Doctor I Hate You

Doctor I Hate You

माधुरीला “भोळे नर्सिंग होम” मध्ये अँडमिट करून तो बाहेर पडला तेव्हा तो अस्वस्थ होता. काल रात्रीपासून तिला ओटीपोटात असह्य वेदना सुरू झाल्या होत्या पण डॉक्टर दोन दिवस रजेवर होते आणि डॉक्टरांच्या गैरहजेरीत नर्स किती मदत करू शकतील? याची अजिंक्यला कल्पना नव्हती. तसेही इतक्या मध्यरात्री अशा अवस्थेत घराबाहेर नेऊ नये रात्री निशाचर फिरत असतात त्यांची नजर पडायला नको असे त्याची आई म्हणाली. अर्थात असल्या थोंताडावर त्याचा विश्वास नसला तरी बोला फुलाची गाठ पडलीच तर म्हणूनच तो अस्वस्थ होता. त्याच्या आईने माधुरीला कोमट पाण्याने शेक दिला. तिच्या पोटावरुन हळुवार हात फिरवत तिला धीर देण सुरू ठेवलं. त्याचे बाबा गजाननराव हॉलमध्ये येऱ्या झाऱ्या घालत होते. तर बहीण केतकी अर्धवट झोपेत “दादा, वहिनीला बर वाटलं का रे अस विचारत होती.” दोन अडीच तास अस्वस्थतेत गेले. पहाटे त्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन लावून तिला आणत असल्याची सूचना दिली. तो, आई आणि माधुरी दहा मिनिटात हॉस्पिटलला पोचली.

डॉक्टरांनी नर्सला दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ती पोचताच, तिला admit करून घेत सलाईन लावण्यात आली आणि तिला पेन किलर देण्यात आलं. नर्सने तिच्या पोटावर आधी हात ठेवत आणि नंतर टेथास्कोप लावून बाळाची हालचाल तपासली. ती माधुरीकडे पाहून हसून म्हणाली, “तुमच्या मिस्टरना बाहेर जायला सांगा. आपण तुम्हाला तपासू, बेबीची मुव्हमेंट चांगली आहे काळजी करण्यासारखं काही नाही.” त्याने ते ऐकलं आणि तिचा हात हातात घेत तो म्हणाला, “Madhu don’t worry doctor will come soon,we are waiting outside.” ते ऐकताच नर्स त्याच्याकडे पहात म्हणाली, Can’t you believe on us? it’s our routine job. Doctor will certainly come but till then we will manage the situation.”

तसं तो काही न बोलता बाहेर पडला. त्याच्या बोलण्याने नर्स दुखावली आहे ते त्याच्या लक्षात आलं. त्याची आई नर्स जवळ जात म्हणाली, “बाई त्याच मनावर घेऊ नका तो थोडा घाबरला आहे म्हणून तस म्हणाला. मी तुमची माफी मागते.” “राहू द्या हो ताई, तुम्ही माफी मागण्याचा प्रश्न नाही, पण तुम्ही पहाताय ना? तुमची सुन आल्या बरोबर आम्ही त्यांना ट्रीटमेंट सुरू केली आणि तुमचा मुलगा उगाचच डॉक्टर येतील घाबरू नको अस माझ्या समोरच तुमच्या सुनेला सांगतोय, राग येणारच ना? पेशंट रात्री अपरात्री येतो तेव्हा प्रत्येक वेळी डॉक्टर हजर असतातच असं नाही आणि अनुभवाने आम्ही डिलिव्हरी कशी करावी हे शिकलोच आहोत. बऱ्याचदा डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आम्ही निभावून नेतो. एखादी केस क्रिटिकल असेल तर आम्ही सरांना लगेचच बोलावून घेतो, त्यांच्या पुढाकाराने काम सोप्पे होते.इतर वेळेस आम्ही स्टाफच सर्व निभावून नेतो पण यांना कोण सांगणार?” “मावशी, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते मग तर झालं. “माधूरी म्हणाली.
त्या नर्सने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली,”मावशी म्हणतेस आणि माफी मागतेस. मावशीची कुणी माफी मागत का? नाही ना, आता फक्त थोडी कळ काढ, मी अँनिमा दिला आहे. थोड्या कळा येतील पण लवकरच तू मोकळी होशील.” “बेटा, आता दुखतंय का पोटात,थोडं कुशीवर पडण्याचा प्रयत्न कर. बरं वाटेल, मी थांबू का तुझ्याकडे?” माधुरीने त्यांचा हात घट्ट पकडला,”आई, तुम्ही थांबा ना, please.” त्यांनी नर्सकडे पाहिलं. नर्सने होकारार्थी मान डोलवली. “बरं बेटा मी आहे हो तुझ्या जवळ. अजिबात काळजी करू नको तो गजानन सगळं काही ठीक करेल.” तशा अवस्थेत माधुरीला हसू आलं,”आई तुमचे गजानन बाहेर आहेतच मग मी काळजी का करू?” त्यांचं बोलण ऐकून नर्स हसू लागली.
वंदना नर्सकडे पहात म्हणाली,”ताई पाहिलत माझी सून किती खेळकर आहे.” नर्स गोड हसली, “होय तर खरंच तुमची सून खेळकर तर आहेच पण समजूतदार देखील आहे.” अर्थात हा टोमणा अजिंक्यला होता पण अजिंक्य त्या रूम मधून मगाशीच बाहेर पडला होता ते बरेच झाले.

अजिंक्यच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.तो रिसेप्शनला बसलेल्या बाईंना म्हणाला, “मॅडम, सर किती वाजता येतात?” “गोखले,आम्ही तुमचा फोन आला तेव्हाच सरांना कळवलं आहे, ते अजून घरी पोचले नाहीत,तरीही तासाभरात सर येतील.तुम्ही रिलॅक्स व्हा आमच्या स्टाफला प्रेग्नन्सी केस हँडल करण्याची चांगली प्रॅक्टिस आहे.”
तरीही तो अस्वस्थेने फिरत होता. त्यांचं बोलण सुरू असतांनाच, लेबर रूम मधून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला,आणि तो जास्तच गोंधळात पडला,” सिस्टर अजून कुणी ऍडमिट होतं का? नाही म्हणजे बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय म्हणून—.” तो तिथच अस्वस्थ येऱ्या झाऱ्या घालत होता इतक्यात त्याची आई वंदना गोखले बाहेर आली, “अजिंक्य,अभिनंदन, तू बाप झालास , छोकरी झाली?” “आई तू पाहिलेस का? म्हणजे नक्की छोकरीच ना!, पण डॉक्टर तर म्हणाले होते —-“
“अरे,माधुरीची सुखरूप सुटका झाली ना, पहिली बेटी धनाची पेटी. असं वाकड तोंड करू नको जा, तिला भेट, बघ बिचारी आतुरतेने वाट पहात असेल.”
तो माधुरीला भेटायला गेला, माधुरीच्या जवळ, स्वच्छ कपड्यात बांधलेलं गोंडस बाळ ठेवलं होतं. माधुरी त्याच्या इवल्याश्या टाळूवरून हळुवार हात फिरवत होती. तो तिच्या जवळ स्टूलवर बसला. तिचा हात हाती घेत म्हणाला, “Madhu Congrats, are you alright? We have a baby girl, but do you remember What doctor Muzumdaar told us after the second sonography? तिच्या चेहऱ्यावर त्याच्या बोलण्याने वेदना उमटली. सारी रात्र तीने तळमळून काढली होती आणि तरीही अजिंक्य त्या बाबत सिरीयस नव्हता. “Ajinkya, What are you saying, do you know? We have a pretty girl and still you are unhappy?”
“No dear I am not, but how Dr. Mujumdar, a doctor having Thirty years experience can be wrong?” “अजिंक्य! हे सर्व आताच बोललं पाहिजे का? मी खूप आनंदी आहे. आपल्याला पाच वर्षांनी बाळ झालं, आई बनण्याचा माझं स्वप्न पूर्ण झालं.अजून तुला कांय हवं?” “Sorry darling, extremely sorry.” त्याने हाताची तर्जनी मुलीच्या हाती दिली. मुलगी तिच्या इवल्या हातांनी बोट धरण्याचा प्रयत्न करत होती. नर्स तिथे आली आणि म्हणाली, “सर तुम्ही बाहेर थांबता का? बाळाला दूध पाजयचं आहे.” “Yes sure, carry on ,I will go, sorry Mam I did not want to hurt you.” “Ok, alright.”

तो तिचा निरोप घेऊन बाहेर पडला. त्याच्या मेंदूत मात्र विचारचक्र सुरू झालं, हे कसं शक्य आहे, जर डॉक्टरांनी पाचव्या महिन्यात सोनोग्राफी केल्यानंतर, “कॉंग्रेट्स मिस्टर गोखले तुम्ही मुलाचे बाप होणार आहत.” असे स्पष्ट सांगितले होते आणि आता तरीही.. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सुरवातीपासून भ्रमात ठेऊन फसवणुक करणं गुन्हाच नाही का? तो स्वतःशी बोलला, “नाही, नाही डॉक्टरांना याचा जाब मला विचारावाच लागेल.”

तो बाहेर आला तेव्हा बहीण केतकी त्याचा हात हाती घेत म्हणाली, “Mr. Father, Congrats, You are Dad of my pretty doll, Aren’t you happy?”
तो हसला, “of course, I am.” त्यांने केतकीच्या पाठीवर कौतुकाने थोपटले. “आईच बाबांना तस सांगत असताना मी ऐकलं.” गजाननराव त्याच्याकडे पहात हळू आवाजात म्हणाले, “तुझी आई म्हणत होती तू नर्व्हस आहेस म्हणून, हे बघ अजिंक्य तुला माहिती आहे किती प्रयासाने तुम्हाला बाळ झालं आणि अशा सिच्युएशन मध्ये तू तिच्या समोर अस वागतोस हे काही बरोबर नाही. माधूरीला काय वाटेल ह्याचा तरी विचार करायचास?”

“बाबा, प्लीज इनफ, आपण घरी गेल्यानंतर बोलू.” अजिंक्य त्यांच्या हातावर हात थोपटत म्हणाला. केतकीला बाळ पहायची घाई झाली होती, “दादा,मी पहायला जाऊ का रे? मला तिला आत्ताच बघायच, just after birth, how does she look.” ती त्या स्पेशल रुमच्या दिशेकडे पहात म्हणाली. “अग हो हो,थोड थांब,त्या सिस्टर म्हणाल्या त्या बाळाला दूध पाजणार आहेत.”अजिंक्य तीची उत्सुकता पहात म्हणाला. “मग तर मला गेलच पाहिजे, I must see how she manage to suck milk.आई,जाऊ का?”
केतकीची ती उत्सुकता बघून रिसेप्शनला बसलेल नर्स म्हणाली, “जा तुम्ही, पण आधी हात सोप ने स्वच्छ धूवा. हात कोरडे करा.”

केतकी आणि तिची आई दोघी आत गेल्या तस अजिंक्य दबक्या आवाजात बाबांना म्हणाला, “I spent more than two-three lakhs for her treatment, he assured me that it will be male baby and now..” खरं तर त्याला डॉक्टर मुजुमदार यांचा राग आला होता. तो हळू आवाजात म्हणाला, Doctor I hate you, you can’t keep your promise.”affiliate link

ते त्याच्या बाबांनी ऐकलं की नाही न कळे पण ते त्याच्या मांडीवर हात ठेवत म्हणाले, “बेटा विज्ञानाच्या पलिकडे असणाऱ्या गोष्टी माणसाला नाही कळत, तुझे डॉक्टर देव नाहीत, त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत तुला बाळ दिलं त्यांचे आभार मानण्या ऐवजी तू असा विचित्र वागशील अस मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं. तेव्हा मुलगा, मुलगी यावरून नाराज होण्यापेक्षा पाच वर्षांनी आणि त्या गणेशाच्या कृपेने तुला मुलगी झाली आणि तीस वर्षांनी घरात बाळ आल या पेक्षा सुख काय हवं?” गजाननराव आपल्या मुलाला म्हणाले.

“तुम्ही असाल देव आणि दैववादी. मी नाही, I know for every problem there is a solution in science. I personally believe it.” अजिंक्य त्यांच्याकडे पहात म्हणाला. वंदना आणि केतकी बाहेर येताच,केतकी त्यांच्याकडे येत म्हणाली, “किती छान दिसते, तिचे गाल एकदम गुलाबी गुलाबी आहेत,आणि डोळे निळसर आहेत. Baba I like her. Very cute.just my barby.”

गजाननराव हसत म्हणाले,”मग केतकी, तुझी भाची काय म्हणाली? आजोबांना पाठवून दे म्हणाली की नाही!” ते आणि अजिंक्य बाळाला पाहायला गेले. नातीचं कौतुक करत ते अजिंक्यला म्हणाले, “मला नात मनापासून आवडली,थोडी मोठी झाली की ती आमच्या बेडरूम मध्ये झोपणार, होय ना लब्बाडे? येशील ना आजोबाकडे? माधुरी तू रात्रभर जागून दमली असशील तू आता निवांत झोप मी थोड्या वेळात तुला खीर घेऊन येतो.” ती गोड हसली. अजिंक्यने तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला.”मधू, मी निघू ना, तुझ्या मम्मीला कळवलेलं नाही, दुपारी त्यांना घेऊन येतो.” ती हसली, “अरे केतकी ताईने व्हिडिओ कॉल करून त्यांना बाळ दाखवलं, ते निघाले असतील,इतक्यात येतीलच. तू रात्री झोपला नाहीस, जा तू आराम कर. आणि बाबा, माझी मम्मी आणि पप्पा खीर आणि सूप घेऊन येतायत, तुम्ही सुद्धा घरी जा आणि आराम करा.संध्याकाळी या माझ्या सोनूलीला पाहायला.”

दोघ निघाले. अजिंक्य आता सावरला होता, पण त्याचं अतिविचारी मन मात्र त्याला शांत बसू देत नव्हतं, पाचव्या महिन्यानंतर जेंडर बदल कसा होतो याची शहानिशा केल्या शिवाय तो नक्कीच शांत बसणार नव्हता. काही माणसांना शंका घेत दुःख विकत घ्यायची हौस असते त्याला काय उपाय? दुसऱ्या दिवशीच अजिंक्यने डॉक्टर मुजुमदार यांची अपॉइंटमेंट घेऊन भेट घेतली. माधुरीच्या मेडिकल फाईल दाखवत तो म्हणाला,” Doctor, I am sorry to ask you but I don’t understand how it happened, when you said Sonography report shows it’s a male baby.” “हे पहा गोखले, अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी मधले निष्कर्ष हे नव्वद टक्के बरोबर असतात. गर्भाच्या हृदयाचे ठोके, ताईंचे वाढते वजन, पोटाचा आकार ही बाह्य लक्षणे यावरून हे आम्ही सांगतो पण दहा टक्के निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. खर तर आम्ही तुम्हाला वाढणार गर्भ मुलगा आहे की मुलगी हे सांगणे चुकीचे आहे. कायद्याने त्याला मान्यता नाही. पण तुमच्या सुसंस्कृतपणावर आमचा विश्वास होता म्हणून आम्ही सांगीतले. तुमची केस अशीच आहे,गर्भाची पोझिशन पाहून मी तसे म्हणालो होतो.

जेव्हा तुम्ही IVF(आयव्हीएफ) साठी तयार झालात तेव्हा त्यातील शक्यता तुम्हाला सांगितल्या होत्या. फरटीलीटी ट्रिटमेंटमध्ये जेंडर नक्की करण्याची जास्त शक्यता असते ज्यामध्ये क्रोमोसोम्स किंवा गुणसूत्रे जास्त अचूक ओळखता येतात पण तरीही शंभर टक्के अचूक खात्री कोणीही देऊ शकत नाही. देवाचे आभार माना की ताईंना जुळे किंवा तिळे झाले नाही. या ट्रीटमेंट दरम्यान त्यांनी किती सहन केले त्याची तुम्हाला कल्पना नाही. तेव्हा तुम्ही हे अस उगाचच अपसेट होणं साहजिक असलं तरी त्यासाठी कुणाला ब्लेम करणं योग्य नाही. निसर्गाने जे दान तुमच्या पदरी दिल त्याचा अभिमान बाळगा आणि मुलगी झाली म्हणून दोष द्यायचा असेल तर नशिबाला द्या.”

“Doctor I have due respect for you but, I have spent enough money only on your firm word, only because I thought we will have a legal male heir. डॉक्टर, मी आपल्या शब्दांवर विश्वास ठेवला होता. आता तुम्ही तुमचा शब्द फिरवता आहात.”

“Mister Gokhale get out of my cabin, it was medical assumption, केवळ सौजन्याने मी तुम्हाला याच स्पष्टीकरण दिलं आहे. या पेक्षा वेगळ मी काही सांगू शकत नाही. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करु शकता, यापुढे बाळाच्या जेंडर संबंधीत कोणतेही स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही आणि तुम्ही त्या बाबत विचारणा करु नये, is that clear?”

अजिंक्य डॉक्टरांच्या परखड बोलण्याने भानावर आला. “Sorry doctor, मी इमोशनल झालो होतो, म्हणजे मला फक्त असं का घडलं असावं ते जाणून घ्यायच होतं, I do not mean to blame you at all. Very sorry if I have hurt you” “No way, please leave my cabin immediately.” डॉक्टर संतापून म्हणाले.
डॉक्टरांची कॅन्सलटिंग रूम सोडतांना त्याच्या मनात अपराधी भावना होती, डॉक्टरांवर अविश्वास दाखवून त्यांनी माधुरीच्या मातृत्वाचा अपमानच केला होता. गेले सात आठ महिने बाळासाठी तिने जे भोगले त्याची यत्किंचितही जाणीव नसल्या प्रमाणे तो वागत होता. सुशिक्षित असूनही मुलगाच हवा या अविचारात अडकलेला तो एकटाच नव्हता. आजही महाराष्ट्रातील खेड्यातच नव्हे तर पूणे,औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, बीड सारख्या मोठ्या शहरात अगदी मुंबईत अनेक हॉस्पिटलमध्ये गर्भलिंगनिदान करून गर्भ मुलीचा असल्यास अनधिकृतपणे गर्भपात केला जातो. यातून अचूक निदान न झाल्याने जर पूर्ण दिवस झाल्यानंतर मुलगी जन्मली तर तिला कचराकुंडी दाखवली जाते, प्रवाहात सोडली जाते किंवा तीला जंगलात टाकल्याने ती लांडग्यांची भक्ष होते.

रानातील लांडगे परवडले, पण माणसातील लांडग्यांच काय? यात त्या बाळाच्या वडिलांबरोबर त्यांच्या घरातील कुटुंबीय आणि सन्माननीय डॉक्टर, नर्स, सामील असतात ही शोकांतिका नाही तर काय? ज्यांनी जीव वाचवायचा तेच जीव घेऊ लागले तर?

माधुरीला भेटायला तिची मम्मी,पप्पा आले तेव्हा ती खुप आनंदात होती. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला की ते तिला माहेरी घेऊन जाणार होते, खर तर पाहिलं बाळंतपण माहेरचं पण डॉक्टर मुजुमदार यांची ट्रीटमेंट सुरू असल्याने त्यांनी तिला माहेरी नेण्याचा मोह टाळला होता. डिलीव्हरी झाल्यावर आता तिला नेण्यात काही अडचण नव्हती. त्या दिवशी मिस्टर पेंडसे चक्क चार तास थांबले. मुलीचं आणि नातीचं माहेरी जंगी कौतुक होणार यात वादच नव्हता. निघतांना त्यांनी माधुरीला काळजी घे अस म्हणत निरोप घेतला.

तिची डिलीव्हरी झाल्यानंतर जे अजिंक्य म्हणाला त्यामुळे ती disturb झाली होती. अजिंक्यच्या मनात नक्की काय आहे तेच कळत नव्हतं. सुशिक्षित असूनही मुलगी झाल्याबद्दल त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. अजिंक्य जेव्हा माधुरीला भेटायला यायचा तेव्हा तेव्हा क्षणभर ती भयाने गोठून जायची “हा” माझ्या बाळाचं काही बरे वाईट तर करणार नाही ना? तो जेव्हा त्या बाळाकडे पहायचा त्याच्या नजरेनं तिचं काळीज धडधडू लागे. ती बाळाला अलगद स्वतःकडे ओढून घ्यायची. बऱ्याचदा बाळ रात्री जागत असे त्यामुळे माधुरीचा सकाळी किंवा दुपरी अचानक डोळा लागे.

एक दिवस अजिंक्यची आई तिच्याजवळ दुपारची थांबली होती बाळ दूध पीत होत म्हणून वंदना पेपर वाचत बसली होती. इतक्यात माधुरी अर्ध झोपेत हळू आवाजात असंदब्ध बोलू लागली, “Ajinkya don’t touch my baby, don’t touch her. If you don’t want my baby, I will leave your house but please don’t kill her. Please go away. I want my baby, I gave birth to her. She is my beloved, she is my heart. I promise you I will not bother you. I will not ask for any money.” तिने बाळाला घट्ट धरलं तस बाळ रडू लागलं. वंदनाने ते सगळ ऐंकलं तस तीने काळजीने माधवीच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला. माधुरी दचकली, “Ajinkya please, please..” “माधुरीsss, माधुरीssss बाळा मी आहे.” माधुरीने डोळे उघडून पाहिले आणि सासूचा हात घट्ट धरला. ती बरीच घाबरली होती, अंग घामाने भिजलं होत. “आई इथे अजिंक्य आला होता का?” तिने विचारलं. “नाही ग बाळा,इथे कुणीही आलेल नाही, मीच कधीपासून बसले आहे.” “आई बहुधा मला स्वप्न पडल असाव, तो माझ्या छकुलीला माझ्या जवळून ओढून घेत होता. आई तुम्ही माझ्या सोनुलीला त्याच्यापासून वाचवा.”

“माधुरी तू निश्चींत रहा, आपल्या सोनुलीला कोणी नेणार नाही याची खात्री बाळग. मनात भलते सलते विचार आणू नको आणि अजिंक्य तर तिचा बाप नाही का? कोणी बाप आपल्या मुलीला इजा करेल का? तुझ आपलं काहितरीच. मी आहे ना? आणि अजिंक्यचे पप्पा, त्यांना किती आनंद झालाय ठाऊक आहे ना?” “आई,खरचं अस काही नाही ना होणार? मला सारखी भिती वाटते.” “नाही ग बाळा, तुझी भिती निरर्थक आहे. अजिंक्य रागाच्या भरात काही बोलला असेल पण म्हणून काही- – -“

दोन दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळणार होता, ती थेट माहेरीच जाणार होती आणि त्यामुळे ती आनंदात होती. बाळ निजलं हे पहात आंघोळ उरकण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली, सासू तीचा सकाळचा ब्रेकफास्ट आणण्यासाठी आणि स्वतःच उरकण्यासाठी घरी गेली होती. तीने आंघोळ आवरली आणि ती बाहेर आली, तिच लक्ष बेडवर गेल तर तिथ बाळ नव्हते, तिच्या मनात चर्र झाल, तरी क्षणभर वाटलं नर्स कपडे बदलण्यासाठी घेऊन गेली असावी दोन चार मिनिटे कोणीच आलं नाही पाहून तिने बेल दाबली तशी नर्स लगबगीने आली. “बोला मॅडम, काही हवंय का?” “सिस्टर माझं बाळ औषध द्यायला नेलं आहे का?” तिचा प्रश्न ऐकताच सिस्टर गोंधळली, “मॅडम तुमचं बाळ आम्ही नाही नेलं ते तर तुमच्या बाजूला झोपलं होत.” “सिस्टर,खरंच तुम्ही माझं बाळ नाही पाहिलं तर कुठे गेलं? सिस्टर आधी तिला शोधा.” अस म्हणत ती जमिनीवर कोसळली. सिस्टरने वॉर्ड बॉय ला इंटर कॉम वरून मोठ्याने सांगितले, “महेश, महेश लवकर इथं ये, अर्जंट.” तिचेही पाय लटपटू लागले. तो येताच,त्यांनी घडला प्रकार पाहून ,दोघांनी माधुरीला आधी बेडवर झोपवले आणि सिस्टरने तिची नाडी तपासली. ती ठीक चालत आहे पाहून तिने डॉक्टरना फोन करून घडली घटना सांगितली.

डॉक्टर येताच त्यांनी सिस्टर आणि वॉर्ड बॉय यांना फैलावर घेतलं. “झोपा काढता का इथे? महेश तू कुठे होतास? बसला असशील कुठेतरी तंबाखू मळत, गेट लाँस्ट,आधी सगळीकडे शोध घ्या.”

बाहेर निघतांना त्यांनी अजिंक्य गोखलेला फोन लावून तातडीने येण्याची सूचना केली. थोड्या वेळात वंदना नास्ता घेऊन आली आणि इथला प्रकार पाहून भांबावून गेली. डॉक्टरांच्या प्रयत्नाने माधुरी शुद्धीवर आली होती पण आपले बाळ जवळ नाही पाहून ती रडू लागली.वंदनाने तिला जवळ घेत धीर दिला, “माधुरी रडू नकोस,हे बघ डॉक्टर स्वतः शोध घेत आहेत लवकरच बाळ सापडेल.”
अजिंक्य घाई गडबडीत आला, त्याला पाहताच माधुरी ओरडत म्हणाली “अजिंक्य सांग माझी सोनूली कुठे नेली?”
“Madhu I really don’t know, I left the house just before half an hour when doctor mujumdar called me. Don’t worry we will find our baby.” पण माधुरी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती, ती आक्रोश करत म्हणाली, “अजिंक्य मला माझं बाळ दे, मला काही सांगू नको. तू दुष्ट आहेस, माझ्या बाळाचं काही बरं वाईट केलंस तर तुला मी सोडणार नाही.”

अजिंक्य तिच्याकडे पहातच राहिला त्याच्या बायकोच हे रूप त्याला नवीनच होतं. यापूर्वी ती कधीही इतक्या रूडली त्याच्याशी बोलली नव्हती. वंदनाने कशीबशी तिची समजूत काढली आणि अजिंक्यला बाहेर पाठवून दिले. सगळेच तणावाखाली होते.माधूरीचे वडील पेंडसे सपत्नीक आले.अजिंक्यने त्यांना फोन करून ही शॉकिंग बातमी सांगितली होती. ते आपल्या मुलीवर अचानक उद्भवलेल्या संकटाने काळजीत होते. हॉस्पिटल गाठताच त्यांनी आपल्या जवयासह डॉक्टर मुझुमदार यांची भेट घेतली. डॉक्टरांनी जो काही प्रसंग घडला त्याबद्दल माफी मागितली पण त्यांना खात्रीपूर्वक सांगितले,”पेंडसे साहेब झालं ते नक्की चांगलं नाही अखेर आमच्या Hospital Reputation चा प्रश्न आहे पण तुम्ही खात्री बाळगा की बेबीच्या केसालाही धक्का लागणार नाही. लवकरच पोलीस येतील आणि छडा लावतील.”

डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये बसवलेले C.C. T.V. कॅमेरा पेंडसे यांना दाखवताच त्यांची खात्री पटली. ते म्हणाले,” या प्रसंगाने मी ही तणावाखाली आहे त्यामुळे DVR चा पासवर्ड मी विसरलो आहे. आमचा ऑपरेटर येताच फुटेज पाहता येईल आणि आपल्याला बाळाला कोणी नेले त्याचा trace लागेल. पोलीस इतक्यात पोचतीलच तुम्ही निर्धास्त असा.”

डॉक्टरांची भेट घेतल्याने अजिंक्यने टेन्शन कमी झाले तरी माधुरी समोर जाण्याची त्याची हिम्मत होत नव्हती, तो माधुरीच्या बाबांना म्हणाला “पप्पा तुम्हीच तिची समजूत काढा, तिला माझाच संशय येत आहे. माझ्या मुलीला मीच गायब करेन का? पण मी तिच्या समोर चुकीने काही म्हटले आणि ती मलाच गुन्हेगार समजत आहे. पप्पा please मला ती काही म्हणाली तरी हरकत नाही पण तिच्या मनावर काही विपरीत परिणाम होता नये.” पेंडसेंनी त्याचा खांदा थोपटून त्याला दिलासा दिला.

पेंडसेंनी माधूरीची भेट घेत तिची समजूत घातली.”बेटा भोळे हॉस्पिटलच reputation चांगलं आहे डॉक्टर मुझुमदार शहरातील प्रसिध्द डॉक्टर आहेत, पूर्ण हॉस्पिटलमध्ये survival vigilance systems आहे भरोसा ठेव लवकरच तुझी सोनूली तुझ्या जवळ असेल.”
ती स्फुंदत त्यांचा हात घट्ट धरत म्हणाली, “पप्पा हे तुम्ही हे खरं सांगताय ना?” “होय बेटा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी म्हणतो तसच होईल.तू निश्चिंत रहा. फक्त थोडा धीर धर. स्वामी समर्थ सर्व ठिक करतील.” त्यांनी हात जोडून वर पहात नमस्कार केला.

डॉक्टरांच्या ओळखीने तातडीने चक्र फिरली, Crime branch team आली आणि त्यांनी डॉक्टरांचे हॉस्पिटल व्हिडिओ फुटेज तपासले आणि अवघ्या दोन अडीच तासात एका जोडप्याला बाळासह डॉक्टर इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये हजर केल, व्हिडिओ फुटेज पाहिल तेव्हा इन्स्पेक्टर माने यांनी एक जोडपे संशयितपणे फिरतांना डॉक्टरना दाखवले. तेव्हाच डॉक्टर मुजुमदार यांनी त्या जोडप्याची Medical History इन्स्पेक्टर माने यांना दाखवली.

