मनातल्या विठ्ठलाला

मनातल्या विठ्ठलाला

मनातल्या विठ्ठलाला एकदा एकांती भेटायलाच हवं
वाटतं सगळ्या चिंता दूर सारत त्याला आलिंगन द्यावं

करायला हवी त्याची एकदा मनापासून विचारपूस
फारच दगदग होतेय का? विचारावं, आहेस ना तू खूश?

बसवून त्याला निवांत जवळ, करावेसे वाटते हितगुज
समजून घ्यावी त्याची चिंता, भावनेची त्याच्या राखावी बुज

बोलवताच कुणीही, उपाशीच त्यांच्या मदतीस तो धावतो
त्यांची काम उरकतांना थकला तरी बळे बळेच हसतो

त्याला सगळेच धरतात गृहीत, तो जपतो सगळ्यांचं हित
उगाच नाही त्याला कुणी म्हणत माऊली, माय म्हणजे प्रीत

त्यांची दुखणी काढता काढता स्वतःलाच विसरून जातो
अगदीच इलाज हरला तर एकांतात बसून अश्रुत न्हातो

त्याला स्वतःला कधी नसते उसंत, तोच करतो सर्वांना आश्वस्त
वय झालं तरी थांबून चालत नाही, कष्टाला त्याच्या नाही अंत

त्याला ‘ती’ एवजी तो म्हणतो कारण तो आहेच माझा भगवंत
माझ्या जन्मापासून आजपर्यंत तो माझ्या श्र्वासाश्वासात व्याप्त

विठ्ठला तूच तर नाही ना हा खेळ मांडून मला करतोस भ्रमित
तु कुठे कुठे भरून राहिला आहेस मला सुटत नाही हे गणित

वाटतं तुझे पाय धरून तुला शरण जावं, अन तुझी माय व्हावं
फिटणार नाहीच तुझे उपकार या जन्मी अश्रूंचं अर्ध्य तुला द्यावं

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “मनातल्या विठ्ठलाला

  1. Milind Chavan
    Milind Chavan says:

    लय भारी

  2. Milind Chavan
    Milind Chavan says:

    लय भारी , मस्त

  3. SANDEEP NAGARKAR
    SANDEEP NAGARKAR says:

    खूप छान सर

  4. Archana Ashok kulkarni
    Archana Ashok kulkarni says:

    खूपच छान.विठ्ठलाच्या कष्टाची काळजी.खूप प्रेमळ, मृदु भाव…!

  5. संतोष महिंद्रकर
    संतोष महिंद्रकर says:

    खूप छान

Comments are closed.