दुःखाचा बाऊ करू नये

दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकारतरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार कोणाला…

Read More »
No Comments

जीवा लागलासे छंद

मनास आनंद देणारी गोष्ट तेथेच मन ठेवावे व्यस्तछोट्या मोठ्या संकटास भिऊन होऊ नये उध्वस्त प्रेम केले तर विरह आणि उगवत्या सुर्याला अस्तप्राक्तन ठरलेले, कोणाच्या नशीबी कमी, कोणा जास्त कोणासमोर अति…

Read More »
6 Comments

लोकशाही

निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगारगळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’ आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकारका नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन…

Read More »
2 Comments

उंबरा ओलांडून जाता

उंबरा ओलांडून जातांना मज आली सय पिल्लांचीकुठवर जपायची मी नाती? अपेक्षा त्याच्या जाणिवांची उसवलेले तोडून धागे, मी अधीर, अनुभव घेण्या प्रीतीचीकुठे मज ठाऊक होते तेव्हा,ही तर सुरवात नव्या यातनेची रंगवते…

Read More »
No Comments

गारुड मनावर

काही माणसांची उंची मोजयला जगात नसतं कोणतंच योग्य साधनअशा विभूतींची बांधू नका स्मारके, अजोड करुनि कर्तृत्व करावे मनी स्मरण मानवातील ते देवदूत निगर्वी, सालस, निर्भय, सुहास्य वदनी जिंकती सकल जनमानबिंदू…

Read More »
2 Comments

कावळा

कावळा गुलाबी, जांभळ्या, मोरपंखी रंगात असता तर!कावळा तुमच्याआमच्या घरी पिंजऱ्यात नक्की दिसला असता त्यालाही राघू, मैना, बुलबुल सारखं गाणं गाऊन घेतलं असतंत्याला कुटुंबातील माणसांची नाव शिकवून काऊ बनवलं असतं बाळाला…

Read More »
1 Comment

तुझे अस्तित्व हाच झोल

या वर्षी जून काहिसा कोरडा गेला, पेरलेलं गेलं वायाजुलै महिन्यात सगळ गेलं वाहून, उतरून गेली रया दुबार पेरणी करत वावरात, उभं केलं पुन्हा हिरवं धनकाळतोंड्यांने साधला पुन्हा डाव,कुस्करलं भोळं मन…

Read More »
5 Comments

चारित्र्य

मित्रांनो आठवतोय का तुम्हाला धडा, साने गुरूजींचे “सुधास पत्र”?दूर असून गुरुजी, वयातलं अंतर विसरून, झाले होते पुतणीचे मित्र मुलगी म्हटली की होते सुरू शिकवणी, ‘बिचारी’ हाल खाईना कुत्रद्या की मुलांनाही…

Read More »
No Comments

जिव झालो पिसो

काल तिनसांजा, इलस नदीच्या काठी, तरणी, मोहक सुंदर सुंगटी पोर गोधडधडला काळीज माझा, मिटून डोळे स्वागत तुझा, तू मेनकेचो अवतार गो तुझो रंग गोरो, नितळ कांती, उजळ शिंपल्याचो मोती, मनातला…

Read More »
5 Comments

या नभाने

नभाला रंग बदलतांना मी पाहिलंय, पाहिलंय क्षितिजाला टेकतानानभाला चिंब भिजतांना पाहिलंय मी, पाहिलंय गडगडाटी हसतांनाचांदण्यात न्हाऊन उजळतांना अन काळरात्रीत पाहिलंय लपताना सुर्याची उशी करून झोपताना कदाचित त्याला कुणी पाहिलही नसेलसहस्त्र…

Read More »
14 Comments

आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफम्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं मापघरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येतेयेतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच…

Read More »
No Comments

अंकुर

माझे हिरवे कोकण, परी बडवते उरपाणी बरसते फार, तरी रितीच घागर रोज श्रमूनिया रानी, केली माती मी मोकारबांध घालूनिया शेता, त्याला दिला मी आकार तिला पालापाचोळ्याचे, दाट शिवले अस्तरलाल भिंतींच्या…

Read More »
No Comments

जनाधार

नियतीची गती न कळे कुणा, खटखटे पुन्हा मोदींच्या स्वप्नाचे दारलोकशाहीला म्हणावे काय? असे पून्हा त्यांच्याचवरीच देशाची मदारपून्हा एकदा देशात, नरेंद्र दामोदरदास मोदी यांचेच एनडीए सरकारआता मात्र शिवू देऊ नका मनास,…

Read More »
No Comments

सांगायला हवं आहे

सांगायला हवं आहे, कळवायला हवं आहेआपला देश महान आहे, असच पीएम सांगत आहेतआपण विश्वगूरू बनलो,खुळे अनुयायी म्हणत आहेत, भ्रमात सारे जगत आहेत आपल्या या महान देशात खून, दरोडे पडत आहेतक्रीडा…

Read More »
1 Comment

कसा हा पाऊस

पावसाचे आले दिन, परी डोळ्यात पाऊसआड गेले तळाबुडी, आता पाण्याचाच ध्यास ऊसासे मन, फाटली जमीन, देवास नवसपाण्याविना कंठा सोस, मरतील गुरे दावणीस पक्षी व्याकूळ होती, पाण्याविन कासावीसपक्षी सोडूनीया खोपा, गेले…

Read More »
No Comments

माझे कोकण वाहते जीवन

महाराष्ट्राचे नंदनवन, माझ्या परशुरामाची भुमी कोकणउंच सह्याद्रीच्या रांगा, करती या भुमीची अष्टोप्रहर रक्षणअथांग पसरलेला समुद्र, त्रिकाळ करी सह्याद्री पुजनदुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बागेचे रोजच करती सिंचन प्रसिद्ध येथील जुनी मंदिरे,…

Read More »
2 Comments

मत कोणाला?

कोणाला देणार मत? कोणत्या पक्षावर ठेऊया नक्की भरवसा?येथे निशाणं भगवी, धवल, निळी, हिरवी, कळे ना कोण वागेल कसा? कोणाचं घड्याळ, कोणाची शिट्टी, कोणाचा बाण ,कोणाची मशालकाही बाप्यांना कळेना आघाडीत की…

Read More »
No Comments

प्रतिभा

प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…

Read More »
No Comments

स्वप्न आणि आकांक्षा

आपले मुल म्हणजे डिपॉझिट हे प्रत्येक सुशिक्षित ठरवतोत्यांच्या इच्छाआकांक्षा लादून बुस्टर दिल्यागत जिद्द फुलवतो चार-पाच वर्षांच्या मुलांना आम्ही क्रेडिट कार्ड बनवतोपाहुणा येण्यापूर्वी आमच्या मनासारखं त्याला सजवतोत्याचा चॉईस डॉक्टर, इंजिनिअर असल्याचं…

