ओला श्रावण
‘ऋतू बरवा, ऋतू हिरवा,पाचूचा वनी रूजवा, युगविरही ह्दयावर सरसरतीमधूशिरवा, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती’ श्रावण महिन्याचे एवढे अचूक वर्णन अर्थात शब्द ‘आरती प्रभू’ चि. त्र्य. खानोलकर कोकणच्या लाल…
‘ऋतू बरवा, ऋतू हिरवा,पाचूचा वनी रूजवा, युगविरही ह्दयावर सरसरतीमधूशिरवा, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती’ श्रावण महिन्याचे एवढे अचूक वर्णन अर्थात शब्द ‘आरती प्रभू’ चि. त्र्य. खानोलकर कोकणच्या लाल…
आपण पाहिलेल्या आणि मनात दबा धरून बसलेल्या काही व्यक्ती धरणीवर ज्वालामुखी उद्रेक व्हावा आणि लाव्हारस उसळून बाहेर पडावा तशा मनातून आठवणींच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्या तेव्हा का अचानक आठवतात याला…
८४ लक्ष योनीतून फिरल्यानंतर मनुष्य देह मिळतो असं आई म्हणायची, या चौऱ्याशी लक्ष योनी कोणत्या,तर वेगवेगळे कीटक,साप, श्वापदे, विविध प्रकारचे जीवजंतू, झाडे वगेरे.‘मनुष्य जन्म अति थोर,त्याचा मोठा अधिकार’, का ?…
नीला रेप्युटेड कंपनीत outsourcing एजन्सी मार्फत गेले चार वर्षे कामाला होती. या चार वर्षात तिने स्वतःच्या कामाचे रेप्युटशन निर्माण केले होते. कोणी सोडून गेले की बॉस ती अधिकची जबाबदारी तिच्यावर…
प्रत्येक माणसाच्या जीवनात चढ उतार असतात. कष्ट सहन केल्यानंतर सुख वाट्याला आले तर त्याचा आनंद मोठा असतो. पालघर तालुक्यात उमरोळी येथे दत्तात्रय कदम यांचे शेतकरी कुटुंब रहात होते. दत्तात्रय कष्टाळू…
हिंदू हा धर्म आहे की जगण्याची जीवनशैली हे अद्यापही आपल्याला ठरवता आलेले नाही. कधीतरी तो धर्म असतो तर कधीतरी जीवनशैली. आपण शाळेत प्रवेश घेतांना Religion, Caste, sub-Caste असे तीन कॉलम…
पाहिले मी तुला, तू ही मला पाहिले,ह्रदय दिले अजाणता, कसे ते ना कळे रोजचीच भेट आपली, रोजचे रागावणेरोजचेच रूसणे अन रोजचेच हासणे नेत्रांनी घायाळ करशी, बरे नव्हे वागणेसरावलीस तु ही…
तो परदेशात रहात असला तरी त्याची पाळंमुळं याच जमिनीत होती. तरूण होता तेव्हा काही वर्षे त्यांनी भारतात नोकरी केली होती. ऐन पंचविशीत असतांना तो अरब देशात नोकरीला होता. Technical Qualifications…
लहानपणी मांजर रस्त्यावर आडवी गेली तर आपण जागेवरच थांबत असू, आपण रस्त्यावरून जातांना मांजर आडवी जाणे अशूभ मानलं जाई. काळी मांजर म्हणजे चेटूक असाही समज होता. त्यामुळे काळ्या मांजराला आपण…
काही दिवसांपूर्वी हिवाळ्यात गावात मध्यरात्री गोंविंद भटाकडे चोरी झाली होती. घरातील पाण्याने भरलेली पितळेची भांडी रिकामी करून चोर घेऊन गेले होते. पोलिसात तक्रार दाखल झाली आणि चार दिवसानी ती भांडी…
पोटाची भूक ज्याला नाही असा विरळा, मग तो मनुष्य असेल,पशू असेल किंवा पक्षी. भुचर असेल, जलचर असेल किंवा हवेत राहणारा. झाडांनाही भूक असते म्हणून त्यांची मुळे सुपिक जमिनीच्या शोधात पळत…
सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर…
गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता.…
गुंतलो विचारात काही कळतही नाही, अजाणता ग्रासून राहीमुक्ती न यातून कुणा कधीही, हे ज्ञान मज गर्तेत खेचून नेई सारी अस्वस्थता इथे ,अनिश्चितता, मनी विचारांचाच कल्लोळकिती पोचते शरीराच्या सिपियुकडे? बुध्दीभ्रम, वैचारिक…
“महेश तुझ्यासाठी घर दार सगळं सोडून मी आले, मी तुला लग्नापुर्वीच म्हणाले होते माझ्या कुटुंबात मला कोणाची लुडबुड नको आणि तू तसे कबूल केले होते तरीही तुझ्या आईला घेऊन..”“का? तुझी…
कथेचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा एक दिवस मी डॅडला सांगितले, “तुमच्याकडे अभ्यास करणं मला बोअर होतं. आधी तुम्ही example सोडवून पाहता, मग मला सांगता. आमच्या टीचर वेगळी मेथड…
‘जीवनात संघर्ष असला तरच जगण्याची मजा असते’, हे वाक्य ऐकायला तसं बरं आहे, पण मला डिप्लोमाला ड्रॉप लागला आणि डॅड आणि माझ्यात पहिला संघर्ष झाला. डॅड म्हणाला, “तुला डीग्री करता…
शांता शिससाट कणकवली नगावे येथून लग्न होऊन तिरवड्यात जुवेकरांच्या घरी सुन म्हणून आली. लग्न करुन आलेल्या प्रत्येक मुलीला नवीन घरात आपले कसे होणार ही चिंता असतेच. जर मुलीला कामाची सवय…
आपल्याला काय खायला आवडते? म्हणजे बर्गर, पिझ्झा, चायनीज हे मला विचारायच नव्हते तर तुमच्या आहारात काय असेल तर तुम्ही आनंदी असाल? असं मला विचारायच होतं. तुमच्या मते तुम्ही पूर्णब्रह्म कशाला…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा पाहता पाहता संतोष मोठा झाला. स्टेशनच्या शाळेत ४ थीला जाऊ लागला. त्याची आई दारू गाळते हे कोणीतरी इतर विद्यार्थ्यांना सांगितले. ते संतोषला नावाऐवजी ‘दारूवाला’…
दोन भावंडांच्या पाठीवर तिसऱ्या पोराचा घरीच जन्म झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा मुलाचा बाप सुरेश कामावर होता. या आधीच्या मुलांच्यावेळीही तो नव्हता. त्याला बोलवून आणले तेव्हा तो तर्रर् होता. त्यामुळे…
तुम्हाला आठवतय का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कोणाला लिहीले? खरं सांगायचं म्हणजे मलाही नाही आठवत, खूप ताण देऊनही नाही आठवत. आमचं,म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा त्या वर्षी एप्रिल महिन्यात…
जशी लोकसंख्या वाढली गावातील जागा कमी पडल्याने नागरी वस्तीसाठी आपण जंगलांवर आक्रमण केले. त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला मग जंगलातील प्राण्यांनी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेतला. बिबट्या, वाघ, वस्तीत शिरून…
गावी गेलं की आमच्या पाड्यावर रस्त्याच्या कडेला एक दोन मजल्याची इमारत दिसते आणि ती पाहताच आठवण होते ती गांगुली अंकलची. आज ते किवा त्यांची पत्नी हयात नाही पण काही माणसं…
काल प्रवासात माझ्या कंपार्टमेंटमध्ये एक तरूण जोडपे आणि त्यांचा दिडदोन वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. जोडप्यातील मुलगी आपल्या नवऱ्याला अधून मधून अरे आणि अधून मधून अहो संबोधत होती. त्याला हाक…
“दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा’, ही बालभारती मधील कविता आठवत असेल. आज वसु बारस म्हणून सहज आठवण झाली. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा…
तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शे-दीडशे उंबऱ्याचे लालठण गाव वसलं आहे. गावाच्या बाजूने तालुक्याला जाणारा पक्का रस्ता वैतरणा नदीला वळसा घालून जात होता. या लालठण गावात आगरी आणि वारली समाजाची घरे होती.…
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे, भारतात वेगवेगळ्या रूपातील दुर्गांची पूजा केली जाते, शैलपुत्री, ब्रह्मचारीणी चंन्द्रघंटा,कधी कात्यायनी कुष्माण्डा,स्कंदमाता,कालरात्री, महागौरी वगेरे. या नवरात्रीत रोज रंगीबेरंगी साड्या आणि ड्रेस घालून महिला आनंदी जीवन जगत…
“मिस मोडकss”, “मिस मोडकss”, तिला पाठीमागून हाक ऐकू आली. स्मिताला कळेना आपल्याला कोण हाक मारतंय? लक्षपूर्वक ऐकल्यावर तिच्या लक्षात आलं बहुतेक गोडबोले असावा, अधून मधून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा मनोरमा चपापली, “ये निनाद, अरे बाळा ! मुद्दाम मी बऱ्याच दिवसांनी थालीपीठ टाकली आणि तू निघून जातोस. आधी ये आणि बस, हे बघ तुझे…
मिठीबाई कॅम्पसच्या बाहेर, ‘डॉलर’ रेस्टॉरंट मध्ये ते दोघे बसले होते. ही जागा त्यांच्या परिचयाची आणि अत्यंत आवडीची होती. गेले पाच वर्षे ती येथे येत होती, रेस्टॉरंट मधील वेटर ते मॅनेजर…
गेल्या वर्षी अल निनोनं, नो नो म्हणत पळ काढला म्हणून बरं झालं. या वर्षी उशीरानं पाऊस आला, पाऊस वेळेत येईल असा क्लायमेटचा अंदाज होता, म्हणून अपुऱ्या पावसावर पेरणी कशीबशी आटोपली.…
तिच्याकडे जाताजाता वळलं आणि खुशाली घेऊन निघू म्हटलं तरी तासभर कसा गेला कधी कळत नसे,आता तीची पावलं भडगाळवाच्या दिशेने पडावी असे तिचे वय. संपूर्ण शरीरावर सुरकुत्या, मान लटलटू लागलेली, हाताला…
शाळेत असतांना सगळ्यात जास्त आतुरतेने आम्ही कशाची वाट पाहत असू? ती म्हणजे सूचना वहीची. या वितभर वहीने अनेकांना आनंदीत केले आहे. अभ्यासाच्या जाचातून थोडा दिलासा दिला आहे. ती वही घेऊन…
महाराष्ट्रात हल्ली कशा कशासाठी अनुदान द्यावे लागते तेच कळत नाही. दुबार पेरणी झाली, द्या अनुदान, पीक बुडालं द्या अनुदान, जास्त पिकलं, भाव गडगडले द्या अनुदान. हे अनुदान भूत मानगुटीवर बसले…
लहानपणी पावसाची आम्हाला मज्जा यायची, आकाश काळकुट्ट व्हायचं अगदी दिवसा अंधारून यायचं, मग कितीतरी वेळ आकाशात फटाके फुटायचे, धडाड धूम, धडाड धूम. मग फटाक्यांची आताषबाजी संपतासंपता, सगळ लख्ख उजळून निघायचं,…
दंताजींचे ठाणे उठले ,फुटले दोन्ही कानडोळे रूसले काही न बघती नन्ना करते मान।या वात्रटिकेने दातांच दुखण किती असह्य असत ते कवी व्यक्त करतो. पण दात तर हवेच, बोळकं तोंड किंवा…
७९ व्या मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष, निसर्ग अभ्यासक, निसर्ग संरक्षक मारुती चितमपल्ली यांच्या बाबत माहिती वाचता वाचता मला मी सफाळे येथे रहात असताना जंगलात गेल्यानंतर जो अनुभव यायचा तो आठवू…
माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन! अशी आमची मराठी भाषा.आमची भाषा मोठी विनोदी. वळवावी तशी वळते, वकुबानुसार कळते. बोलतांना तोल सांभाळून बोललं नाही आणि…
मी पणाचा पडदा सारीता मी दूरपाहिला श्रीहरी भोळा माझिया समोर ॥ झाली भेटाभेट सरले अंतरमाझिया मनाचा नाचू लागे मोर ॥ पाहिले मी डोळा रुप ते सुंदरसावळा तो विठ्ठल दिसे मनोहर…
घराकडली चर्चा पदीच्या कानावर गेली तसो तो म्हणालो. “आवशी तू माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरजच न्हय, मी पोरग्या बघलय. जो पर्यंत माझ्याकडे पुरेसे पैसे जमा होणत नाय लग्नाचो विषय कोणी…
तुमका सांगुन खरा वाटाचा नाय पण आजच्या काळातव कोकणात काय काय शाणे वंशाचो दियो व्हयो म्हणान मुलासाठी पाच सा चेडवा झाली तरी प्रयत्न करत रवतत. इतक्या मुला-बाळांचो संसार झेपाक नको?…
आज आपली पिढी ज्या वेगाने अनेक साधनांचा उपभोग घेत आहे ते पाहता आपण फक्त साधनांच्या जनरेशन नेक्स्ट ची वाट पाहण्याची उत्सुकता दाखवू शकतो. मग नोकियाचा मोठा हँडसेट ते आता स्लिम…
भाग १ भाग २ येथे वाचा मुला बापाचं कडाक्याच भांडण झालं. आदर्श म्हणाला, “शिवानीला पुण्यात न्हाय पाठवलं त पुन्हा घरला येणार न्हाई, मग रहा ऐकलेच बोंबलत.” आबा शांतपणे म्हणाले, ”…
अभयचही तसंच झालं होतं. खाली खेळायला गेला की हाक मारून बोलवल्याशीवाय घरी परतण्याची आठवण नसे. उशीरा येण्याबद्दल रागावल तर म्हणे, “आई शाळंला सुट्टी हाय तरीपण मी इंग्लिशचा अभ्यास करतो. बाकीची…
एक दिवस अभय कुत्रा कुत्रींचं झोंबाट पडवीच्या आडोशाला उभं राहून पहात होता एवढ्यात आजोबांनी ते पाहिले, “आरं ए पोरा इकडे ये, जा घरला, तुला गुरूजींनी अभ्यास दिलाय ना? कुत्र्यांच झोंबाट…
बोर्डाची १२वी ची परीक्षा पंधरा दिवसावर आली तसा विनय भानावर आला. अजूनही Maths आणि Chemistry ची दोन दोन Chapter करणे बाकी होते. इंग्रजीला तर हातही लावला नव्हता. त्यातल्या त्यात Physics…
प्रेम केले कुणावर तरी, हिशेब त्याचा मांडू नयेफुटकळ कारण शोधून कुणाशी, उगाच भांडण करू नये हरे शामा, हरे कृष्णा, चित्त हारण मोहना ——-(धृ) प्रेम करता ह्रदयही द्यावे, मागेपुढे उगा पाहू…
मित्र, सखा, सहचर या शिर्षकाचा अर्थ खरतर मीच शोधत होतो. मित्र ते सखा आणि सखा ते सहचर हे टप्पे किंवा यातील अंतर कापणं तसं अवघडच. मित्र कोणाला म्हणाल? मैत्री कधी…
कधी कधी काही गोष्टी उशिराने मनाला कळतातभावविश्व तोलता येत नाही, आठवणी पून्हा छळतात ती दिसताच मन होते उल्हसित, रोमांच मनी फुलतोतिच लक्ष वेधलं जावं म्हणून तिच्याकडे पाहून मी हसतो तो…
तो जाताजाता थबकला, त्याने खिशातून सिगारेट केस बाहेर काढली, थोड्या वेळापूर्वी अर्धवट ओढलेली सिगारेट काढून लायटरने पेटवून शिलगावली. मोठा कश घेत तो घसा खरवडून खोकला. पुन्हा दम मारत त्यानी तोंडाचा…
“हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है, हां हां हां!” शोलेमधील असरानीचा डायलॉग सर्वांना आठवत असेल, किंवा दो आँखे बारा हात मधील वार्डन आठवत असेल. किती तरी चित्रपटात अमिताभ यांनी कैदी आणि…
अरे राजूss अशी हाक येताच तुम्ही सावध होता आणि आलो म्हणत तिच्याकडे निघता. दरम्यान, पून्हा दोनदा हाक येतेच येते. तुम्ही जवळ पोचताच ती सांगते, “हे बघ तू ऑफिसला निघतोच आहेस…
काळ हेच दुःखावर औषध असते. वर्षभर यशवंत तिला घरात राहायला जाऊ नाहीतर घुशी आणि उंदीर घराची वाट लावतील अस सांगत राहिला समजावत राहिला, पण ती बधली नाही. हळू हळू यशवंतला…
त्या प्रसंगानंतर ती वाचलेलं किडूकमिडूक घेऊन घराला लागून कोंबड्यांची एक रिकामी खोली होती त्यात राहायला आली. ती खोली अस्वच्छ तर होतीच पण कोंबड्यांच्या शीटीची दुर्गंधी त्यात भरून राहिली होती. ती…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तिच्या माहेरी, बहिणीच्या छळाबाबत हे समजले तेव्हा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी रजनी तिला घेऊन जायला आले. तिच्या शरिरावरील जखमा आणि तिची खंगलेली…
सिंधूताई सकपाळ यांच्यावर चित्रपट प्रदर्शित झाला आणि उभ्या महाराष्ट्राला सिंधूताई आणि त्यांच सामाजिक कार्य याची माहिती कळाली. चित्रपट पाहिल्याने सामाजिक प्रबोधन होत का? खर तर ते व्हावं हा चित्रपट निर्मात्याचा…
शारदाश्रम इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतांना सचिन तेंडुलकर याला १९ वर्षाखालील संघातून परदेशात जाण्याची संधी होती. त्याला परदेशात जाण्यासाठी बोनाफाईड सर्टीफिकेट तातडीने हवे होते. खरं तर बोनाफाईड देण्यासाठी फारसा कालावधी…
एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचं की ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. नोटबंदी म्हटलं तर फसली आणि म्हटलं तर यशस्वी झाली.
तो काळच तसा होता, माणूस कोणत्या जातीत जन्मला यावरून समाजातील त्याचे स्थान ठरत होते. गावाला तो हवा होता, परंतु त्याचे स्थान मात्र गावकुसाबाहेर होते. त्याची सावली अंगावर पडता नये, ती…
कुणाला जातीची, कुणाला मातीची, म्हणजे आपल्या गावाची तर कुणाला भाषेची अस्मिता असते. कोणाला पक्षाची, कोणाला आपल्या विशिष्ट वर्गाची, क्लासची असते. अस्मितेच काय हो! जो कोणी तिचा हात पकडेल त्याच्या बरोबर…
आज कोणत्याही मोठ्या शहरात नवतरुण जोडप्यांचा सर्व्हे केला तर दिसेल की ही जोडपी मोठ मोठ्या हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये किंवा टॉवर मध्ये आणि मोठ्या फ्लॅट मध्ये राहतात, पण त्यांच्यावर लक्ष द्यायला,…
गेल्या आठवड्यात श्रध्दाच्या हत्येची बातमी ऐकली आणि अंगावर काटा उभा राहिला, ज्या थंड डोक्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन ते नोएडा सारख्या गजबजलेल्या शहरातील एका भागात…
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मुंबईला निघून गेला, त्याने धीर दिल्याने ती सार काही विसरून गेली. तो पून्हा आला तेव्हा त्याने तिच्यासाठी आणलेला नाईट गाऊन तिला घालायला लावला. तिला ते कसेतरी…
गावाच्या मध्यभागी तो बंगला आजही उभा आहे. साठ वर्षांपूर्वी त्या बंगल्यात आडारकर यांचं सधन कुटुंब वास्तव्यास होतं, त्यांची शेती वाडी होती. शेतीचं काम पहायला स्थानिक कुळवाडी होते. घरकाम करायला तारी…
नाना बोडस, अभय नाडकर्णी, दादा सामंत, अस्लम शेख, संतोष पवार, कृष्णन अय्यर, दाजी पाटील आणि व्हिक्टर फर्नांडिस हे सर्व सह प्रवासी मिळून ग्रुप बनला होता. कधी बोडस तर कधी नाडकर्णी…
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री चा हात असतो असे म्हटले जाते पण अशा यशस्वी पुरषांच्या मागे ठाम असणाऱ्या फारच थोड्या सौभाग्यवतींच्या जीवनात भाग्याचा दिवस येतो, जेव्हा त्यांचे जाहीरपणे कौतुक केले जाते.…
आमच्या कोकणात म्हण आहे, “भितीक कान असतत” तर, खर तर मी ही खाजगी गोष्ट तुम्हाला का म्हणून सांगावी? पण कोणावर भरोसा ठेवायचा? बऱ्याच बातम्या घरातूनच लीक होतात. तिला काही विश्वासानं…
सांगली वरून पटवर्धन फॅमीली इतक्या झटपट येण शक्य नव्हतं आणि accident केस असल्याने बॉडी जास्त वेळ घरी ठेवण शक्य नव्हतं. Ambulance रस्त्याला लागताच शेखरने मेधाला फोन लावला पण बराच वेळ…
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्याने अभयला फोन केला. तिथून हॅलो ऐकू येताच शेखर त्याला म्हणाला, “तुझे प्रताप कळले, आता तू राहू शकत नाही, तुझा तूच निर्णय घे,तेच बरे.”…
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. दोन दिवस निघून गेले तरी अभय जाण्याचं नाव घेईना तसं ती शेखर नसतांना त्याला म्हणाली, “भावाने पुढील शिक्षणासाठी आसरा दिला आणि तू त्याच्या बायकोवरच… लाज…
त्या दोघांचं भांडण ऐन भरात असतांना दार वाजले, तिने लगबगीने स्वतःचे आवरले आणि ती बेडरूममधून निघून गेली. वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंड स्वच्छ धुतले आणि ती बाहेर आली. बाहेरील अंदाज घेत…
काल पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं, गणपतीची उत्तरपुजा करायला गुरूजींना सवड नाही, तांदूळ देऊन म्हणतात, “प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळेस पुजा केली तेवढी उत्तर पुजा अवघड नाही. आचमन करा आणि प्रोक्षण करून कलश…
नमस्कार, आज गणेशचतुर्थी. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु कोकणासहठाणे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या संपूर्ण पट्ट्यात तो जल्लोषात साजरा होतो. कोकणात त्याच्या उत्सवाचे स्वरूप थोडे वेगळे…
ज्या देशात गरिबांच्या अन्नधान्यावर कर लावण्याची शासकावर पाळी येते त्या देशातील न्याय सावकारांचा गुलाम झाला आणि सद्विवेक बुद्धी श्रीमंत माणसाची बटीक झाली असे समजायला हरकत नाही. आम्ही हे विसरलो की…
आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. लहानपणी राख्यांचा खूप सोस असायचा. दोन्ही हातात मनगटभर राख्या असायच्या, राख्यांवर चित्रपटांची नावं असायची. नारळीभात किंवा नेवऱ्या असायच्या. श्रावण महिन्यात जेवणात पापड, सांडगे भोपळ्याच्या फुलांचं…
“सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे” असं आपण अनेकदा ऐकलं असेल, किंवा “जगी सर्व सुखी असा कोण आहे.” समर्थांच वचन ऐकलं असेल. तुमच्या मते कोण सुखी आहे? मुकेश अंबानी! अमिताभ…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा जेव्हा आम्ही पालकांच्या भूमिकेत शिरलो तेव्हा आमचे अनुभव आणि आमच्यावरील संस्कार हे आमच्या पालकांचे आणि शाळेचे होते परिणामी त्याच तराजुनी आम्ही आमच्या मुलांचे मूल्यमापम…
“सिंहावलोकन”, चुक घडुन गेल्यावर केलं जातं. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” असं आपण म्हणतोच ना! मी चुका केल्या, त्याच चुका तुम्ही करु नका अस अनुभवी माणूस उदाहरणे देऊन सांगतो. विश्लेषक कोणाला…
श्रीमती मंजुश्री गोखले यांचं, “हेचि दान देगा देवा” हे पुस्तक वाचत होतो. पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररी मधून पंढरीची वारी नुकतीच सुरू झाली असताना हे पुस्तक अचानक हाती लागलं आणि चारशे…
मी ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो, मला निरोप द्यायला माझे सहकारी, इतर कॉलेज मधील माझे मित्र, आणि माजी विद्यार्थी जमले होते. माझ्या या कार्यक्रमासाठी कुटुंबीय होतेच, खुप जणांनी पुष्पगुच्छ दिले भेटी…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सानिकाच्या पायगूणाने घरात समृद्धी आली. तिच्या बारशाला प्रसाद आणि त्याचा बॉस हजर होता. बॉसने तिच्या मुलींसाठी खूप गिफ्ट आणली होती. सोन्याची चेन सानिकाच्या गळ्यात…
मध्यम वर्गीय सुशिक्षित कुटुंबातील संस्कारात वाढलेली असली तरी ती मॉडर्न होती. म्हणजे मिडी, जीन्स, बेलबॉटम, स्लीव्ह लेस टॉप असे कपडे. हाय हिल सँडल, सोम्य मेकअप अशा स्वरूपात ती ऐशीच्या दशकात…
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. हवामान खाते किती विचित्र आहे? ते जे अनुमान सांगतात त्यात काही सत्यता नसते. पाच मे पासून या वर्षी पाऊस लवकर येणार हे भाकीत दर दिवशी…
तिला प्रथम दर्शनी कोणी पाहिली तरी ती कोणाला पहिल्या भेटीत आवडावी इतकी सुंदर नव्हती. सडसडीत बांधा, वडीलांप्रमाणे उभट तोंडवळा आणि निमगोरा रंग अगदी चार चौघीप्रमाणे, आणि तरीही ती पळून गेली…
मराठीत पाणी, संस्कृत मध्ये तोय, जल, निर, इंग्रजी मध्ये water तर अरबीमध्ये maa, चायनीज मध्ये shri, ग्रीसमध्ये Nero, इंडोनेशियात पाण्याला Air म्हणतात. कितीही वेगवेगळ्या नावाने पाण्याचा उल्लेख केला तरी अंतिमतः…
आत्या गावावरून कधीही आली तरी शकुंतलावर रागावयाची, “शके तुका आवशीन काय शिकवल्यान का नाय? ह्या कपाळ उघडा कित्याक? आणि ही पोरांवरी अर्धी पॅन्ट कित्याक घातलं? तुम्ही काय ख्रिस्ताव आसास काय?”…
त्याने फार मोठ्या विश्वासाने बाबूला झुंजीत उतरवायचे ठरवले होते. जर बाबू जिंकला तर त्याला एकहाती अडिच लाख रोख बक्षीस मिळणार होते. शिवाय यूट्यूबवर ही झुंज अपलोड केल्यास त्याला समाज माध्यमातून…
सुरज चौबळची ती नेहमीची लोकल होती. तो एमबीए केल्यानंतर हॉंगकॉंग बँकेत कामाला लागला आणि महिन्याभरात त्याची अनेकांशी दोस्ती जमली. तीन साडेतीन वर्षानंतरही त्यांचा ग्रुप टिकून होता. प्रवासात अनेक चेहरे दिसतात.…
माधुरीला “भोळे नर्सिंग होम” मध्ये अँडमिट करून तो बाहेर पडला तेव्हा तो अस्वस्थ होता. काल रात्रीपासून तिला ओटीपोटात असह्य वेदना सुरू झाल्या होत्या पण डॉक्टर दोन दिवस रजेवर होते आणि…
मी जवळ जवळ दोन महिन्यांनी सफाळे गावात गेलो होतो. हल्ली दर दोन महिन्यांनी माझा आतला आवाज मला ओढून माझ्या जन्मगावी, सफाळ्याला घेऊन जातो. विरार पाठी टाकलं आणि वैतरणा आलं की…
शाळेतून येता येता त्याचे रस्त्यावर द्वाड मुलाशी भांडण झाले, त्याचे कारणही तसेच होते, त्या मुलाने काही कारण नसताना त्याला टपली मारली. हा अन्याय निमूट सहन करणे त्याला शक्य नव्हते. त्याने…
केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, असं सुभाषित आहे आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला होता. तोच अनुभव दोन दिवसापूर्वी प्रवासात आला. मी मांडवी एक्सप्रेसने जात होतो. दिवसा प्रवास असला…
मित्रांनो, १५ ते ३० वय हे वय असं असतं की या वयात मुलं आणि मुली यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स उच्च पातळीवर असतं म्हणूनच या वयात तरूण तरुणींना आपल्या कामवासनेला…
एक दिवस रेडिओ वरती सकाळी भावगीत लागलं होतं, अरे मन मोहना रे, मोहनाsssसाधी भोळी मीरा तुला कळली नाहीतुझी माझी प्रीत कधी जुळली नाही ती भावगीतातील आर्त तान ऐकली आणि मन…
समीर रोज आपल्या बाईकने कामावर जायचा, साडेनऊची ड्युटी असल्याने आठ साडेआठला निघाला तरी तो तासाभरात महापेला पोचत असे. निघायला दहा मिनिटे उशीर झाला की तो ट्रॅफिकमध्ये अडकून पडे. घरून कितीही…
लग्न म्हणजे दोन शरीरे, मन आणि दोन आत्मे यांच पवित्र बंधन. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचा एकत्रित प्रवास. सहजीवन, जीवन प्रवासातील सुसंवाद. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे समर्पण बुद्धीने मनोमिलन. लग्न म्हणजे…
तसं तिचं माझं काही नातं नव्हतं पण तिला पाहिलं की वाटायचं कधीतरी आपण तिला नक्कीच भेटलोय. कधी? कुठे? काहीच तर आठवत नाही तरीही ती दिसली की मनाची हुरहूर वाढायची. तिच्याकडे…
मी इथे वास्तव्य करून आहे त्याला पन्नास वर्षे झाली, म्हणजे माझा जन्म इथलाच, खरं तर तुमच्या भाषेत माझी गोल्डन ज्युबिली नाही का? माणसाचा जन्म होताना मातेलाच वेदना होतात पण मला…
आजचे कर्नाटक हे पुर्वी छोट्या छोट्या संस्थानात विभागलेले होते. यातील बेळगाव आणि धारवाड या दोन जिल्हावार आपण भाषिक तत्वावर दावा करत आहोत. आपल्याला उडप्यांची हॉटेल चांगलीच परिचित आहेत. कोलार येथील…
संकल्प आणि सिध्दी यात असते बरेच अंतरबेत बारगळतात कारणे देत हेच कळतं नंतर मुले आईला नियमित अभ्यास करण्याचं करतात प्रॉमिसअगं लक्षात होतं पण विसरलो म्हणत क्लास होतो मिस मुलगी आईला…
गेला संपूर्ण महिना गाजला तो पेपर फुटी प्रकरणाने, मिलिटरी सर्व्हिसचे पेपर फुटले, पेपर फुटी होईल म्हणून म्हाडा परीक्षा रद्द झाली, एमपीएससीचे, टि.ई. टी.चे, आरोग्य खाते किंवा मेडिकलचे असे अनेक पेपर…
आई, मी आता लहान नाही तू प्रत्येक वेळी मी काय करावे काय करू नये येऊन सांगत बसू नको. माझे मला ठरवू दे. तू सारख का पाठी लागतेस? मी कशीही वागले…
मुंबई ही अशी नगरी आहे की इथे कोणत्याही ऋतूत काहीही मिळतं. एकवेळ गावाकडे ठराविक भाज्या मिळणार नाही पण मुंबईत तुम्हाला हवी ती भाजी केव्हाही मिळेल ते ही घरबसल्या. आपल सर्च…
त्याचे नाशिकच्या सुरगणा येथे प्राथमिक शिक्षण झाले. सुरगणा आणि पेठ हे तसे दुर्गम तालूके येथे भरपूर पाऊस पडतो पण डोंगराळ भाग जास्त असल्याने लागवडीसाठी योग्य जमीन कमीच. त्यांची वडिलोपार्जित अवघी…
सारेच पक्ष आता बदनाम कोणाकडे न उरली नितीप्रत्येक पक्षाची आता सत्तेसाठी कुणाशीही अभद्र युतीकधी युतीत तर कधी आघाडीत कळेना यांची रणनीतीअर्ध्यारात्री राज्यभिषेक, सत्तेसाठी लाचार, गुंग होते मती घड्याळ हाताला बांधले…
२८ ऑक्टोबर २१ पासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलानीकरण व्हावे या साठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, आज पर्यंत त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेल नाही. ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाला…
आज कार्तिकी एकादशी आहे. विठ्ठलाच्या भक्तांची मांदियाळी या कार्तिकी एकादशीला पंढपूरात जमली आहे. गेले अठरा महिने करोनाचे दाट संकट होते त्यामुळे पंढरपूरात विठ्ठल एकांतात होता. त्यानेही सोशल डिस्टन्सींग पाळले होते.…
कोणता पक्ष चांगला हा विचारच फसवा अविचारपक्ष कोणताही असो, उडदा माजी काळे गोरे हेच सार आम्ही सत्यवादी, असा वृथा नकोच कुणाचा अहंकारकुणी आपल्याला दिला असे बिरुद मिरवण्याचा अधिकार प्रत्येक दिव्याखाली…
तो शांतपणे मनात भविष्याच वादळ घेऊन बसला होता, किती विरोधाभास होता, वरवर तो शांत बसला होता पण वास्तव वेगळच होत नियतीच्या क्रुर चेष्टेने तो हादरून गेला होता. अस शांत बसणं…
आज दिवाळी, प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येत घरोघरी तोरणे बांधली होती. दुष्ट प्रवृत्तीवर विजय व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो.…
काल मी कामावरून घरी आलो तर माझा मुलगा प्रवीण आजीवर रूसून बसला होता. मी आलो हे पाहून त्यांनी जोराने रडायला सुरवात केली. तो थांबून थांबून रडत होता, “पप्पा मने जवा…
देवगडातल्या चौसोपी वाड्यात आजी एकट्याच रहात होत्या, हो एकट्याच. म्हणजे बापट आजोबा जाऊन दहा वर्षे झाली तेव्हापासून त्या एकट्याच ह्या आठ खणांच्या वाड्यात रहात होत्या. नाही म्हणायला घरकामाला पार्वती आणी…
अर्जुन बळवंत वालावलकर या रत्नागिरी जिल्ह्यातील वालवल येथील सुपूत्राने कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. ते ब्रिटिश काळात रेल्वेच्या सेवेत होते. संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे विस्तारत होते तरी कोकणात रेल्वे येत…
आमच्या वेळी मिनी केजी, सिनियर केजी, पूर्व प्राथमिक असे काही प्रकार नव्हते त्यामुळे आई आणि आम्ही मुले हे घट्ट समीकरण वय वर्ष सहा पर्यंत पुरले. त्या वेळी दुधाची बाटली हा…
वृद्धाश्रमात येऊन नक्की किती वर्षे झाली माहिती नाही, आताशी कालगणना करता येत नाही. खोलीतील कॅलेंडरवर नजर पडली आणि त्यावरचे वर्ष दिसले पण २०२१ म्हणजे किती वर्षे पाठी सरली आणि किती…
“अहो, ऐकताय ना,हा तुमचा जेवणाचा डबा, हा रुमाल आणि हे तुमच पाकीट. “हं निघा आता लवकर नाहीतर उशीर होईल. “अग इकडे ये, लवकर ये,मला उशीर होतोय.”, ” हं आता आणि…
लहान मुलांना आनंद कशाने होत़ो? , अचानक मिळालेल्या चॉकलेटने, ध्यानी मनी नसतांना आई किंवा बाबा यांनी आणलेल्या कपड्यांनी, वाढदिवशी आणलेल्या नावाच्या केकने, आवडीचे खेळणे बाबांनी न कूरकूरता खरेदी करून हाती…
२५ जून १९७५ च्या मध्यरात्री आणिबाणी घोषित करण्यात आली तेव्हा मी इयत्ता आठवित होतो.आणिबाणी म्हणजे काय? ते माहितही नव्हते. निकडीची परिस्थिती, युद्ध, आक्रमण, संसंर्गजन्य रोग, आर्थिक मंदी इत्यादी आपत्तीमुळे राष्ट्राचे…
तिने अगदी नाईलाजाने फोन केला, “विनीत तू तातडीने निघून ये.” “काय झालं? खरच एवढं तातडीने निघायची गरज आहे का?” तो विचारण्यापूर्वी मोबाईल कॉल बंद झाला. त्यांनी दोन तीन वेळा फोन…
या विषयावर लिहिण्यापूर्वी, मी मलाच विचारले, व्हावे का व्यक्त? गेल्या वर्षी एका मुलीने महाराष्ट्रातील राजकीय घटनेबाबत एक पोष्ट शेअर केली आणि आमच्या अति तत्पर पोलीस खात्याने तीला अटक केली. आपले…
समीर आपली खरेदी आटपून घरी परतला तेव्हा दिड वाजत होता. त्याला परतायला उशीर झाल्याने आई वाट पहात होती. “रे! किती उशीर! अख्खो बाजार खरेदी करून आणलस काय?” “नाय गे,बऱ्याच दिवसांनी…
मी संशयान तिच्याकडे बगलय, तर म्हणाला, “अगे, पुण्याचे रमेश lकामत ते. मागे इलेले आणि आत्याक पैसे देय होते. तेच ते. त्यांनी माझो नंबर विचारलो, मी सांगलय, माका काय ठावक, त्यांका…
आई इल्यापासून घरातल्या कामांका माका मदत जावक लागली, आईनं ह्यांच्या आवडीचे शेवये, खापरोळे करून घातलेन. तवसा हाडला होता त्याचा धोंडस केलेन. दर दोन दिवसान एखादो नवीन पदार्थ जावक लागलो. मुला…
चार पाच दिवसांनी त्यांका पुन्हा चक्कर इली. मी रिक्षा सांगलय. झील, मी आणि ते रिक्षा केलव मालवण गाठलव. डॉक्टरांनी रिपोर्ट काडूक सांगल्यांनी. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट बघीतल्यानी, सांगितल्यानी, “ह्यांना माईल्ड अटॅक…
हे नसताना शरयू येय. तिच्या घरची परिस्थिती चांगली होती तरी पण मी ते जा काय आणीत तेतूरला तिका ठेवी. ती या घरची मालकच होती. ती सुद्धा भाच्यांका खावक घेऊन येय,…
कोकण म्हणजे परशुरामाच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी. एका बाजूक सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा आणि दुसऱ्या बाजूक दूरवर पसरलेलो अरबी समुद्र यांच्या मध्ये माझा तळकोकण. “लाल तांबडी माती, जपत इली नाती,…
“कुठे आहे बंदूक? मला द्या, हा मी निघालो,शत्रूच्या छाताडावर नाचून गोळ्या घालूनच येतो.” एवढं त्वेषाने बोलेपर्यंत त्यांना दम लागला आणि ते खुर्चीत कोसळले. समोर बसलेली आम्ही मुले एकदम शांत झालो.…
संदीप आईवर खेकसला, “अगं आई काय करतेस? माझा मोबाईल तुला कशाला हवा? तुझा आहे ना?” “अरे माझ्या मोबाईलच नेट गेलंय, जरा रेसिपी बघत होती रे, तुम्हाला गिळायला काही तरी नवीन…
संगीता एक साधारण कुटुंबातील मुलगी, तिच्यासह चार भावंड असल्याने हौस, मौज तिला माहितच नव्हती. बी.ए. पर्यंत कसंबसं शिक्षण झालं होतं. कोणीतरी सूचवलं आणि तीच लग्न शेखर नवरेशी भटा ब्राह्मणांसमोर झालं,…
त्याचा मृत्यू झाला तेव्हा अख्ख्या गावावर शोककळा पसरली,. गावातील टोर पोर सगळे त्याच्या घराच्या दिशेने निघाले होते, त्यात भटाबामणापासून हरीजन वाड्यातील म्हाताऱ्या वेणू आक्का पर्यंत सगळे होते. कोण होता तो?…
अंधार फार झाला, आता सुर्यास जाग आणावस्त्र फाटले काळजाचे, माणुसकी थोडी विणा। चला करु नेक विचार मन, मनात जागवू आशाचेतवा स्फुल्लिंग काजव्याचे, पाहूया उद्याची उषा॥ गेला आठवडाभर दर दुसऱ्या दिवशी…
तो मुलाचा बारावीचा ऑन लाईन निकालाचा दिवस होता. त्यापूर्वी चार दिवस कुठे प्रवेश घ्यायचा? कोणते कॉलेज चांगले? कुठे चांगल्या Faculty आहेत या विषयी चर्चा होत होती. मुलाने स्वतः कॉलेजविषयी बरीच…
फडणवीस यांच्या युती सरकार काळात विधानसभेत कायदा करून, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिल गेलं. अर्थात या पूर्वी सामाजिक आरक्षण १०% होतं, आता नव्याने त्यात बदल करून मराठा समाजाला…
माझ्या बद्दल कोणी काही लिहेल या भ्रमात मी कधीच नव्हतो, कसे असणार? काय माझे कर्तृत्व जेणेकरून कोणी काही लिहावे? पण मी गेल्यावर काय! कोणी माझी आठवण ठेवेल की नाही याचा…
रविवार असल्याने मोबाईलचा अलार्म बंद करुन मी आळस देत पडून होतो. रोज साडेपाच वाजता morning walk ला आम्ही चार मित्र गेले अनेक वर्षे जात होतो. पण गेल्या वर्षापासून करोनाकाळात Lockdown…
मिंत्रानो आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी एक. सत्ययुग आणि त्राता युगाची सुरवात या दिवशी झाली असे मानण्याचा संकेत आहे.कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले हा असा दिवस आहे की जे काही या दिवशी…
आपण गोष्ट ऐकतो, वर्षानुवर्षे ऐकत आलो, सांगत आलो. एक मुलगा आपल्या बायकोला खुश करण्यासाठी आईचं काळीज मागतो. ती प्रेमळ आई, वात्सल्याचं प्रतीक असणारी आई, मुलाच्या आनंदासाठी आपल काळीज काढून देते.…
आवाहन सळसळत्या रक्ताच्या माझ्या तरुण मित्रांना संपूर्ण भारतात करोनामुळे भितीचे वातावरण आहे, देशातील मोठ्या शहरात या रोगाचा उद्रेक झालेला दिसत आहे. एकुण करोना बाधितांपैकी अंदाजे तीस टक्के ते पन्नास टक्के…
“सुरेश एवढा बदलेल अस वाटल नव्हत हो!” नाडकर्णी आपल्या मैत्रिणीला, सामंत बाईंनी सांगत होत्या, दोघी अधूनमधून बाजारात भेटत तेव्हा एकमेकांना आपल्या बातम्या ऐकवत होत्या. मैत्रीण हसून म्हणाली, “अहो आम्ही शेजारी…
“ए समिधा ! समिधा, ए समिधा पाणी देतेस ना?” आईच्या दोन हाकांनीही समिधाची एकाग्रता ढळली नाही. गेला महिनाभर शेजारच्या साठे काकूंचा लोकसत्ता दुपारी आणून समिधा नोकरीच्या शोधात रकानेच्या रकाने चाळत…
मी नववी किंवा दहावी इयत्तेत असताना आम्हाला पु.लं.च्या बटाट्याची चाळ या पुस्तकातील एक परिच्छेद, ‘भ्रमंती’ या नावाने होता. हा भाग अनेकांच्या वाचनात आला असावा . आमच्या मराठी विषय शिकवणाऱ्या काळे…
मी नेहमीच तिच्याकडे भाजी घेत असे. वसईची, गावातील, गावठी भाजी म्हणून मला त्या भाजीचं आकर्षण होतं. टिळक ब्रीजच्या पूढील मनपा मंडईतील असणाऱ्या विक्रेत्यांकडील मेथी, पालक, लाल माठ, अळू आणि तिच्याकडे…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ संजीव एक जानेवारी पासून कंपनीच्या Seawoods येथील office मध्ये जाऊ लागला. सकाळी दहा ते सहा अशी ड्युटी होती.कॅन्टीन…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ पाहता पाहता सप्टेंबर उजाडला आणि गणपतीचे वारे सगळीकडे वाहू लागले. त्यांच्या सोसायटीत गणपती नसला तरी शिंत्रे काकूंच्या घरी…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ त्याचे लग्न ठरले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पार्ल्याला थाटात साखरपुडा झाला. दोघेही अधून मधून भेटत होते. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ त्याच्या बंगलोरला जाण्याची तयारी किती दिवस शेखर आणि कोमल करत होते. कोमलने त्याच्यासाठी काही पदार्थ करून दिले. एखादा…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ तिला रुपारेल येथे Science ला admission मिळाले. बहुदा गोखले काकांच्या सूचनेनुसार प्रवेश मिळाल्यानंतर तिने पेढे वाटले. तिचे सकाळचे…
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ संजीव पटवर्धन एका मध्यम वर्गातील कुटुंबात वाढलेला मुलगा, खुप हुशार नसला तरी पार्ले टिळक शाळेत पाचवी ते दहावी…
मकर संक्रांत संपली तरी आभाळ ढगाळ. सकाळचे साडेसात वाजले तरी सूर्याचं दर्शन नाही, हे अस मळभ आच्छादित असलेलं वातावरण असलं की माझं डोकं ठणकायला लागतं. अंग मोडून येतं. आम्ही,म्हणजे मी…
संदर्भ नीट आठवत नाही परंतु कोणत्या तरी देशाचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर होते. ते एका रेल्वेस्टेशनवर थांबले, दूर अंतरावर एक बाई झाडत होत्या. कोणीतरी तिला म्हणाले, “बाई, आता नंतर झाडा, देशाचे अध्यक्ष…
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जेवढ्या शाखा आणि स्वयंसेवक आहेत ते पाहता अचंबित व्हायला होते. पंन्नास वर्षांपूर्वी सफाळ्या सारख्या अतिग्रामीण भागात संघाची शाखा नियमितपणे चालवण किती अवघड असावं त्याची कल्पना जो…
भारताने १९५५ साली संविधानाचा स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्ये तेथील रूढी, परंपरा, त्या भागाचा इतिहास, प्रादेशिक भाषा या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करून…
काही वर्षांपूर्वी फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटूंबातील लोक morning walk, Gym या साठी नियमित जात असत. मग शिवाजी पार्क मैदान म्हणा, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी येथे सकाळी फेर…
एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसई मधून शेरलॉक नावाचं त्रैमासीक निघत असे.या मासिकाचे संस्थापक, मुद्रक, प्रकाशक होते श्रीकृष्ण ठाकूर. या मासिकात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील गोष्टी आणि पोलिस शोधमोहीमांबाबत काही सत्य कथा…
सुबोध घरी शांतपणे बसला होता पण त्याच्या मनात मात्र वादळ घोघावत होते. चार दिवसांपूर्वी सारिका तडकाफडकी घर सोडून गेली. तस काही फार मोठं कारण नव्हतं. सारिकला भावाच्या लग्नाला जायचे होते,…
“काकी,ए काकी, गूरा सोड”, अशी हाक आली की आई घरापाठच्या गोठ्यात जाऊन गुरांची दावणी एक एक करून सोडत असे आणि गूरे गोठ्या बाहेर पडता पडता शेपटी वर करून वाटेतच मलमुत्र…
सौरभला दिवाळीची सुट्टी होती. दिवाळी संपली की आठ दिवसांनी मनालीला जायचा प्लॅन त्याच्या डँडीनी केला होता. कधी एकदा दिवाळी संपते आणि आपण मनालीला जातो असे त्याला झाले होते. दिवाळीत कोणत्याही…
नेहमीप्रमाणे आठ तेराच्या लोकलने जात होतो, इतक्यात एक अंदाजे पन्नास वर्षांच्या बाई येवुन आमच्या सीटच्या बाजूस उभ्या राहिल्या. काळी साडी, काळा ब्लाऊज, कपाळाला मोठे सफेद गंध, गळ्यात माळा, हातात सोन्याच्या…
शेवंता भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. शेवंती ज्या समाजातील मुलगी होती, ते पहाता त्यांचा सल्ला तिच्या काकीने ऐकला असता हयाची खात्री नव्हती. पण ती मोठ्या आशेने त्यांना विचारत होती.…
शेवंता शाळेच्या वाटेला लागली, तेव्हा सात सुध्दा वाजले नव्हते. शनिवारी शाळा सकाळी असल्याने, दर शनिवारी तिची अशीच गडबड उडत असे. तिची चुलती केस विंचरून द्यायची पण आताशा ते तिच्या मना…
गोविंदाsss गोविंदाsss, गोविंदा गोविंदा अशी मोठी आरोळी ऐकू आली की आम्ही अंथरुणातून ऊठत असू, पण अंथरुणा बाहेर यावे असे वाटत नसे इतका गारवा हवेत असे. नऊ, दहा वर्षाचं वय, त्यामुळे…
“नाना! हे लिंबूपाणी घ्या.” केशवने त्यांच्या ओठाकडे काचेचा ग्लास सरकवला. नानांचे ओठ पार सुकले होते. त्यांच्या ओठाला ग्लासचा थंड स्पर्श झाला तशी त्यांच्या शरीरातून शिरशिरी निघून गेली. त्यांनी बळेच लिंबू…
भिती कशाची वाटते तर ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत पण कोणा तरी व्यक्ती कडून ऐकल्या त्या गोष्टी बाबत, बर प्रत्येक व्यक्ती आपण ऐकलेली गोष्ट आपल्या जवळचा मीठमसाला लावून सांगत असल्याने…
लहानपणी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला दूध पिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बागुलबुवाची किंवा अंधाराची भिती दाखवत. गावी प्रत्येक घरास एक सामान ठेवण्याची, थोडी अंधारी खोली असे. हीच ती बागुलबुवाची खोली. मुलांना…
तुकाराम महाराज यांना कोण ओळखत नाही, वाणी असूनही धन कमावण्याऐवजी ते गरीबाची नड सांभाळून माणूसकी कमवत होते म्हणूनच पत्नी नेहमी त्यांचा उध्दार करीत असे. तुकाराम अभंगाच्या नावाने वाट्टेल ते लिहुन…
एकवीस मार्चला शासनाने प्रथम लॉकडाऊन जाहीर केले आणि ते टप्याटप्प्याने वाढवले त्याला सहा महिने लोटले. त्यानंतर जून महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यात आली तेव्हा अत्यावश्यक सेवेतील दहा टक्के कर्मचारी यांना…
आदरातिथ्य म्हणजे नक्की काय? कोणी कोणा विषयी आदर व्यक्त करावा?त्याचा व्यक्तीच्या वयाशी सबंध आहे का?आदरातिथ्य करतांना वय, सामाजिक दर्जा, जात,धर्म ,पंथ,भाषा याचा अडसर येणे योग्य नव्हे. बालो वा यदी वा…
आज लहान मुलांच्या,अगदी तीन साडेतीन वर्ष वयाच्या मुलांच्या हाती मोबाईल असतो आणि तो मोबाईल त्यांना सहज हाताळता येतो. त्याच्यावर अनेक गेम असतात, ते गेम त्यांना कुशलतेने खेळता येतात आणि तो…
साडेआठ वाजता, कॉमन announcement वरून खाली रेसटॉरंट मध्ये येण्याची सूचना देण्यात आली. आम्ही तयार होऊन खाली पोचलो, एका भागात वेजिटरियन आणि दुसऱ्या बाजूला नॉन वेजिटरियन अशी व्यवस्था केली होती. दिल्लीला…
Practical exam सुरु कधी झाली आणि कधी संपली कळले देखील नाही. External examiner उगाचच उभे-आडवे प्रश्न विचारून वाट लावत होते. कधी कधी दोन-दोन मुलांना तर कधी एकत्र चार-पाच मुलांना Viva…
राणीची आई भाग १ व भाग २ वाचा. मी तिला म्हणालो, “अग जरा हळू चालव, कुठे तरी पडशील आणि मलाही —–’ एवढं म्हणेपर्यंत मी तिच्या पाठीला चिकटलो. गाडी स्पीडब्रेकरवरून जम्प…
फेब्रवारीपर्यंत अभ्यासक्रम संपला आणि इतर सोशल इव्हेंट सुरू झाले, Gadering, Fun Fare, Carreer Guidence सतरा कार्यक्रम, ह्या काळात अभ्यासाचे अनेक दिवस वाया जात, पण ना प्रोफेसर मंडळींना चिंता ना मुलांना.…
तिचं-माझं नेमकं काय नातं होतं ते ती गेल्यावर मला समजलं. तिला सर्वजण ‘राणीची आई’ नावाने हाक मारायचे, मला समज आल्या पासून मीही तिला राणीची आई नावानेच हाक मारू लागलो. तिने…
मे महिन्यात मी गावी गेलो होतो. रोज सकाळी गखा घेऊन काजू काढायला जात असू. तसे त्या दिवशी सकाळी गेलो. एकाने गख्याने काजू काढायचे आणि एकाने ते झाडाखाली निवडायचे म्हणजेच वेचायचे.…
पृथ्वीवर पडणारा सूर्य प्रकाश म्हणजे ऊर्जेचा अक्षय स्त्रोत. कुठून बरे ही ऊर्जा निर्माण होते? चार हायड्रोजन एकत्र येऊन एक हेलियम अणू तयार होतो आणि केंद्रीय संयोग होत असतांना प्रचंड उष्णता…
काही दिवसांपूर्वी राज्याच्या माध्यमिक परीक्षा मंडळाचा एस. एस .सी. चा निकाल लागला. करोनाच्या गोंधळात भूगोल विषयाचा पेपर घेता आला नाही, त्यामुळे इतर विषयाचे गुण लक्षात घेऊन सरासरी गुण त्या विषयास…
आकाशात ढगांची दाटी झाली की कुठे तरी दूर वर मोराचा मॅओऽऽ मॅओऽऽ टाहो ऐकू येतो, चित्रवाक पक्षीही “झोती व्हावती, झोती व्हावती” म्हणत आपली चोच वर करून वरूण राजाला साकडं घालतो,…
बाप्पा या वर्षी तुझे काही खरे नाही. तुला कळलंय ना सध्या देशात काय चाललंय ? कधी काळी तुझ्या मुषकाने हाहाकार माजवला होता आणि आत्ता या करोनानं थैमान घातलं आहे. ऐकतोस…
Man proposes and God disposes अशी म्हण आहे.किती सुंदर स्वप्न आपण पहात असतो. स्वत:साठी आणि आपल्या कुटूंबासाठी, काय चूक आहे अशी स्वप्न पाहण्यात? पण स्वप्न पाहणं आणि ती सत्यात येणं…
कामावर जाणाऱ्या व्यक्तीला विचारा त्याचे आणि गाडीचे काय नाते आहे? पुण्यावरून रोज प्रवास करत मुंबईला कामावर येणारे किमान पाचशे, हजार चाकरमानी असतील यात महिलाही आल्या बर का. कोणाची इंद्रायणी, कोणाची…
ब्राह्मण कुळात दादांनी जन्म घेतला तरी घरी कुळजात रग्गड जमीन असल्याने त्यांनी शिक्षणाकडे द्यावं तस लक्ष दिले नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज त्या काळी होता.…
एकोणीसशे सत्त्याहत्तर साल होतं. मी नववी इयत्तेत शिकत होतो. फारसं काही कळत नव्हतं, पण दहावी वर्गातील काही मुले कुठेतरी एकांतात चर्चा करू लागली की ही काय बोलत असावी असा विचार…
ती माझी कोकणात जायची पाहिली वेळ होती. तेव्हा कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, आणि रात राणीने म्हणजे आताच्या लाल परीने जाणेही सोप्पे नव्हते, कारण एस टी रिझर्व्हेशन करण्यासाठी दोन दोन…
गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात मी त्याला विसरलोच नाही. मुकूंद गजा पाटील हे नाव आजही मनपटलावर एका वेगळ्याच कारणास्तव कालातीत उरलं आहे. कोण होता मुकूंद? कोणतं पदक मिळवल त्यान? की तो…
माई बोलायच्या थांबल्या तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माईंनी आपल्या भाषणांने सभागृह जिंकले होते यात वादच नव्हता कारण भाषण संपले तरी सभागृह एकदम शांत होते. जणू सर्वांच्या जाणीवाच सुन्न झाल्या…
लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे असं म्हणतात ते काही उगीच नाही. मुंबईतल्या महासागरात आलेला माणूस कधी त्याच्या नकळत या सागराचा एक जलबिंदू बनतो आणि विशिष्ट लोकलचा सदस्य बनतो ते त्यालाही…
