प्रेम म्हणजे नक्की काय असते?

प्रेम म्हणजे नक्की काय असते?

एकांतात नव्हे, अगदी गर्दीतही रूसते
बरं बाई,म्हणत, चिमटा काढून हसते
बर्फाच्या गोळ्यासाठी, ठाम हटून बसते
त्याला आवडतील अशा, तंग कपड्यात शिरते
निरोप घेण्याच्या वेळी समजून उमजून टाळते
निघुया म्हणत किती वेळ रस्त्यातच घुटमळते
तेव्हा कुठे कळते, ते त्याचे प्रेम अंतरी रूजते

प्रेम म्हणजे काय? कळायचं वय नसते
केवळ त्याच्या एका अदेवरही भुलते
मन नकळत त्याच्या प्रेमात गुंतते
त्याची भेट व्हावी म्हणून रात्री तळमळते
स्वप्नांच्या गावात भेटीला नकळत पोचते
शंका आशंकानी उगाचच कोलमडते
अन तो नजरेस पडता नागीण बनून डोलते
तेव्हा कुठे पटते प्रेम दिसामासी फुलते





रुसणं फुगणं,संशयाने पाहणं नित्य चालते
एका शब्दाच्या जखमेनी पार विव्हळते
आता त्याची भेटच नको, मनी ठाम ठरवते
अन भेट होत नाही म्हणून, स्वतःच हरवते
नजरेस अचानक पडता, पापण्यांतून बरसते
मिटल्या डोळ्याने, स्पर्श सुखातच चिंब भिजते
आता मनाला पटते, त्या विरहाचे नाव प्रेम असते

दिवसाही चांदण्या पहाते, प्रेमात गुणगुणते
आठवण मनी येता, खुदकन गाली हसते
सुकलेला मोगरी गजरा, ओंजळीत लपवून पहाते
कुरळ्या केसांच्या बटात, त्याला शोधून पहाते
धूंद बेहोश क्षणांच्या कल्पनेतही रमते, सुखावते
तो दूरवर दिसता, तीची चकोर पोर्णिमेगत फुलते
तेव्हा गात्रांनाही पटते, धमन्यात रक्त, प्रेम बनून झिरपते

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “प्रेम म्हणजे नक्की काय असते?

  1. भोसले राजेंद्र
    भोसले राजेंद्र says:

    Chanach kavita…sir.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      Dhanyawad

  2. cheap wigs

    It can be said to be a bald savior hahahahahahaha. Originally, I had curly hair and bought brown, which has a color difference with my hair. This dark brown is a reddish brown. Later, I changed the natural color of the model, and then I also straightened my hair and dyed it back to the natural color. The hair color is very close. It can be said that it is the best fake bangs I have ever bought. It just can’t be blown by the wind (Figure 2 after being blown by the wind for ten minutes). Once blown, it will hit the willow hahahahahaha or you often bring a small comb It’s ok hahaha

Comments are closed.