नक्कल
नक्कल करायला असावीच लागते अक्कल
लोकांचे अनुभव टिपता टिपता पडते नितळ टक्कल
नक्कल करून खरंच का शहाणपण येते ?
की शहाणपण असेल तरच नक्कल जमते
बाळ जेव्हा पहिलावहिला शब्द उच्चारते
तेव्हाही ते आईबाबांची नक्कलच करते
लहान वयात शिकण्याचा वेग असतो भन्नाट
वय वाढत जाते तशी शिकण्याला लागते नाट
नक्कल करायची म्हणजे शक्कल चालवावी लागते
नक्कल करताना भाव ताकदीने पोचावावा लागतो
नक्कल करता करता तो एक स्वभाव बनतो
अनाहूतपणे तो मग कुणाचीही नक्कल करतो
शब्दातले ते चढ उतार अन् मोजके थांबे
जणू ते थांबे हेच हास्यासाठी रसाळ आंबे
नक्कल जशी समोरील प्रेक्षकाला खळाळून हसावते
तशी ती कुणाला तरी घायाळ ही करते
शब्दा बरोबर देहबोली जेव्हा वळण घेते
या पूर्वीच्या अथि रथिंचा ती प्रत्यय देते
नक्कल म्हणजे नसते नुसती टिंगल टवाळी
ती तर असते नक्कल करणाऱ्याची अनुभवझोळी
नक्कल करणारी व्यक्ती असते खरंच अभ्यासू
दुसऱ्याचे बारकावे टिपताना होऊ देत नाही हसू
नक्कल बेहुब जमली तर नक्कीच पडतात टाळ्या
नक्कल मोठ्यांची फसली तर पदरी शिवराळ लाखोल्या
नक्कल करायला हवा निर्भेळ उमदा स्वभाव
नक्कल म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अथांग ठाव
ज्याची केली नक्कल त्यानेच दिली पसंती
तर नकलाकार म्हणून जगी होते ख्याती
पण नक्कल करताना शाब्दिक चुकली भट्टी
तर नकलाकाराच्या संसारावर लोक फिरवतील माती
Chanach..
Kharach khup chaan
खूपच छान…..!
नक्कल या विषयाचेजवळ जवळ सर्व कंगोरे कवितेत व्यक्त केले आहेत.शब्दरचना खूप छान.तुमच्या निरीक्षण आणि ग्रहणशक्तीला सलाम…!
Hi there, I enjoy reading all of your article. I wanted to write
a little comment to support you.
Actually when someone doesn’t understand afterward its
up to other visitors that they will help, so here it
takes place.