स्मृती

स्मृती

तो माझ्यासमोर आला आणी माझ्याकडे पहात म्हणाला “ओळखलत का?,”माझ्या चेह-यावरची
प्रतिक्रिया त्यांनी वाचली . “सर , मी राजेश ! राजेश पानसे . ” मी माझ्या स्मृतीला ताण देत राजेशला आठवण्याचाप्रयत्न  केला . मला आठवणारा  राजेश म्हणजे अगदी किरकिरा , पाठीपाठी राहणारा . खूपच आग्रह करुन  भाग घेतलाच तरीही यशासाठी झगडण्या ऐवजी लवकर  हार पत्करणारा . आज माझ्यासमोर उभा राहिल्रेला राजेश वेगळाच होता . माझ्या भावनांचा कल्लोळ त्याने टिपला असावा . “सर , होय  मी तोच राजेश ज्याला तुम्ही स्पधेत भाग घ्यावा म्हणून हात ओढून पुढे आणायचात ,मी  त्याला बसण्यासाठी खुण केली . अछ्छा मग आज इकडे कसा? वाट चुकलास की काय ?, ‘नाही सर , मुद्दामच आलो म्हटल पाहूया काय बदल झालाय  तो ?’
मग काय मत झाल तुझ ?’
सर खर सांगू का? इमारत बदलली , नवीन साधन आली , आमच्या वेळेस हे व्हाईट बोर्ड नव्हते ‘. अरे वा ! लक्ष आहे की तुझ मी त्याच्या निरिक्षणाला दाद दिली . सर !बहुतांशी शिक्षक वर्गही नवा वाटतोय . पण सर तुम्ही बदलाल अस वाटलं नव्हत .”

मला त्याच्या बोलण्याचा अर्थ बोध झाला नाही प्रश्नाथेंक नजरेन त्याच्याकडे पाहिलं . सर ! आम्ही विद्याथ्री होतो तेव्हा काय ,सालीड  घाबरायचो तुम्हाला . कधी कालेजला येताना उशीर झाला आणी तुम्ही व्हरांड्यात दिसला की पाय कापायचे . पण आता ,  सर मी पाहिलं व्ह्रराड्यात मुल खुशाल आरडा – ओरडा करतायेत , त्यांच्या बाजूने शिक्षक गेले तरी मुलांना फरक पडत नाही . अगदी हातात मोबाईल धरून रस्त्यावर चालतात तसे दिसतायेत  . सर ! वीस सालान पूरवी एखाद्या वर्गात कुणी गोंधळ केला तरी तुम्ही धावून जायाचात . त्याच्या बोलण्यातली बोच मला कळली . त्याच खर होत . वीस सालपूवी चे ते विद्याथी आत्ताच्या या यंत्र युगात कुठून आणू ? शब्दानीच गप्प राहणारे , शिक्षक समोर दिसले तर मानेनेच नमस्कार करणारे विद्यार्थी मी कोठून आणू ?
मी त्याच्याकडे पाहत म्हणालो “खर आहे राजेश , या वयात शिस्तीविषयी वेगळच वाटायच , तुम्ही
मुलही तशीच होता.  क़ुणाला शिक्षा केली तरी पालक विचारायला येत नव्हते . आता दोन तपांचा अंतर पडलंय . मुलांना शिक्षकांची भीती नाही वाटत, आदरही नाहीं वाटत कारण त्यांच्या मनाच्या कोपरयात भावनेला जागा नाही . पालकांनाही आपल्या मुलाला वर्गात शिक्षा झालेली नाही  आवडत. त्यांच्या “स्व “ला ठेच बसते ना ! मी आता हया विद्यार्थांच्या मागे काठी घेऊन धावलो तर कस वाटेल ? “सर ! स्वारी , पण तो तुमचा करारी बाणा पाहण्याची आम्हाला सवय होती . ती प्रतिमा मनीं घेऊनच मी तुम्हाला भेटायला आलो होतो.”
काळाने कात टाकली होती तेव्हाची माझी प्रतिमा धुसर झाली होती . हा बदल पचवण राजेशला जड जात होत . तो उठला “स्वारी सर ! काही चुकुन बोललो असेन तर माफ करा , “दोस्ता तेव्हाचा तू आणि आताचा तू फरक आहेच ना ? मला जाणवेल इतका तू आमुलाग्र बदललास , अन्यथा तू एवढया मोकळेपणाने माझ्याशी बोलला असतास ? तेव्हा ‘बदल’हाच शाश्वत आहे . तोच नियतीचा संकेत आहे . मी कितीही नाही  म्हटलं तरीही बदल स्वीकारावाच लागणार, अन्यथा प्रवाहात टिकून रहाणे शक्यच नाही ! 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar