आघात भाग ५

आघात भाग ५

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

पाहता पाहता सप्टेंबर उजाडला आणि गणपतीचे वारे सगळीकडे वाहू लागले. त्यांच्या सोसायटीत गणपती नसला तरी शिंत्रे काकूंच्या घरी गणपती येत होता. ज्या दिवशी विनायक चतुर्थी होती त्या दिवशी सानिका शिंत्रे काकूंच्या घरी दर्शनाला आली आणि त्यांची भेट झाली. गंमत म्हणजे ती त्याच्याशी मन मोकळे बोलली, त्याचा जॉब गेल्या विषयी किंवा लग्न कधी या विषयी तिने कोणताही प्रश्न विचारला नाही. त्यानेच पटनीमध्ये काय चालू आहे? पुणे कसे वाटते,असे तिला विचारले,तिने कोणताच आड पडदा न ठेवता उत्तर दिले.  या वेळेस ती अगदी bold वाटली,वडिलांची भीती जणू संपली असावी. तोच विचार  करू लागला, ही इतकी बोल्ड,निर्धास्त कशी बनली? की मग तिच्या स्वयंपूर्ण बनण्याचा हा आविष्कार असावा? 

शेखर कोमलशी बोलून संजीवने  कुठे तरी जॉब पहावा असे सुचवत होता. कोमल तो जेवायला बसला की त्याची अधून मधून विचारपूस करत होती,. जॉबचं कुठे काही जमते की नाही याची विचारणा करत होती. तिला तरी बाहेर जगात काय चालले ते कसं कळणार,संजीव एक दिवस रात्री सर्व जेवायला बसले असता म्हणाला, “पप्पा मला जॉबची काळजी आहे. मी तीन चार ठिकाणी मेल केला आहे. पाहू कुठून जॉब येतो. सध्या तरी मार्केटमध्ये खूप मंदी आहे पण मला खात्री आहे लवकर हा करोना संपेल आणि बाजारपेठ आणि transport  पुन्हा सुरू होईल,. पप्पा मी देशमुख काकांना सांगून ठेवलंय तुम्ही माझ्या जॉबच टेंशन घेऊ नका.” 





ते शांतपणे म्हणाले,”संजीव मला ते माहीत आहे पण तू शांत बसलेला दिसलास की वाईट वाटत. इतका देव क्रूर का, job गेल्यामुळे ठरलेलं लग्न मोडलं,तुला किती वाईट वाटत असेल त्याची  कल्पना मी करू शकतो, पण मला खात्री आहे कदाचित तुला या पेक्षा चांगली बायको मिळेल. लग्न झाल्यावर असा प्रसंग आला असता तर जे झाले असते, त्या पेक्षा झालं ते चांगलं झालं म्हणायच. देशमुख काकांना जाऊन भेट ते नक्की मदत करतील, कुठे जॉब असला तर ते सांगतील त्यांच्या Contact मध्ये राहा.”

तो त्यांना काही म्हणाला नाही,या करोना काळात हजारो लोकांचे जॉब गेल्याचे तो वाचत होता. सार्वजनिक सेवा क्षेत्र सुरक्षित होत, पण त्यांचे वेतनही दोन तीन महीने वेळेवर होत नव्हते. तो मनाशी म्हणाला पप्पांना सांगायला काय जातंय! सध्या industry पार झोपली आहे आणि ज्यांच्या नोकऱ्या आहेत ते लोकल, बस बंद असल्याने कामावर जाऊ शकत नाहीत. जे कामावर जातात त्यांना आठ तास ड्युटी करण्यासाठी आठ दहा तास प्रवास करावा लागतो.”

कोमल अधून मधून संजीवची समजूत काढायची. ती भाविक होती,रोज देवला साकडं घालायची,”एकदाच करोना सरुदे आणि माझ्या मुलाची कंपनी चालू होऊ देत”  .मुलगा हॉल मध्ये निवांत बसला की तीच मन सैरभैर व्हायचे. तिला बिचारीला मुलाची समजूत कशी काढावी तेच कळत नव्हते. वयात आलेला मुलगा निराशेच्या विचाराने काही चुकीचे करुन बसला तर या विचाराने तिची झोप गेली होती. शेखरही तिला कधी कधी सांगत असे, “संजीवला समजव उगाच कुढत बसू नको,हे ही दिवस जातील.” ती घरच्या कामात एवढी व्यस्त असे की जेव्हा ती सर्व आटोपून संजीवला काही सांगाव म्हणून येई तेव्हा संजीव डोळे मिटून पडलेला असे. मग त्याला जागं करायला ती धजावत नसे.

सानिकाचा विचार मनी येताच त्याला त्यांची हॉटेल मधली भेट आठवली. जर सानिकाने तेव्हा होकार दिला असता तर आता तिची प्रतिक्रिया काय असती? तिनेही जॉब गेला म्हणून नकार दिला असता की आधार दिला असता. सानिका थोड्या वेळाने निघून गेली. ती दिसायला जास्त सुदंर दिसत होती. तिचे मुळात गोरे असणाऱ्या गालांना लकाकी आली होती. तिने पुण्याला आपला जोडीदार पहिला असेलच त्याच्या मनात आले, का पाहू नये आता तर ती स्वावलंबी झाली होती. तिला पटनी मध्ये मोठ्ठं पॅकेज मिळाले नसले तरी तीची VJTI Degree लक्षात घेता तिला निश्र्चित चांगली सॅलरी मिळत असावी असा अंदाज त्यांने बांधला दुपारी तो लॅपटॉपवर chess खेळत होता, इतक्यात मेल आला. त्याने उत्सुकता म्हणून मेल ओपन केला तर त्याला Supreme Logestic Solution कंपनीचा online intreview चा call दिसला. पंधरा दिवसापूर्वी त्याने biodata mail केला होता. दुसऱ्या  दिवशी  दुपारी तो online interview साठी सज्ज झाला. तीन वाजता त्याला कॉल आला आणि वाधवानी नावाच्या गृहस्थाने अर्धा तास त्याचा इंटरव्ह्यू घेतला. त्यानंतर बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी इंटरव्ह्यू संपवला. वाधवानी यांनी Second round बद्दल काही सांगितले नव्हते त्यामुळे Best of Luck चा अर्थ काय घ्यावा ते कळेना. दोन दिवसांनी त्याला Second interview चा मेल आला. या वेळेस Video call वर नारायणन आणि शर्मा नावाच्या दोन व्यक्ती मुलाखत घेत होत्या. त्यांनी Material Handling and Material Management या विषयी अनेक प्रश्न विचालले. पहिल्या कंपनीमधील त्याच्या Profile बद्दल विचारले. त्यांनी त्याला उत्तरे दिली.”So best of Luck Gental man.” म्हणत त्यांनी interview संपवला. त्याची मुलाखत संपल्यावर आईने त्याला विचारले,”संजीव मग तुझी मुलखात कशी झाली,जॉब मिळेल ना तुला?”





“अग आई  तु सारख सारख माझं डोकं खाऊ नको. ते किती Interview घेणार आहेत हे मला कसे कळणार? किती vacancies आहेत आणि कोणाला घेणार हे त्यांचं त्यानाच माहीत.”  “अरे एवढं रागवायला काय झाले ? तुला माहीत असेल तर ठीक, मी काही तुझ्यावर सक्ती नाही केली. संजीव तुझा स्वभाव गेले पाच सहा महिने खूप बदलला आहे. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी तू लगेच मनाला लाऊन घेतो.” “बरं, चूकल माझं, पण तू सारख सारख विचारत राहते त्याचा मला त्रास होतो.” त्याने तिच्याकडे नाराजीने पहात उत्तर दिलं.

कोमल kitchen  मध्ये  निघून गेली. नक्की संजीवचे काय झाले ते तिला कळत नव्हते, नोकरी गेल्यामुळे  लग्न मोडले आणि त्यामुळे तो upsate होणे साहजिकच होते पण तो मोकळेपणे कोणाशी बोलत नव्हता, की मित्रांकडे जात नव्हता त्यामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा झाला होता. तिने शेखरला सकाळची घटना सांगितली, तस शेखर तिला म्हणाला, “अगं साहजिकच आहे त्यानी संसाराची  स्वप्न रंगवायला आणि ह्या करोनाच्या उद्रेकाने थैमान घालायला एकच गाठ पडली. त्यात आता करोनामुळे job opportunity कमी झाल्यात. तुझ्या ईश्वराला साकडं घाल, एकदा त्याची गाडी रुळावर येउ दे म्हणजे मी ही मोकळा. तसं मी दोन चार साहेब लोकांना नोकरीचं बोललो पण त्यांच्या ओळखीने नोकरी मिळाली तरी  ते जो salary  देणार तो दहा बारा हजार,तुझा मुलगा जाईल का एवढ्या कमी पगारावर? ” “तीच काळजी वाटते हो, एकटा बसलेला असतो, बाहेर फिरायला जा म्हटलं तरी नुसता बघत बसतो.” कोमल चिंतेने म्हणाली. त्याला जेवायला बोलावले तरी, हॉल मध्ये उगाचच बसून राहतो, तर कधी तू घे जेऊन मला भूक नाही अस सांगतो. मुलगा असा चिंतेत असताना कोणत्या आईच्या घशाखाली घास जाईल?”

“मग मी काय करू म्हणतेस? तूच सांग,अग चिंता हा असा आजार आहे तो औषधाने नाही तर प्रेमाने कमी होतो. तू त्याचा फार विचार करु नको, एकदा त्याच्या जॉबच नक्की झालं की त्याचा मूड ठीक होईल.काही गोष्टीसाठी काळ हेच औषध असत.” “अहो तुम्हाला सांगायला काय जात,तुम्ही सकाळी कामावर जाता, शामल एकदा college ला गेली की संध्याकाळी उशिरा उगवते घरी मीच असते. तो असा चिंताग्रस्त एकटाच बसला की नाही पाहवत.” “तुझं बरोबर आहे पण मग तुझं म्हणणे काय मी पण घरी बसू का?” 





 संजीव बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत होता,आपल्यामुळे घरातलं वातावरण बिघडत आहे पाहून तो kitchen मध्ये आला. “आई तू पप्पांना उगाचच त्रास देत आहेस,माझा प्रॉब्लेम मी सोडवेन. logistics खूप कंपन्या आहेत, कुठेतरी मला नक्की जॉब मिळेल,तू माझी चिंता सोडून दे.” “संजीव, ,उद्या पासून तू नेहमी सारखा मोकळा वाग,तूच चिंता करत बसलास तर मी शांत कशी राहू?” शामल आली तस तिने बोलणे थांबवले. शामलवर उगाचच चिंतेच सावट पडू नये असं तिला वाटत होतं. संजीव अधूनमधून देशमुख काकांकडे जाऊन त्यांच्याकडे शिकत होता. तिथे

त्याचा वेळ चांगला जाऊ लागला. त्यांनी काही हाऊसिंग सोसायटीचे अकाऊंट पहायला सांगितले, दोन दिवस तो घरी अकाऊंट तपासत होता आणि त्याला काही Mistakes सपाडल्या त्यांनी त्या देशमुख यांना दाखवल्या, त्यानी त्या पहिल्या आणि त्याच कौतुक केलं. चार दिवसानी त्यांनी वेगळ्या सोसायटीचे लेजर त्याला पाहायला दिले. हळू हळू त्याला त्यातील बारकावे कळू लागले. तो त्यांना विचारून एन्ट्री पास करत होता. पहिल्यापेक्षा त्याचा वेळ छान जात होता. एक दिवस त्याला मेल आला. त्याचं Supreme logestic मध्ये final interview साठी selection झालं होतं आणि दोन दिवसांनी marketing manager त्याचा Online interview  घेणार होते.

दोन दिवस प्रतीक्षेत गेले. Live  interview असल्याने  त्यांनी ड्रेस प्रेस केला, टाय  निवडला आणि video call ची वाट पहात तो Laptop समोर बसला. पारेख नावाच्या गृहस्थाने त्याचा अर्धा तास interview घेतला आणि त्याचा experience, Adverse situation Handle करण्याची क्षमता, expectation इत्यादी बाबत चर्चा केली आणि गुड लक म्हणत interview आटोपला. दोन दिवसांनी त्याला सिलेक्ट झाल्याचा mail आला. कंपनीने त्याला दोन वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर appointment दिली होती आणि peformance base  Contract  Renewal ची शक्यता किंवा संधी उपलब्ध असा मार्ग खुला होता. म्हणजे भविष्यात टांगती तलवार होतीच. त्याने या संबंधी पप्पांशी चर्चा केली मात्र त्यांना या बाबत फारशी माहिती नसल्याने त्यांनी देशमुख काकांचा सल्ला घ्यावी असा सल्ला दिला.





त्याने आपल्या कंपनीतील मित्रांना या बाबत विचारले. त्यांनी सद्या असाच ट्रेंड बाजारात असल्याची माहिती दिली. संध्याकाळी तो देशमुख काकांकडे Advice घेण्यासाठी गेला. त्यांनी त्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले जर त्यांनी तुझ्याशी Two Years Contract केलं असेल तर ते जसे त्यांच्या दृष्टीने चांगले आहे तसे तुझ्यासाठी चांगले आहे. या दोन वर्षात तू स्वतःला अपग्रडे केलेस तर दुसऱ्या टर्मसाठी तू जास्त Expect करू शकतो. दुसऱ्या ठिकाणी जंप करू शकतो. कोणतीही व्यक्ती आपण Contract Basis आहोत हे लक्षात घेऊन आपला Performance चांगला व्हावा यासाठी कष्ट घेइलच आणि त्याचा तुला नक्की फायदाच होईल. आम्ही हौसिंग सोसायटीचे Audit प्रत्येक वर्षी Contract renewal करून घेतो त्यामुळे सोसायटी जवळून आम्हाला थोडीफार वाढ मिळते जर आम्ही contract renewal  केलच नाही तर आम्हला काही फायदा होणार नाही. दोन वर्षांनी कंपनीला तुझ्या Performance ची  खात्री पटली तर ते तुला स्वतः Offer देतीलच आणि नाही दिली तरी दुसरी कंपनी तुला तुझा Experience पाहून नक्की घेईल.” त्यांचा सल्ला त्याच्यासाठी मोलाचा ठरला.

मनातील वादळ शमल. त्याने Job acceptance mail पाठवला. रात्री  कंपनीचा मेल आला. “Dear Sanjiv, Congratulations and Well come to our Family, please  join from First Jan 2021, See Rajiv Shukla, your immediate Group Leader, feel free to contact him he will help you to solve your problem.” मार्केटिंग मॅनेजर पारेख ने मेल पाठवला होता. त्याने  मेल पाहिला आणि बऱ्याच दिवसांनी त्याला शांत झोप लागली. मनावरचे मळभ दूर झाले. Job गेल्यामुळे त्याचे लग्न मोडले होते आणि संकटात जी सोबत करणार नाही तिला पुन्हा त्याच कारणासाठी निरोप देणे शुद्ध मुर्खता होती.

शेखरचा आणि कोमलचा चहा झाला तसे शेखर  शामलला उठवायला गेला,”शामल अग किती वेळ झोपतेस? सात वाजले college ला जायच आहे की नाही. त्यांच्या आवाजाने संजीवला जाग आली, त्याने मोबाईल पाहिला सात वाजून गेले होते. आळस देत तो उठला,शामल आणि तो चहा घेत होते, स्वतःचा चहा संपवून त्यांनी शामलच्या कपातला चहा घेतला तस ती ओरडली, “आई बघ ना,दादा माझा चहा घेतोय, त्याला सांग माझा चहा द्यायला. मी मारेन त्याला.” तीने त्याच्या हातातून कप ओढण्याचा प्रयत्न केला आणि चहा अंगावर सांडला. संजीवने तीला टपली मारली, “कार्टे, चहा माझ्या अंगावर सांडवलास ना!” 

ती ओरडत म्हणाली,”तू का माझा चहा घेतलास, तुला हवा तर कआईकडे मागायचा ना? तुला तसचहवंहव.” कोमल रागाने म्हणाली, “कुक्कुली बाळ आहात का? भांडतात कसले? संजीव तूला अजून चहा हवा तर करून घे तिच्या पूढ्यातला का घेतोस?”  “अग गंमत केली, मला नकोच तिचा चहा. शामे, माझ्याकडे माग कधी मग पाहतोच तुला.

आई, पूढच्या सोमवारी मी नव्या कंपनीत join होतो.त्यांचा रात्री मेल आलाय.” “अरे! तू पप्पांना नाही बोललास तो, एवढी चांगली बातमी त्यांना नको कळवायला.” “आई,तू पण कमाल करतेस रात्री मेल आला, तूम्हाला झोपेतून उठवून सांगायला हव होत का?” शेखर office ला जाण्यासाठी तयारी करत होता, कोमल डबा बनवत होती. संजीवने पप्पांना रात्री आलेल्या मेल संबधी माहिती दिली. देशमुख काकांचे मतही ऐकवले .

 ते गंभीर होत म्हणाले. “भविष्यात सरकारी नोकरी राहिल की नाही हिच चिंता आहे. आता सरकार contract पध्दतीने अतिशय तुटपुंज्या वेतनावर नेमणूक करणार आहे. त्यातही खुल्या गटासाठी रिक्त जागा अगदी नाममात्रच असणार. मग त्या कोणाला म्हणून देणार, तू मिळेल तो Job स्विकारून पूढे जा,तेच उत्तम. आपल्यात potential आहे तर नक्की काउंट होणारच. माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. अजून मी निवृत्त व्हायला चार वर्षे आहेत तो पर्यंत तुला जे करायचे ते कर.” “पप्पा Thanks”, त्याने शेखरचे दोन्ही हात हातात धरून डोक्याला लावले. शेखरने त्याला ह्दयाशी धरले.संजीवच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कोमल दुरून ते दृश्य पहात होती,तिचेही डोळे भरून आले, अखेर देवाला जाग आली म्हणायची. तिने देव्हाऱ्याकडे पहात हात जोडले.

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “आघात भाग ५

  1. आघात भाग ३ – प रि व र्त न

    […] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग […]

  2. आघात भाग २ – प रि व र्त न

    […] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग […]

  3. आघात भाग १ – प रि व र्त न

    […] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग […]

Comments are closed.