आणि वादळ माणसाळले भाग ४

आणि वादळ माणसाळले भाग ४

आई इल्यापासून घरातल्या कामांका माका मदत जावक लागली, आईनं ह्यांच्या आवडीचे शेवये, खापरोळे करून घातलेन. तवसा हाडला होता त्याचा धोंडस केलेन. दर दोन दिवसान एखादो नवीन पदार्थ जावक लागलो. मुला खुश झाली. राणी आजीच्या बाजूक बसान तिच्या वांगडा गजाली करूक लागला. लहर इली तर आई, समीर काय करता? कोण कोण पाहूणे येऊन रवतत? बघूक जाय. किचन मधलो पोरगो काय करता बघून येय.

एक दिवस आईन राणी कडसून तवसा किसून घेतलेन. स्वतः लापशीचो रवो खमंग वास येयसर तुपावर भाजून घेतलो, गूळ, वेलची, जायफळ आणि चून आणि हळदीचा पान घालून शिजत ठेवलेन. बागेत धोंडसाचो वास पसरलो. त्या दिवशी एका कस्टमरनी समीराक विचारला, “ओ मालक, कसला तरी छान वास येतोय, आपल्या हॉटेलमध्ये बनवतात का?” समीरने घरी जाऊन एक डिश आणून त्याला दिली तर तो किती पैसे विचारूक लागलो. समीरने त्याची समजूत काढली, “अहो साहेब! माझ्या आजीने बनवल, याचे पैसे नको.” पण कस्टमरने, आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आजीला पाचशे रुपये दिले. आजी मानी, म्हणाली, “आमी पाहुण्याकडून असल्या वस्तूचे पैसे नाय घेणव.” तर कस्टमर आजीच्या पाया पडला आणि म्हणाला, “तुम्ही मला आई सारख्या भेट म्हणून घ्या.” आईने मग आणखी एक प्लेट धोंडस त्याला खायला घातला. पण पैसै नाही घेतले. गंमतच मोठी.

आठ दिवसाक इलेली आई पंधरा दिवस रवली, शरद्याचो चार वेळा फोन इलो आवशिक धाड, सौरभ आठवण काढता. मदतीक येण्याविषयी ह्यानी विचारला त्या बद्दल काय विषय काढीना, ताकाक जावन भांडा कित्याक लपवा. मीच विचारलय, “रे ह्यानी तुझ्या नाय तर भावाशीच्या येण्याबद्दल विचारला त्याचा काय? इच्छा नसात त नाय म्हणा. पंधरा दिवस झाले, काय ता सांगून टाकला की तु मोकळो आणि ते मोकळे. ते काय तुमका फुकट बोलवणत नाय, तुझ्या भावाशिक त्यांनी सांगल्यांनी तसा.”



affiliate link

“गो आक्का, आमच्या घराकडली कामा सांडून कसा जमतला, फार तर दिवाळीत भाता कापून झाल्यावर आणि मार्च एप्रिल महिन्यात जमात, मे महिन्यात घराकडली कामा करुक व्हयी. लाकूड फाटो, झडी बांधणा, गोवर टाकणा, पत्यारो कोपऱ्यात टाकणा, कोपरे जाळणे, कामा दिसणत नाय पण फुरसत नसता. तुका काय म्हायत नाय! आता झालस बागकर पण शेत भात तुकाव ठाऊक आसा.”
“रे, मेल्या माका यादी कसली देत, मी अमेरिकेतसून येवक नाय! तुका काय सांगूंचा ता त्यांका सांग, ते मोकळे आणि तू पण मोकळो. तुझ्या भरवश्यावर रवाक नको, कसा?”
“आक्का ह्या कोडा घातलं, म्हणजे देवबागकर आमच्यावर नाराज, मी असा करतंय, दिवाळीत थोरल्याक धाडतय आणि मार्च ,एप्रिलात मी येतंय मात्र मे चो विश्वास धरू नको. आमची कामा पाठी सरली तर कोणी तरी येव.” चला एकदाचो मार्ग निघालो, दुपारी ह्या त्यांच्या कानावर घालूक व्हया मी उगाचच बोललय. आवस विचारूक लागली, “उमा ! कोणाचो फोन गो, कोणाशी बोला होतं इतको वेळ?” “तुझ्या लाडक्या झिलाचो फोन होतो, आवशिक धाड सांगत होतो. सौरभ आठवण काढता तुझी.” मी सांगलय. “मग झिलाक सांग, बग, कधी पोचती करता माका, आठ दिवसांच्या गजालीक इलय पंधरा दिवस होवन गेले. सून म्हणतली, आई सुख खाऊक रवलीहा. पाठचा कोणी बगूचा?” मी तिका सांगलय, “इतकी वर्सा मदत केलस मा, आणखी किती वरसा करशीत? त्यांचो संसार त्यांका सांभाळूक येवक नको? म्हणांदे काय म्हणतीत ता ,तुका कंटाळो इलो तर सांग, मगे नातवाक पोचती करूक सांगतय.”

चार दिवसांनी समीराक सांगलय, बाबारे, तुझ्या आजयेक घराक जावचा हा, वेळ काढ आणि पोचती कर, तो आजयेवर चिडलो, “वर्षभर थयच असतस तरी जावची घाय कित्याक मारतस? ते तुझे नातू मग आमी कोणाचे?” आजी काय उत्तर देतली, ती म्हणाली, “रे सोन्या, थय शेती हा, पुढचा पाठला बघूचा असता, तुमच्या बागेवरी नाय, एकदा शिपणा केलास की आठ दिवस जाग नाय घेतली तरी येता. मगे लावणी झाली की काम नसतला, तेवा महिनोभर रवाक येतय.” समीरान तिका न्हेवन सोडली. खूपसे मासे, थंडाची मोठी बाटली खावक असो बोचको घेवन गेलो. आदल्या दिवशी चिंगळा, सौंदाळे, हलवो याची रापण लागली होती. बरो मोठो वाटो गावलो होतो. मासे सुटे निटे करून फ्रीजरमध्ये ठेवून दिले होते. ता सगळा बांधून दिलय. मामी त्याका बघून एकदम खूश. म्हणाली, “किती वर्षानी इलस ता तरी आठवता काय तुका? आता बापयो दिसाक लागलस. येईत जा रे कधीतरी, नाय तर वळख कशी रवतली? आज रवतलं मा? रात्री गप्पा मारा, उद्या सकाळी निघ, चलात मा?” समीर हसलो, म्हणालो, “मामी, संध्याकाळी कस्टमर नाईट हॉल्ट घेवक येतत. त्यांका रात्रीचा जेवण, सकाळी गरम पाणी, चहा कॉफी, नाश्तो देवक व्हयो, आप्पांका भारी पडता, नाय तर नक्की रवलं असतंय.”



affiliate link

समीर, मामांचो निरोप घेऊन निघालो, तसा मामीन तांदळाचा बोचक्या आणून पुढ्यात ठेवला, “ह्या घेवन जा, स्कूटर आसा, तुका काय कपाळवरसून नेवक नको, दोन शेर भाकरीचा पीठ आसा ता शेवये करुक न्हे. ठाकुर भावोजींका शेवये आवडतत. दोन भोपळे आसतं,बघ एखादो घेऊन जा,जवलो घालून भाजी बरी जाता. तुझ्या हॉटेलात भाजी कर, नायतर वडे कर, छान जातत.”
“गे मामी, ह्या सामान खय ठेव आणि मी खय बसा? स्कूटर हाडलिहा रिक्षा न्हय. मी ह्या काय नाय न्हेणय, एक दिवस रिक्षा हाडतय. काय देतलास ता गोळा करून ठेव. उशीर झालो, आई काळजी करतली. चल, मी निघतय.” त्याने दोन्ही मामींच्या हातावर पाचशे, पाचशे रुपये ठेवले. दोन्ही मामा मामींच्या, आजीच्या पाया पडलो . निघतांना दोन्ही मामा, मामी, भावंडा रस्त्यावर सोडूक इली.

समीरच्या डोक्यात दर पंधरा दिवसांनी कायतरी नवीन खुळ येय आणि त्याची पूर्तता केल्याशिवाय त्याका चैन नसा. एक दिवस रात्री जेवताना ह्यांका म्हणालो, “आप्पा, आपण चार पाच माणसा बसतीत अशी फायबर बोट आणली तर भारी काम होयत,आपला बुकिंग वाढात. फायबर बोट चलवक एक पोरगो ठेवया, आपल्या रेस्टॉरंटमध्ये बुकिंग करतीत त्यांका फ्री आणि बाहेरच्या माणसांका तासाक चारशे, बघा किती गर्दी खेचतय ती!” हे म्हणाले, “रोज कायतरी नवीन काडतस, माणसा नको! तुझ्या आत्याक सांगलय, ती नाय म्हणाली, तुझ्या मामाक विचारलय तोव काय सांगणा नाय, होतला कसा? आणि प्रत्येक वेळेक नवीन भांडवल कुठून टाकतलस?” “त्याची चिंता सोडा, मी चौकशी केलय, कंपनी हप्त्यांवर फायबर बोट देवक तयार हा, पंचवीस हजार आगाऊ व्हये म्हणजे झाला.” समीरचो उपाय ऐकून हे म्हणाले, आधीच त्या “चिलरचो” हप्तो सूरू आसा, असो खर्च वाढवीत गेलस तर हप्ते भरूची मारामार होयत.”

“आप्पा, धंदो म्हटलो म्हणजे रिस्क इलीच, नवीन कल्पना राबवक व्हयी तरच उपयोग, नायतर हय लोक कित्याक म्हणान येतीत? आपल्या बँक खात्यावर पैसे आसत पण, “दुसऱ्याच्या पैशानच धंदो करूचो” अशी वाणी लोकांची म्हण हा. कर्ज घेतला की जबाबदारी कळता. तुमी अजीबात टेन्शन घेव नकात, माझा बरोबर नियोजन आसा.” फायबर बोट आणण्यासाठी मेरी टाईम ऑफिसची, तहसीलदार आणि ग्रामपंचायतीची परवानगी काढूची लागली, कसले कसले दाखले जमा करूचे लागले. बोटी बरोबर लाईफ जॅकेट खरेदी करुची इली. जाहिरातीचो बॅनर लागलो, नेहमी प्रमाणे पोलीस, कस्टम् ,तहसीलदार, असे कितीतरी जणांचे हात ओले करूचे लागले तेवा खय मुहूर्ताचो नारळ वाढवलो आणि बोट सुरु झाली. बापू घाडी बोट चलवक, बोट राखूच्या कामाक रवलो,. मनसेचो बाबा कांदळकर (शहरप्रमुख) उद्घाटन करुन गेलो, दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी इली. उद्घाटनाची क्लिप U tube वर अपलोड केली. मुंबईत WhatsApp करून क्लिपची लिंक धाडली.

“आता येणाऱ्या नवीन पर्यटकांसाठी निवती, सिंधुदुर्ग किल्ला, भोगवे पर्यंतची बोटींग करायची संधी एकाच छत्राखाली.” असो पोस्टर लागलो. गावात फेरी बोट वाले कुरकुर करूक लागले. “समीरान ह्या बरा करुक नाय,आपलो धंदो करूचो सोडून लोकांच्या पोटावर पाय देवक बघता.” बापू घाडयाक फितवूक लागले. एक दिवस बापू घाडी येऊन ह्यांका म्हणालो, “ठाकुरांनू गावतली माणसा उगाच माझ्या नावान कलागती करतत म्हणतत, बापू, बामणाची चाकरी सोड, आमच्याकडे कामाक रव, मुद्दाम आडवे येतत उद्या बोटीक काय झाला तर माझ्यावर येयत. तुमी कोण तो दुसरो माणूस बघा. वसाडीचे माका काम करूक देवचे नाय.”

समीराक कळला तसो रागाक इलो,. “काकांनू, कोण तुमच्या वाटेक जाता ता सांगा, नाय एकेकाची आय झवलय त माका विचारा? माझो दणको ठावक नाय त्यांका, दोन तासात आत नाय टाकलय तर बापाशीचा नाव लावचय नाय! असा भियान चलात.” तरी बापू घाडी सांगीना,शेवटी समीरान त्याका विठ्ठलाची शपत घातली तेवा कोळमकर, लाड, गावडो, गावकर, मारकुस अशी नावा बाहेर इली. डायरेक पोलीसाकाडे तक्रार बरी न्हय म्हणून समीरान सरपंच व्हिक्टरच्या कानावर घातला.





व्हिक्टर म्हणालो ,”सांजच्याक ये, त्यांका बोलवून घेतंय, उगाच वाईटपण नको.” समीर आणि हे, शरयूच्या घोवाक सोबतीक घेवन गेले. तासभर वाट बघून झाली तरी यांचो खय पत्तो नाय, शेवटी व्हिक्टर चिडीक येवन बोललो, “मायझये अजून येवक नाय, शब्दाक काय किंमत आसा की नाय? बा झवले ते, पुन्हा फोन करून सांगण्याची ह्यांची लायकी नाय. तुमी पोलीस पाटलाकडे लेखी तक्रार देवा, मगे बघूया काय म्हणतत ता.” समीर, सरपंच व्हिक्टराक म्हणालो, “काका ती डुकरा ऐकतीत असा माका नाय वाटणा, त्यांका चरबी इलीहा, पण माझ्या बोटीचा नुकसान झाला तर मी त्यांका सोडूचय नाय, त्यांनीच धंदो करूचो ही मोनोपोली बरी न्हय, त्यांनी त्यांचो धंदो करूं दे, मी पण लायसन काढलय. पैसे भरलय, मी काय चोरून धंदो करतय काय?”

ह्यांनी समीराक चूप केल्यानी, “आपण कुळवाड्यांवरी “गाळी” घालू नये, त्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय? काका आणि मी असतांना असा एकेरीवर येव नये.”
समीरचा डोक्या आदीच गरम, तो म्हणालो, “तुमचो असो शांत स्वभाव म्हणानच लोक बोट घालून बगतत, रिगला तर रिगला, तुम्ही खपवन घेशात, मी नाय. काय करतीत? मारतीत मा, माझे हात केसा उपटूक नाय जाऊक.” पोलीस पाटील येणत नाय बघून ते वाटेक लागले.”

ते जावक निघतत तवसर कोळमकर गावच्या पोलीस पाटलासोबत इलो, इतर कलागती होतेच. सरपंचांनी पोलीस पाटलाक विषय सांगितलो. पाटील समीरकडे बघून म्हणालो, तुमचा हॉटेल, लॉज चलता तरीही बोट कित्याक व्हयी, सगळा तूच केलस तर बाकी पोरांनी काय आपली आय घालूची.” समीर म्हणालो, “धुरी काका त्यांनी काय करूचा तो त्यांचो प्रश्न. मी एकपण गोष्ट बिगर लायसन करूक नाय. सगळी रितसर परवानगी घेऊनच धंदो करतय, यांचो प्रश्न खय इलो? मी कोणाकच वाटेत अडवूक जाणय नाय की खोटा सांगून त्यांका न्हेणय नाय, कस्टमर आपणहून इला तर मी त्यांका कित्याक म्हणान सोडू? त्यांका शक्य असला तर त्यांनी रेट कमी करून बोट चलवची. पण आमच्या माणसाक, घाडी काकांक धमकी देवन घाबरवण्याचो उद्योग बरो न्हय.” “पुरूषोत्तमा,तुझो झिल भारी बोलता, मी हया कालच्या पोराची टिवटिव ऐकूक येवक नाय, उद्या तुमच्यात वादावादी नको म्हणान इलय.” धुरी आवाज चडवीत बोललो.

“पाटील, तुमी आवाज चडवन बोललास म्हणान खोट्याचा खरा जावचा नाय. आम्ही कोणाबरोबर भांडाक येवक नाय पण, एकट्या माणसाक गाठून दमदाटी करणा योग्य आसा काय? आमचा चुकीचा वाटला तर तक्रार करा पोलीसात. कोर्टात केस करा, आमची चूक सिध्द झाली तर करतीत ती शिक्षा भोगू. बोटीचा नुकसान करण्याचो प्रयत्न ह्यानी केलो तरी त्याचो विमो आसा, पोलीस चौकशी झाली तर ह्यांची सगळी नावा तक्रारीत येतली. दोष माझो नाय. जर पुन्हा हो प्रकार घडलो तर पोलीस तक्रार करतलय ह्या लक्षात घेवा.” शरयूचो घोव न बोलता ऐकत होतो, तो धुरयाकडे बघीत म्हणालो, “भाऊ समीरान, जा काय घडला ता तुमच्या आणि व्हिक्टरांच्या कानावर घातला, तुमच्या मते कोणाची चूक वाटता? समीरची असली तर सांगा आम्ही एक शब्द न बोलता वाटेक लागतव, चूक कुणाची ह्या जर कळला तर निवाडो करण्याची गरजच नाय.” धुरी जाम झालो, तरी कोळमकराची बाजू घेत म्हणालो, “यांचो धंदो जुनो आसा, त्याच्यावर त्यांचा पॉट हा, उद्या धंदो बसलो तर ते काय खातीत?”

“हो विचार ज्याचो त्याने करुक व्हयो, समीर त्याका काय करीत? त्याका त्याचो व्यवसाय करण्याचा आणि वाढवण्याचा स्वातंत्र्य आसा. त्येणा नोकरीसाठी मुंबयत पळ काढूक नाय की नियमबाह्य करूक नाय. आज त्याच्या नावाचे बातमे पेपरात छापून येतत, सरकारी माणसा भेट देवक येतत,तुमका त्याचो अभिमान व्हयो, त्याका अडवण्याची भाषा खैली?

“कदम, समीर तुमचो भाचो म्हणून बाजू घेतास, उद्या तुमच्या काजू कारखान्याच्या आजूबाजूक दुसऱ्या कोणी कारखानो काढलो तर तुमी चूप रवशात काय? तुमचा नुकसान झाला तर राग येतलोच ना!” “ओ पाटील,जर मी प्रामाणिकपणे धंदो करतय तर माका भय कसला? माझा गिरायक खय येक जावचा नाय, पंचवीस वर्षा धंदो करतय, किती इले आणि गेले. मी थयच आसय, तेवा ह्ये गोष्टी खरातल्या न्हय.” व्हिक्टर म्हणालो, “कदमांचा बरोबर हा, तुमचो धंदो चोख आसा तर तुमका भय नको. ह्या कोळमकरानी आणि इतर भागेल्यानी आपलो धंदो करूचो. लोकांका दमदाटी कित्याक? वाईटपण येता. एका गावात रवतव, रोज एकमेकाक तोंड दाखवूक व्हया. भांडणा करून जगाक तमाशो कित्याक?”



affiliate link

पोलीस पाटील धुरी आणि कोळमकर आणि त्यांचे हलवे वाटेक लागले. व्हिक्टर समीरची समजूत काढत म्हणालो , तु शांत रव बघू , तापातापीन प्रश्न सुटणा नाय. तसाच काय असला तर राणें सायबांच्या कानावर घालूया, मी स्वतः त्यांची भेट घेवन कानावर घालतय. बघूया, त्यांची काय प्रतिक्रिया येता ती?” सरपंचांचो निरोप घेवन समीर, आप्पा घराकडे इले. शरयूचो घोव परस्पर गेलो. जेवताना सगळी घडली कहाणी समीरान माका आणि बहिणीक सांगल्यान. राणी बडबडला, “रे तुका सगळा एकदम करूचा आसा ता लोकांच्या डोळ्यात येतलाच, हो कालचो पोरगो आमका काय शिकवतलो असाच त्यांका वाटतला.”

हे समीरकडे बघून म्हणाले,”बघलस ना, पोलीस पाटील त्यांच्या वरसून बोलता, तू सांभाळून रव, या लोकांचा सांगूक येणा नाय, अवदसा आसत आवझवरी, खुनशी जात ती.” समीरान ओळखीच्या पोलीसाक घडलो प्रकार कानावर घातल्यान. त्येनी, मी काय ता बघतय, तु निवांत रव असो शब्द दिलो. दोन दिवसांनी पोलीसांची गाडी गावात इली, ती परस्पर संगमावर गेली, तासभर झालो तरी ते परतूक ना, म्हणान समीरान रावल्याक फोन लावल्यान, तेवा तो म्हणालो, “जळला मेल्यांचा लक्षण, पोलीसांवर भरवसो हा तुझो? रे, ते जातीचे लबाड, त्यांनी कोळमकर, लाड, मारकूस यांच्याकडसून पैसे घेतल्यानी आणि म्हणाले, “बामणांचा कसला काय घेवन बसलस , स्वतःक मोठे शाणे समाजतत. तुमी घाबरा नको,आमी आसव ना!” ता ऐकून समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हरामी आवझवरे. पैसे माझे खाऊन माझ्याच विरोधात बोलतले, यांका उभे करता नये. खातत ता खातत आणि निंदतत.”

थोड्या वेळान पोलीसांची गाडी इली, इल्यावर समीरान त्यांका थंडाची बाटली पाजली, गावडे हवालदार म्हणालो, “मी थयसूनच इलय, शानपट्टी करीत होते, भोसडवलय त्यांका, माका नाय वाटणा आता तुमच्या वाटेक जातीत असा. मी त्यांका दम भरलेलो हां ,जर लेखी तक्रार इली तर ३०५ लावन आत टाकतलय. तेवा तुम्ही बिनधास्त रवा तसाच काय असला तर फोन करा.” चुतमारीचे फुकटचा जेवन वाटेक लागले, जेवताना विचारी होते हलवो, सूरमयचो तुकडो नाय काय? ह्यांका फुकटचा खाऊक घातला तरी ह्यांची भर होणा नाय, समीरान गावड्याच्या हाती पाकीट दिला तसो लोचट हसलो, म्हणालो, “समीर भाऊ, काळजी घ्या, रात्री एकट दुकट फिरू नका , पिसाळल्या कुत्र्यांचा काय भरोसो?” असला ह्यांचा दुट्टपी वागणा. समीर काय समजूचा ता समजलो. ह्यांची कोणाकडे तक्रार करून यांचा काय एक वाकडा जावचा नाय, धंद्यात वाकडेपणा येतला, ही काळ्या दगडावरची रेघ होती. ह्या पेक्षा त्यांच्यात उठबस केली तर भूता शांत होतीत. साप मरूक व्हयो पण काठी तुटता नये.

समीरच्या डोक्यात विचार इलो जर कोळमकर आणि मंडळीक आपण आपल्या गटात घेवन जर इतर शहरांनी जाहिरात केली तर सगळ्यांका बिझिनेस मिळात आणि पर्यटन केंद्र म्हणान गावाचा नाव नकाशावर येयत. तेणा आपली योजना सरपंच व्हिक्टर यांच्याकडे मांडल्यान. सध्या आसत त्या सर्व बोटीचा सुरक्षा ऑडिट करून त्यांका त्यांच्या सुविधेनुसार बोटीवर नंबर टाकले की त्यांचा बुकिंग कस्टमर स्वतः करतीत म्हणजे त्यांका व्हयी ती बोट ते निवडतीत. कस्टमरसाठी कोणाची मारामारी जावची नाय आणि सगळ्यांका सारखो धंदो गावात.



affiliate link

त्याचा बोलणा ऐकून सरपंच हसले,. “रे मेल्या, तु काय म्हणतस ता करूक कोण एक तयार होवचो नाय, हय दारवेक आणि गुटख्याक पैसे पुरणत नाय, बोट सजवूक पैसे कोण खर्च करतलो? आमी गाय, म्हैस भाकड होईसर तिका पिळतलव, सुग्रास देवन तिका तयार केली तर ती जास्त दूध देयत ह्या आमच्या डोक्यात घुसणा नाय. तुझी मेहनत वाया जायत.”

“व्हिक्टर अंकल, प्रयत्न करुक काय हरकत, तयार झाले त ठिक नाय तर ये रे माझ्या मागल्या आसाच.” “सरपंच म्हणाले, तुका इच्छा आसा तर कर प्रयत्न, माका काय त्यांचा खरा दिसणा नाय. माझी मदत लागली तर कळव.”
ही गोष्ट सहज होणारी नव्हती म्हणून समीर मेरी टाईम कार्यालयात गेलो तेणा साहेबाक पटवून ती गोष्ट त्यांच्या कानवर घातली, साहेबाक आयडिया पटली. ते म्हणाले, नायतरी व्हयते आडदांड कोणाचा ऐकूचे नाय. मी कलेक्टर सायबांका, ऑर्डर काढूक सांगतय म्हणजे सगळे सरळ होतीत.” समीर म्हणालो, “साहेब रजिस्ट्रेशन झाला तर तुमचो महसूल वाढात आणि तुमचा नाव पण होयत.”

गावात जितके प्रवाशी बोटी होते, मासेमारी बोटी होते सगळ्यांका नोटीस इली, ” गेले दोन वर्षा वादळ इला त्यात बोटींची तपासणी करूची रवली, त्यामुळेच आपआपल्या बोटीचा सुरक्षा ऑडिट न केल्यास लायसन्स रद्द होईत. वेळेत रजीस्ट्रेशन न केल्यास त्याची मान्यता रद्द होईत. मान्यता रद्द झाल्यास हे कार्यालय जबाबदार रहाणार नाही. जो तो धावपळ करूक लागलो. समीरान त्याच्या बोटीचा ऑडिट करून घेतला. ही बातमी लगोलग कोणीतरी पोचवली, जो तो समीरकडे चौकशी करूक येवक लागले, समीर म्हणालो, ऑडिट करूचा तर बोट बरी व्हयी, रंग रंगोटी करूक व्हयी. प्रवाशांसाठीची लाईफ जॅकेट घेवक व्हयी. ह्या सगळा असला तर ok देतीत.