Read More »
No Comments

टक्क्यांचा दावा सोडला

आरक्षण विषयावर पिएचडी करून मी टक्क्याचा दावा सोडलासंविधानाचे पारायण करूनही मी आंबेडकरवाद मनातच कोंडला जखमा चाटून पुन्हा ताज्या ठेवण्यात, काहींचे स्वारस्य होते दडलेसांगा, ज्यांनी बुध्द घेतलाच नाही त्यांचे संसारात काय…

Read More »
No Comments

राहून गेले

कधीकधी कुणाला सांगायचं राहून जातेआठवण होते तेव्हा झालेला असतो उशीरज्याचासाठी व्यक्त व्हायचंय तो होतो अधीरतो काही गुन्हा नव्हे, ज्याची करावी फिकीरफार उशिर होण्याआधी, मनापासून द्यावा धीर तुमचे शब्द हे कदाचित,…

Read More »
5 Comments

नातं

ओळखतही नव्हतो पण दिसली की ती हसायचीठराविक स्थळी, डोळ्याची पाखर तिला शोधायची यापलीकडे संबंध नव्हता, नव्हते कुतूहल कोण ती?मनात कुणी घर केलं, की फुलत जातात नसती नाती काय घडला प्रमाद…

Read More »
4 Comments

अयोध्येस परतला राम

दशरथपुत्र राम, वशिष्ठ शिष्य, उत्तम धनुर्धारीएकनिष्ठ, सत्यवचनी, विनय, विवेकी, सदाचारी कौसल्या नंदन राम, गुणांची खाण, तो पुरुष अवतारीहरण करी पीडा, संहारुनी राक्षस खडा, भजे ब्रह्मास अंतरी बालक्रीडा रामाची विचित्र, मागू…

Read More »
No Comments

अपेक्षांचे ओझे

हाती काही नव्हते तेव्हा, माझ्याकडे कोणाची नव्हती अपेक्षाजो जो संचय वाढत गेला, बदलत गेली निती, वाढे अभिलाषा मनी होते समाधान, वैभवात भर पडत होती, नाती सुखावत होतीहळूहळू समजले, या लक्ष्मीकारणे…

Read More »
5 Comments

उतरू जाता प्रेमाची वाट

प्रेमात कोण डुंबेल याचा त्यांना येत नाही अंदाजकिती खोल डोह आहे ते सांगता येत नाही आज प्रेमात गुंतवावा लागतो जीव, मागू नये उगा व्याजकाही इतके रसिक की शब्दांचाच चढवती प्रेमात…

Read More »
4 Comments

चुकीचा खिळा

ज्याच्या हातुन चुक घडली नाही अशा माणसाच्या होतो शोधातमी माझा भुतकाळ तपासत होतो काय दडलय त्याच्या पोटात? माझ्या लक्षात आले चुक मान्य न केल्याने चुकांचे झाले खिळेकाही प्रसंग विसरून जायचे…

Read More »
No Comments

सरत जाते बालपण

लहानपणी नात्यात असतो अवीट गोडवाबहीण भाऊ यांची भांडणे म्हणजे फुलवा क्षणात भाऊ-ताई बसते रुसून लपूनदोघांपैकी एक हैराण शोधून शोधून आता तुझ्याशी बोलणारच नाही ती बसते अडूनकधी ताई तर कधी दादा…

Read More »
1 Comment

जगलो खुळ्या भ्रमात

मी जगलो खुळ्या भ्रमात, गुंतून तुझ्या प्रेमातमज ठाऊक कुठे होते? तो मृगजळाचा फासमज कळून चुकले उशीरा, ती फसवी होती प्रित मज मनास वाटले क्षणी त्या, एक प्रेम गीत गावेआकाश पेलणाऱ्या…

Read More »
1 Comment

विसरून जायचंय मला

नको ते संदर्भ, कशास आठवू? सारेच मला विसरायचेनको त्या आठवणी, कशास जागवू? इथेच सारे हरवायचे काय गवसले काय हरवले, हिशेब मांडून काय मिळेल?नको त्या भुतकाळात रमताना, उगाच मन स्वतःस छळेल…

Read More »
2 Comments

निवांत

आता प्रत्येक क्षण, तास, दिवस असते तिला प्रचंड घाईसमृद्धीच्या मार्गावर सुसाट बाळाच्या वाट्यास नाही आई डबा, मुलांची शाळा, सासुचं पथ्य, तिला गाठायचं ऑफिस७.१२ ची गाडी पकडतांना गाडीत तिचं शरीर होत…

Read More »
No Comments

गणपती माका पावलो

रे आठ दिसार इले गणपती, झोपून काय रवतस आये आरडतामेल्या उठ चाय खा आणि वाडवण घेऊन लख्ख अंगण झाडता खरा तर ‘ह्या’ बायकोक असता, ती ऐकणा नाय म्हणान माका नडतागावाक…

Read More »
1 Comment

भ्रम

काय खरं? काय खोटं? सामान्य माणसाला कधी नाहीच कळतइतिहास आणि वर्तमान, दोन्ही त्याला सारखेच असतात छळत यशासाठी देव, अंगारा, वशिला कोणतंच सुत्र कधी कायम नसतंमेहनत, समयसूचकता यांच गणित जुळलं, तर…

Read More »
No Comments

संभ्रम

राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…

Read More »
No Comments

वाट पाहतो

पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…

Read More »
No Comments

सन्यस्त ओढ्यात बैसला

शुभ्र, धवल, पाढूंरका तो खडकावर आदळे प्रपातभारावून सारा आसमंत गेला वाहे शीतल मंद वात खाली काळा डोह थोरला सोसतो निमुट, गेली हयातदर वर्षाला पडे उघडा परी कधी केली न त्याने…

Read More »
No Comments

मनातल्या विठ्ठलाला

मनातल्या विठ्ठलाला एकदा एकांती भेटायलाच हवंवाटतं सगळ्या चिंता दूर सारत त्याला आलिंगन द्यावं करायला हवी त्याची एकदा मनापासून विचारपूसफारच दगदग होतेय का? विचारावं, आहेस ना तू खूश? बसवून त्याला निवांत…

Read More »
5 Comments

अटळ असलं तरीही

का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…

Read More »
1 Comment

जगण्याची मज्जा

जीवनात प्रत्येकाच्या थोडा तरी जरूर संघर्ष हवारोज तोच सुर्य पुर्वेला तरी नजरेस दिसतोच ना नवा! पाऊस असो वा उन, विना तक्रार चालत रहाते घड्याळतुमची मनस्थिती कशी ही स्थिती असो,थांबत नाही…

Read More »
No Comments

मशागत

जन्म आणि मृत्यू हा नियतीचा खेळ आहेतो देतो जन्म आणि कर्म, जीवन कर्तव्याचा मेळ आहे हसत जगणे ही एक सुंदर अद्भुत कला आहेनित्य नवीन अनुभव घेणे रंगीत मनोहर सोहळा आहे…

Read More »
No Comments

मनोव्यापार

देह सोडतांना एकदा आत्म्याने विचारले मनालाक्षणोक्षणी बदलतोस जरा सवडीने विचार स्वतःला आहे का तुझ्या अस्तित्वाने कुणाला शांत झोप?त्यागू शकशील का कधी लालसा, काम, क्रोध, लोभ? अविरत भ्रमण करीत फिरतोस, आधी…

Read More »
No Comments

तेच अमर होती

काही माणसं अशीच असतात त्यांच्यावर रागावताच येत नाहीकाही माणसं कुणी रागवलं तरी फारसं मनावर कधी घेत नाही काही माणसं मात्र अतिसज्जन, मनानं असतात फारच हळवीत्यांना कुणाचा अतिपरिचय सहन होत नाही…

Read More »
No Comments

मांगल्य

गंध नसणारी रानफुले रंगाने लक्ष वेधुन घेतातवाळूतील खडबडीत शिंपलेही मौल्यवान मोती देतात आकर्षक दिसणं कधीच आपल्या कुणाच्या हाती नसतंपण जग एवढं आचरट, खोट्या दिखाव्यालाच भुलतं कातळावर फुलणारं फुलही तितकाच सुगंध…

Read More »
1 Comment

प्रजासत्ताक

शाळेत असताना प्रजासत्ताक दिनी स्वप्नात तिरंगा यायचा तसा तो आता येत नाहीसमुहगान म्हणताना यायची छाती फुलून, गर्व वाटायचा तसा मनी आता वाटत नाही आता नको त्या मनोव्यापाचा इतका गुंता वाढलाय…

Read More »
No Comments

आई शप्पथ खरं सांगतो

खोटं वाटलं तरी शप्पथ खरंच सांगतो खुशाल हवं तसं वागाफाट्यावर मारा अदृश्य अडचणींना आज, आत्ता मस्त जगा स्वतःशी हवे प्रामाणिक, खोटे उगाच कुणा, कशाला भ्यावे?भिती मनी बाळगूच नये, दुसऱ्याशी आपुलकी…

Read More »
No Comments

बहुरूपी

प्रत्येक माणसात लपला आहे एक खट्याळ, नटखट, लबाड, विदूषकफक्त एक जरूर लक्षात ठेवा, बनू नये आपण मनाने कोणासाठी तक्षक बाळ रडते तेव्ह काही सूचत नाही, बाबा करतात विदूषकी चाळेअन आईही,…

Read More »
No Comments

तालेवार

गावात, कोंबड्याच्या बांगेने पहाटेस पुर्वेला फुटत तांबडंअन थंडी पावसात इरसाल गावकरी उबेला घेतो घोंगडं सकळची न्याहरी करून तो वावरात बीगीबीगी जातोरामराम म्हणत, “आज एकदम बेगीन” कुणी आडवा येतो अण्णा, चाल्लो…

Read More »
No Comments

रेखाटले ते चित्र भुईवर

झोपड्या इथे उभ्या, फ्लेक्सच्या भिंती, रेल्वेच्या भुईवरफोडुनी जलवाहिनी भरती पाणी, ना चिंता, नसे कुणाचा डरघरात जळती दिवे विजेचे, आकडे टाकले त्यांनी खांबावरशौच्यासाठी प्रभात काळी, मोकळे सौचकुप रूळारूळावर कष्टकरी जनता, त्यांचे…

Read More »
No Comments

उठ हो सिद्ध

उठ मित्रा सिध्द हो, घे सारे आकाश पंखाखालीतोडून घे ती नक्षत्रे, अन बांध मानवतेच्या महालीकरून आव्हान सूर्यास, त्या तेजाने पेटव ज्ञानाची वातपाडून टाक विषमतेच्या भिंती, जागव प्रेम जनमाणसात उठ मित्रा…

Read More »
5 Comments

कॅलिफोर्निया ते शांघाय

कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, चाकरमान्यांनी होती मुंबई व्यापलीबदक, रंगारी चाळ, भिवंडीवाला, कासीम अशा अनेक चाळी बहुमजलीदहिहंडी, गणपती, शिवजयंती, उत्सव, कधी भंडारा माणसे अशी गुंतलीसंकटात जाती धावून मदतीस, लोभ न राग,…

Read More »
No Comments

बिनधास्त

जे करायचं ते करायला कोणाच्या बापाला आपण भित नाहीबाप म्हणतो, माझ्या बोलण्यावागण्याला मुळी रित नाही बाप आपला लय शाणा, आपल्याला दारावर कधी घेत नाहीमेरा नाम मत लेना उगाच बोलतो, त्याच्या…

Read More »
No Comments

आता तरी जागे व्हा

माणसाचा आता झालाय माकड अन माकडाचा झाला माणूसप्रत्येक पुढारी हाच मदारी, नाचवे जनतेला, होतो मनापासून खुश आश्वासनाची दोरी त्याच्या हाती, भुलथापांचा नित्य वाजवे डमरूसणासुदीच्या निमित्ताने काढतो वर्गणी, बनवे नागरीकांना झुमरू…

Read More »
No Comments

आव्हान

मी दिला सोडुनी परिचित रस्ता, दिली सोडून जुनी वहिवाटस्विकारले स्वतः खुले आव्हान, नवे करण्याचा घातला घाट दिली सोडून शहरी नोकरी, मनी केला एक निश्चय, संकल्पधाव घेतली गावाकडे, करायचा होता शेताचा…

Read More »
2 Comments

मलाच कळत नाही

मी आस्तिक आहे की नास्तिक हे माझं मलाच कळत नाहीमी पुजापाठ करत नाही आणि चमत्काराला भाळत नाहीआई म्हणते आज गुरुवार अंड नको खाऊ, मी पाळत नाहीउपवास, तापास का करावे? उपाशी…

Read More »
No Comments

नंदलाल मुरलीधर

सावळे ते रूप, काळा मेघ शामयशोदेचा कान्हा, कृष्ण त्याचे नामगोपिकांचा कान्हा, यशोदेचा तान्हा नट खट बाई हरी, कोणा आवरेनादेवकीचा बाळ, करी यशोदा सांभाळयशोदा नंदन मोहन, तो त्राटिकेचा काळ वसुदेव पुत्र…

Read More »
2 Comments

प्रिती धुंद

जाग आली भावनांना मन आले फुलूनआला वारा भरारत गंध श्वासात घेऊनफुल पाखरे नाचती गंध पेरती पेरतीत्यांना पाहुनी आनंदी फुले गोजिरे हसती मध पिऊनी फुलपाखरांना आली नकळत झिंगउतरती धरेवरी अलगद, किती…

Read More »
1 Comment

व्यवस्थेचे गुलाम

कोणा एखाद्या अधिकारी व्यक्तीला आपण चारित्र्यवान म्हणतोपैशाने, शिक्षणाने, संस्काराने, कशाने तो नक्की चारित्र्यवान ठरतो? अंगभर कपडे, स्वच्छ पोशाख, पादत्राणे याने का चारित्र्य घडते?गरीब बिचारा! कोठून आणेल पैसा अडका, मग त्याचे…

Read More »
No Comments

टपटप पावसाची

टपटप पावसाची सर अखंडीत अन धरा थंड गार झालीतुझ्यासवे दुलईत मी परी हळव्या मृदा गंधाने जाग मला आली गात्रे सारी रोमांचित तव स्पर्शासाठी कधीची आतुरलेलीमिटले नेत्र अनोख्या सुखाने सख्या तू…

Read More »
1 Comment

फरफट

एक वडापाव-कटिंगवर शब्दाखातर रोजच शाखेत राबत होतोभाईंचे काम, कसले श्रम? कसला घाम? रात्ररात्र बॅनर लावत होतो स्पर्धा, मेळावे, रोगनिदान, रक्तदान शिबिर, गल्लीबोळात भरवत होतोशाखाप्रमुख सांगतील तसं, त्यांचा वडीलकीचा मान म्हणून…

Read More »
1 Comment

तीच घराची शोभा

रस्त्याने चालतांना एकदा आम्ही बोर्ड वाचला मालक चालक संघटनातेव्हा पासून मी मलाच विचारतो प्रश्न,आणि करतो मालकाचा बहाणा चालक म्हणजे पत्नी तीच तर कुटुंबाची गाडी विनाअपघात चालवतेतिचं कोणी ऐकत नाही असं…

Read More »
1 Comment

झेंडा

किती पक्ष? किती झेंडे? सामान्य माणसाचे मात्र वांदेप्रत्येक पक्षाचे वेगळे धोरण, तरीही कोणी आघाडीत नांदे कोणाच्या हाती कोणाचा बाण? कोणी हरवला बापाचा मानकोणाचे घड्याळ टिक टिक बोले, ते तर म्हणती…

Read More »
2 Comments

माती

ती विहिरीच्या खोदकामावर करत होती नेमाने कामविहिरीला लागावं पाणी यासाठी तिच्या सर्वांगाला घाम मुकादम खुणेनेच माती वर ओढण्याचा करत होता इशाराइंजिन धूर ओकत भसाभसा, भरले भांडे आणी धरेच्या दारा तिचा…

Read More »
4 Comments

चोर

खरं तर प्रत्येकाच्या मनात असतो लपलेला एक चोरसापडत नाही कुणाला तोवर आपण नक्कीच शिरजोर कुणी मन चोरतं कुणी धन, कुणी चोरतं कुणाचं अंगणचोरून कुणाचं तर बरेच ऐकतात, मग रंगत वादाचं…

Read More »
1 Comment

घर देता का, घर?

अहो घर द्या, घर, आमचे सर्वांचे एकच मागणे मुंबईत हवे घरविश्वास नाहीच बसणार पण आताशा यांच्या मागणीचा पंच “घर” “कुणी घर देता का घर!” विधानभवनात बेघर आमदार फिरत होतेअधिवेशन संपवून…

Read More »
2 Comments

विराणी

चिप्प ओला कोरा कागद मी आलटून पालटून पहिलाहृदयाच्या डोळ्यांनी त्यातील प्रत्येक शब्द नीट वाचला मी पाहिले त्या कागदावर होते पुसटसे अश्रूचे ओघळखुप बारीक नजरेनं पाहिली त्यातील शब्दांची तळमळ लिहावे म्हणून…

Read More »
3 Comments

कुठे शिवबाचे राज्य अन..

गर्जना करणाऱ्या वाघाला हवे बदलत्या परिस्थितीचे भानस्वार्थासाठी जमतील उपरे त्यांचा इतिहास आहे का महान?खंजीर खुपसला गुरूवर ज्यांनी त्यांना निमूट करशी सलाम!आयुष्य झिजवले विरोध करूनी परी तू आज दिल्लीपतींचा गुलामकुठे हरवला…

Read More »
4 Comments

बहूरूपी

काल अचानक वाटू लागले आपण आहोत निष्णात बहूरूपीमुलगा, भाऊ, नवरा, वडील, आजोबा सगळी वठवतो खोटीच नाती बहिण, आत्या, काकी, मावशी, मामी, नणंद, जाऊ, आजी भिन्न अभिव्यक्तीप्रत्येकीचा वेगळाच दर्जा, कुणी प्रेमळ,…

Read More »
2 Comments

गुन्हा

मदत करणं असेल गुन्हा तर तो मी नेहमी करतोचुकलोच म्हणत जूने विसरून पून्हा तीच वाट धरतो चुकांचं परिमार्जन, म्हणजे नवीन चुकांचं जणू लायसन्सचुका करून त्या निस्तरण्याचं तसं हे माझं जुनंच…

Read More »
1 Comment

चला विझवू वणवा

मित्रांनो स्वतःला सुशिक्षित म्हणवता तर एवढं तरी ठरवाप्रत्येक गोष्ट मनाला पटतय का? विचारूनच रान पेटवा हे असं फारसा विचार न करता Forward करणं कृपया थांबवातुमच्या निराधार बातमीने कोणाचा जीव जाईल…

Read More »
2 Comments

प्रेम ते लग्न भाग १

जो पर्यंत होत नाही, करावसं वाटतं प्रेमआधी भेटी गाठी, मग प्रेझेंटची लेन देनरुसणं फुगणं नेहमी तिचं हमखास चालतंथोडी विनवणी, मनधरणी करत प्रेम फुलतंतारीफ केली की मन झुळूक होऊन झुलतंस्पर्शाची जादू…

Read More »
2 Comments

बापाला मरावंच लागतं!

मुलांना किंमत कळायला बापाला मरावंच लागतंतो जिवंत असेपर्यंत त्याचं बोलणं, वागणं सगळंच टोचतं लहानपणी, बापाला आम्ही छोटे आहोत हे कुठे कळतं?जेव्हातेव्हा शिस्तीच बाळकडू, आमचं सुख त्याला सलतं दुखलं खुपलं आईच…

Read More »
4 Comments

मी

मी मनाचा व्यापार, स्वयंभू अहंकारमी ओंकार, निराकार, अविनाशी ईश्वर मी सुक्क्ष्माती सूक्ष्म, जीव जलचरमी एकपेशी जीव, महाकाय भूचर मी अविनाश आत्मा, इश शुभंकरमी अचल, निश्चल, अहिल्या पत्थर मी यत्किंचित रजकण,…

Read More »
2 Comments

जी लो बेटा

मला मीच विचारलं, काय रे! आहे का तुझ्या जीवनाची हमीअंर्तमन म्हणालं तुझा विश्वासच डळमळीत, हिच तर मोठी कमी मी स्वतःशी हसलो, पोलिसांना हवे संरक्षण ते कोर्टात सांगतातआमचे अनेक नामचित आमदार…

Read More »
2 Comments

शोध

सारेच अर्तक्य, अनाकलनीय, दुर्लभ तरीही नित्य शोध सुरुप्रत्येक श्वासागणीक जगणे, मरणे तरी “माझे” चा अट्टाहास धरु? कल्पनेच्या जगात वावराताना बांधतो आम्ही नित्य इमलेजगण्यात सुखाचा ध्यास, त्यासाठीच मनाचे नवनवे जुमले पैसे…

Read More »
3 Comments

माझी सख्खी बायको

ती बया मला मुद्दामच ती घासून गेली असा जणू मनी भास झालातो तिचा इशाराच तर नसेल असा माझ्या मनाने मला कौल दिला तिचा मुखचंद्र दिसावा म्हणून मीु खुप दुरवर पाठलाग…

Read More »
4 Comments

माझं आकाश

अथांग अशा अवकाशात माझही एक हक्काचे आकाशएक तेजपूंज सुर्य तेथे त्याची मला सोबत अन प्रकाश या आकाशात माझा चंद्र त्याची शितल छाया मनातदूरवर शेत माझे, या खोपीचे घर तुळस डोलते…

Read More »
2 Comments

मायाजाल

विसरू पाहातो, ते दिवस ती सांज अन तो डुंबणारा सुर्यरोजचीच भेट, मुक संवाद, फुलणारा श्वास अन विरह मी मंत्रमुग्ध होत होतो, जुईचा गजरा तुझ्या केसांत माळतानानजरेत तुझ्या अनामिक भिती बावरत…

Read More »
5 Comments

पोपट

एखादी चिमूरडी रूसून रस्त्यावर फतकल मारतेतिच्या रुसण्याने नकळत आपली कळी खुलते तिचा प्रश्न सोडवावा म्हणून आपण तिथे पोचतोचल बेटा अस करु नये म्हणत तिचा हात धरु पाहतो ती हात झटकून…

Read More »
1 Comment

ओंजळ

शब्द फुले ही तुझ्या यशाला जपून ठेव ग मुलीओंजळ तुझी रिती न राहो मी बाप तुझा मामुली तुज न दिला कपडापैका न डामडौल दाविलाअनुभवाचे शब्द सांगुनी, मी बोल तुला लाविला…

Read More »
1 Comment

कुंचला

मित्रा तिच्या सवे पुन्हा येत आहे तुझ्या शायरीला बहरतुझ्या लेखणीला आहे अदृश्य डोळे त्यांची तेज नजर तुझी लेखणी फिल देते षौडशीचे कोमल थरथरते अधरतु स्वप्नातही पाहतोस, खरंच तुझ्या लेखणीचा कहर…

Read More »
1 Comment
तिज पाहता

तिज पाहता

पाहिले तिला तिनसांजेला मनातून चढवला साजते देखणे रुप मी विसरू पाहतो परी आठवते ती रोज केसात माळला मी तिच्या चंद्र पूर्ण पौर्णिमेचाअन गजरा गुंफला तिच्यासाठी शत तारकांचा अस्ताच्या सुर्याजवळून फुलवली…

Read More »
3 Comments

स्मरु नको

स्मरू नको भेट ती, नको स्मरू दिवस तोपरी मनास सांगना, तव गीताचा भाव तू नको स्मरू प्रेमलाप, नको गुंतू मज सवेएकांती घे परी, तव भोळ्या मनाचा ठाव तू भेटीचा उपयोग…

Read More »
2 Comments

श्रध्दा

अहंकाराचा पिंजरा त्यातील राघू गोजीरामी पण त्यागून जाता फुले जीवन मोगरा चेहऱ्यावर हासू फुलेल जीवन तरु बहरेलहितगूज करु पाहता आनंद घन बरसेल कस्तुरी तुमच्याच पाशी परी तुम्ही अजाणमदतीस जा धावून…

Read More »
7 Comments
प्रकोप

प्रकोप

अवघा विदर्भ, खानदेश, मराठवाडा टाकतोय भितीने धापातुझा निरोप घेता घेता हे विपरीत काय केलस रे बाप्पा? आम्ही तुझ्याकडे सौख्य शांती मागितली अन तू दिलं गुलाबनाव सुंदर पण लक्षण खोट हा…

Read More »
2 Comments

बाप्पा लवकर या

कालच त्याच विसर्जन केलं आणि माझ अवसान गळालंडोहात तो गडप झाला, त्या क्षणी काळीज दुःखाने हललं गेले पंधरा दिवस त्याच्या तयारीत दुःख उरी लपवलंवर्षांनी एकदा येतो, त्याला नकोच सांगूया, मनी…

Read More »
8 Comments
बापू तुझ्या देशात

बापू तुझ्या देशात

गोरा साहेब गेला तेव्हा स्वातंत्र्य मिरवत नाचलो होतोतिरंग्यासह मिरवणुकीत रस्त्यावर मुक्त फिरलो होतोस्वातंत्र्य गाणी गुणगुणत उपासपोटी जागलो होतोपारतंत्र्य संपलं म्हणत आनंदात खुळा रडलो होतो गोरा साहेब गेला अन लोकशाहीची ठोकशाही…

Read More »
2 Comments
एकदा एका मुंगीने

एकदा एका मुंगीने

एकदा एका मुंगीने भुंग्यावर केल खुळ प्रेमभुंग्यानेही तिला पाठीवर नेलं केली मस्त चैन भूंगा फुलांवर बागडत होता, मुंगी ऐटीत बसली होतीमध्येच भूंगा भरारत होता मुंगीला वाटत होती भिती या फुलावर…

Read More »
2 Comments
plakh-mangesh-kocharekar

ओळख

पहिल्यांदाच तिची माझी भेट तशी अचानक झालीमी होतो तेव्हा अगदीच गावंढळ अन ती रुळलेलीगळ्यात तिच्या लाल स्कार्फ अन डॅशिंग तिची देहबोलीसगळ्या देखत ती गंमत म्हणून अखियोसे मारे गोलीकेसांचा छान बॉयकट…

Read More »
No Comments

सर आली पहिल्या प्रेमाची

सर आली पहिल्या प्रेमाची वाटते मनाशी गावेजे अंतरी फुलते आहे ते सांगून मोकळे व्हावेप्रेमात तुझ्या भिजावे अन तुला चिंब भिजवावेसंपवावे द्वेत मनाचे तुज आनंदे सख्या रिझवावे  मी रुपात गुंतले होते…

Read More »
No Comments
लिहिन म्हटलं

लिहिन म्हटलं

लिहिन म्हटल कविता तुमच्या माझ्या जीवनावरविषय इतका गहन मनास घालावा कसा आवरजीवन म्हणजे प्रश्न, कोडं, विवर, वादळ वावटळजीवन म्हणजे जन्म, ज्योत, जल, परिमळ, खळखळजीवन म्हणजे याग, त्याग, तर्पण, समिधा यांचं…

