विराणी

विराणी

चिप्प ओला कोरा कागद मी आलटून पालटून पहिला
हृदयाच्या डोळ्यांनी त्यातील प्रत्येक शब्द नीट वाचला

मी पाहिले त्या कागदावर होते पुसटसे अश्रूचे ओघळ
खुप बारीक नजरेनं पाहिली त्यातील शब्दांची तळमळ

लिहावे म्हणून कागद तिने कितींदा असले हाती घेतला
कुठून करावी सुरवात न उमगून तसाच कोरा ठेवला

तिच्या अश्रूंच्या थेंबाना तो कोरा कागदही भाळला
त्यावरचे ठसेच सांगतील, तिने कसा जीव लावला

लिहीण्यासाठी तिची झालीच असेल प्रचंड तळमळ
आतड्यांना बसला असेल पीळ अन डोळे काजळ

लिहिण्यापूर्वी येत होते डोळे अश्रूंनी काठोकाठ भरून
हातास सुटत होता कंप अन लेखणी जात होती गळून

खुपदा प्रयत्न केला, धीर झालाच नाही, ओळी गेल्या पुसून
ह्रदय विदीर्ण झाले परतून ये म्हणून कितींदा विनंती करून

तरीही तो कागद तिने होता ह्रदयाशी व्याकूळतेने जपला
त्याची स्पंदने सांगत होती तिची आर्त आर्जव कंप आतला

कागदास घडी घातल्यास चुरगळेल त्या अनामीकेचे मन
तसाच टाकून देण्यास मन धजावेना म्हणून जळी केला अर्पण

त्या अथांग सागरासही कळू दे दुःख तिच्या विरहाचे थोडे
सरीता का धावत असते काट्या कुट्यातून सुटेल त्याला कोडे

ती संकटे झेलत जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची करते याचना
किती दुःख तिला विरहाचं असावं, निर्दयी कर की कल्पना

डोळ्यातील अश्रूंच्या थेंबानी तिचा पदरही चिंब भिजला
दुःख अगतिक असल्याने अन विरहाने तिचा श्वास कोंडला

एक दीर्घ दबला हुंदका त्या आसमंतात दूरवर घुमत गेला
माझ्या श्वासाचे जिवंत कलेवर, पण आत्माच नाही उरला

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “विराणी

  1. Archana Kulkarni
    Archana Kulkarni says:

    अप्रतिम….!

    1. Mangesh kocharekar
      Mangesh kocharekar says:

      धन्यवाद मॅडम

  2. israelxclub.co.il

    May I simply say what a relief to uncover somebody that really understands what theyre discussing over the internet. You certainly know how to bring a problem to light and make it important. More and more people really need to check this out and understand this side of the story. I was surprised that youre not more popular because you certainly have the gift.

Comments are closed.