द्यावं अशी अपेक्षा असते. त्यांचे विचार योग्य असतीलही पण पालकांची सूचना ऐकण्यास हरकत नसावी. परंतु आपल्या अभ्यासात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी इअर फोन लावून संवाद माध्यम बंद करणे चुकीचे आहे. केवळ स्वतः ची स्पेस निर्माण करण्याचा आणि ती टिकवण्याचा प्रयत्न करतांना मुले स्वतःच स्वास्थ्य आणि अमूल्य वेळ मुले वाया घालवतात तेव्हा वाईट वाटते.

मोठं मोठ्या कार्यालयात देखील याची प्रचिती येते. ज्यांचे विचार समान असतात किंवा आवड समान असते त्यांच्यात लवकर मैत्री होते. “समान गुणे व्यसनेशु सख्यम्” कोणत्याही कार्यालयात कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र ग्रुप असतात त्यात अन्य कोणाला जागा नसते. दोन शेजारी महिला हितगूज करतांना जर तिथे तिसरी व्यक्ती आली तर विषय थांबवतात किंवा बदलवतात. याचाच अर्थ त्यांच्या Space मध्ये तिला किंवा तिसऱ्या व्यक्तीला स्थान नसते.





कार्यालयात दुपारच्या लंच टाईमचा ग्रुप आणि संध्याकाळी टी टाईमचा ग्रुप भिन्न असू शकतो. ज्याचे ज्याच्याशी किंवा जीच्याशी पटते त्या दोन व्यक्ती एकत्र येतात. मग त्यांच्यातील वय भिन्न असेल आर्थिक स्तर भिन्न असेल किंवा सामाजिक स्थर देखील भिन्न असेल तरी मैत्री होते. जर दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्ती विषयी गैरसमज वाढवणार भाष्य करत असतील तर त्याला Gossip म्हणत असावेत आणि अस Gossip करण योग्य नाही. पण जेव्हा दोन महिला, मैत्रीण बनून बोलतात तेव्हा त्या कुणाची तरी चेष्टा, मस्करी किंवा बदनामी करत असाव्यात असा संशय घेतला जातो तो अयोग्य असतो. जर दोन भिन्न व्यक्तींनी एकमेकांशी सुखदुःख शेअर केलं तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप करणं किंवा रस घेणं वाईटच. त्यांच्या स्पेस मध्ये दखल देणं अयोग्य.

गेल्या तीस वर्षात बरच पाणी पुलावरून वाहून गेलं. घराचा आकार मोठा झाला आणि माणसाच मन छोटं झालं. लग्न ठरवताना मुलाचा स्वतंत्र ब्लॉक आहे की नाही, गाडी आहे की नाही याची चौकशी होते आणि जर मुलगा स्वतंत्र राहणार असेल असच स्थळ मुलगी आणि तिची आई पसंत करते.सुनेला संयुक्त कुटुंबात राहणे गैरसोयीचे वाटते. तिच्या संसारात तिला तिसरं कोणी नको असते. साहजिकच जर मुलगा आपल्या कुटुंबासोबत रहात असेल आणि लग्न इच्छुक असेल तर तू स्वतंत्र घर घेतलं तर विचार करता येईल असं सांगितलं जातं.

मुलींना आपल्या संसारात, सासू ,सासरे किंवा दीर यांची अडचण नको असते. तिच किचन, हे फक्त तिचं असतं त्यात कोणी लुडबुड केलेली तिला खपत नाही. याऊलट सासूही आपल किचन सहजासहजी सुनेच्या ताब्यात देण्याचा मोठेपणा दाखवत नाही. तिलाही अनेक वर्ष त्या किचनमध्ये वावरण्याची सवय झाल्याने ती जागा ही तिची हक्काची झालेली असते. यामध्ये तिचे किचन वापरू देण्याचा समजूतदारपणा सासूने दाखवला नाही तर वाद होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच समजूतदार पालकही मुलाला, नोकरी मिळाली की फ्लॅट घे म्हणून पाठी लागतात, समाजव्यवस्थेत होणारा बदल पाहता मुलाजवळ स्वतंत्र घर असेल तर पालक निमित्ताने जाऊन संबंध सुरळीत ठेवतात, त्यांनाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपता येते.
मात्र आदी अडचणीत एकमेकांना गरज लागली की सवय नसल्याने जुळवून घेणे कठीण भासते. म्हणूनच या Space चा विचार करतांना त्यातील भविष्यातील धोक्यांचा आढावा तरुण मुले आणि पालक या दोघानी घेणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा मुले आणि पालक वेगवेगळ्या ठिकाणी किंवा शहरात रहात असतात मात्र सुनेला तिच्या बाळंतपणात सासूने मदत करावी किंवा तिचे बाळ मोठे होई पर्यंत सासू सासऱ्यांनी तिच्याकडे राहावे असे वाटू लागते. अशा वेळी यापूर्वी एकट्या राहीलेल्या सासूला जुळवून घेणे अवघड वाटते. म्हणून स्वतंत्र अस्तित्व किंवा Space चा विचार करताना आपल्याला भविष्यात याच नात्याचा उपयोग होऊ शकतो हे लक्षात घेऊन संवेदनशील असले पाहिजे. तिथे Use And Throw हे तत्व चालत नाही हे लक्षात घ्यावे तरच भविष्यात खटके उडणार नाहीत आणि Space चा आदरही होईल.

आता तर नवरा आणि बायको यांनाही स्वतःची स्पेस हवी असते हे विशेष. घरात अवघी दोन माणस असतांना यांना टू बीएचके फ्लॅट का लागतो? हे कोड सुटत नाही. दोघांनाही एकमेकाचा सहवास नेहमीच सुखद वाटेल असे नाही अशावेळी प्रायव्हसी मिळावी असाही त्याचा उद्देश असू शकेल. त्याचे किंवा तिचे भावनिक बंध दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाशी असू शकतात. भावनिक बंध ही मनाची गरज असते त्यात वासना किंवा शारीरिक ओढ असतेच असे नाही. जर दोघांचे व्यवसाय क्षेत्र समान असेल तर त्या व्यवसाय किंवा नोकरीतील अडचणी, वेळेची बंधने किंवा उशिरा पर्यंत थांबावे लागणे या बाबत त्यांना जाणीव असते परंतु बऱ्याचदा कामाचे क्षेत्र भिन्न असते त्यामुळे घरी परतायला उशीर झाला किंवा काम निम्मित कोठे जाणे झाले की दोघे व्यथित होतात. दोघांच्या मनात संशय निर्माण होतो. अगदी त्यांच्या कार्यालयाची पिकनिक गेली आणि तिने थोडे सुदंर, थोडे वेगळे कपडे घातले की शेरेबाजी सुरू होते. “कोण बघायला येणार आहे? किंवा एवढा नट्टा पट्टा कोणासाठी चाललाय?” असा विसंवाद का होतो कारण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आम्ही आदर करत नाही. त्याला वेगळ अस्तित्व आहे तो आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, जगू शकतो हेच आम्ही मान्य केलेल नसत.





बऱ्याचदा नवरा व बायको ह्यांच्या आवडी,निवडी भिन्न असतात त्यामुळे पती पत्नी हे नातं योग्य प्रकारे निभावताना बरेच खटके उडतात याचे कारण तिला आवडणाऱ्या गोष्टी त्याला आवडत नाहीत किंवा त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनात टोकाचा दुस्वास,आकस असतो. आज जुळवून घेणे, Compromise हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही, भांडणं विकोपाला जाण्याच तेच खर कारण असतं. दोघेही सुशिक्षित, दोघेही नोकरदार, सुस्थितीत कोणी कोणावर अवलंबून नाही म्हणूनच सांमजस्य हा प्रकार नाहीच. दुसऱ्या व्यक्तीच्या मतांचा आदर तेव्हाच करता येईल जेव्हा तिलाही आदर मिळेल. तिला काही बाबतीत स्वतंत्र space गरजेची असेल तर मोठ्या मनाने त्याने दयावी. उलट पक्षी त्याला अशी मोकळीक हवी असेल तर तिनेही त्याला द्यावी. जर दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर केला, तर गैरसमज दूर होतील आणि दोघांनाही एकमेकाविषयी आदर वाढेल.

घरात नवी येणारी सून बऱ्याच अपेक्षा आणि आईचे संस्कार घेऊन सासरी येते. यात दिवसाच्या वेळापत्रकापासून ते स्वभावापर्यंत भिन्नता असू शकते. नवीन वातावरणात रुळायला, वेळ लागणारच , तिच्या सोबत सासूने मैत्रिणीच्या भूमिकेतून पाहिले तर मतभेद कमी होतील ती लवकर तेथे रुळेल. तिच्या स्वातंत्र्याला धक्का न लावता तिचा स्वीकार केला तर सासू सून हे नाते मुलगी माझी गुणांची मध्ये बदलेल. तिच्याकडे सुन म्हणून न पाहता मुलगी म्हणून सासूने पाहिले आणि सासू म्हणून न पाहता आई म्हणून पाहिले की नात्याचा पिळ सहज सुटेल आणि एकमेकांचा आदरही वाढेल. पुढाकार अर्थात घरातील जेष्ठ मंडळीनेच घेतला तर उत्तम.

आज नवरा बायको नसलेले दोन मित्रमैत्रीणी एकमेकांना भेटतात, पिक्चर अथवा नाटक पहायला जातात. ट्रेकला जातात किंवा खरेदीसाठी जातात याच कारण लग्नापूर्वी त्यांची मैत्री असते. लग्नानंतर त्या मैत्रीत अंतर पडावे अस त्यांना वाटत नाही पण ही मैत्री निखळ आहे हे तिने लग्नापूर्वी तिच्या नवऱ्याला सांगणे आणि त्याने ते मान्य करणे यावर गैरसमज होईल की नाही ते अवलंबून आहे. जर तिने होणाऱ्या नवऱ्याला सांगितले आणि त्याला ते मान्य नसेल तर एकतर मैत्रीला आवर घालणे किंवा लग्न न करणे हे दोनच उपाय योग्य. आजची तरूणाई लग्न न करणे या दुसऱ्या पर्यायाचा विचार प्रथम करते हे दुर्दैव. नवऱ्याला किंवा पत्नीला अंधारात ठेऊन अशी मैत्री सुरू ठेवणे, दोघानी एकमेकांना कल्पना न देता मैत्री सुरू ठेवणे हे संसाराच्या पुढील वाटचालीसाठी घातक.अशा वर्तनाची परिणीती विसंवादात होते आणि पुढे घटस्फोट.

आज महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाल्यामुळे तसेच त्याही उच्च शिक्षित असल्यामुळे, दुसऱ्याचे मी का ऐकावे? किंवा तो माला सांगणारा कोण? अशी स्वतंत्र बाणेदार वृत्ती असते. परंतु संसार हा असा रथ आहे जो एकमेकांचा विश्वास, समजून घेण्याची, प्रसंगी नमते घेण्याची वृत्ती दुसऱ्यासाठी त्याग करण्याची वृत्ती यावर चालतो.त्याचे एक चाक अहंकार, गैरसमज, अविश्वास, अतिआत्मविश्वास यांच्या चिखलात रुतले की विनाशाला प्रारंभ होतो. म्हणून मित्रानो दुसऱ्या व्यक्तीचा मताचा आदर करा त्याला त्याची Space द्या, नम्रतेने, विनयाने बोला. चुकले तर चूक मान्य करा, दुसऱ्याला क्षमा करायचा मोठेपणा दाखवा. तुम्ही समजून क्षमा करताना मोठे व्हाल तेव्हा समोरची व्यक्ती आपोआप नमते घेईल, ती भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे..तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची Space राखली तर तो तुमच्या Space चा नक्की विचार करेल.

आज आपण पाहतो सुक्षित किंवा उच्च शिक्षित नवीन जोडप्यात छोट्या छोट्या कारणांवरून मतभेद होतात आणि प्रकरण कौटुंबीक न्यायालयात जात.जर संमजस भुमीका दोघांनी घेतली आणि दोघांनी एकमेकांना माफ केल, म्हणजेच Forget and Forgive तत्त्व वापरल तर सुखांत होईल पण वारंवार संधी मिळूनही समेट घडून आला नाही तर त्याची परिणती घटस्फोट किंवा वियोगात होईल. केवळ माझ्या इगोला कुरवाळण्यासाठी मी टोकाची भुमीका घेणे किती योग्य. विसंवादामुळे वैचारिक मतभेद आणि घटस्फोट अशी घटना घडते तेव्हा होणारे परिणाम हे त्या दोघांपुरते मर्यादित रहात नाहीत तर त्यांची लहान मुले, दोघांचे पालक आणि कदाचित मित्र परिवार यांनाही त्याची झळ पोचते.

कधी कधी काही मित्र दोघांचे सामाईक असतात, अशा वेळेस त्यांनी कोणाची बाजू घ्यावी हा प्रश्न उभा राहतो? वर्षानुवर्षे जपलेली मैत्री गैरसमजुतीने संपून जाते. असाच परिणाम लहान बालक आणि वयोवृद्ध यांच्यावर होतो. म्हणूनच जर दोघांनी संमंजस भुमीका घेतली दोघांनी एक मेकाच्या मान मर्यादांचा मान राखला तर नक्कीच, “झाला संसार सुखाचा गे माये” अस म्हणता येईल.





दुसऱ्याच्या Space बाबत नक्की मोठ्या मनाने विचार करायला शिकलो. आपले स्वातंत्र्य जपताना दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करायला शिकलो तर ती व्यक्ती तुमच्याशी भावनिक बंधनात आपोआप गुंतेल. मग दोघांनाही स्वतःची स्पेस सांभाळून दुसऱ्याच्या मताचा आदर करणे शक्य होईल. तेव्हा फक्त स्वतःपुरते जगण्यापेक्षा,दुसऱ्याच्या भावनांचा विचार करुन स्वतः चे स्थान त्याच्या मनात निर्माण करण्याची किल्ली जर तुम्हाला मिळाली तर तुमच्या विषयी आदर नक्कीच वाढेल आणि तुमची त्यांच्या मनातील स्पेसही शतपटीने वाढेल.

सशक्त, सुविचारी मन आणि संयम याने भविष्यातील प्रश्न सोडवता येतील तेव्हा मी, माझे, मला या “मी”च्या अहंकाराला तिलांजली द्या आणि संमजस भूमिकेतून आम्ही, आपण, आपले, सर्वांचे हि भावना मनी धरा तर मंगलच होईल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

27 thoughts on “स्पेस

  1. กันไปแล้ว ในด้านของท่าร่วมรักนั้นก็เป็นเรื่องสำคัญที่จะช่วยให้สาว ๆ

    Hello, Neat post. There is a problem with your web site in web explorer, could check this?
    IE still is the market leader and a huge component of folks will
    omit your great writing because of this problem.

  2. Archana kulkarni
    Archana kulkarni says:

    परिवर्तन हा निसर्ग ,काळ यांचा नियम आहे. विज्ञान युगात ते विशेष वेगाने बदलतात.
    मला आठवते, मला दोन मामा होते.दोघेही जेव्हा शेती व्यवसाय सांभाळू लागले तेव्हा आजी त्यांच्याशी दाराआडून बोलायची. त्यांना ‘अहो बाबूराव ‘ अशी आदरार्थी हाक द्यायची.

    आपण यांना नऊ महिने पोटात वाढवले , जन्म दिला , लहानाचे मोठे केले हा कोणताच हिशोब नव्हता.

  3. fun888

    I like the valuable info you supply on your articles.
    I’ll bookmark your weblog and check again here regularly.
    I’m moderately certain I will be told plenty of new stuff
    right here! Good luck for the following!

  4. Anonymous

    I am really impressed along with your writing abilities and also with the format
    in your blog. Is this a paid subject matter or did you customize it yourself?

    Anyway stay up the excellent quality writing, it is uncommon to look a nice
    blog like this one nowadays..

  5. instagram takipci satin alma

    Do you mind if I quote a couple of your posts as long as I provide credit
    and sources back to your blog? My blog site is in the exact same niche as yours and my
    users would genuinely benefit from a lot of the information you present here.
    Please let me know if this ok with you. Appreciate it!

  6. instagram türk takipçi satın al

    Excellent goods from you, man. I have take into accout your
    stuff previous to and you’re simply too wonderful.

    I really like what you’ve received here, certainly like what you
    are saying and the best way during which you are saying it.
    You make it entertaining and you still care for to keep it smart.
    I cant wait to learn much more from you. This is really a terrific website.

  7. สมัครเช็คสถานการณ์ Covid-19 ได้ที่นี่

    If you wish for to grow your familiarity only keep visiting this website and be updated
    with the most up-to-date information posted here.

  8. fun88 ทางเข้า 2020

    Nice blog! Is your theme custom made or did you download it from somewhere?

    A design like yours with a few simple adjustements would really make
    my blog stand out. Please let me know where you got your design. Thanks

  9. sao kun hoo - sao kun hoo

    I seriously love your website.. Excellent colors &
    theme. Did you make this site yourself? Please reply back as I’m planning to create my very own site and would love to find
    out where you got this from or what the theme is named. Kudos!

  10. ประกอบความร่วมมือจากเราที่ต้องใช้เทคนิคการเล้าโลมที่

    Hi there! Do you use Twitter? I’d like to follow you if that would be okay.
    I’m absolutely enjoying your blog and look forward
    to new posts.

  11. fun881211asia

    Undeniably consider that which you said. Your favorite justification appeared to be at the net
    the easiest thing to have in mind of. I say to you, I definitely get annoyed at
    the same time as other folks think about concerns that they
    plainly do not recognise about. You controlled to hit the nail upon the highest and
    also defined out the entire thing without having side-effects , other people can take
    a signal. Will probably be back to get more.
    Thanks

  12. ด้วยการให้เธอจับเสาเตียงเพื่อช่วยยันสิ่งที่กำลังจะได้รับ

    Hello very nice website!! Guy .. Excellent .. Amazing .. I will bookmark your website and take the feeds additionally?
    I’m satisfied to seek out so many useful info here within the
    publish, we need work out extra strategies in this regard,
    thanks for sharing. . . . . .

  13. moverslosangeles.co/bennys-piano-movers-los-angeles-ca.html

    Hello there! I could have sworn I’ve been to this website before
    but after looking at many of the articles I realized it’s new to me.

    Anyways, I’m certainly delighted I stumbled upon it and I’ll be bookmarking it and checking back often!

  14. แทงหวยออนไลน์

    Hi there! Would you mind if I share your blog with my facebook group?
    There’s a lot of people that I think would really enjoy your content.
    Please let me know. Thank you

  15. t

    If you desire to increase your knowledge simply keep visiting this web site and be updated with the newest news posted
    here.

  16. movers-yelp-los-angeles

    Having read this I thought it was rather enlightening.
    I appreciate you taking the time and energy to put this information together.
    I once again find myself spending a lot of time both reading and commenting.
    But so what, it was still worthwhile!

  17. moving companies

    hello there and thank you for your information – I’ve definitely picked
    up something new from right here. I did however expertise
    several technical issues using this website,
    as I experienced to reload the web site a lot of times previous to I
    could get it to load properly. I had been wondering
    if your web hosting is OK? Not that I am complaining,
    but slow loading instances times will very frequently affect your placement in google and can damage your
    quality score if ads and marketing with Adwords.
    Anyway I am adding this RSS to my e-mail and could look out for
    much more of your respective exciting content.
    Ensure that you update this again very soon.

  18. ace-moving-company

    I’m gone to tell my little brother, that he should also go to
    see this weblog on regular basis to get updated from most up-to-date information.

  19. h

    Have you ever considered creating an e-book or guest authoring on other blogs?
    I have a blog centered on the same information you discuss and would love to
    have you share some stories/information. I know my readers would value your work.
    If you are even remotely interested, feel free to shoot
    me an e-mail.

  20. furniture-removal-services-torrance

    Nice weblog right here! Additionally your web site quite a bit up very fast!
    What host are you using? Can I am getting your affiliate hyperlink for your
    host? I wish my web site loaded up as quickly as yours lol

  21. หี

    Hi there, just became aware of your blog through Google, and found that it’s really
    informative. I am going to watch out for brussels.

    I’ll appreciate if you continue this in future. A lot of people will be benefited from your writing.
    Cheers!

  22. chris-movers-torrance

    Hello! I just would like to give you a big thumbs up
    for the excellent info you’ve got right here on this post.
    I am returning to your web site for more soon.

  23. ตอกเข้าลึกๆ เอาให้จุกไปเลยพี่

    If you are going for best contents like myself, only pay a
    visit this web site everyday since it provides feature contents, thanks

  24. movers-los-angeles-yelp-reviews

    Hey there! This is kind of off topic but I need some advice from an established
    blog. Is it very difficult to set up your own blog? I’m not very
    techincal but I can figure things out pretty fast. I’m thinking about creating my own but I’m
    not sure where to start. Do you have any points or
    suggestions? Thanks

  25. movers-torrance-yelp

    Way cool! Some extremely valid points! I appreciate you writing this post plus
    the rest of the website is extremely good.

  26. luxury villas tuscany

    If some one wishes to be updated with hottest technologies therefore he must be go to see
    this web page and be up to date daily.

  27. spectrum-local-movers-los-angeles-ca

    Excellent post. I was checking constantly this blog and I am impressed!
    Very helpful information particularly the last phase 🙂
    I handle such info a lot. I was looking for this certain info for a long time.
    Thank you and good luck.

Comments are closed.