डॉक्टर मुजुमदार यांना आठवले, अग्रवाल आणि त्यांची पत्नी ट्रेटमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी आले होते पण मिसेस अग्रवाल यांच्या गर्भाशयात दोष असल्याने त्या स्वतः IVF तंत्रानेही आपल्या बाळाला जन्म देऊ शकत नव्हता आणि Surrogacy उपचार त्यांना परवडणारा नव्हता. डॉक्टरांनी त्यांना child adoption मार्ग सुचवला होता, पण मिसेस अग्रवाल तेव्हा तयार नव्हत्या. आणि आता मुलाच्या अनामिक ओढीने त्या नको तो गुन्हा करून बसल्या. माधूरीला तिचे बाळ मिळाले. तिने मुलीला जवळ घेत तिचे मुके घेतले.”सोनुले कशी ग तुला एकटीला टाकून मी गेले. पून्हा नाही जाणार तुला एकटीला टाकून.” तिच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली होती. ते अश्रू पुर्नभेटीचे होते. आणि अजिंक्यवर उगाचच घेतलेल्या पश्चातापाचे देखील. त्याचा हात जवळ ओढत तिने बाळाला त्याच्या हाती दिले.अजिंक्यने आपल्या मुलीचा हळुवार पापा घेतला. “अजिंक्य मला माफ कर मी उगाचच…” त्याने बाळ तिच्या कुशीत ठेवत तिच्या ओठावर हात ठेवत काही न बोलण्याची खुण केली. तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत तो ओठातच हसला.”

गजाननराव आणि वंदना गोखले ते दृष्य दूर उभे राहून पहात होते. त्यांचा आनंदाला पारावर नव्हता. पेंडसे दाम्पत्य त्यांच्या शेजारी उभे होते. गजाननरावांनी पेंडसेचे हात घट्ट हाती धरत त्यांना विश्वास दिला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली ते खऱ्या अर्थाने दोन कुटुंबाचे मनोमिलन होते. ते पाहून दोन विहिणी एकमेकींना विश्वास देत पुन्हा भेटल्या. नव्याने नात्याची ओळख पटत होती. दोन दिवसांनी डिस्चार्ज घेतांना अजिंक्य डॉक्टर मुजुमदार यांना भेटला त्यांची माफी मागत म्हणाला, Doctor I am really sorry for my behaviour. I was impatient to know what’s wrong behind the situation.But now I realized for the mother there is no difference between him or her,baby is baby. त्यांनी डॉक्टरांच्या हाती बर्फीचा बॉक्स ठेवला त्यातील एक बर्फीचा तुकडा अजिंक्यला भरवत डॉक्टर म्हणाले, ,”या बर्फी सारखी तुमची लेक तुमच्या कुटुंबात आनंद पेरेल याची खात्री बाळगा. गोखले तुमच्या मिसेसने ट्रीटमेंटला प्रतिसाद दिला म्हणून तुम्हाला बाबा होता आलं. बावीसाव्या शतकात मुलगा-मुलगी असा भेदभाव बाळगू नका. मुलीला मुलासारखे प्रेम द्या. या आता आणि एक लक्षात घ्या डॉक्टर हा देव नाही तुमच्या सारखा हाडा मासाचा माणूसच आहे. त्याला देव बनवून नको त्या अपेक्षा बाळगू नका. All the best for your further.” अजिंक्यने डॉक्टरांची पून्हा क्षमा मागीतली. पेंडसेंनी भोळे हॉस्पिटल स्टाफला गिफ्ट म्हणून पॉकेट दिले आणि ते निघाले. गोखले आणि पेंडसे कुटुंब त्या प्रसंगाने आनंदात न्हाऊन गेले.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “Doctor I Hate You

  1. israelxclub.co.il

    May I simply say what a relief to uncover somebody that really understands what theyre discussing over the internet. You certainly know how to bring a problem to light and make it important. More and more people really need to check this out and understand this side of the story. I was surprised that youre not more popular because you certainly have the gift.

Comments are closed.