दान द्यावे देवा
मी काही लिहीत नाही, तेव्हाही मी अस्वस्थ असतो
मी सुचेल तेव्हा लिहितो, तेव्हाही मी स्वस्थ नसतो
माझ्या लिखाणाची मीमांसा, जोवर मला कळत नाही
माझ्या अस्वस्थतेचं वादळ, तोवर पूर्ण शमत नाही
शब्द म्हणजे हृदयाचे अंतरंग ढवळून निघालेला हुंकार
शब्द म्हणजे मनाचा ओंकार अन् ब्रह्म नी आकार
शब्द म्हणजे मनाचे चैतन्य, स्वराचा नादमय आविष्कार
शब्द म्हणजे नाभी तून उगवलेला तेजोमय स्वर झंकार
कधी सुचते, कधी अडते, पण मी मनाला डिवचत नाही
त्याचे त्याला स्वातंत्र्य, इथे कुणीच कुणाला हरवत नाही
मी शांत बसलो, जणू ध्यानस्थ, हे त्याला पटतच नाही
मग शब्दांची लय फेकत ते नाचते त्याला आत्ता उसंत नाही
त्याचा वेग म्हणू की आवेग, पण ते कल्पनेला आवरत नाही
क्षणात वायुवेगे भरारत, शब्दात बद्ध होण्याला थांबत नाही
मी करतो त्याचीच आराधना, थोडा बांध घाल भावनांना
तेव्हा कुठे ते वादळ शमतं अन् मी अलगद उतरवातो शब्दांना
खरंच की हो मी पामर अन तो साहित्य सम्राट मुक्त भ्रमर
त्याची सेवा चाकरी करता यावी या करता हवी विशाल नजर
त्यानेच द्यावे शब्द भांडार, शिकवावे अनुप्रास अलंकार
त्यानेच शिकवावे यमक लय, द्यावा शब्दांना आकार
आशीश त्याचा लाभला, तर लेखणी मन मोकळ करेल
त्यानेच द्यावी शक्ती, युक्ती तर लेखणी झरझर उतरेल
त्याचा कृपाप्रसाद मिळाला तर शब्द चैतन्य बहरेल
त्याच्या चरणी लीन होत लेखणी शब्दांचा अभिषेक करेल
Good.
Appreciated
Bhavsar saheb Thanks for your complement.
आजच्या सर्व कवितांमध्ये सर्वात उत्कृष्ट कविता.कमाल आहे….!
कल्पना अफलातून, शब्द अचूक, योग्य छंदबद्धता अर्थ कळस…!
Ma m thanks for your complement.
Very thoughtful. अत्यन्त चांगली कविता
कविता उत्कृष्ट आहे
Sagar thanks.
खुपच सुंदर
शब्द एक अंतरंग
Sachin thanks for your complement.