पोपट

पोपट

एखादी चिमूरडी रूसून रस्त्यावर फतकल मारते
तिच्या रुसण्याने नकळत आपली कळी खुलते

तिचा प्रश्न सोडवावा म्हणून आपण तिथे पोचतो
चल बेटा अस करु नये म्हणत तिचा हात धरु पाहतो

ती हात झटकून वेडावून समोरून निघून जाते
धावत पळत जाऊन रडतच आईला घट्ट बिलगते

आपला पोपट झालेला पाहून तिची आई गाली हसते
प्रश्नांच अस्तित्व आपल्याला नेमके तिथच का दिसते?

कधी तरी एखादे मुल रस्ता ओलांडताना मध्येच पडतं
त्याच्या समोर येत वाहान कर्कश आवाज करत थांबत

गाडीचा मालक बाहेर येऊन मुलाला कचकचीत शीवी घालतो
आपण उगीचच त्याच्या समोर येत त्याच्यावर शीरा ताणतो

मुलाला उचलून घेण्यासाठी हाताचे पंख नकळत हलतात
त्याचे कपडे ठिकठाक करून देतांना डोळे अश्रूंनी भरतात

आपल बालपण असच कधीही रस्त्यात नकळत दिसतं
गंमतही वाटते आणि मनाला न जुमानता ह्दय हळहळत

प्रश्न नेमका सुटला नाही तरी मनाला थोड हलक वाटतं
कुणासाठी कधीतरी थोड असच आतड तिळ तिळ तुटतं

आपल बालपण,आपलीच आई अन प्रसंग डोळ्यात येत
आता यातल काहीच की उरल नाही, आठवून मन उदास होत

अशा अनेक आठवणींचा गोफ काळजात ठेऊन आपण जगतो
त्या प्रसंगाला अचानक सामोरे जातो,तेव्हा मदतीस धावतो

ती चिमूरडी आणि माझा झालेला पोपट जेव्हा मला आठवतो
समोर कोणी नसतांना माझ्या अचरटपणासाठी मी दिलखुलास हसतो

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “पोपट

  1. Bhosle R. B.

    Chan kavita sir.

Comments are closed.