निरोप घेऊन ती निघाली शाळांना सुट्टी नसल्याने एस.टी.ला फारशी गर्दी नव्हती. रात्री महाडला बस थांबली. त्यांनी डबा आणला होता. एस.टी.कॅंटीनमध्ये त्यांनी डबा खाल्ला. चहा प्यायला आणि परत आले. रात्री दोन…
मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता, रात्री दहाची वेळ असावी, घरात गरम होत होते म्हणून घरातील सगळेच घरासमोरील मांडवात बसले होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला, जिवाची तगमग थोडी कमी झाली. उकाड्याने…
करोना संकट संपूर्ण जगावर लादले त्याला दोन महिने होत आले, दरम्यानच्या काळात कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भ बरेच बदलले. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या संक्रमणाच्या धोक्यास सामोरी जाऊ नये…
मी माझ्या ऑफिसमध्ये कामात असतांनाच तो आला . “सर येऊ का ?” मी कामातून मान वर करून पाहिले. अंदाजे चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा तरूण माझ्या समोर उभा होता. मुले मोठी झाली की…
अडीच वर्षांच्या ऋत्वीला kindergarten मध्ये घालायचं ठरवलं तेव्हा आजोबा कळवळून मुलाला म्हणाले, ” रत्नाकर एवढ्या लवकर तिला शाळेत कशाला घालताय? तुला आम्ही सहाव्या वर्षी शाळेत घातलं होतं, तरीही तू शाळेत…
नाईलाज म्हणून प्रथम चौदा दिवसांचा लाॅकडाऊन केंद्राने २१मार्चला जाहीर केला तेव्हा त्यांना सुध्दा या करोना संकटाच्या भयंकर परिणामांचा अंदाज नव्हता पण लाॅकडाऊन करावे लागले आणि सगळे जैसै थे म्हणजेच मुलांच्या…
परवा रात्रीची गोष्ट, करोना बंदमुळे सगळीकडे एकदम शांत, शांत नव्हे सन्नाटाच की, सगळे आपआपल्या खोपटात, सॉरी म्हणजे फ्लाटात ,घरात म्हणा हवं तर. हं तर काय म्हणत होतो एकदम सन्नाटा रस्त्यावर,रेल्वे…
तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी.. कोणती म्हण कुठे लागू होईल काही सांगता येणार नाही. वस्तू असावी एका ठिकाणी आणि आपण उगाचच नको तीथ शोध घ्यावा अशा अर्थांनी आपण…
चीनच्या बुहान प्रांतातुन या रोगाचा विषाणू आढळला आणि पाहता पाहता त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेव्हा “पाहता पाहता वाढे भेदिले शुन्य मंडला” या मारूती स्त्रोत्रातील वाक्याची आठवण झाली नसती तरच नवल.…
आता सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी.अशा इंटरनॅशनल शाळांचं पेव फुटलय, बदलत्या प्रवाहा बरोबर बदलायला हवे या बाबत दुमत नाही, पण ज्यांच्या घरात मार्गदर्शन करणारे आहेत आणि ज्यांची आर्थीक स्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या…
आता वारेगुरूजींची माहिती यू ट्यूब वर पाहिली आणि आठवले आमचे अशोक गुरूजी. माझी जेव्हा ,जेव्हा सफाळ्याला ट्रिप होते,तेव्हा जी.प.च्या शाळेसमोरून जातांना आठवतात आमचे अशोक गुरूजी.साडेपाच, पावणेसहा फुट उंची ,गोल चेहरा…
एकोणिसशे एकाहत्तर साल असावं बहुदा मी पाचवीत होतो.माझी शाळा आमच्या चुलत्यांच्या घराजवळ होती.चुलत्यांना आम्ही अण्णा काका म्हणायचो ते रंगाने उजळ ,देहयष्टी शिडशिडित पण काटक आणि डोळे घारे असे होते.धोतर आणि…
परिक्षेतील टक्केवारी हा ज्ञानाचा मापदंड ठरू लागला आणि ज्ञान संपादन करुन घेण्याची लालसा संपली.कागदावर असणारे गुणांचे आकडे महान ठरू लागले. नोकरी आणि समाजात असणारा मान मरातब हा वीद्यापिठांच्या पदव्यानी ठरू…
आताचे पालक हे अतिजागृत अति सजग आहेत मुलगा पाचवी इयत्तेत गेला की स्काॅलरशीपची तयारी इयत्ता नववीत गेला की दहावीची तयारी आणि जोडीला इंजीनिअरग करता एंट्रंन्स परिक्षेची तयारी , त्याला इंजीनिअर…
पाऊस पडण्यासाठी नक्की काय स्थिती असावी,अंदामान हे पावसाचे माहेर समजले जाते.कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला की लक्षव्दिप, केरळ , कर्नाटक, गोवा येथुन पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो मग कोकणमार्गे…
पंधरादिवसांपूर्वीची गोष्ट मी नुकताच कार्यालयातून आलो होतो.चहाचा कप अद्यापि हातातच होता इतक्यात मोबाईल वाजला . आत्ता कोणाचा फोन ? मी नाराजीनेच उठलो मोबाईल पाहिला.विनोद गवारे यांचा फोन . ते पार्ले…
काल दुपारी काही काम नव्हत म्हणुन जुने अल्बम पाहण्याची लहर आली.एकोणिससे नव्वदपर्यंत मोबाईल नव्हते आणि स्वत:चा कॅमेराही नव्हता पण उत्साह अमाप होता. चार जणांना विचारलं की एखाद्या सद्ग्रहस्ताचा कॅमेरा मिळायचा…
बत्तीस वर्षापुर्वी कामासाठी मुंबईला स्थलांतरीत झालो.त्या नंतर काही वर्षे शनिवारी- रविवारी सफाळ्याला जाणे होत होते. त्यानंतर महीन्या दोन महिन्यांनी एखाद्या रविवारी सफाळ्याला जात होतो .नंतर जाण्याच्या फे-या कधी कमी झाल्या…
तीस पस्तिस वर्षापुर्वी ” शोले ” मधला संवाद प्रसिध्द होता. “जब किसी दूर गांव मे बच्चा रोता है तो उसकी मा कहती है, बच्चा सो जा नहीं तो गब्बर सींग …
आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा आमचे पालक आमच्या अभ्यासाबद्दल खुप जागरूक होते असं काही म्हणता येणार नाही.कितीही टक्के गुण मिळाले तरी एक पालूपद होत,”जर चांगले अक्षर काढले असते तर पाच दहा…
भाऊबंदकी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा शब्द ,फार मागे गेल नाही तरी रामायणात तेच महाभारतात तेच आणि शिवाजीच्या शिवकालातही तेच,सत्तेमागची खरी शक्ती आदिमाया,महामाया,आणि लक्ष्मी किंवा धनलक्ष्मी.युद्ध लढली गेली सत्तेसाठी पण त्या मागची…
या वर्षी प्रत्येक मतदात्याने आपला मतदानाचा हक्क दोन वेळा बजावला,एकदा लोकसभेसाठी आणि आता विधानसभेसाठी,खरच का हो तुमच्या मताला किंमत आहे? जर तुमचे मत अमोल आहे अनमोल आहे तर नक्की चुकत…
महानगर पालीकेची सत्ता स़ोन्याच अंडे देणारी कोंबडी आहे असा सत्ता धाऱ्यांचा विश्वास आहे.. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक आराखडा आणि मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक आराखडा यात फार तफावत नाही. मग ही सोन्याची कोंबडी…
तुकाराम महाराज व्यवस्थे विरुद्ध बोलत होते, समाजातील जातीव्यवस्था भोंदूगिरी आणि रूढीरीती यांच्या विरुद्ध आक्रोश करत होते म्हणून प्रस्थापितांनी त्यांना नाकारले.तुकाराम ओंबळे दहशतवादा विरुद्ध लढले आणि शहीद झाले .अजून चार वर्षांनी…
२०१४ साली मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले तेव्हा प्रस्थापित सरकारच्या कारभाराला कंटाळून जनतेने मोदी सरकारचा पर्याय निवडला असा राजकिय विश्लेकांचा पक्का दावा होता. हे यश भाजपच, अण्णांच्या…
एका माजी शिक्षण मंत्र्यांच्या काळात शिक्षण सार्वत्रिक करण्याची मोहीम राबवली गेली.शासनाने शिक्षणावर वार्षिक खर्चाच्या आराखड्यातील ८% रक्कम खर्च केली पाहिजे तरच शिक्षणाचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचेल अस नियोजन सुत्र सांगत.…
आम्ही पुरोगामी आहोत ,सुधारक विचार आमच्या रक्तातच आहेत. आम्ही फुले, कर्वे,शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारे सेवक आहोत असा डंका पिटणारे खुप झाले. सुधारक म्हणवून घ्यायला कोणाला आवडणार नाही?…
गेले काही महिने रोज न्यूज पेपर मधून विविध वाहिन्यावरून चर्चा सुरु आहे ती देशात घडणाऱ्या विविध प्रसंगाची ,त्यावर व्यक्त होणाऱ्या मत मतांतराची, मग पुण्यात एफ.टी .आय. मध्ये संचालकांच्या झालेल्या…
चर्चा आणि वाद ह्यात अंतर असाव कि नसाव,आपला विचार मांडतांना प्रक्षोभक भाषा वापरण टाळणे शक्य नाहीच का ? ह्या चर्चेचा वापर वाहिन्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी करतांना नवे सामाजिक प्रश्न…
जून महिना सुरू होण्यापूर्वीच वळीव पडून गेला. विटाव्यात तसाही पाऊस कमीच पण हणमाच्या म्हाताऱ्यान पिकल्या मिशातून बोट फिरवत आभाळाकडे पाहिलं आणि हळू आवाजात पुटपुटला “पांडुरंगा ह्या वरसाला तरी पाऊस पाणी दे…
रम्य ते बालपण,असते आरसपाणी. मन,जणू फुलापाखराचे स्वच्छंदी जीवन,ते दिवस आनंद घन,निरागस चाळ्याची अन खेळाची मुक्त गुंफण,भविष्यासाठी आठवणीचे अमोल धन.स्वयं स्फूर्ती,अन बालिश खोडयाची उधळण.प्रत्येकाच्या कोषात बालपणीची एखादी आठवण असतेच अन मुख्य…
मुली आणि महिला यांच्यावरील अन्याय कमी व्हावेत म्हणून शाळा,आस्थापने,वस्त्या येथे तेथील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून महिला कल्याण समिती गठीत कराव्यात असा आदेश न्यायालया मार्फत शासनाला झाला आणि शासनाला जाग आली. अपोलो…
काही वेळा आपल्या संपर्कात अश्या वक्ती येतात कि त्यांना विसरणं शक्यच नसत.ह्या व्यक्ती प्रवासात,एखाद्या प्रासंगिक कार्यक्रमात भेटतात आणि आपला ठसा समोरच्या व्यक्तीच्या मनपटलावर कायम सोडून जातात.संक्रांतीच्या आदल्या दिवशी असच घडल.माझ्या…
सांगायचं तर, कोणाच जवळ लपवण्या सारख काही नसतांना तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या प्रयत्नात जास्त उघडा पडतो.एक खोट झाकायला किंवा लपवायचा प्रयत्न करतो आणि नव्या दहा खोट्या गोष्टीना जन्म…
चला पचवू नकार“न लागे थांग कुणाला,या वेड्या,खुळ्या मनाचा,सदैव कल्लोळ चाले येथे भावनांचा” “मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर”…
सकाळच ऑफिसच काम संपवून मी नुकताच मोकळा झालो होतो.क्लार्क आणि सेवक वर्ग जेवत होते.मी हि जेवण कराव म्हणुन हात धुवून नुकताच जेवणाचा डबा सोडून जेवायला बसत होतो इतक्यात तो माझ्या…
अडीच वर्षाच्या ॠत्वीच शाळेत नाव घालायचं ठरल तेव्हा आजोबा मुलाला म्हणाले “रत्नाकर गाढवा सहा वर्षापर्यंत तू शाळेत जात नव्हता एव्हढ्याश्या मुलीला शाळेत पाठवायला तुला काहीच कस वाटत नाही .रत्नाकर काही…
गणपती विद्येच आराध्य ,चौसष्ठ कलांचा स्वामी असा तो गणपती ,पार्वतीने आपल्याच अंगावरच्या घामाच्या मळाने गणपती बनवला अशी कथा सांगितली जाते. गणपती हा सेना नायक अर्थात युद्ध निपुण,नर्तनात कुशल,कुशाग्र बुद्धीचा…
पाणी म्हणजे जीवन ,पण हेच पाणी जेव्हा जीवन संपवत तेव्हा त्याला जीवन का म्हणाव? असा प्रश्न पडतो .गेल्या वर्षी ऋषिकेश आणि हरिद्वार येथे आलेल्या पुरात यात्रेकरू वाहुन गेले तेव्हा पाऊस…
रक्षा बंधन, श्रावणातला सर्व धर्मियांना जवळ आणणारा सण ,हिंदू ,मुसलीम, पारसी अन,शिख बंधू -गिनींना जवळ आणणारा सण . इतिहासाची पान चाळली तर मुसलीम महिलांनी हिंदू सरदार अन राजांना बंधू मानुन…
रिझल्ट लागला कि प्रवेशासाठी गर्दी होते .कोणी ओळख असल्याची सलगी दाखवत प्रवेशासाठी कुणा शेजाऱ्याला घेवून येते. ती तशीच आत आली. माझ्याकडे पाहत म्हणाली “सर,बसुना ?” माझ्या उत्तराची वाट न पाहताच…
मुंबईच शांघाय बनवूया, मुंबईला एक नवी ओळख देवूया हे पालुपद कोणाच सांगायची गरज नाही. काही राजकारण्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच आश्वासन दिल आहे. खुब वर्षपुर्वी एका पक्षान हमे गरिबी हटानी है।…
एकतीस डिसेम्बरचा जल्लोष करण्यासाठी मुंबई ते गोव्या पर्यंतची सगळी हॉटेल आधीच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात सिंधू महोत्सवाचे आयोजन केल्याने कोकण वासियांना पर्यटन व्यवसायाचे द्वार खुले झाले आहे.वेंगुर्ले,…
जन्म आणि मृत्यु मर्त्य माणसाच्या हाती नाही , हे खर वाटतंय का? एखाद्या प्रसंगात आजारी माणुस दगावण्याची दाट शक्यता असतांना आणि त्याच्या घरच्या मंडळीनी त्याच्या वाचण्याची आशा सोडली असतांना डॉक्टर प्रयत्नांची…
लिहण,तेही पत्र, “काय चेष्टा करताय राव,संगणक युगात पत्र लिहण्याच तुम्हाला सुचत कस?तब्येत बरी आहे ना ! नाही म्हणजे अचानक पत्र लिहण्याची हुक्की आली कि काय?” या आशयाची शब्दफेक तुमच्यावर झाली…
नेहमी प्रमाणे मी काम आटोपून घरी निघालो होतो,रस्त्याला लागल कि पहिला विचार येतो तो आज तरी लोकल वेळेवर असेल ना !आज ऑफिस मधून निघायला उशीरच झाला होता.नेहमी उशिरा येणारी लोकल…
निष्ठा हा शब्द कसा प्रचलित झाला असावा? श्रद्धा आणि निष्ठा ह्या शब्दात जो फरक आहे त्यामध्ये श्रद्धाळू मतलबी कि निष्ठावान मतलबी कि दोन्ही सारखेच मतलबी. साहेबांवर श्रद्धा आजही आहे म्हणणारे…
अतुल अभ्यंकर निवर्तल्याची बातमी गेल्या बुधवारी बातम्यात दाखवली गेली तेव्हा हाच तो अतुल का?असा प्रश्न मला पडला.शारदाश्रम तांत्रिक विभागात १९९० -९२ या काळात एक गोरापान,ऊंच मुलगा मझ्याच विभगात म्हणजे इलेक्ट्रिक…
एकविसाव्या शतकातील पिढीला मिळालेली साधने हि विज्ञानाची देणगी आहे.विज्ञान शाप कि वरदान निबंध शालेय जीवनात प्रत्येकानेच लिहिला असेल,लेखणीतून झर झर उतरते मात्र कृतीतून नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.आजच्या धावपळीच्या युगात…
”सर येऊ? ” ती आत आली. माझ्या समोरची खुर्ची ओढत ती बसली. माझी नजर प्रश्नार्थक. ”सर ऍडमिशन हवय मुलाला ” “तुम्ही यादव सरांकडे जा कि, सांगा त्यांना “मी उत्तरलो “. सर,त्यांनी तुमच्याकडे पठवल ” माझ्या…
रेल्वे स्टेशनवर पोचलो तर प्रचंड गर्दी होती नेहमीच्या आठ त्रेचाळीस साठी मी आलो होतो .अजूनही आठ बत्तिसचा इंडिकेटर होता ज़िना उतरताना असा भरलेला प्लाटफॉर्म पहिला कि छाती दडपून जाते , गाड्या…
त्या पालकांना बोलवायची ती पहिलीच वेळ नव्हती . त्यांच्या मुलाविषयी तक्रारी वाढत चालल्याहोत्या .वर्गतलि बरीच मूलं त्याच्याविषयी तक्रार करत होती . तो कुणाचे डबे फस्त करत होता ,मधल्या सुट्टीत पट्ट्यांनी…
तो माझ्यासमोर आला आणी माझ्याकडे पहात म्हणाला “ओळखलत का?,”माझ्या चेह-यावरचीप्रतिक्रिया त्यांनी वाचली . “सर , मी राजेश ! राजेश पानसे . ” मी माझ्या स्मृतीला ताण देत राजेशला आठवण्याचाप्रयत्न केला…
भारताची ओळख पटवायची तर ती त्याच्या विविधतेतून संस्कृतीतून पटवावी लागते आणी महाराष्ट्राची ओळख पटवायची तर ती पुरोगामी समाजसुधारकांतून सांगावी लागते . ‘फुले ‘ ,’ आगरकर ‘, कर्वे , भास्करराव पाटील…
मी दुपारचा जेवणाचा दाबा संपवून थोड relax मूड मध्ये बसलो होतो इतक्यात फोन वाजला .मी रीसिवर उचलला , ” hello . . . . . hello??” तिथून प्रतिसाद मिळाला :”प्रीन्सिपल…
सत्त्यापाल सिग यांच्या कल्पना कृतीतून उतरलेली महामृत्युंजय योजना महाविद्यालय पातळीवर राबवण्याचा निर्णय झाला य़ योजनेची माहिती देण्यासाठी आयुक्त परिमंडळ चारचे आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी प्राध्यापक आणि मुखाध्यापक यांची सभा त्यांच्या…
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याला रविवारही सुनासुना वाटतो फ़लाटा वरची कलकल गाडीतला भजनाचा सूर ,दरवाजावर दोन गटात होणारी हमरातुमरी,वाद वाढला तर भ च्या बाराखडीतली भाषा ही परिचयाची उजळणी रवीवारी ऐकू येत…
काही कामा निमित्त हायकोर्टात गेलो होतो. कोर्टात लोक का जातात? असा प्रश्न मला लहानपणी पडायचा . पण मी तसा प्रश्न कोणाला विचारु शकलो नाहीझाले . आता कोर्टात माझ्याच कामासाठी आल्यावर…
पालघर तालुक्यातील सफाळे माझे गाव ,वीस पंचवीस वर्षापूर्वी नोकरीसाठी गाव सोडव लागल.आजही गावाची आठवण आली कि पावलं त्या दिशेने वळू लागतात . दिवाळी सुट्टीच्या निम्मितान जाण्याचा योग आला. बऱ्याच वेळा…
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पिकनिक वजा समाज सेवा कॅम्प नेण्याचे ठरले तेव्हा एखादी कंपनी,विजकेंद्र ,एक फार्महाउस,निसर्ग शेती आणि जमलाच तर एखादा गड असा भरगच्च कार्यक्रम आम्ही ठरवला. विद्यार्थ्यांना उत्सुक्तता होतीच पण…
मला माझ्या गावाची ओढ आजही आहे. वय वाढल्याने ज्या जबाबदाऱ्या वाढल्या त्यामुळे मर्यादा आल्या मात्र जंगलात फिरायला जाणे हा माझा छंद होता. लहानपणी पावसाळा वगळता दोन्ही ऋतुत टोळक्यांनी फिरायला जायचो…