Read More »
No Comments
आला आषाढ

आला आषाढ

ज्येष्ठ महिन्याचा ताप, चिकचिके अंग, होतसे संतापसूर्य, कष्टाने लालेलाल, त्याला लागलीसे धाप सारे निस्तेज चेहरे, म्लान काळी झाली कायापाणी किती वेळा प्यावे? जगण्याची गेली रया रात्री डोळ्याला नाही डोळा, होतो…

Read More »
No Comments
चिखल

चिखल

मला आवडतो पाऊस चिखल तुडवण्याची मला हौसअहो खऱ्या अर्थानं चिखलच करतो तुमची वास्त पुस्त|| कधी चपलात कधी बुटात, कधी कानातही शिरतोकधी शर्टवर, कधी बॅग वर धुतल्या नंतर उरतो|| रस्त्यावर चिखल…

Read More »
No Comments
तव डोळ्यात पाहताना

तव डोळ्यात पाहताना

तव डोळ्याच्या तळ्यात प्रेमाचा महापूर येतोत्या भावनांच्या लाटेत मी पून्हा पून्हा हरवतो कधी संयमी शांत शीतलसंथ गतीचा मोहक निर्मळतुडुंब भरला तरीही सोज्वळनिश्चल तरीही भेटीस व्याकुळ कधी अशांत नागीण वळवळधुमसे क्रोधे…

Read More »
4 Comments

ती, ती, आणि ती

तिचं माझं जन्म -जन्मांतरीच नातं होतंतिनेच तर हा देह पोसला, आटवूनी स्व रक्त माझे गुद्दे, लाता खाऊनही, ती गोड गोड हसत होतीजन्म होताना, यातना होऊनही, उरी कवटाळत होती माझ्या पोटची…

Read More »
8 Comments
साहेब कुणी आरक्षण देता का?

साहेब कुणी आरक्षण देता का?

साहेब कुणी आरक्षण देता का?जातीचे आरक्षण देऊन पावन करून घैता का?शेतीत बा राबायचा, पण मला कष्ट जमत नाहीतनांगर, टिकाव, फावड हातातही धरवत नाहीपाऊस, पिकांचं ताळतंत्र अजिबात समजत नाहीगुर-ढोर, शेण, गोवर,…

Read More »
1 Comment
हरवून गेलो भान

हरवून गेलो भान

सौंदर्य पाहुनी तुझे, हरवूनी बसलो देहभान माझेगेले गळूनी वयातील अंतर मन मोर होऊनी नाचे सुडौल बांधा, चाल डौलदार, गोल चेहरा साजेस्वर्ग अप्सरा, मन मोहिनी स्वप्न परी मज भासे मृग नयनी,…

Read More »
23 Comments
तांडव

तांडव

जेष्ठ सरता सरेना, सा-या जीवा लागे धापरस्ता तापूनिया लाल, दिसे दुरूनही निश्र्वास कुणी चाले अनवाणी, पाय पेटती उन्हातवृक्ष दूर दूर दिसे, त्याची सावली मनात सुर्य मध्यांनीला आला, धरा सोसते तापमघा…

Read More »
4 Comments
FlorenceNightingale

फ्लोरेन्स

फ्लोरेन्स तुझी आठवण येते आज तू हवी होतीसतुझ्या नाती राबत असताना तू ही सोबत असतीस शुश्रूषेचा खरा वसा दिलास फ्लोरेन्स तूच जगासऋग्णांची सेवा अविरत भिंगरी होती तुझ्या पायास त्यांची सेवा…

Read More »
No Comments
आठव

आठव

आठव आली मज बालपणीचीअन् सवांगड्यांची कितीक वर्षांनी पाहता मैदान, चिंचेचे ते झाडनजरेचा आड झाले दृश्य जागे फांद्या फांद्यावरी लपले सवंगडीराज्य माझ्यावरी धावपळ माझी सुरपारंब्या खेळूनिया धापलागे गाढ झोप नाही घोर…

Read More »
22 Comments
चौकट

चौकट

वाटतय प्रत्येकाचे आयुष्य झालंय बंदीस्त चौकटकोणी तुमच्याकडे कस पहावं, वागावं याची ठोस अटप्रत्येकाची भूमिका ठाम, प्रत्येकजण एक कसलेला नटप्रत्येकाचे प्रारब्ध हा नियतीने भरलेला संचिताचा घट या चौकटीला आहेत स्वतःच्या स्वार्थाचे…

Read More »
3 Comments
रेषा

रेषा

पुसता आली जर आपल्यातील मतभेदांची रेषाअन् मिटवता आलं जर वाढत्या वयातील अंतर दोस्तहो खरच काय धमाल वेळ आला असता?लुटलाच असता पून्हा जवानीचा तारूण्य बहर बसलो असतो तुमच्याच थव्यात मैत्रीणी सोबतअन्…

Read More »
5 Comments
समाज

समाज

माणसाच्या जथ्याला म्हणावं का समाज?जाती, धर्म, पंथ यांचा का उगाच बाळगावा माज?एकत्रित आले की झुंड शाही, अन चालतों नंगा नाचएकटे असताना कंठातून फुटत नाही खुला आवाज मी ब्राह्मण मी मराठा…

Read More »
11 Comments
प्रेम म्हणजे नक्की काय असते?

प्रेम म्हणजे नक्की काय असते?

एकांतात नव्हे, अगदी गर्दीतही रूसतेबरं बाई,म्हणत, चिमटा काढून हसतेबर्फाच्या गोळ्यासाठी, ठाम हटून बसतेत्याला आवडतील अशा, तंग कपड्यात शिरतेनिरोप घेण्याच्या वेळी समजून उमजून टाळतेनिघुया म्हणत किती वेळ रस्त्यातच घुटमळतेतेव्हा कुठे कळते,…

Read More »
3 Comments
farmersProtest

संभ्रम

पहा देशा, सधन पंजाब, बसला अगतीक हमरस्त्यावरकोणी फिरवला वरवंटा त्यांच्या मोहमयी मधुर स्वप्नांवर? अर्ध शतक ठोकले दिवसांचे तरी अधिर नजर दिल्लीवरआंदोलन झाले शस्त्रसज्ज, नेते, कुणासही घेती अंगावर बैठका अनेक झाल्या…

Read More »
24 Comments
तक्रार

तक्रार

तू भेटलास अचानक अन नकळत सूर जुळलेकल्पनेचे चित्र मनाच्या बागेत आपसूक फुललेतुझा बांधा, तुझा रंग, तुझे नाक, तुझे केस अन डोळेतुझी छबी, माझ्या मनातील राजकुमार, मला कळलेदोन चार भेटीतच भुरळ…

Read More »
4 Comments
तांबडी सडक

तांबडी सडक

माझ्या गावाची पायवाट, लाल तांबडी सडकनका घालुनी डांबर, तिला करू रे विद्रूप तिला पहा विचारून, का तिचा रंग असा भडकप्रेमाखातर तुमच्या, तिने किती गाळले नित्य रक्त रोज लाथाडून जाता, परी…

Read More »
7 Comments
व्रतस्थ

व्रतस्थ

त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्यामजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होतादिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी…

Read More »
4 Comments
सलाम

सलाम

जगण्याचे राहून गेले ही खंत उरी कशाला?मी घातली,गवसणी होती, त्या उंच आभाळालाआव्हान दिले होते, त्या अथांग सागरालामी नजरेत टिपले होते, अंतरिक्षात नव नक्षत्रालाअन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला न…

Read More »
10 Comments
संकल्प नवा

संकल्प नवा

श्वासात भरून घेतला, मी वनराईत मोकळा श्वासकितिक युगे तिने जपला मज जगवण्याचा ध्यास ? स्वार्थी अंधधूंद आम्ही, तरूवरांचा केला किती नाशपरी नवनिर्मीतीचा तिचा उत्साह, ती झुंजली खास कधी वणवा, कधी…

Read More »
4 Comments
चला स्वागता नववर्षाच्या

चला स्वागता नववर्षाच्या

गत वर्ष संकटात गेले पून्हा पून्हा म्हणू नकानव वर्षाचे स्वागत करा पण उन्मादात चूकू नका त्याने शिकविले बरेच काही, बदलवल्या आपल्या सवयीमाणूसकी अन आत्मनिर्भरता, सयंम बाळगू नकोच घाई काटकसर अन…

Read More »
2 Comments
भेट

भेट

माणसातल्या बेटांचं आणि माझं अतूट अस नातंमनातील शब्दांच भांडार कधीच नव्हतं इतकं पोरकंबालपणीच सहवासाची मनास नकळत लागली गोडीइयत्ता पार करता करता नकळत जमली आमची जोडीमते पटत नव्हती तरी त्याच्याशी जुळला…

Read More »
2 Comments
मला काही सांगायचंय

मला काही सांगायचंय

गर्भातला अंकुर हूंकारत म्हणाला मला काही सांगायचंजन्मा आधिच,वाट्याला यातना, हे अघोरी कृत्य थांबवायचं मी मुलगा की मुलगी! हे जाणून तुम्हाला काय साधायचं?मुलगा म्हणून मी जन्मलो, तरच कौतुक, हे मला संपवायचं…

Read More »
4 Comments
कोण कलाकार

कोण कलाकार

कोणी दिला गंध फुलांना कोण देतसे रंग ?कोणी शिकवली गाणी तुक्याला कोण शिकवी अभंग? कोणी दिला हा स्वर खगांना कोणी दिले हे पर ?शिकवले कुणी काड्या वेचून बांधण्यास त्यांना घर?…

Read More »
1 Comment
पदचिन्ह

पदचिन्ह

झगडलो मनाशी परी न मला कळलेअधीर मन माझे कसे तुझ्यावर जडले? तुझ्या अबोल डोळ्यांनी विद्ध मला केलेओझारत्या स्पर्शाने काळीज धडधडले न काही बोलली तू, न पाहिले वळूनीमनातील मोर माझ्या गेला,…

Read More »
41 Comments
वेदना

वेदना

बाबा please दार उघडा ती कळवळून बोललीतिच्या शब्दांची पाखरं हवेत फिरतच गुदमारलीदारा वरची बेल अन् नाईलाज म्हणून कडी वाजवलीपण त्यांच्या मनाची कवाडं मुळीच नाही करकरली त्याने धीर एकवटून साद घातली…

Read More »
75 Comments
दैव मी म्हणावे

दैव मी म्हणावे

दैव मी म्हणावे का दुष्टचक्र त्यालाकळुनी अजाण आता मी संभ्रमात आहे लाडीक हरकतीने तिने केला कठोर गून्हाझुलवून या मनाला केल्या कितिक जखमा ती भ्रमरापरी फिरून, मद शोधीत सुखात आहेमी झुरतो…

Read More »
43 Comments
धुक्यात हरवली

धुक्यात हरवली

ही शांत शांत निरव पहाट, मंद धुंद स्निग्ध वातचल उठ सखये झणकरी, नवअनुभव ह्या प्रेमात बघ गोठले चराचर हरवले सारे या शिशिरातमधुनच नवल घडे चमचमती अवनी प्रकाश दूत भास की…

Read More »
67 Comments

मॅनेज

Event management च्या जगात सारे काही होते manageनेता, खेळाडू, नटनटी, पक्ष यांचे मीडिया ठरवते gauge विषय कोणताही असो चॅनल ठरवते त्याच footageपत्रकार, फोटोग्राफर, कॅमेरामन यांच्या हाती coverage न्यूजपेपर, एडिटर, न्यूजसेटर…

Read More »
56 Comments
तुझी आई

तुझी आई

आज तू सहजच बोलून, दुखावले माझ्या मनातुला कळलेच नाही मुली, किती झाल्या जखमा आठव बरे  ते दिवस, अन रोजचाच तुझा बहाणापायाची घडी,पोटाचा पलंग, मी होतो तुझा दिवाना तुझे हास्य,तुझे चाळे,…

Read More »
2 Comments
दान द्यावे देवा

दान द्यावे देवा

मी काही लिहीत नाही, तेव्हाही मी अस्वस्थ असतोमी सुचेल तेव्हा लिहितो, तेव्हाही मी स्वस्थ नसतोमाझ्या लिखाणाची मीमांसा, जोवर मला कळत नाहीमाझ्या अस्वस्थतेचं वादळ, तोवर पूर्ण शमत नाही शब्द म्हणजे हृदयाचे…

Read More »
9 Comments

आई नव्हे दाई

चाळशी नंतर स्त्री बायको उरत नाहीतिच्या रक्तात भिनत जाते तीची आईती होते मुलांची हक्काची प्रेमळ दाईया दाईविना मुलांना पर्यायच उरत नाही | मुलांना कसं समजवावं फक्त तिलाच जमतंतीच नीट जाणते…

Read More »
7 Comments
महात्मा

महात्मा

ओढून ताणून कुणी बनत नसतो महात्मादुसऱ्यासाठी कण कण जाळावा लागतो आत्मा द्यावा लागतो वेळ जाणावे लागते गरिबाचे दुःखसमर्पित भावनेने सेवेसाठी आटवावे लागते रक्त त्यागावा लागतो अहंकार गिलावा लागतो क्रोधगाळावा लागतो…

Read More »
5 Comments
sare-kahi-banda-ahe

सारे काही बंद आहे

हे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा करतू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच करवैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धरनिरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर आम्ही हव्यासापोटी अहंकार,…

