चौकट
वाटतय प्रत्येकाचे आयुष्य झालंय बंदीस्त चौकट
कोणी तुमच्याकडे कस पहावं, वागावं याची ठोस अट
प्रत्येकाची भूमिका ठाम, प्रत्येकजण एक कसलेला नट
प्रत्येकाचे प्रारब्ध हा नियतीने भरलेला संचिताचा घट
या चौकटीला आहेत स्वतःच्या स्वार्थाचे चिवट संदर्भ
पण कुणाला विचारून थोडाच हुंकारतो पोटी गर्भ
‘तो’ की ‘ती: हे डॉक्टर चाचणीत ठरते नी उरतो फक्त स्वार्थ
चौकटी चेहेरा देतो नकार, तिची यातानाच ठरते मग व्यर्थ
त्याच्या जगण्याला मात्र ना घरबंध ना कशाची तमा
आयुष्य सारीपाट मांडून उधळण केल्यावर कसली क्षमा
जो दुसऱ्याला पीडाच देतो त्याला दिसत नाहीत जखमा
असते नियती कठोर सोसाव्या लागतात त्यांना यातना
मनाच्या जखमेला हवी निर्व्याज प्रेमळ स्नेहाची फुंकर
चुकल्या मुलाची चूक, सुधारताना आई देते का अंतर?
कधी कधी चौकट तोडून रुजवावं लागतं हृदयात प्रेम
मन जडलं कुणावर तर जाती बंधनाची तोडावी अल्लद फ्रेम
चौकटीत जगावं की चौकट मोडून पून्हा रूजवावं
ज्याला कळतो माणुसकीचा धर्म त्याने स्वतः ठरवावं
ज्या चौकटीत गुदमरतो श्वास ती धैर्याने तोडावी
काही नाजूक कोडी मात्र प्रेमानेच अल्लद सोडवावी
Sundar. 🏠
Mandavkar,Thanks for comments.
सुंदर