आघात भाग ६

आघात भाग ६

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

संजीव एक जानेवारी पासून कंपनीच्या Seawoods येथील office मध्ये  जाऊ लागला. सकाळी दहा ते सहा अशी ड्युटी होती.कॅन्टीन सवलत होती.ऑफिस पर्यंत जायला आणि पुन्हा स्टेशनवर सोडायला बस होती. एक महिन्यात त्याचा जम बसला. कंपनी मोठ मोठ्या कंपनीचे  प्रोडक्ट इतर देशात पाठवत होती आणि इतर देशांमधून आलेले Raw Material कंपनीच्या स्टोअर्स ना पुरवत होती.

कोविडचे संकट कमी झाले तसे सोसायटी खाली पुन्हा लहान मुले खेळू लागली. वातावरण सुधारू लागले. एक दिवस सानिका  आणि शामल यांची रस्त्यात  भेट झाली. बोलता बोलता तिने संजीव बाबत चौकशी केली तेव्हा तिला त्याच्या नवीन जॉब बाबत समजले. तिने त्याला WhatsApp करून अभिनंदन केले. त्याने तिला Thanks मेसेज पाठवला.

कधी तरी शामलला त्यांची झालेली भेट आठवली तेव्हा ती संजीवला म्हणाली “दादा गोखल्यांच्या सानिका तुझ्याबद्दल विचारत होती,तुम्ही बोलत नाहीत का?” तो हसला, “का ग तुला काय  करायचे आहे? आम्ही बोलत नाही असं ती तुला म्हणाली का?” ती त्याच्याकडे संशयाने पहात म्हणाली, “मला आपलं वाटलं, जर तुम्ही बोलत असता तर तिने मला का बरं विचारले असते, तुझा दादा कुठे join झाला म्हणून? आता मुद्दाम भेटून तिला तुझ्या नवीन कंपनीची माहिती सांग हो म्हणजे —–” तो तिच्याकडे पहात म्हणाला, “शामल तू लहान आहेस उगाच असला चोंबडेपणा करू नको नाहीतर फटके खाशील.” तो मनातच म्हणाला,शामलला तिने काही सांगितले की काय न कळे.





त्याच आठवड्यात शेखरला चाफेकरांचा फोन आला आणि त्यांनी घडल्या प्रकाराबाबत माफी मागितली. येऊन भेटण्याची इच्छा आहे गैरसमज दूर होतील अशी मखलाशी केली. त्याने रात्री जेवतांना ती माहिती कोमलला सांगितली तसे संजीव रागावला, पप्पा ज्यांनी माझं म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी लग्न मोडले त्यांचा फोन तुम्ही कसा घेता? तुम्हाला काही अभिमान आहे की नाही.” शेखर त्याच्याकडे पहात समजुतीच्या स्वरात म्हणाला,” हे पहा मी काही त्यांना चर्चेच निमंत्रण द्यायला गेलो नव्हतो, त्यांनीच मला फोन केला तू या बाबत निर्णय घ्यायला मोकळा आहेस आमची काही जबरदस्ती नाही. तुला मान्य नसेल तर कळवून टाकू दोन दिवसांनी.”

संजीव काही बोलला नाही पण खरे तर सानिका हा त्याचा पहिला चॉईस होता. ना इलाज म्हणून त्यांनी मृण्मयीला होकार दिला होता आणि तिने त्याला संकटात एकटे टाकले असतांना पुन्हा तिचा विचार करायचा म्हणजे? त्याचे मन सैरभैर झाले, पुन्हा एकदा सानिकाजवळ आपले प्रेम का व्यक्त करू नये?

आठ दिवसाने त्याला संधी मिळाली,सानिका वीक एन्ड साठी घरी आली होती. त्याने जाणीवपूर्वक तिला WhatsApp करून भेटशील का? मला जरुरीचे बोलायचे आहे कळवले. तिने त्याच्या message ला  yes अस उत्तर दिल्याने त्याची आशा पल्लवित झाली. वेळ ठरली आणि दोघ पून्हा एकदा त्याच रेस्टॉरंटमध्ये गेले त्यांनी एका  बाजूचे टेबल गाठले याच ठिकाणी ते यापूर्वी भेटले होते जिथे त्यांनी तिला prapose केलं होतं. 

ते बसताच वेटरने ग्लास ट्रे आणि बिस्लेरी बाटली आणून ठेवली.मेनु कार्ड पुढे सरकवत तो दूर उभा राहिला, तिने मेनू कार्ड पाहून “दो सादा सँडविच.”ऑर्डर दिली. ती त्याच्याकडे पहात म्हणाली,”हं सांग कशासाठी बोलावलं आहेस? पुन्हा propose करणार आहेस का?” असं म्हणत ती मिश्कीलपणे हसली. संजीवन तिच्याकडे पहात म्हणाला,”Sanika,we are  grown up now, be serious I want to tell you something.” “Ok, I am serious, go head.”

त्याने काही आड पडदा न ठेवता त्याच्या अयशस्वी लग्नाबाबत  सगळं खरं खर सांगितले आणि म्हणाला “तुझ्या बाबत मी कोणताही प्रश्न उपस्थित करणार नाही तू आजही मला आवडते, मला हवी आहेस अर्थात तुझी हरकत नसेल तर!” त्यांचं बोलणं चालू असताना वेटर सँडविच ठेवून गेला.





तीला क्षणभर काय सांगावे कशी सुरवात करावी  ते सुचेना. ती त्याच्याकडे पहात म्हणाली, तू नाही विचारले तरी मला सांगितले पाहिजे, मी काय आहे हे तुला कळल्यावर कदाचित तू माझा तिरस्कार करशील. मी पुण्याला रेंटल रहात होती त्याच इमारतीत तो राहायचा अगदी बिनधास्त प्राणी, बंगाली होता. सौमित्रा गांगुली. A young , Handsome and Crazy. आमची अशीच जाता येता मैत्री झाली तो ही  IT Solution कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला होता. मी पुण्यात असेन तेव्हा आम्ही Saturday , Sunday ट्रेक करायचो. त्याला गाण्याची आवड होती,बरीच जुनी गाणी हिंदी आणि बंगालीत तो गायचा. मलाही गाणी मनापासून आवडायची.आम्ही केव्हाही एकत्र फिरायचो. बऱ्याच IT कंपनीत मुले मुली एकत्र काम करतात, प्रवास करतात कधी कधी पार्टनर बनतात,लग्न करतात असे मी म्हणत नाही, Are you getting me.”  संजीवने मान डोलवली तस ती पूढे सांगू लागली.

“आम्ही प्रेमात पडलो अस काही म्हणता येणार नाही पण We did enjoy togther आणि असच एक ट्रेकवर असतांना त्यांनी गंमत म्हणून रम प्यायली, मलाही पाजली.त्यात काही गैर होत,वेगळं होत असे नाही. आम्ही कधीतरी रात्री Dinner  बरोबर Rum घ्यायचो मी Non Veg खाते please समजून घे. पण ती वेळ योग्य नव्हती, आम्ही ग्रुप बरोबर होतो आणि ट्रेक वरून  उतरताना तो जास्तच चेकाळून बोलत होता. अस चार चौघात असताना त्याने तोल सोडून वागण मला insulting वाटलं, तस मी त्याला म्हणाले पण He was extremely out of control I just couldn’t tolerate him, तो वाटेतच माझ्याशी लगट करत होता, I had warned him several times to behave  but no way. असाच काहीसा प्रकार चालला असताना एक अरुंद वाटेवरून उतरताना त्याच्या पायाखालचा दगड सटकला आणि काय होतय हे कळायच्या आत——” सानिकाने तोंडावर रूमाल धरला, ती रेस्टॉरंटमध्ये नसती तर कदाचित जोराने रडली असती. संजीवने तीच्या डोक्यावरून हात फिरवला, तिने प्रयासाने स्वतः ला आवरल तरीही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. थोड्या वेळाने ती नॉर्मल झाली.

संजीवची उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती. “सानिका पुढे?” तिने सांगण्याच्या पुन्हा प्रयत्न केला पण तिचे डोळे पुन्हा भरून आले. सँडविच गार होत होत तिथे त्यांचे लक्ष नव्हते,दूर उभं राहून वेटर उत्सुकतेने पहात होता पण ते आता भानावर नव्हते. तिने पुन्हा सांगायला सुरुवात केली, संजीवने आपला हात तिच्या हातावर अलगद ठेवला. तिने पूढे सांगायला सुरुवात केली, “त्याच्या पाय खालचा दगड सरकला आणि त्याचा तोल गेला,काय होते कळायच्या आत तो दगड पडावा तसा दरीत फेकला गेला. त्या नंतर काय झाले ते मला कळले नाही, मी शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. दोन दिवस मी सतत वेडाचा झटका यावा तशी वागत होते असे माझ्या मित्रांनी सांगितले. माझ्या सहकाऱ्यांनी मदत केली नसती तर कदाचित ही सानिका आज वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये खितपत पडली असती. पण माझे सहकारी खरंच चांगले. मी शुद्धीवर आल्यावरच त्यांनी घरी कळवले. पोलीस केस झाली, माझे जबाब झाले, मित्रांचे जबाब झाले. माझा मित्राचा फोन लॅपटॉप पोलीस घेऊन गेले. पण तसं संशय घेण्यासारखं काही नव्हतं आणि त्याच ठिकाणावरून या पूर्वी अपघात झाले होते म्हणूनच मी वाचले. माझ्या Daddy नी माझ्याशी संभाषण बंद केल. मी मांसाहार करते आणि कधीतरी वाईन घेते हे समजले असते तर घराची दारे नक्कीच बंद झाली असती परंतू मित्रांनी सावरून घेतल.





आठ दिवस मला अपघाताची  स्वप्न पडायची मी झोपेतून किंचाळून उठायची. मीच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे असं वाटायचं. तो  गेल्यावरही माझा पिच्छा सोडत नव्हता पण त्याचे पालक मात्र समजूतदार होते. त्यांनी माझ्या संबंधी कोणतीही शंका घेतली नाही. वकीलांच्या सल्ल्यानुसार जो भाग वागळायचा तो वगळून मी आमच्या ट्रेक बद्दल त्यांना  सांगितले. It was an unfortunate accident अशी नोंद झाली. 

सकाऱ्यांनी मला जीवदान दिले अन्यथा कदाचित आरोपी म्हणून मी येरवड्यात कोणत्या तरी बराकीत असते आणि तू साधी चौकशी करायलाही आला नसतास. माझ्या डॅडीना जेव्हा पुण्याला पोलिसांनी बोलावले तेव्हा आपली मुलगी खरेच अपराधी तर नाही असे वाटून त्यांनी माझ्याशी बोलायचे टाळले. केवळ बाप म्हणून आणि आईनी त्यांना शपथ घातली म्हणून कर्तव्य करण्यासाठी ते आले होते. जेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली तेव्हाही त्यांनी मौन सोडलं नाही. जर खरच मी दोषी ठरले असते तर आमच्या घराची दारे माझ्यासाठी कायमस्वरूपी बंद झाली असती.कटू वाटले तरी हे सत्य आहे. तूच सांग, मी तुझ्या बरोबर लग्न, संसार करण्यासाठी योग्य आहे !”

संजीव तिच्याकडे पहात म्हणाला, “सानिका यात तुझा काय दोष? दुर्दैवाने तू त्या बंगाल्याच्या प्रेमात पडलीस.” “संजीव,तो आता नसला तरी त्याच अस घृणास्पद नाव घेऊ नको त्याच “सौमित्रा” नाव होतं. तो माझा मित्र होता. तो वाईट वागला हे दुर्दैव पण—” “Sorry ,सानिका, मला म्हणायचे आहे,जे काही घडले ती दुर्घटना आहे आणि आता ती लक्षात ठेवून आयुष्य फुकट घालवण्यात काय अर्थ आहे.मला वाटतं तू हे सारं विसरावे.”

“संजीव,मी हे विसरू! तुझ्या जीवनात घडले असते तर तू विसरला असतास? एवढं सोप्प का आहे? ,आपल्या बरोबर असणाऱ्या सोबत्याचा जीव आपल्या समोर आणि आपल्यामुळे जातो आणि आणि—–” “सानिका,त्याच्या आठवणीने तुला काय यातना होत असतील ते मी imagine  करू शकणार नाही पण तुला हे हळू हळू विसरायला हवं. तो आता या जगात नाही हे वास्तव तुला स्विकारवच. लागेल, बरं सँडविच गार झाले, आपण Coffee घेऊया का?”

“संजीव माझ वास्तव ऐकल्यानंतर आता तुला नक्की पटेलच की मी तुझ्यासाठी योग्य नाही. अशा चारित्र्य नसलेल्या मुलीशी तुला  बोलावे असे वाटणार नाही, खरं ना?” सानीका त्याच्या चेहऱ्याकडे पहात होती. तिची खात्री होती की तीच हे असलं वर्तन ऐकल्यावर कोणिही लग्नाला तयार होणार नाही. संजीव क्षणभर विचारात पडला, खरच जर तिचे वर्तन आपल्या घरी समजले तर  पप्पा तिच्याबरोबर लग्नास अनुमती देतील की नाही, हाच प्रश्न त्याला  पडला होता? त्याने सानिकाचे हात हाती घेत थोपटले. सानीका, आपण coffee घ्यायची ना?तुझी कथा ऐकण्याच्या नादात आपले sadwitch पूर्ण थंड झाले.”

तिने मानेनेच होकार दिला. त्यांनी वेटरला बोलावून coffee ऑर्डर केली. “सानिका तुझे मी ऐकले, आता मी काय सांगतो ते तू ऐक,तुझी पूर्ण कथा ऐकल्यावर मी अजूनही ठाम आहे, होय तू मला हवी आहेस, जशी आहे तशी तू माझी पहिली पसंती होतीस, आहेस आणि या पुढे राहशील. तुझी कथा ऐकून तुझ्या बद्दल मला तू म्हणते तशी ना घृणा उत्पन्न झाली ना राग आला. तू तर परिस्थितीची शिकार आहेस. सानिका तुझी हरकत नसेल तर—-“

सानिका त्याच्याकडे पहात म्हणाली,” हं, माझी हरकत नसेल तर काय?” “सानिका तुझी खरंच हरकत नसेल तर ही weeding ring मी तुझ्या बोटात घालू इच्छितो.” अस म्हणत संजीवने बंगलोर वरून आणलेली पर्ल रिंग तिच्या समोर धरली.

“Sanjiv,are you Mad? After hearing my story,my full episode still you feel I am match for you?” “Yes  dear, I bought it before  year and half only in your name. Believe me  I am mad for you since I saw you when I was in twelve.”





ती निशब्द, सानीकाने  तिचा डावा हात पुढे केला आणि संजीवने तिचा हात धरून तिच्या तर्जनीत ती पर्ल रिंग हळूच सरकवली. सानिकाला आज पहिल्यांदा संजीवच्या निर्व्याज प्रेमाची खात्री पटली आणि तिने संजीवच्या हाताचे चुंबन घेतले. Oh! Sanjiv I love you too. ही आगळी एंगेजमेन्ट वेटर दुरून पहात होते. कदाचित असा प्रसंग ना या पूर्वी कोणी पाहिला असावा ना कुणी पाहिल पण कदाचित Restaurant च्या स्मृती कोशात जरूर नोंदवला जाईल. सानिकाच्या जीवनात अपघात घडला नसता तर! संजिवला पून्हा योग्य  जॉब मिळाला नसता तर? आणि संजीवने उदार मनाने सानिकाच्या चारित्र्यवर संशय व्यक्त केला नसता तर? या तरच्या पोटातील तर्क न लढवणेच योग्य. संजिवने केले ते योग्य की अयोग्य कोणी ठरवावे आणि सानिकाची कथा कानी पडल्यावर संजीवच्या या लग्नाला पप्पा अनुमती देतील का? पण सारे आशेवरच तर जगतात. मग संजिवच्या लग्नास पप्पांची अनुमती मिळेल आशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

सानीकाची कथा खरी की खोटी ते फक्त सानिका आणि त्या ईश्वरालाच माहिती. लवकरच करोनाचे नियम पाळत सानिका संजीवचे लग्न होईल आणि सुखी संसार सुरू होईल. लग्नाचे निमंत्रण corona मुळे आपल्याला नसेल पण सुखी संसारासाठी आशीर्वाद द्यायला आपले हात कोणी बांधलेत? तेव्हा देऊ आशीर्वाद सानिका आणि संजीवची सुखी संसाराला.

                                   समाप्त

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “आघात भाग ६

  1. Kiran p

    Very nice

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      Thanks for complement.

  2. wepea.com

    awesome post, i love it

  3. भोसले राजेंद्र
    भोसले राजेंद्र says:

    Chan. Khup aavadli katha. Sir.

  4. Kiran p

    It’s a nice story I like it

  5. आघात भाग १ – प रि व र्त न

    […] भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ […]

Comments are closed.