स्वामी हो

स्वामी हो

तिने अगदी नाईलाजाने फोन केला, “विनीत तू तातडीने निघून ये.” “काय झालं? खरच एवढं तातडीने निघायची गरज आहे का?” तो विचारण्यापूर्वी मोबाईल कॉल बंद झाला. त्यांनी दोन तीन वेळा फोन करून पाहिला पण व्यर्थ. ती नक्की का बोलावते, काय अस घडल की तिने, “तू निघून ये” असा फोन करून कट करावा. त्यांनी सगळ्या शक्यता मनात पडताळून पहिल्या पण कळायला काही मार्ग नव्हता. त्यांनी मोजके सामान घेतलं आणि ऑफिस गाठलं, “स्वामी! मला तातडीच्या कामासाठी जायचं आहे, अनुमती द्या. त्यांनी मानेने होकार दिला. तो पाया पडला आणि त्यांनी मठ सोडला. तो गेले चौदा वर्षे इथे वास्तव्यास होता. अनुग्रह झाल्यापासून तो आपली पाच आकडी पगाराची नोकरी सोडून इथे आड वळणाला येऊन राहिला होता. आपली चार, आणि दोन वर्षांची दोन मुले आणि पत्नी आणि वृद्ध आई वडील यांना मागे सोडून येताना त्याला काहीच का वाटले नसावे?

खरच सर्व जबाबदाऱ्या झटकून देवाची केलेली सेवा अशी देवाला पोचेल? स्वतःच्या परिवाराला अडचणीत टाकून समाजाची केलेली सेवा स्वामींना आवडेल? उच्च शिक्षीत असूनही खुळ्या समजुतीपोटी देवसेवा करण्यासाठी संसाराचा त्याग करणारे अनेक असतील.त्यातीलच तो एक म्हटल तर वावग नसेल. असं अनुग्रह स्विकारून संसार त्यागून बाहेर पडण ही तर पळवाट होती. “आधी संसार करावा नेटका मग लागावे परमार्था” याचा अर्थ त्याला खरंच का माहित नसावा?

त्याच्या मनात काय भावना होत्या? ते त्याच्या शिवाय कोण समजू शकेल? त्यांनी रत्नागिरी स्टेशन गाठलं आणि गाडीची वाट पहात तो बसला. त्याच्या मनात विचारांची वावटळ आली. वादळच ते मनाला विच्छीन्न करणारे.

काय गुन्हा होता तिचा? बिचारी! फार सुंदर नसली तरी साधी आणि सुस्वरूप होती म्हणूनच तर मी बऱ्याच महिन्यांच्या नजरेतील भेटी नंतर तिला भेटून मन मोकळं केल होतं. त्या नंतर अनेक भेटी नंतर लग्न करण्या बाबत आमचे एकमत झाल होत. पुढाकार तर मीच घेतला होता. किती स्वप्न रंगवली होती आम्ही. एकांतात किती आश्वासन दिली होती.योगायोग ती आमच्या समाजातील असल्याने मी आमच्या मैत्री विषयी आई बाबा यांना सांगितले तेव्हा कोणताच विरोध झाला नाही. आई इतकी संमंजस, म्हणाली, “अरे विनय तिला एकदा घर दाखवायला आणि भेटायला ये की घेऊन.” सगळ्या गोष्टी अगदी सहज झाल्या. तिच्या घरूनही सहज परवानगी मिळाली.

माझ्यासाठी अगदी स्वप्नवत. तेव्हा माझी फिरतीची नोकरी होती. आठवडयातून चार दिवस मी टूर वर आणि दोन दिवस मुबंई. तीच आपलं बर होत दहा वाजताच ऑफिस आणि फक्त रस्ता ओलांडल की ऑफिस. माझ्या फिरत्या नोकरीमुळे मी फक्त दोन दिवस घरी असायचो तरीही तिने तक्रार केली नाही. दादर मधलं अवघ दोन खोल्यांचं घर, आई, बाबा, लहान भाऊ आणि मी असे पाच जण, माझा कितीसा सहवास तिच्या वाट्याला आला असावा? तरीही तिने तक्रार केली नाही. मी तिला फक्त गृहीत धरत गेलो. घरातील काम उरकून ती ऑफिस गाठायची आणि संध्याकाळी घरी आली की रात्री अकरा वाजे पर्यंत उरकत बसायची. हॉल मध्ये आई, बाबा आणि भाऊ, आणि किचन मध्येच आम्ही अशी झोपण्याची व्यवस्था. कितीस सुख तिच्या वाट्याला आलं असावं?

गाडीचा आवाज आला आणि विचार शृंखला तुटली. मुंबईला पोचायला सात तासांचा रात्रीचा प्रवास होता. काही खावं अशी इच्छा नव्हती. काय संकट तिथे उभं आहे माहिती नव्हतं. मी डोळे मिटून स्वामींची प्रार्थना केली. “स्वामी मला मार्ग दाखवा, मी अज्ञानी आहे, अजाण आहे. मी पापी आहे. दुसऱ्याला दुःखात लोटून अलिप्त राहण्याचा मला अधिकार नसताना मी सुटका करून घेतली आहे. मला क्षमा करा, मार्ग दाखवा.” डोळे मिटत होते पण झोपही येत नव्हती. पोटात खड्डा पडला पण एवढ्या रात्री काय करावे. तसाच पडून राहिलो. स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊनही अस्वस्थता संपली नव्हती. पनवेल आले आणि आवाजाच्या गोंधळात जाग आली.

तासा दिडतासाने घरी पोचलो, सकाळचे सहा वाजत होते. झोपले असावेत म्हणून बेल वाजवण्यापेक्षा दारावर ठकठक करू म्हणत होतो तोच तिने दार उघडलं. माझ्या हातातली बॅग तिने घेतली आणि मला वाट मोकळी करून दिली. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेन पहात होतो पण तिने हातानेच थांब अशी खूण केली.

तिचं बरोबर होत, आई, बाबा आणि मुलं झोपली होती. मी ब्रश करून फ्रेश होइपर्यंत तिने चहा केला. माझ्या समोर उपमा ठेवत म्हणाली हे खाऊन घे, मी पुन्हा, काय घडलं ? या अर्थी तिला डोळ्यानेच विचारले, पुन्हा तिने खुणेनेच डिश संपवण्यासाठी खूण केली. तिच्यावर रागावाव, ओरडावे, एवढ्या दुरून तातडीने का बोलावून घेतलं अस विचारावे मनात आले पण तिच्या डोळ्यांकडे नजर गेली आणि माझा राग शांत झाला. तिचे डोळे लाले लाल झाले होते. कदाचित संपूर्ण रात्र ती झोपली नसावी. मी उपमा संपवण्यापूर्वी तिने चहा दिला. तो गरमा गरम चहा पिताच मला तरतरी आली. मी तिच्या हातावर हात ठेवून तिला धीर देणार होतो, तिने चटकन हात मागे घेतला जणू तो स्पर्श तिला वर्ज असावा किंवा नकोसा वाटत असावा. मी हळू आवाजात तिला विचारलं, विशु सांग काय झालं? का इतक्या तातडीने मला बोलावून घेतलं?

तिच्या संयमाचा बांध फुटला, “अहो आपला ऋषी ? आपला ऋषी वाईट संगतीला लागला हो.” “काय! काय केलं त्याने, विशू सांग, काय केलं? “अहो तो एल.डी स्मोक करतो. आणि —–” “काय? एल.डी.—- तू काय बोलतेस तुला कळतय ना? आणि काय?” मी तीचा हात जोराने हालवत विचारलं, “वीशू आणि काय? बोल आणखी काय करतो?” माझ्या आवाजाची पट्टी अचानक वाढली. तशी आई उठून आली. “विन्या अरे केव्हा आलास? अग विशाखा मला उठवायच नाहीस का? त्याला चहा पाणी दिलस का? की किर्तन सुरू केलस. प्रवासाने दमला असेल बिचारा. थोड निवांत पडू दे त्याला. आत्ताच काही सांगायची गरज नव्हती. विन्या जा बाबा थोडा वेळ पडून रहा.”

तिचा तळपापड झाला. खर तर या अशा वागण्यानच ऋषी हाता बाहेर गेला होता. जेव्हा मुलाने, “आई मी स्वामींचा अनुग्रह घेतला , मी नोकरी सोडून स्वामींची सेवा करायला जातो” असं म्हणाला तेव्हाच त्याला आईंनी विरोध करायला हवा होता, पण —-विरोध करायच राहील दूर,
विन्या तुला जमणार का, अस एकटं कायमचं रहायला?”

तिला आईंचा राग नाही आला. कीव करावी अस वाटलं, त्या, म्हणे शिक्षीका होत्या, पण स्वतःच्या मुलांना इतकं लाईटली घेत असतील तर विद्यार्थ्यांच काय? नवलच म्हणायच. आईंच्या बोलण्यावर ती काही म्हणाली नाही. तोच म्हणाला, “विशू तू आईकडे लक्ष देऊ नको, सांग ऋषी आणखी काय काय करतो?” “अरे तो मीत्रांसोबत दारूही पितो. त्याने तस कबूल केलं माझ्या समोर.” ती रडकुंडीला येत म्हणाली त्याने कपळावर हात मारला, “काय म्हणतेस? दारू! आणि ती कोण देत त्याला? विशू आता तो आठवीत आहे कदाचित कोणीतरी फसवून पाजली असेल त्याला.”
“मी मुर्ख आहे अस तुला म्हणायच आहे का? मी त्याची शहानिशा केली आहे. तो आणि त्याचे मित्र चोरुन दारु प्यायचे. त्याच्या मित्रांनी येऊन हे मला सांगितले नसते तर कदाचित कळलही नसत.” “पण मग मित्र खर सांगतोय कशावरून? त्याच्यावर तू विश्वास कसा ठेवलास?”
अरे गेले दोन महिने ऋषी अधूनमधून खोकतो. सर्दीही झाली होती. मला वाटले दुपारी मैदानात उन्हात खेळत असतात म्हणून सर्दी झाली असेल. मी त्याला अडूळसा, बेल, तुळस याचा काढा करून दिला. आठ दिवसांनी पून्हा खोकू लागला. मला संशय येत होता पण कामाच्या गडबडीत मला त्याच्याकडे पहाण जमल नाही.” “तुला संशय आला तर तू आई, बाबा यांना का सांगितले नाहीस? निदान शहानिशा झाली असती.” बाबांनी गेल्या वीस वर्षांत कोणत्या बाबतीत लक्ष घातलेल तू पाहिलस का? जर त्यांना ते कळल असत तर संसार अर्ध्यावर टाकून तुला जाण्याची परवानगी दिली असती का त्यांनी? आईंच तरी काय वेगळ, त्यांनीच ऋषीला लाडोबा करून ठेवलय.” “विशू, तू विनाकारण आई बाबांना या वादात ओढू नको. ऋषी तुझं ऐकत नव्हता तर मग चार फटके द्यायचे होते.” “तो अधीकार आईंनी कधीच काढून घेतला आहे. दोन महिन्या पूर्वी ऋषीचा बर्थडे होता. तुला आठवते? फोन करून ऋषीला विश कर अस मीच म्हणाले होते, तुला आमची आठवण असते की नाही तो तुझा स्वामी जाणे.” “विशू अस कस म्हणतेस तू मी कधीच का फोन करत नाही?” “हो ना! करतोस की, जेव्हा माझे चार कॉल गेल्यावर तू उचलत नाहीस आणि मिसकॉल तू पाहतोस. कदाचित मी अजूनही जिवंत आहे का? याची खात्री करून घ्यायला तू कॉल करत असशील”

“किती तोडून बोलतेस ग? आणि स्वामींचा असा एकेरी उल्लेख करू नको, तुला काय बोलायचं ते मला बोल.”
“तू तिथे तुझ्या स्वामींच्या सेवेत मग्न इथे मला काय भोग भोगावे लागतात तुला आहे का काळजी? पंधराव वर्ष लागल म्हणून बर्थडे गिफ्ट म्हणून त्याने माझ्याकडे रेबॉक चे शुज मागितले, मी देणार नव्हते तर आई मध्ये पडल्या. म्हणाल्या,” तुला घेऊन द्यायला जमणार नसेल तर मी देऊ का?” “इतके महाग बूट घेण्याची खरच काही गरज होती का? पण माझी लायकी दाखवायची होती ना आईंना, मग शेवटी फुटबॉल खेळायला जातो म्हणून मी शूज घेऊन दिले.
त्याने जेमतेम् चार दिवस वापरले आणि ते एका मित्राला आठवडाभर दिले. तुझा मुलगा हरीशचंद्राचा अवतार. दुसऱ्या मित्राला बुट दिले नाही म्हणून त्याने येऊन तक्रार केली तेव्हा याचे प्रताप समजले.अन्यथा कळलेच नसते.”
“आता कसा आहे तो? सावरला आहे ना?” “नाही, ,त्याला अधूनमधून तल्लफ येते आणि मग हातपाय आपटत बसतो. अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं आहे. त्यांच्या क्लास टीचर म्हणाल्या इथे राहिला तर मित्रांच्या संगतीत वाया जाईल. कुठेतरी दूर न्या म्हणजे हळू हळू तो विसरेल म्हणून मग तुला—-” “बर पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?”

“काय करावं म्हणजे? तो तुझा मुलगा आहे, तुझी काही जबाबदारी आहे की नाही? की तू आम्हालाही स्वामींच्या पायावर घालणार आहेस? ” ती रागावली तिचा संताप झाला. “तो माझा मुलगा नाही अस मी म्हणालो का? पण म्हणून मी काय कराव अस तुझ म्हणणं आहे?” “त्याला तुझ्याकडे घेऊन जा, सांग तुझ्या स्वामींना त्याच डोकं ताळ्यावर आणायला. निदान हे सगळ विसरे पर्यंत तरी, नाही पेक्षा इथे येऊन रहा कायमचा.” तो तिच्या वाक्यावर उपहासाने हसला, “म्हणे इथे येऊन रहा, माझ काम आणि माझी सेवा सोडून? तुझ डोक ठिक आहे ना?इथे येऊन मी काय करु? मला आता कोण नोकरी देईल आणि माझ्या सेवेच काय?” “हे प्रश्न तू मला का विचारतोस? नोकरी सोडून जायचा निर्णय घेतांना मला विचारल होतस? नाही ना? आईंनी तुला जा म्हणून परवानगी दिली तेव्हा मी एकटी येथे दोन मुलांना कशी सांभाळू शकेन हा प्रश्न स्वतःला विचारलास? नाही ना? मग आताच का? विचार तुझ्या स्वामींना.”

तिचा प्रश्न योग्यच होता, कुटूंबाची कोणतीच जबाबदारी मी पार पाडली नव्हती, फक्त लग्न करून मुल जन्माला घातली होती. तिने त्यांचा गर्भ नऊ महिने आपल्या रक्ताने पोसला होता. त्यासाठी खस्ता खाल्या होत्या आणि तरीही मी माझी मुलं म्हणून सांगत होतो. ना तिला सुख दिलं होतं ना बाप म्हणून मुलांची काळजी घेतली होती.

काही महिन्यापूर्वी जेव्हा आई आजारी पडली होती तेव्हा मला यावे लागले होते, माझा मोठा मुलग प्रथम आता वीस वर्षांचा झाला होता. सकाळी हॉस्पिटलमध्ये तोच आजीकडे थांबायचा. आईला पाहून दोन दिवसांनी मी निघालो तर माझ्याशी भांडला, “तुम्हाला आजीची आमची कोणाची जबाबदारी नको तर लग्न का केले?” याचा जाब विचारत होता. मी रागाने त्याच्यावर हात उगारला तर ओरडून म्हणाला, “बाबा, खबरदार तुम्ही मला मारले तर—-” त्याची आक्रमकता पाहण्यासारखी होती.

पूढचे न बोलताच मला समजले होते. तो अंगाने भरला होता आणि कदाचित त्याने ते खरे केले असते. मला उलट बोलल्या बद्दल विशूने त्याच्या दोन लगावले तेव्हा म्हणाला, “आई, मारायच आहे ना मला, मार पण बाबांचा राग आमच्यावर काढू नको, ज्या माणसाने तुला संसारात कोणतेही सुख दिले नाही त्याला तू अजूनही पुजते, धन्य तुझी. हे अस गाय होऊन जगते म्हणून त्यांच फावलं आहे, तू Divorce का घेत नाही. त्यांना त्यांच्या स्वामी बरोबर करू दे की संसार.”

ती ओरडली,” प्रथम! माफी माग बाबांची, माफी माग म्हणते ना?” पण तो जागचा हलला नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल ऐवढी घृणा भरली असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तिने बेल्ट काढून त्याच्या सपा सप मारलं पण तो शांत राहिला. तेव्हाच मला कळालं की मी किती चुकलो आहे. मुलं आणि माझ्यामध्ये संवाद असायला हवा होता पण वेळ निघून गेली होती.

आजही तो आमच भांडण ऐकत होता पण एकही शब्द बोलला नाही. आमचे बाबा हे एक वेगळं रसायन होत, नोकरी एके नोकरी आत नाही की बाहेर नाही. फार तर भाजी पाला आणून देणे इतकीच काय ती सांसारिक जबाबदारी. लहानपणापासून कदाचित तेच आम्ही पाहिलं म्हणून त्याच चुका आम्हीही केल्या. मी अचानक नोकरी सोडायचा निर्णय घेतला त्या पूर्वी माझी अवस्था अशीच झाली होती. संसार नको वाटत होता. माझ्यावर दया येऊन आईने मला स्वामी सेवा करण्याची मोकळीक दिली. आई हे विसरली माझं लग्न झालं होतं, मी प्रापंचिक दृष्ट्या मोकळा नव्हतो. माझ्या संसाराची जबाबदारी माझीच तर होती. मला मोकळीक देणारी ती कोण होती? तो अधिकार खर तर विशुचा होता. आणि आईने तिला विश्वासात न घेताच निर्णय घेऊन टाकला.

मी संसाराकडे पाठ फिरवून निघून स्वामींच्या सेवेसाठी निघून गेलो हे प्रथमला कळलं तेव्हा पासून प्रथमला देव या शब्दाचा तिटकारा वाटू लागला होता. तिला पूजा करू देत नव्हता. निरांजन लावले की फुंकून विजवत होता. सणा वाराला नैवेद्य ठेऊ देत नव्हता. त्याच काय चुकलं? ज्या देवामुळे बाप जिवंत असूनही त्याच प्रेम त्याची माया मिळत नसेल तर त्या देवावर त्यांनी श्रद्धा का ठेवावी? आमचे बाबा त्याची समजूत घालण्यात कमी पडत होते. त्याच हे विरक्त असल्या प्रमाणे वागण्याचं टोक ही केवळ माझ्या भक्तीची प्रतिक्रिया होती. त्याची समजूत घालायला माझ्याकडे शब्द नव्हते.

मी एक दिवस स्वामींना माझी व्यथा सांगितली तेव्हा ते म्हणाले, “विनीत तुझ्या संसारासाठी तुझ्या मुलांसाठी थोडे महिने तू परत जा. आपल्या पत्नीची माफी माग, मुलांची काळजी घे.” मी स्वामींचे पाय धरले त्यांची मनधरणी केली, “स्वामी तुमच्या या भक्ताला अंतर देऊ नका.” स्वामी फक्त हसले, त्या हसण्याचा गूढ अर्थ हृदयाच्या गाभ्यात घुमत राहिला. “संसार माया आहे, मोह सोडल्या शिवाय तुला माझ्या पर्यंत पोचता येणार नाही. सांसारिक दुःख दूर सारल्याशिवाय शांती नाही.” माझ्या मनाचा निर्धार झाला आणि मी सर्व पाश तोडायचे ठरवले पण तिची आर्त हाक ऐकली की निर्धार गळून पडतो. खरंच माझी अवस्था त्रिशंकू झाली आहे, गती नाही, मुक्ती नाही आणि संसारही नाही.