Read More »
4 Comments
अवकाश ज्याचं त्याचं

अवकाश ज्याचं त्याचं

तिच बदललं अवकाश याची तिला खंत नाहीतिला माफ करावे, विसरावे, पण मी काही संत नाही || तिने कसे जगावे, कसे वागावे? हे सांगण्यास मी महंत नाहीतिच्या व्यथा तिचं जगणं, मी…

Read More »
30 Comments
bhijlya-chippa-vata-mangesh-kocharekar

भिजल्या चिप्प वाटा

या ओल्या पावसात, भिजल्या चिप्प वाटानव अंकुर रानात, स्पर्शाने येई मनी काटा भिजण्याचे सुख आगळे, त्यात न्हाती दगडगोटेचला अनुभव घेऊ रानी, गार पाण्यात काय वाटे भिजुनी झाली माती, लोणी तळव्यास…

Read More »
20 Comments
जीवना

जीवन

जीवन म्हणजे नसे तमाशा वृथा कुणाला रिझविण्याचानसे विदुषकी चाळा उगा कुणाला हसविण्याचा स्वतः फुलावे, अन् फुलवावे अमृत कुंभ तुम्ही व्हावेशब्द फुलांच्या होऊनी माळा गीत त्यांचे तुम्ही खुलवावे हलकी,सुगंधी झुळूक होऊनी…

Read More »
2 Comments

ह्या पावसात

ह्या पावसात आता, भिजल्या चिप्प वाटारस्त्यावर उठती सरीतून, पावसाच्या शुभ्र लाटावाटेवरी गढूळ पाणी, रूते पायी बाभळी काटा ह्या पावसात आता मखमल मिरवतो रस्ता हरवून गेल्या बाई  परिचित डोंगर वाटादुभत्या गुरांनी भरला…

Read More »
569 Comments

कवी

काव्य कवीची कल्पना, तो शब्दाने रोकडाकवी मनाचा श्रीमंत, थोडा धनाने तोकडाकवी पाहतो पल्याड, कवी पाहतो अल्याड कवी डोकावे मनी, येई स्वप्नात फिरुनीकवी दाट अंधारात पाहे,  वागे फटकुनीकवी फिरे रानमाळ, शोभे…

Read More »
248 Comments

गणेशा

गणेशा तुला वंदू कसे? तुझे दर्शन घेऊ कसे?सगुण तू, निर्गुण तू, दृश्य तू अदृश्य हे न ठसेमुर्तिरूपे पुजूनी, प्राणप्रतिष्ठा केली तरी न दिसे || रक्त वर्णी फुले अर्पूनी, भक्ती भावे…

Read More »
11 Comments
नक्कल

नक्कल

नक्कल करायला असावीच लागते अक्कललोकांचे अनुभव टिपता टिपता पडते नितळ टक्कल नक्कल करून खरंच का शहाणपण येते ?की शहाणपण असेल तरच नक्कल जमते बाळ जेव्हा पहिलावहिला शब्द उच्चारतेतेव्हाही ते आईबाबांची…

Read More »
5 Comments

षोडसी

टपटप, टपटप, कौलावरती, पागोळ्याला धारा गळतीपागोळ्याचे अंगणी पाणी, आणि वृंदावनी आली भरती। झाडावरती लटकले मोती, वा-यासंगे हळुहळू डुलतीनटखट वारा झोंबे सोबत, फांदीवरून हळू निखळती। फुलांस लगटूनी थेंब चमकती, हळूच फुलांचे…

Read More »
4 Comments

माकडाची शाळा

एका माकडाने काढली प्राथमिक शाळासिंह, वाघोबासह सारेच वनचर झाले गोळा माकड झाडावर चढून म्हणाले, श्री गणेश बोलाहत्ती झाड हलवत म्हणाले मास्तर खाली चला माकड खाली उतरुन म्हणाले चला पाढे काढाआधी…

Read More »
No Comments

कळेना मनाला

कळेना मनाला ठाव हृदयाचाकधी स्फोट होतो मनी भावनांचासंशयी मनाला समजही पटेनादुःखी राहण्याची हौस ही फिटेना नजरेस कोणी का द्यावा दिलासा चोरुनी पहूनिया भरती उसासाजीव लावण्याला सखा सापडेनाभाव अंतरीचा मलाही कळेना मदतीस…

Read More »
2 Comments

श्रध्देने कमाल केली

 वाट बिकट होती, परी कितीक पार गेलेसोबत कुणास होती, कुणी एकलेच तरले अनुभव सकल आले, परी मांडता न आलेभोगले विपुल दुःख, परी सांगता न आले समजूत केली माझी, हे प्राक्तनात…

Read More »
7 Comments
ओळखलंत का सर

ओळखलंत का सर

मला ओळखलंत सर, मी तुमचा गिरीधरबसायचो पाठच्या बाकावर, खोडकर मुलातच वावर चित्तच नव्हतं थ्याऱ्यावर, कित्येक छड्या खाल्ल्या हातावरअठवाताच होते अजूनही थरथर, जणू शोधते तुमची नजर शाळा सुटली की आम्ही ओहोळावर…

Read More »
6 Comments

बीज अंकुरले

पुन्हा आला आला पावसाळा ,मन आनंदुनी गेलेहोती मोकार जमीन, तेथे बीज अंकुरूनी आले  झाडी हिरवाई ल्याली, रावा फांदी फांदी वर माझ्या अंगणी प्राजक्त, त्यांचा सडा भुईवर मंद,गंध मोगरीचा, रानी सुटला चौफेरमाती…

Read More »
3 Comments

चिमण्या

चिमण्या झाडावरच्या, मुक्तपणे चिवचिव करणाऱ्याचोचीत चोच देता देता, स्वच्छंदी किलबिलणा-या मोकळ्या आकाशी, फांदीवर आपलं घरटं बांधणा-याचिमण्याला समज देत दाणे टिपण्यास जाणाऱ्या मध्यरात्री हळुवारपणे लाडात येऊन कुजबुजणा-याइवल्याशा अंड्याचे रक्षण प्राणपणाने करणाऱ्या…

Read More »
38 Comments

पृथ्वीचे विरह गीत

कधी न कधी तो भेटीस येईल, म्हणूनी ती फिरे गरगर किती करावी तिने याचना, भेटीस ये तू आता सत्वर ज्येष्ठ सरला तरी न आला, म्हणूनी तिची वाढे हुरहूर प्रेम आंधळे…

Read More »
28 Comments

मन

मनाशी फुटला श्रध्देचा अंकुर, विश्वासाचे मूळ विश्वंभर विकासाचा ध्यास प्रत्ययी वावर, स्वप्न ही सुंदर वाटे मना निग्रह मनाचा कौतुकाची थाप, मनाशी मोठा वाटतो आधार करू विनवणी देऊ अधिकार, प्रगतीसाठी परी…

Read More »
4 Comments