व्हिक्टर यांचा हार्डवेअर दुकान होता, आयत्या वेळेक रोख पैशांचो वांदो, मालवणात उधार कोण देतला? न इलाज. शेवटी जो तो व्हिक्टरच्या दुकानावर धावलो, कोणाक रंग, कोणाक व्हार्निश, कोणाक स्टील शीट, कोणाक मोटर ट्यूब. कोणाक anchor, व्हिक्टर म्हणालो, ” माका चार दिवसात उधारी मिळाक व्हयी, तुमच्या घरापर्यंत येवचा लागता नये”. अडलो माणूस काय करीत? व्हिक्टर बरोच सुखावलो, धंदो दुपटीन वाढलो. जो तो बोट चांगली दिसाक व्हयी म्हणान काम करून घेवक लागलो. सुतार, वेल्डर, पेंटर सगळ्यांका कामा गावली. सगळे मेरी टाईमच्या इंजिनिअर सायबाक धन्यवाद देवक लागले.

सगळ्यांचे बोटी नव्या रंगान चमकूक लागले. एक दिवस मेरी टाइमचो साहेब आणि कलेक्टर गावात सर्व्हे करूक येतले अशी बातमी इली. बोटकरांनी वर्गणी काढून पताकी लावले, सगळे रस्ते स्वच्छ केले. किनाऱ्याक पडलेला प्लास्टिक जमा करून साफसफाय केली. साहेब आणि त्याचे अधिकारी इले. समीरान त्यांचा सरपंच व्हिक्टर यांच्या हस्ते जंगी स्वागत केला, त्यांका शाल, श्रीफळ, भेटवस्तू दिली. साहेब खूश झाले. म्हणाले, तुमच्या अडचणी सोडवू, तुमच्या बोटींची नोंदणी झाली असल्याने तुम्हाला मेरी टाईम जवळून एक स्मार्ट कार्ड मिळेल जे तुमच्या बोटीच रजीस्ट्रेशन असेल त्यावर तुम्हाला सबसिडी दरात डिझेल मिळेल, राष्ट्रीय बँकेचं कर्ज मिळेल. जिल्ह्यातील सर्व मासेमारी संघटना एकत्र आल्या तर तुम्ही तुमची सहकारी बँक काढू शकाल. तिला सरकार अनुदान देईल. त्याचे तुम्ही भागधारक होऊन तुम्हाला व्यवसायाला हवे तेव्हा कर्ज घेऊ शकाल. हे कर्ज तुम्हाला इतर बँकांपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होईल. विविध योजना तुम्ही करू शकाल. सहकारी तत्वावर तुम्ही तुमचा पेट्रोल, डिझेल पंप सुरू करू शकाल.” साहेबांनी सांगितले ते सर्व मंडळींना पटले, अरे हे तर एकदम खरे,आपण असा कधी विचार केलाच नव्हता.





व्हिक्टर म्हणाले, “साहेबांनी, दिशा दाखवली हा, उत्तम मार्गदर्शन केलेला आसा, खूप काही गोष्टी सरकारी तत्वावर होऊ शकतत. थय देशावर सहकारी दूध डेरी,शुगर फॅक्टरी, सूत गिरणी काय काय करतत आणि हय आमी कुर्ली वरी फक्त एकमेकांचे पाय वडीत बसतव. कसो विकास होतलो? काय करूचा तर आमची तोंडा आवझवरी एकामेकाच्या विरुद्ध टोकाक. मग विठ्ठल काय त्याचो बापूस इलो तरी काय जावचा नाय. एकजूट जावक व्हयी. ती झाली तर या योजनेचो फायदो. कसो घेवचो ती तुमची योजना तयार ठेवा. आपण बोटींग स्पर्धा आयोजित करूया, जिल्ह्यात जाहिरात देवया. तुमच्या पर्यटनाकडे लोक वळूक व्हये मात्र ग्राहकांची लुटालूट करता नये ह्या लक्षात ठेवक व्हया. तुमची संघटना मजबूत करा.” सगळ्या श्रोत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. साहेबांच्या हस्ते कोळमकर ह्यांका बोट मालक असोसिएशनचो सेक्रेटरी घोषीत केलो. तर समीर ठाकूराक अध्यक्ष घोषीत केलो. सभा सरली. गजाली करीत सगळे वाटेक लागले.

रात्री जेवण करून साहेब जावक निघाले तेव्हा समीर सोडूक गेलो, साहेबांचे आभार मानले, कधी तरी फॅमेली घेऊन या म्हणान हात जोडून विनंती केली. कोळमकर जाम खूश म्हणालो, समीरची कलेक्टरकडे भारी वट. व्हिक्टर समीरच्या आयडियेवर भारी खूश म्हणालो, “समीर हात जोडतंय तुझ्या अकलेक, काय बा तू माणूस आसस तुकाच ठाऊक. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरानी बातमी इली. कोकण महोत्सवात बोटींग स्पर्धा होणार, पहिल्या तीन क्रमवार विजेत्यांना मिळणार बक्षिसे आणि जिल्ह्याचे मानपत्र.

झिलान गेल्या दोन तीन वर्षात जी उलथापालथ घडवून प्रगती केली ती बघून हे हरखून गेले. हॉटेल सागर दर्शनचो डिस्प्ले रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर लागलो. पर्यटक वाढले. समीरान वॉटर गेम आणले. प्लास्टिक वॉटर स्लाईड हाडली. वॉटर फॉल तयार केलो, नवीन नवीन वॉटर गेम इले. धंदो दुपटीने वाढलो.आधी पाच स माणसा कामाक होती, धंदो वाढलो तशी धा माणसा कामाक रवली .राणी कॅशियर म्हणान काम करूक लागली.हो बदल खरोखर दृष्ट लागण्यासारखो होतो. कोळमकर बोट क्लबचो सेक्रेटरी झाल्यापासून त्याची कॉलर टाईट झाली. आधी आपण बोट चलवी, आता बोट चलवूक माणूस ठेवल्यान. ऑफिस टाकून बुकिंग करूक लागलो. दोन चार दिवसांनी समीराक भेटूक येय, सहकारी बँक काढूया,तु उचल केलस तर काम नक्की होयत म्हणूक लागलो.

आमचो शरदो, भाच्याची प्रगती ऐकून स्वतः इलो आणि समीरच्या धंद्यात मदत करूक लागलो. शरयू भाच्यावर एकदम खुश, आधी मदतीक येवक नाक मुरडत होती. आता स्वतः किचन सांभाळूक लागली, रोज दुसऱ्या दिवशीचो मेनू ठराक लागलो. मुख्य म्हणजे रोजचो मेनू डिस्प्ले वर दिसण्याची सोय केली. आमच्या रिसॉर्ट चा नाव ऐकून एक कस्टमर इलो होतो . त्याचो सोलार पावरचो बिजनेस होतो. तो म्हणालो, “मी तुम्हाला सोलार पॅनल बसवून देतो. मला हप्त्याने पैसे द्या. तीन वर्षे सर्विस फ्री. अगदीच गळी पडलो, म्हणालो फक्त दहा हजार द्या उरलेले सबसिडी मिळाली की द्या. समीर म्हणालो, “मी वडिलांशी बोलतो मग तुम्हाला सांगतो.”

समीर ह्यांका म्हणालो, “आप्पा, गावात सोलर नवीन आसा, आपण पयली उडी मारली तर फायदो होयत. आपल्यामुळे कंपनीचो. जितको धंदो होयत त्याच्यावर पाच टक्के कमीशन गावात. आता त्यांका दहा हजार दिले की लगेच काम सुरू करतीत.” हे तयार होईनात, म्हणूक लागले, “रे मेल्या ह्या माणसाचो काय भरोसो, फ्रॉड असलो तर हात चोळीत बसशीत, तो सांगता ता खरा कश्यावरसून?” समीरने त्याका बोलावून चर्चा केली, “तुमचे इंस्टालेशन झाल्या शिवाय आम्ही पैसे देणार नाही, कबूल असेल तर पहा, तसेच पूर्ण व्यवहार पेपरवर हवा.” त्यांनी कबूल केले. तरी आप्पा तयार होईनात. ते समीराक म्हणाले, “हाती नाय पैसो, सगळा हप्त्यावर घेतस उद्या बायको हप्त्यावर आणलस नाय म्हणजे मिळवलं.” कशी बशी त्याने आप्पांची समजूत काढली.

बागेमुळे, पुरेसो सुर्यप्रकाश मिळात अशी जागा मिळय ना जय थय झाडा, शेवटी घरावर दहा किलोवॉट क्षमतेचे पॅनल बसवला आणि स्वतःची वीज इली. अख्या गावात विज नसली तरी आमची बाग उजळून दिसा. खय लाईट नसली तरी सागर रिसॉर्ट मध्ये लाईट असता हया बघून कस्टमर वाढले. अँडव्हान्स बुकिंग पंधरा दिवसावर इला. झिलान सागर रिसॉर्ट चो कायापालट केलो.

शरयू म्हणाली, “तरी मी तुमका कधीचा सांगीत व्हतय ठाकूरांचा रक्त आसा, आपल्या कुळाक साजेसाच करतलो, माझ्या कपळावर हात ठेवून शपथ घेतल्यान आणि हो चमत्कार घडलो.”, मी म्हटलंय, “कोणाच्या कोंब्यांन का उजवाडेना, सगळा रांकेक लागला म्हणजे आमी सुटलव. राणीक पंचवीस वर्षा सरली. हे तिच्या लग्नाचो विचार करीत होते. Law सांगूक केलो, ना प्रॅक्टिस ना नोकरी, ती काय करता ह्या कोणाक काय सांगतलव? तिच्यासाठी स्थळ कसा मिळतला? होच प्रश्न होतो,एक दिवस हयांनी तिका विचारल्यानी,”गो तुका घोव कसो व्हयो? म्हणजे नोकरीवालो की बिझनेसवालो?” तर म्हणता, “माका इतक्यात लग्नच करूचा नाय.हय काय वाईट हा! मस्तं दिवस जातात, रोज नवीन माणसा भेटतत, त्यांचे स्वभाव कळतत, काय काय माणसा तऱ्हेवाईक असतत, गंमत येता.”





हे म्हणाले, ” गो खुळ्या गंम्मत कसली? आयुष्यभर, आमच्या बरोबर रवतलस काय? तुका तुझो संसार नको!” तसा चिडला, म्हणाला, “आप्पा, माका घालवण्याची तुमका इतकी घाय झालीहा तर खुशाल स्थळ बघा, दगडा बरोबर लगीन लावलास तरी माझा काय म्हणणा नाय.” पण एक दिवस वेगळोच प्रकार घडलो. पुण्यावरून एक फॅमिली चार दिवस बुकिंग करून रवाक इली, आठ दहा माणसा होती, त्यांनी धम्माल केली. भरपूर खर्च केलो. रोज वेगवेगळी फर्माईश करीत. आमच्या शरयू आत्यान सुंदर स्वयंपाक बनवून घातलो. पार्टी एकदम खुश. जाताना समीर जवळ शरयूक देवक दोन हजार रूपये दिले. म्हणाले, “तुमच्या किचनच्या बाई सुंदर स्वयंपाक करतात.” ,

त्यांका काय म्हायत, ती या घरची मालकच आसा. समीर म्हणालो, “साहेब ती माझी आत्या आहे, हौस म्हणून किचन सांभाळते, त्यांचा वेगळा बिझनेस आहे.” तस म्हणाले, “Sorry, त्यांना बोलवता का मला त्यांना Best Wishes द्यायच्या आहेत.” शरयू आत्या आली तस त्यांनी चांगल्या स्वयंपाकासाठी आभार मानले. शरयू आत्या म्हणाली, स्वयंपाक आवडला ना! येत जा रेस्टॉरंट तुमचच आहे.”

एकदा गंमतच झाली. एक दिवस राणीच्या मोबाईलवर कॉल इलो, राणी खयतरी गेला होता, समीरान कॉल घेतलो, तो नंबर त्याका ओळखीचो वाटलो. कॉल घेतलो, तेव्हा अनोळखी इसम म्हणालो, “सीमा मी बोलतोय, ऐकतेस ना!”. समीरला समजलं हा कॉल कोणातरी मुलाचा आहे, तेव्हा तो गडबडीत म्हणाला, “हॅलो कोण बोलतंय, मॅडम नाही आहेत, बोलावू का त्यांना. मी नोकर बोलतोय.”, समीरला कळलं इथं कुठं तरी पाणी मुरतंय. कॉल नंबर पहिला तेव्हा लक्षात आले की हा तर काही दिवसांपूर्वी आलेल्या कस्टमर चा नंबर होता. राणीची कॉल हिस्टरी पहिली तेव्हा त्याला कळलं की गेल्या आठवड्यात अनेकदा त्यांच्यात बोलण झालं होतं.

समीरान ती गोष्ट माका सांगितली, “ऐकलं का मातोश्री, तुझ्या चडवान घोव शोधलो, तुका खय शोधा शोध करुची गरज नाय?” मी त्याच्यावर चिडलंय, “रे मेल्या काय सांगत, ता तुझ्या बरोबर दिवसभर असता, घोव शोधूक खय गेलाहा? उगाच बंडला मारू नको.” तसा म्हणालो, “गे मागे पुण्याची कामत फॅमिली इली होती आठवता? आठ धा माणसा होती, त्यांच्यात एक MBA झालेलो मुलगो होतो, आमच्या राणीक तो पसंत पडलो.” “पण ह्या तुका कोणी सांगितला? आणि ती दोघा भेटली खय?”

तो हसलो, “गे भेट होवक खय जावचा लागता, मोबाईल असल्यावर एक मिनिटात कोणाकव भेटू शकतत. तिका विचार काय भानगड हां म्हणान, मुलगो दिसाक बरो हा, पण काय करता? कोण ते? विचारुक नको?उद्या कोणीय येईत आणि राणीक पटवन जायत” मी आरडलंय, “रे मेल्या वकील झालीहा ती, तिका अशीच पटवक ती काय वाटेवर सांडलीहा? तिका पसंत पडलो तर तीच त्याका पटवीत.”
“होय मा ! मगे विचार,तिने कोणाक पटवलो हा, कोण आसा तो भाग्यवान?” मी झिलाक सांगलय, “तुच कित्याक नाय विचारणस?” शेवटी समीरान रात्री विषय काढलो, “राणी, पुण्याची पार्टी कशी वाटली? नाय म्हणजे तू त्यांच्याशी बोललस म्हणान विचारतय,त्यांचो लग्नाचो झिल असलो तर आप्पा विचारतीत.” राणी त्याच्याकडे संशयान बघीत रवली. तसा तो म्हणालो,”दुपारी तुझ्या मोबाईलवर कोणाचो तरी कॉल इलेलो सीमा, सीमा म्हणून तुझ्या नावानं कॉल करीत होतो,भायल्या माणसाक तुझा नाव सीमा ह्या सांगल्याशिवाय कसा कळात?म्हणान विचारी होतंय. तु कोणाक तुझो नंबर दिलस काय?”
तशी चिडीक इली तु माझो मोबाईल कित्याक म्हणान घेतलं, मी तुझे कॉल घेतंय काय?आई ह्याका सांग हां, असे लोकाचे कॉल घेणत नाय.” मी हसलंय, “म्हणजे समीर म्हणता ता खरा आसा तर ,अगो राणी! बरा की गो तू, आवशीक पण कळाक दिलस नाय.”

क्रमशः

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग ४

  1. आणि वादळ माणसाळले भाग ५ - प रि व र्त न

    […] १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग […]

  2. zovre lioptor

    I have been exploring for a little bit for any high-quality articles or blog posts on this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Reading this info So i am happy to convey that I’ve an incredibly good uncanny feeling I discovered exactly what I needed. I most certainly will make certain to do not forget this website and give it a look on a constant basis.

Comments are closed.