आजही तीच अवस्था. आमचा आवाज ऐकून ऋषी उठला होता. कदाचित तिने मला बोलावून घेतल्याचे त्याला माहित असावे. प्रथम, माझ्याकडे पाहूनही न पाहिल्या सारखे वागत होता जणू ह्या घरात मी उपरा होतो. त्याच्या नजरेत अंगार होता. त्याला कळायला लागल्या पासून तीच त्याच सगळं पहात होती बापाचं नाव फक्त शाळेच्या हजेरी पुस्तकात लिहिण्या पुरते. ह्या स्वामी नावाने, त्याच्या बापाला हिरावून घेतले होते. त्याचा संताप योग्य होता. त्याच्या समोर माझी उपस्थिती म्हणजे नवीन आव्हानाला निमंत्रण होते.

दुपारी आम्ही एकत्र जेवलो. तिने आणि मी शाळेत जाऊन वर्ग शिक्षिकेचे म्हणणे ऐकले. ते त्याच नाव गैर वर्तनाबद्दल कमी करणार होते. त्यांचा नाईलाज होता. मी दाखला घेण्यापूर्वी स्वामींना परिस्थिती सांगितली त्यांची अनुमती घेणे गरजेचे होते. मी दाखला घेऊन बाहेर पडलो. घरी कोणत्याच गोष्टीबाबत बोलण म्हणजे चर्चा, भांडणं आणि अबोला या तीन पायऱ्यांची उतरण होती. आम्ही प्लाझा समोरच्या बागेत बसलो. यावेळी शक्य तो कोणी परिचित येण्याची शक्यता नव्हती. बराच वेळ आशू माझ्याकडे पहात बसली. बोलायचे कोणी आणि कुठून? हा प्रश्न होताच, तिनेच सुरवात केली. “काय करायचं ठरवलं?” ती.
मी प्रश्नार्थक नजरेन तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात अगतिकता दिसली, “ऋषीला घेऊन जाण्याने प्रश्न संपणार नाही. त्याच्याकडे लक्ष दे. त्याला वेळ दे. तुझ्या स्वामींना सांग त्याला चांगली बुद्धी द्या. एवढे वर्ष सेवा करतोस काय मिळवल?” काय उत्तर द्यावं मला सुचत नव्हतं, मी तिलाच प्रश्न विचारला, “तुला काय अपेक्षित होत? धन, सुख.” “माझं जाऊ दे रे, मी तुझ्यावर प्रेम करून डाव पणाला लावलाच आहे. तू सगळी जबाबदारी झटकून तिथे स्वामींच्या पायाशी जाऊन बसलास, तुझं काय? तू समाधानी आहेस? तुला शांती मिळाली.” ती एकटक बघत म्हणाली. खरं तर तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं सामर्थ्य माझ्यात नाही हेच खरं.

काय अधिकार होता मला तिची अशी थट्टा करण्याचा? , अर्ध्या वरून पळून जाण्याचा. पण याच उत्तर माझ्याकडे नव्हतं हेच खरं. मी तिच्या मांडीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला त्यात शृंगार नव्हता तर याचना होती मला समजून घ्यावे यासाठी, पण ती झटक्यात दूर झाली. “खूप सुख दिलस, आता त्या आठवणी नको, पुन्हा स्वप्नरंजन करून त्यात जीव गुंतवावा अस काही शिल्लक ठेवलस का? मला फक्त उत्तर दे, आमचं काय करणार आहेस? का ते ही स्वामीच ठरवणार ! तुला माहीत आहे प्रथम माझ्या पूजा करण्याची टिंगल टवाळी करतो? मी देवाला नैवेद्य ठेवायला गेले तर क्षणात खाऊन टाकतो. का? का अस वागतो ठाऊक आहे? तुझे स्वामी. गेल्या बारा चौदा वर्षात कोणतं सुख तू मला दिल सांगशील? नाही, तुझ्याकडे उत्तर नाही. त्या वीस वर्षाच्या प्रथमला कळत पण तुला नाही. आता एकच विनंती. ऋषीला त्या तुझ्या स्वामींच्या पायाशी बसवू नको. झाली तेवढी संसाराची थट्टा पुरे.” ती उठून चालू लागली, मला बोलायची संधी न देता माझं म्हणणं ऐकण्यापूर्वी. तीच तरी कुठं चुकल म्हणा, मी काय उत्तर देणार होतो. फार एकाकी वाटलं, अनुग्रह घेऊन मी काय मिळवल?

तिसऱ्या दिवशी मी पहाटे निघालो. प्रथम झोपला होता. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याने कूस परतली पण—–. मी पाया पडून आई बाबांचा निरोप घेतला. बाबांनी डोक्यावर हात ठेवला. एखाद्या योगी असावा तसे निशब्द. मला कळेना, त्यांचाच तर हा गुण हळू हळू माझ्यात उतरत नसावा ना? तिने ऋषीला पोटाशी धरले, त्याच्या हातावर साखर घातली, “ऋषी बेटा आई पुन्हा पहावी वाटत असेल तर शहाण्या मुला सारख वाग, आणि हो स्वामीं पासून दूर राहा. शक्य तितक दूर. ये स्वतःची काळजी घे आणि तुझ्या बाबाचीही.” ती आम्ही टॅक्सीत बसे पर्यंत थांबली. मी टॅक्सीतुन हात हलवून निरोप घेतला. ती फक्त पहात होती तिला पाश तोडताही येत नव्हते. “आता तारणहार स्वामी” अशी माझी समजूत पण खरच माझी या आशा निराशेच्या चक्रातून सुटका होईल? खरच, स्वामी माझी सेवा रूजू करून मला संसाररूपी भवसागरातून मुक्ती देतील की त्रिशंकू अवस्थेतच माझी अखेरची यात्रा, छे काहीच ऊमगत नव्हते. जेव्हा ऊत्तर मिळत नाही तेव्हा शोधण्याचा प्रयत्न करूच नये. विचारचक्र सुरू असतांनाच गाडी आली, आम्ही निघालो. आता मी एकटा नव्हतो, पुढे काय वाढून ठेवलं ते त्या शक्तिशाली स्वामींनाच माहिती.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

9 thoughts on “स्वामी हो

  1. ufabet

    I’ll immediately take hold of your rss as I can’t
    in finding your e-mail subscription hyperlink or newsletter service.
    Do you have any? Please allow me know in order that I could subscribe.

    Thanks.

  2. KakA samant

    Story is guessing end. Good one.
    By the way did you get my new Book from Vidya sawant?

  3. 토토사이트

    We are a group of volunteers and opening a new scheme in our community.
    Your web site provided us with valuable information to work on. You’ve done an impressive job and
    our whole community will be thankful to you.

  4. kitchen sayings

    Have you ever considered writing
    an ebook or guest authoring on other websites?
    I have a blog centered on the same information you discuss and would really like
    to have you share some stories/information. I know my readers
    would enjoy your work.
    If you are even remotely interested, feel free to send me an
    e-mail.

  5. hacker and cracker

    What’s up it’s me, I am also visiting this web page daily,
    this web site is genuinely fastidious and the viewers are truly sharing good thoughts.

  6. covid-19 update

    Peculiar article, just what I wanted to find.

  7. Isidro

    I have read so many content regarding the blogger lovers but this piece of writing is really a good post, keep it up.

  8. covid19

    I believe what you said made a lot of sense.

    But, what about this? what if you typed a catchier post title?
    I ain’t saying your content isn’t good., however suppose
    you added a headline that grabbed a person’s attention? I mean स्वामी हो – प
    रि व र्त न is a little vanilla. You
    could peek at Yahoo’s home page and watch how they create article headlines to grab people interested.
    You might add a related video or a related picture or two to grab people interested about everything’ve written. Just
    my opinion, it could bring your website a little livelier.

  9. covid19 made in asia

    I used to be able to find good info from your articles.

Comments are closed.