ओळखलंत का सर

ओळखलंत का सर

मला ओळखलंत सर, मी तुमचा गिरीधर
बसायचो पाठच्या बाकावर, खोडकर मुलातच वावर

चित्तच नव्हतं थ्याऱ्यावर, कित्येक छड्या खाल्ल्या हातावर
अठवाताच होते अजूनही थरथर, जणू शोधते तुमची नजर

शाळा सुटली की आम्ही ओहोळावर दप्तर टांगु झाडावर
कधी कुणाच्या कलामावर तर कधी काजू, फणसावर

सरसरत चढायचो माडावर कुणावर तरी फुटायच खापर
तृप्तीने द्यायचो ढेकर, त्यांचं भागायच फुटक्या तोंडावर

ते दिवस सरले घोडे झाल्यावर घर नाही म्हणाले उंबऱ्यावर
घरून पळालो म्हणू नये पण पोरक वाटलं घर सुटल्यावर

नशीब काढायला फिरलो मुंबईभर, कुणी उभे न करे दारावर
शिक्षणाविना पायाला चक्कर, तेव्हा डोकं आलं ताळ्यावर

ना नोकरी, ना अन्न, ना छप्पर, डोक भणाणुन फिरलं गरगर
चोरी करण्याची हिम्मत केली, लाथा-बुक्क्यांनी मोडली कंबर

पडून होतो रस्त्याच्या कडेला, कुणी घेतली नाही खबर
लाचार, बसलो रस्त्यावर, चवली साठी हसवली नजर

रस्त्यावरून अनेक गेले, पोटातल्या खड्ड्याच वाढत गेले अंतर
मनात ठरवले आता व्ह्यायचे कणखर, जमवायची माया मणभर

एवढ्यात दंडुका पडला कपाळावर मी जिवंत असल्याचं कळलं नंतर
मात्र तिथेच मिळालं हक्काचं घर, मायेचा हात फिरला पाठीवर

जणू आईच मिळाली हॉस्पिटलच्या वार्डवर, तिने कधीच दिले नाही अंतर
तिनेच शहाणं केलं, बनवलं डॉक्टर, मन घडवल सुंदर

आत्ता हे हॉस्पिटल माझं, सर जरा बसा ह्या खुर्चीवर
तुमच्या धाकापाई सोडलं घर, म्हणून पोचलो इथवर

ऋण तुमचे फिटणार नाही, डोकं घालूद्या तुमच्या पायावर
तुमच्या छडीच्या प्रसादाने इथे, नाहीतर नशिबी होता नांगर. 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “ओळखलंत का सर

  1. राजेंद्र भोसले
    राजेंद्र भोसले says:

    छानच….सर.

    1. Kala sant

      Nicely depicted ka

  2. Dhiraj

    nice

  3. Sandeep

    खुपच छान सर

  4. Archana Ashok kulkarni
    Archana Ashok kulkarni says:

    खूप छान आहे कविता….!
    कवितेत पूर्ण कथानक सांगितले.

  5. Lukas

    I like the helpful info you provide in your articles.
    I’ll bookmark your weblog and take a look at once more right here regularly.
    I’m fairly sure I’ll be informed plenty of new stuff proper here!
    Good luck for the following!

Comments are closed.