फ्लोरेन्स तुझी आठवण येते आज तू हवी होतीस
तुझ्या नाती राबत असताना तू ही सोबत असतीस

शुश्रूषेचा खरा वसा दिलास फ्लोरेन्स तूच जगास
ऋग्णांची सेवा अविरत भिंगरी होती तुझ्या पायास

त्यांची सेवा करतांना रात्रीचा दिवस करत होतीस
डोळे श्रमून थकले तरी त्यांचे अश्रू पुसत होतीस

माहित नव्हती जात, धर्म, तुला पिडीत दिसत होता
त्याची जखम धुतांना तुझ्यात ईश्वर तो पहात होता

तू शिकवलास स्वार्थी मानवाला माणुसकीचा नवा अर्थ
सेवाव्रत स्विकारलं की, गळून पडतो अहकांर नी स्वार्थ

फ्लोरेन्स तुझ्या प्रेमळ नाती तुझी शिकवण पेरत आहेत
उगवेल याची हमी आहे तुझ्या भुमिकेत त्या शिरत आहेत

गेले दोन वर्षे त्यांनीही लावली आपल्या जीवाची बाजी
कोवीड योध्द्या म्हणून त्या महान, तू त्यांची प्रेमळ आजी

जेव्हा ऋग्ण बरा होऊन पून्हा आपल्या माणसात जातो
सिस्टरला दुवा देतांना हसत हसत तिचा निरोप घेतो

त्रिवार सलाम फ्लोरेन्स तुला तुझा आज स्मृतीदिन
माणूस म्हणून जगतांना तुझ्यातच मी ईश्वर पाहीन

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags: