उतरू जाता प्रेमाची वाट

उतरू जाता प्रेमाची वाट

प्रेमात कोण डुंबेल याचा त्यांना येत नाही अंदाज
किती खोल डोह आहे ते सांगता येत नाही आज

प्रेमात गुंतवावा लागतो जीव, मागू नये उगा व्याज
काही इतके रसिक की शब्दांचाच चढवती प्रेमात साज

काही प्रेमवीर वाहवत जाती वाटेना त्यांना लाज
नशा सौंदर्याची चढत गेली, की उतरत जातो लिबाज

स्वतःला काही जाती विसरून पडता मोहिनीची भुल
तिचे सौंदर्य डोळ्यात साठवता चषकातील मद्यातच गुल

काही प्रणयवीर दर्दी, तिच्या रूपाची करती वारेमाप स्तुती
तिच्या अंगावर रोमांच उठवत, फेकती बाण, शब्दांतच मस्ती

हळूहळू फुलत जाते कळी तेव्हाच तिला बाहुपाशात गोंजरती
तीचे भरले घट, टवटवीत गुलाब कुरवाळत तिला चिंब भिजवती

कुरळ्या बटात अलगद बोटं फिरवत, काहूर मनी उठवती
ओठांचे आलिंगन, गळ्यात हात, उष्ण श्वास, गात्र जागवती

गोबरे गाल कुस्करून, स्पर्शाने हसवती, पाखरू नाचवती
तिच्या गंधीत सुमनांचा तिलाच सहवास, अंतंरंगी फुलवती

आता कुठे चढू लागतो प्रणयाचा रंग, ती त्याच्या नशेत गुंग
उत्तररात्री त्यांच्या प्रेमाला येतो बहर ती सूख स्वप्नातच दंग

बाहेर दूरवर किलबिलती पाखर, तिच्या ओठावर हसू डोळे जड
तिच्या राजहंसाने काबीज केल घर, शब्द त्यालाच फितूर, तो बेरड

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “उतरू जाता प्रेमाची वाट

  1. Rajendra Bhosle
    Rajendra Bhosle says:

    छान

  2. Tree Mail

    Wow superb blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is magnificent as well as the content

  3. Tree Mail

    Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task

  4. tempo emai

    In addition, I had a wonderful time with that. In spite of the fact that both the narration and the images are of a very high level, you realise that you are anxiously expecting what will happen next. Regardless of whether you choose to defend this stroll or not, it will be essentially the same every time.

Comments are closed.