स्वप्न आणि आकांक्षा

स्वप्न आणि आकांक्षा

आपले मुल म्हणजे डिपॉझिट हे प्रत्येक सुशिक्षित ठरवतो
त्यांच्या इच्छाआकांक्षा लादून बुस्टर दिल्यागत जिद्द फुलवतो

चार-पाच वर्षांच्या मुलांना आम्ही क्रेडिट कार्ड बनवतो
पाहुणा येण्यापूर्वी आमच्या मनासारखं त्याला सजवतो
त्याचा चॉईस डॉक्टर, इंजिनिअर असल्याचं तोंडून वदवतो
तो फार शार्प आहे म्हणत ज्यु. केजीच स्कोअरकार्ड दाखवतो

एखादी इंग्लिश पोएम म्हणायला सांगत डोळ्यानेच दटावतो
चावी दिलेल्या खेळण्या सारखे त्याला इशारा देत नाचवतो
त्याचं संस्कृत छान आहे म्हणत, गीतेचा अध्याय ओकवतो
वक्तृत्व त्याचं उत्तम म्हणत पोझ घेत तो पाहुण्यांना हसवतो

त्याचा रोबोट बनवतांना आमच्या अपेक्षाची चिप घुसवतो
हार्डवेअर आमचेच, त्याची फक्त फ्रेम, त्याला नाव सुचवतो
आमचीच कमांड त्याने करावी फॉलो, प्रोग्राम आम्ही जुळवतो
शरीराची स्क्रीन दणकट दिसावी म्हणून सक्ती, जिमला पाठवतो

त्याचं उठणं, बसणं, रडणं,आणि हसणं सार आम्हीच ठरवतो
आम्हाला मिळाले नव्हते ते त्याला आमच्या हौसेने पुरवतो
कंटाळा येईपर्यंत त्याचा पिच्छा दोघे मिळून त्याला भरवतो
‘You are a winning horse, U must win’ अनेकदा बजावतो
आमचं जगणं फक्त तुझ्यासाठी हे दर हप्त्यात एकदा ऐकवतो

अनेक स्पर्धापरीक्षा, अनेक उपक्रम, त्याची तयारी हाच ध्यास
आमची स्वप्ने, आमच्या आकांक्षा, त्याच्या क्षमतेवर आमचा विश्वास

आमचा स्वार्थ, त्याचे आयुष्य, जिद्दीने पेटवून, हवे तसेच वागवतो

पाहता पाहता तो मोठा होतो, त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवतो
त्याच्या संपर्कासाठी WhatsApp, तेथील किस्से सांगत तो हसवतो
दररोज call मग unreachable भरल्या डोळ्यांनी स्वतःला समजवतो
आमच्या स्वप्नांचे इमले, आकांक्षाचे मनोरे फुलवता, आम्हीच कोसळतो

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar