मन
मनाशी फुटला श्रध्देचा अंकुर, विश्वासाचे मूळ विश्वंभर
विकासाचा ध्यास प्रत्ययी वावर, स्वप्न ही सुंदर वाटे मना
निग्रह मनाचा कौतुकाची थाप, मनाशी मोठा वाटतो आधार
करू विनवणी देऊ अधिकार, प्रगतीसाठी परी न लाचार
मन हे आरसा शुद्ध आचार, प्रयत्नाचा दीप हटवू अंधार
शांतचित्त मनी विवेकी विचार, परी मनी वसे सत्त्याचा अंगार
अभ्यासाची गोडी सातात्याची वाट, चालुनीया नीट व्हावे यशोधर
यश, धन, कीर्ती देई ना अंतर, ज्याचे निरंतर चित्त स्थिर
गिळून क्रोध जेष्ठांशी सादर ,आशिष जनांचा त्याचे शिरी
ज्याने जोपासली मनाशी संस्कृती, त्याच्या साह्या उभा पाठी हरी
चंद्रमा देतसे शीतल चांदणे, बहुता आवडे गोजिरे ते रूप
तैशी वाणी हवी रसा जिव्हे वरी, मनाची काजळी धूवुनी जाय
Sundar
Chaan kavita
खूप सुंदर……
ज्ञानेश्वरीच्या छंदात रचली आहे कविता.
ग्रेट….! अर्थही खूप छान….!
अभिनंदन….!