सुखांत

सुखांत

मिठीबाई कॅम्पसच्या बाहेर, ‘डॉलर’ रेस्टॉरंट मध्ये ते दोघे बसले होते. ही जागा त्यांच्या परिचयाची आणि अत्यंत आवडीची होती. गेले पाच वर्षे ती येथे येत होती, रेस्टॉरंट मधील वेटर ते मॅनेजर सगळेच त्यांना ओळखत असावेत, त्यांचा आवडत मेनु वेटरला माहिती होता. वेटर त्यांच्या टेबल जवळ येत म्हणाला, “निनाद सर, कोल्ड कॉफी आणू का?” निनाद ने त्याच्याकडे पाहिले आणि तो हसला, “असं करा आज मेनु कार्ड द्या, पाहू तुम्ही काही नवीन ऍड केलयं का?” “सर, शेक विथ कोल्ड कॉफी घेऊन पहा, थोडी स्ट्रॉंग, तुम्हाला आणि मॅडमना आवडेल.” निनादने शेफालीकडे पाहिलं, “काय म्हणतेस, करायची का ट्राय?” ती वेटरकडे पहात म्हणाली, “हे पहा आवडली नाही तर तुम्हाला पैसे देणार नाही, आहे कबूल?” “यस मॅडम,मला खात्री आहे तुम्हाला ती आवडेलच पण नाही आवडली तर नका देऊ पैसे, मग तर झालं!”

दोघ हसले,वेटर निघून गेला, “शेफाली,मला जॉब मुळे MBA चा अभ्यास करायला वेळच मिळत नाही. काय करू समजत नाही, प्रोजेक्टचं काम ही अर्धवट आहे. मला खूप टेन्शन आलय.” “अरे मग सोडून दे जॉब, कुठेतरी पार्ट टाईम जॉब मिळाला तर बघ ना?” “शेफाली इतक का ते सोपं आहे, अगं वडील पुढच्या महिन्यात रिटायर्ड होणार, म्हणजे नेक्स्ट मंथपासून मलाच सगळा घरखर्च पहावं लागणार. पार्ट टाईम जॉबमध्ये भागण कठीणच, शिवाय नंदीनीचा कॉलेज खर्च आहेच.” “हे बघ तुझ्या करिअरच्या दृष्टीने आणि आपल्या फ्युचरसाठी तुझं MBA होण गरजेच आहे, We have to fly as early as possible. You can’t expect any progress here. मी माझा पासपोर्ट कधीचा तयार केला आहे, मला स्कॉलरशिप नाही मिळाली तरी डॅड खर्च करायला तयार आहेत.” “हे तू तुझ्यापुरत बोलतेस, माझं काय? ,जर चांगला स्कोअर झाला तरच स्कॉलरशिप, ती नाही मिळाली तर मी तुझ्या बरोबर येऊ शकणार नाही.” “Fuck yaar, अरे पण आपल decide झालंय ना! You have promised me. एवढ्यात विसरलास, तुझ्या पप्पांना तस सांग? त्यांचा PF, Gratuity मिळाली असेलच ना? मुलासाठी एवढही करणार नाहीत का? नाहीतर bank loan घे.”
“Nonsense, What are you talking about ? पप्पा कधीचच म्हणालेत मी तुम्हाला ग्रज्युऐशन पर्यंत शिकवल, पूढे शिकायच असेल तर स्वतः कमवा आणि शीका.”
त्यांच बोलण सूरू असतानाच मोबाईल रींग वाजली त्याने फोन उचलला पप्पांचा कॉल होता पण रिसिव्ह झालाच नाही. त्याने मोबाईल खिशात टाकला. तो स्वतःशी विचार करत होता, पप्पांनी कशासाठी कॉल केला असेल?” “निनाद कोणाचा कॉल? Anything wrong?” “No no it’s alright, My father, रीसिव्ह नाही होत, मी करीन नंतर.”

वेटरने त्याचा नवा मेनु त्यांच्या समोर ठेवला आणि तो निघून गेला. तिने एक सिप घेतला आणि ती हळूच ओरडली”Wow amazing. I must appreciate the choice of that guy, such a wonderful test.” तिने त्याच्याकडे पाहिलं,तो हसला,फारच टेस्टी आहे,नो डाउट. “बर तू काही खाणार आहेस का? मला भूक लागली आहे.” “No, nothing ,in fact I am on diet, I weigh 55. I don’t want to be overweight. You can order for yourself.” त्यांनी वेटरला हात दाखवला, “सर रोस्टेड सँडविच आणू का?” तो हसला, “येस फक्त एक, मॅडमला काही नको आहे.” “सर,मॅडमसाठी नो कॅलरी मेनु आणतो, त्यांना नक्की आवडेल, फक्त एकदा ट्राय करा. वेट लॉस करणाऱ्या सर्व मॅडम आवडीने आमची डिश प्रीफर करतात.” त्याने शेफालीकडे पाहिलं,ती थोडी रागावली होती. तो समजुतदारपणे म्हणाला,”तो इनसिस्ट करतोय तर ट्राय करून तर पहा तुला नाही आवडला तर नको खाऊ.”
तिने अगदी नाराजीने मान हलवली, “ठिक, सांग, पण तुला शेअर कराव लागेल.” त्याने तिचा हात दाबला आणि आश्वस्त केलं. वेटर निघून गेला तशी ती मुळ पदावर आली, “मग काय करतोस? आज तुझ्या पप्पांजवळ विषय काढ, म्हणाव बँक लोन घेतो, चान्स घे, कदाचित ते काही तरी मार्ग काढतील, पहा काय म्हणतात. By hook or crook we have to fly. I have worked hard for Toffel, I don’t want to miss a chance. तो खाता खाता, वेटरने तिच्यासाठी मक्याच थालीपीठ आणल, सोबत लसूण-मिरची ठेचा होता. तिने एक छोटा तुकडा तोंडात टाकला,थालीपीठ क्रीस्पी होत,टेस्टी होत. तीने बळेबळे एक तुकडा निनादला भरवला. तो मानेने नकार देत असतांना तिने दुसरा तुकडाही भरवला. आजूबाजूचे लोक त्यांना पहात होते. त्याला थोड अकवर्ड वाटत होत. ती मात्र निर्धास्तपणे वागत होती. तिने बाहेर जाण्याचा विषय लावून धरला होता, ती त्याची अडचण समजून घ्यायला तयार नव्हती.

वेटरने बिल आणून ठेवलं, त्यानी पैसे देण्यासाठी वॉलेट काढल तसं तिने हाताने त्याला थांबवत मिनीपर्समधून credit card काढून वेटरला दिल. ती सिगारेट बाहेर काढून पेटवणार होती इतक्यात कॅशिअर तिथं आला, “Ma’am, no smoking please,” “Extremely sorry sir, I was in little tension.” “It’s all right Mam, you can smoke in passage,some customers don’t like it.” “Ok, I will take care.” मग निनादकडे पहात म्हणाली, ” let’s move now, please think seriously, hardly nine months left.”
निनाद आणि ती निघाली. रस्त्यावर जाताच तो तिच्यावर रागावला, “शेफाली किती वेळा तुला एकच गोष्ट सांगू, No cigarette in public place. I feel very awkward when someone warns you not to do so.”
“Fuck them, I don’t bother, I said sorry as a part of wisdom. Ninad are you diverting me form my focus?”

“No ,not at all, मी तुला क्लीअर केलय,मी पप्पांकडे पैसे मागू शकत नाही, but certainly I am trying hard to take my MBA.” “Ninad I can’t wait any further,my cousin’s sister has been waiting for me for the last Nine months.” तीने सिगारेट काढली आणि लाईट करत ती झुरके घेऊ लागली, त्याच्या दिशेने पूढे करत म्हणाली,”निनाद घे तूला याची गरज आहे.”

तो हसला, मी माझ्या यश आणि अपयशाला जबाबदार आहे, माझं अपयश मी अस सिगारेट बरोबर जाळणार नाही, I will fight and win. I will not surrender my life and future on this bad habits.” “How dare you, am I a chain smoker? just to relieve my stress, I did it.” ती ताडताड पावल टाकत जाऊ लागली. निनाद तिच्या मागे जात होता. खर तर तिच्या या सवयीसह निनादने तिला स्वीकारल होत पण कधीकधी जास्तच व्हायच. चार दिवस निघून गेले की तिचं डोक ताळ्यावर यायचं मग त्याला फोन करून सतवायची
भेटायला आला नाहीस तर स्वतःला संपवून टाकेन म्हणायची. त्यालाच कळत नव्हतं की त्याची नाव तरणार आहे की डुबणार आहे.

त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिने तो झटकून टाकला, पून्हा त्याने तिला थांबवण्यासाठी हाताने पाठी ओढलं, तीने पुन्हा हात झटकला आणि वेगाने जाऊ लागली. थोड पूढे गेल्यावर ती थांबली, तो तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, “शेफाली तू काही सतरा अठरा वर्षाची इनोसन्ट मुलगी नाहीस. समजून घे, मी पूर्ण प्रयत्न करतो आहे,पण तुझा माझ्यावर विश्वासच नसेल तर आपण खरचं थांबू, अजून पूढे गेल्यानंतर दूर व्हाव लागल तर सावरण मला कठीण होईल.”

ती वळली आणि तीने त्याला मिठी मारली, Nonsense , what are you talking about, leaving me alone. Oh Ninad! my sweetHeart, I love you so much, don’t even say to leave me,I will die alone.” लोक त्यांच्याकडे पाहू लागले तस तो तिला दूर करत म्हणाला, “Shefali,people are around us, try to understand. It’s not your house .” दोघे थोडावेळ चौपाटीवर बसले. समुद्राला भरती होती. लाट किनाऱ्यावर येऊन आपटत होती. तो त्या अथांग सागराकडे पहात शांत बसला होता. त्याच ते तस बसणं तिला असाह्य होत होत.
“निनाद बोल ना,प्लीज, I know I have hurt you, but you only said, after graduation we will take our Masters degree and go to the US.””That was my mistake, I failed to realize my responsibilities. Either I have to pass MBA with flying colors and get the scholarship or arrange for funds on my Own.
त्याचे हात पकडत म्हणाली, “forget it, I will not like to see you with pale face. I am very sorry, I don’t understand how I get suddenly upset, I should not have forced you to ask your papa.” त्याचा मोबाईल वाजला,आई कॉलवर होती, “अरे निनाद मी बोलतेय, पप्पा तुला फोन करत होते, मला म्हणाले त्याने मोबाईल उचलला नाही. काही प्रॉब्लेम तर नाही ना?” “नाही गं, मी निघालोच आहे,आल्यावर सांगतो, पप्पांना मी करेन फोन.”

त्याने कॉल हिस्ट्री पाहिली, अर्ध्या तासांपूर्वी फोन सतरा मिनिटे सुरू होता. “Oh my god! That means he might have heard our conversation.” “निनाद काय झालं,कोणाचा कॉल?” “शेफाली My mother was on call, Pappa called me sometime before, which I couldn’t receive. But it was On, he might have heard our conversation. I can’t imagine what he will think?. “Ninad cool down, I have not said anything wrong.
Of course my language was not right,but he will understand my feelings. “You don’t understand the sentiment of older people. They will think you are not fit to be part of our family. “Hey, my foot, I will not like to be a member of Orthodox family. If you also feel so, good bye.

ती दोघ काही न बोलता रिक्षात बसली आणि पार्ले स्टेशनवरून दोघ वेगवेगळ्या प्लँटफॉर्मवर गेली. तीने बांद्राला जाण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली आणि Hi ! न म्हणताच ती निघून गेली. त्याने हात हलवून तिचा निरोप घेतला पण तीने ना वळून पाहिले ना हात हलवला . इथेच त्याला पहिला धक्का पोचला. तो मालाडसाठी बोरीवली गाडीची वाट पहात थांबला होता. पप्पांनी आमचं संभाषण ऐकल असेल तर त्यांना किती दुःख होईल? तो स्वतःशी विचार करत होता. गाडी आली तसा तो भानावर आला, यांत्रिकपणे आत चढला, कधीकधी शेफालीशी मैत्री केल्याबद्दल त्याला पश्चाताप व्हायचा, ती खूप पझेसिव्ह होती, तीचा डॅड मल्टि नॅशनल बँकेचा चेअरमन होता. त्याचे पप्पा मंत्रालयात अव्वर सचिव, पगार एके पगार, शिवाय यापूर्वी त्यांच्यावर भावंडांची जबाबदारी होती ती वेगळीच. शेफालीला कोणतीच तोशीस कधी लागली नव्हती त्यामुळे ती निनादची अडचण समजून घ्यायला तयार नव्हती.

तो घरी पोचला तेव्हा आईने काळजीने विचारले, “निनाद, ऑफिसमध्ये आज जास्त काम होत का? मी चहा ठेवते तु फ्रेश हो आणि ये.” तो दहा मिनिटात स्वतःच आटोपून आला, इतक्यात पप्पाही इव्हनिंग वॉक संपवून आले. “अरे निनाद आज उशीर झाला का? बरं बर तुझा चहा झाला की सांग आपण बोलू.” “पप्पा काही महत्त्वाचे आहे का? नाही म्हणजे मी थोडा अभ्यास करीन म्हणतोय, माझी एक्झाम जवळ येत आहे.”खरं तर पप्पा आता आपली हजामत करणार आणि आपल्याला काहीच स्पष्टीकरण देता येणार नाही याची त्याला भिती वाटत होती.
“अरे महत्त्वाचच आहे,फार वेळ नाही घेणार, तुझ opinion हवय इतकच.” “मग इथेच बोलू की,म्हणजे मी चहा घेता घेता ऐकतो, तुम्हीही चहा घ्या, आई, पप्पांना चहा आण.हा पप्पा तुम्ही फ्रेश होऊन या मी थांबतो.”

थोड्या वेळानी मनोरमेने मुलासाठी आणि माधवरावांसाठी चहा आणि थालीपीठ आणलं. “निनाद घे, गरम गरम खा, लोणचे आणि थालीपीठ तुझ्या बहिणीचा आवडता मेनु आता येईल आणि म्हणेल आई सॉलिड भूक लागल्याय काही तरी गिळायला दे.” बेल दोन तीन वेळा वाजली तस ती म्हणाली,”पाहिलस, सैतानाच नाव घेतल आणि सैतान हजर.” तिने दार उघडले तस तस नंदिनी जोराने ओरडली, “आई बाहेर घमघमाट सुटलाय बरं,थालीपीठ केलस ना ? मी आत्ता आले.” “घाई करून यायची काही गरज नाही, तुझ्या वाट्याचं कुणी खात नाही, स्वच्छ हातपाय धू आणि सावकाश ये.” माधवराव म्हणाले.

निनाद बहिणीकडे पाहून हसत होता, तीने सॅक टेबलवर टाकली आणि ती टॉवेल घेऊन बाथरूमकडे पळाली, आई निनादकडे पाहत म्हणाली, “तुम्ही सुरू करा, थंड झाल्यावर खाण्यात काय मजा? ती आली की तिला गरमागरम करून देते.” “अग, तू पण घे की आमच्या बरोबर.” निनाद म्हणाला. “हे बघ,आम्ही दोघी एकत्र घेतो, तूतू ,मीमी करू नको, तुम्ही खायला सुरवात करा, तव्यावर अजून टाकलं आहे, मी आलेच.”

माधवरावांनी एकदा मुलाकडे पाहिलं आणि ते म्हणाले, अरे मी तुला फोन केला होता निनाद , आज आम्ही वसईला गेलो होतो, तिथ आम्ही, म्हणजे मी आणि बंडू काकांनी नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये टू बी एच के फ्लॅट पाहिला आहे.तुला दाखवावा म्हणून व्हिडीओ कॉल करण्याआधी तुझ्याशी बोलायचं होत. स्टेशनपासून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. नाहीतरी ही जागा भविष्यात आपल्याला पुरणार नाही म्हणून – – – -” “पण पप्पा, ती जागा घ्यायची तर एवढे पैसे कुठून आणणार? माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही, उलट मला बाहेर जाण्यासाठी स्कॉलरशिप नाही मिळाली तर, काय करायचे हाच प्रश्न..”

“अरे निनाद!अजिबात चिंता करू नकोस,तुझ्या कडून मला काही अपेक्षा नाही. तू बाहेर डीग्रीसाठी नक्की जाणार, म्हणून तर मी ही जागा द्यायच ठरवलय, त्यामुळे तुझ शिक्षणही होईल आणि मोठ घरही होईल.” “अहो, तुम्ही काय बोलताय कळतय का? मुंबईतील जागा विकून मुंबई बाहेर जायच म्हणजे! इतक्या वर्षात आपल्याला इथली सवय झाल्याय तिथे एवढ्या दूर, ना कोणी ओळखी पाळखीच ना नात्या गोत्याचं. मुलांचे मित्र,मैत्रिणी इथेच आहेत.” मनोरमा म्हणाली.

“मग काय झालं? तुझा मुलगा आपलं करिअर करायला अमेरिकेत टेक्सासला जाणार आहे,त्याचं तरी तिथे कोण आहे पण तरीही त्याच स्वप्न त्याला बोलावतय म्हणून तो ही आपल्याला सोडून जाणर आहेच ना? तू तिथे गेलीस की तुझ्याही नवीन ओळखी होतील,मैत्रिणी मिळतील.” “नाही हा! तुम्ही काही म्हणालात तरी मला वसईला यायला अजिबात जमणार नाही, माझं सोडा, लेकीच काय? तिला वसईवरून इथे कॉलेजला यायला जमणार का? कॉलेज सुटल्यावर इथे बसने येते तर ही अवस्था.” “अग,दोन वर्ष राहिल अमुकडे, ती काही कुणी परकी का आहे.आणि तुला ते मान्य नसेल तर काही जबरदस्ती नाही. मी काढीन काही मार्ग.”

निनादने ते ऐकलं आणि त्याला भरून आलं, तो काही न बोलता निघून जाऊ लागला. माधवराव एकदा पत्नीकडे आणि एकदा मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिले.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “सुखांत

  1. çelik kapı

    Yazdığınız yazıdaki bilgiler altın değerinde çok teşekkürler bi kenara not aldım.

Comments are closed.