मशागत

मशागत

जन्म आणि मृत्यू हा नियतीचा खेळ आहे
तो देतो जन्म आणि कर्म, जीवन कर्तव्याचा मेळ आहे

हसत जगणे ही एक सुंदर अद्भुत कला आहे
नित्य नवीन अनुभव घेणे रंगीत मनोहर सोहळा आहे

वय, जात, धर्म पंथ यांची जीवनात नको उगाच झुंज
दिव्यत्वाचाच सर्व प्रवास, दिव्यावर घाली झडप पतंग

किती श्रीमंत? किती गरीब? याचा नसतो नेहमी संबंध
असेल सकारात्मक वृत्ती तर जोडला जातो सगुण बंध

नात्याची गोडवी वाढवावी, शब्दांचा वापरून कंद
आपल्या नजरेतच हवी आपुलकी, माया, मग उजळतो रंग

शुभप्रभात मेसेज हजारोंचे असतील आपुलकीची एकच साद
काही मित्र, नाती इतकी घट्ट, तुटणार नाहीत होऊ दे कितीही वाद

काही माणसांना मैत्र जपण्याचा उपजत असतो व्यासंग
त्यांच्यातील चांगल तेच हेरुन, करा पेश, ओवीचा होतो अभंग

जीवनात वजाबाकी करायची की बेरीज हे ठरवा
तवा कितीही असो गरम भाकरी करपण्यापूर्वी फिरवा

जीवनात कटू अनुभव आले तरी माणुसकी नये सोडू
कोणास ठाऊक? नशिबात, कोण असेल तुमचा भिडू

माणुसकी जपत,आजही, टाटा करतात सढळ दान
नीती न सोडता ते करतात व्यवसाय म्हणून होते गुणगान

काही माणसांचा सहवासाने मन प्रफुल्लित होत
सुधा मूर्ती, राणी बंग यांच्या सानिध्यात नकळत जीवन कळतं

तुम्ही जसे पेराल तेच शतपटीने पुन्हा उगवते
कराल नात्याची मशागत तर मातीच पुन्हा तुम्हाला जगवते

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar