तेच अमर होती

तेच अमर होती

काही माणसं अशीच असतात त्यांच्यावर रागावताच येत नाही
काही माणसं कुणी रागवलं तरी फारसं मनावर कधी घेत नाही

काही माणसं मात्र अतिसज्जन, मनानं असतात फारच हळवी
त्यांना कुणाचा अतिपरिचय सहन होत नाही इतकी सोवळी

काही माणसांचं जगणं वागणं, तऱ्हा अगदीच जगा वेगळी
त्यांच्या शब्दांच्या होती कळ्या इतकी उमदी अन मनानं मोकळी

कुणी कुणासाठी नसतं मोकळं, “जुळवू नये सुर” हे म्हणणं फारच कोरडं
इतक अलिप्त अन टोकाचं वागूच नये अन्यथा जगणंच बनेल एक कोडं

किती दिवस वाट्याला आहेत कोणास ठाऊक म्हणून फुलपाखरू बनावं
पेरावे रंग मनाचे, हसत हसवत, दुसऱ्याला मोद देत देत स्वतः गंधीत व्हावं

व्यक्ती तितक्या प्रकृती हे स्वीकारलं की ओठावर येती नकळत ओळी
“भावबंध जपून मैत्र आज हे जुळावे, भर उन्हात वा सकाळी तारे उजळावे”

असे जगणे ज्यांच्या नशीबी ते पु.लं., पुल पुण्याचे अन पुण्यांचे, अमर होती
जगण्यावर जो करतो हासत प्रेम, त्याचे नाव नित्य निरंतर सगळ्यांच्या ओठी





Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar