मत दिले पुढे काय !

मत दिले पुढे काय !

या वर्षी प्रत्येक मतदात्याने आपला मतदानाचा हक्क दोन वेळा बजावला,एकदा लोकसभेसाठी आणि आता विधानसभेसाठी,खरच का हो तुमच्या मताला किंमत आहे? जर तुमचे मत अमोल आहे अनमोल आहे तर नक्की चुकत कुठे?तुम्हाला तुमचा योग्य, लायक प्रतिनिधी का बर निवडता येत नाही?कि तुमच्या समोर पर्यायच उपलब्ध नसतो? मला वाटत जर स्वतःच प्रामाणिक मत मांडता आल तर तुम्ही नक्कीच अस म्हणाल कि ज्याला आमचा पर्तिनिधी म्हणता येईल,ज्याच्या जवळ विश्वासान आमच्या विभागाच्या,पर्यायानं जिल्हा किंवा राज्याच्या चाव्या, राज्यकारभार सोपवता येईल असा गुणवान उमेदवार पक्ष देत नाहीत.पक्षाला हवा असतो असा चेहरा जो पक्षासाठी निधी उभा करू शकेल आणि गरज भासल्यास शक्तीचा प्रयोग करू शकेल.
उपलब्ध पर्यायातून आपला प्रतिनिधी निवडायचा म्हणजे तारेवरची कसरतच.अर्थात हाच उमेदवार का देता? त्याची पात्रता काय? हे पक्षाला विचारण्याचे साहस कुणी करत नाही,त्याला ह्या लोकशाही पेक्षा स्वतःचा जीव प्यारा असतो.नाहीतरी लष्कराच्या भाकऱ्या बडवून मिळणार काय?म्हणुन कोणिही उमेदवाराच्या पात्रतेवर आक्षेप घेत नाही.त्या पेक्षा वाटल तर मत द्यायला गेल नाही तर पिकनिकला गेल. उगाचच शहाणपणा कराच कशाला?असो, मतदानाचा हक्क बजावून झाला.आता शिळोप्याच्या गप्पांना ऊत येईल. कोणी किती पैसे खर्च केले? कोणाच्या किती नोटा जप्त झाल्या. मला खरच कळत नाही. ह्या नोटांची बंडल नक्की कुठ मिळतात? च्यायला आम्ही बाजारात गेलो तर दहा रुपयाची कोथिंबीर आठ रुपयांना मागणार त्यासाठी घासाघीस करणार समोरच्या भैयाचे किंवा त्या बाईचे दोन शब्द ऐकून घेणार पण एक रुपया कमी कसा केला त्याचा किस्सा बायकोला ऐकवणार.ह्या नेत्यांना एव्हढा पैसा देते कोण?कशासाठी ? खरच धन्य आहे सर्व पक्षाची ! ! ! त्यांच्या उमेद्वारंची आणि त्यांच्या पैसे खर्च करण्याच्या ऐपतिचि. मला सांगा कोण असा मायचा लाल आहे जो स्वतःचे पैसे उधळून निवडून येईल आणि निस्वार्थीपणे जनतेची सेवा करेल? ह्याचा अर्थ स्पष्ट आहे कोणिही सेवाव्रत म्हणुन राजकारणात येत नाही. आता राजकारण हा धंदा झाला आहे आज पैसे फेका आणि पुढील पाच वर्षात पन्नास पट वसूल करा. कोणताही पक्ष चुकूनही अन स्वप्नातही स्वच्छ कारभाराची हमी देवू शकणार नाही.
आता शेंबूड फुसणाऱ्या मुलाला देखील कळते, काही तरी गमावल्या शिवाय काही तरी मिळत नाही.म्हणूनच नागरिक म्हणुन आपली जबाबदारी वाढली आहे.थोड्याच दिवसात सरकार स्थापन होईल.भाजपा ? युती ! की आघाडी कि अजून वेगळ प्रयोग हे ठरायच असल तरी कोणीतरी अन कोणाल तरी सोबत घेतल्या शिवाय सरकार बनत नाही हे नक्की म्हणुन आपली जबादारी वाढली आहे. तुम्ही म्हणाल माझ्या हाती काय आहे? जर डोळे उघडे ठेवून वागायचं अन जगायचं ठरवल तर बरच काही आहे. तुमच्या प्रभागातला रस्ता जेव्हा केला जातो त्याच काम योग्य होत कि नाही हे जर तुम्ही पाहिलात,तुमच्या नगरात होणारी गटाराच बांधकाम योग्य होत आहे कि नाही हे पाहिलात अन तुमच्या प्रभागात टाकली जाणारी जलवाहिनी चांगल्या दर्जाची आहे कि नाही योग्य प्रकारे टाकली जाते आहे कि नाही हे तुम्ही पाहिलात तर पंचवीस टक्के काम झालाच म्हणुन समजा.
प्रभागातल्या प्रत्येक कामावर तुमचा, तुमच्या मित्र मंडळींचा बारीक डोळा असेल तर कोणिही कसेही काम करायला धजावणार नाही मात्र मला, ते काम माझे आहे ही जाणिव होणे गरजेचे आहे. मला काय त्याचे? ही उदासीनता जर नसेल तर नक्कीच तुम्ही बदल घडवू शकाल हा विश्वास मला आहे. गरज आहे ती स्वतःतल्या नागरिकाला त्याच्या हक्कपेक्षा कर्तव्याची जाणीव होण्याची.केवळ एक दिवस घरी थांबून किंवा मत देवून काय होणार आहे? त्या पेक्षा तुमच्या नगरातल्या नगर सेवकावर लक्ष ठेवा, त्याच्याशी संवाद साधा तुमच्या नगरच्या गरजा विषयी त्याच्याशी बोला.नक्कीच बदल घडेल.
भ्रष्ट कारभार चालतो कारण आपलीच उदासीनता, मला काय त्याचे हि वृत्ती.केवळ तुम्ही मनाशी ठरवलंत तर नक्कीच काही प्रमाणात ह्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवता येईल.ग्रामीण भागात आजही पैशांवर चुकलच गांधी नोटेवर निवडणुक लढवली जाते.भाबड्या ग्रामीण जनतेला दोन दिवसाचा बाजार करण्या एव्हढे रुपये मिळाले तरी त्यांचा म्होरक्या सांगेल त्या निशाणीच बटन दाबून ते मोकळे होतात.ग्रामीण जनता अजाण आहे किंवा कशाच्या तरी लोभापायी तस करते पण आपण शहरवासी सुशिक्षित आहोत पण तरिही मताचा हक्क नव्हे कर्तव्य आपण का बजावत नाही?आपल्या माथी अयोग्य उमेदवार मारला जाऊ नये म्हणुन का जागरूक राहात नाही? मी काहिही करणार नाही,माझी प्रतिक्रिया कृतीतून व्यक्त करणार नाही केवळ दुसऱ्याला दोष देत राहीन हे योग्य आहे का ? मोदींना काय अभिप्रेत आहे ह्याची भरपूर चर्चा होते का? तर ते पंतप्रधान आहेत म्हणुन ! तुम्ही तुमचे घर कसे असावे कसे दिसावे या विषयी जागरूक असता ना?ताटात वाढलेलं निमूट खाता कि त्या विषयी आपल मत व्यक्त करता? काय पदार्थ ताटात असते तर बर झालं असत अस तुम्हाल वाटते?
ह्या साठी जसा तुम्ही सोयीन विचार करता तसा तुमच्या इमारती बद्दल,गावाबद्दल करता का? जेव्हा माझी इमारत मला स्वच्छ हवी असे वाटेल,जेव्हा माझ्या ऑफिसातील वीज वाया जावू नये असे मला वाटेल, जेव्हावाया जाणारे पाणी पाहून माझे मन हळहळेल ते पाणी वाचवावे ह्या साठी धडपड करेल तेव्हा माझ्या विचारांची झेप माझ्या पुरती सीमित राहणारच नाही. मित्रहो केवळ मताचा हक्क बजावून चालणार नाही ज्या गोष्टीसाठी,चांगल्या प्रशासना करिता तुम्ही मत दिलत,आता तुमचा प्रतिनिधी तुमच्या साठी,समाजासाठी चांगला कारभार करतो कि नाही हे पाहणे तुमची जबाबदारी आहे.मत तर दिलेत मताने उमेदवार निवडूनही येईलच पण तुमचे चांगले विचार त्याच्यावर लादल्या शिवाय त्याच्याकडून चांगल्या प्रशासनाची अपेक्षा बाळगू नका.चला तर आम्ही मत अकारण वाया घालवणार नाही आमच्या मताचा आदर राखला जाईल ह्या साठी स्वतःत बदल घडवू ,दुसऱ्यास बदलायला भाग पडू आमच्या मताची किंमत समाजासाठी पुरती वसूल करू

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

17 thoughts on “मत दिले पुढे काय !

  1. Maritza

    I was able to find good advice from your blog
    articles.

  2. Myrtle

    Do you mind if I quote a few of your articles as long as I provide credit
    and sources back to your website? My blog site is in the very same
    niche as yours and my users would truly benefit
    from a lot of the information you provide here.

    Please let me know if this alright with you.

    Regards!

  3. Johnathan

    Hi there! This is my first comment here so I just wanted to
    give a quick shout out and say I truly enjoy reading your blog posts.
    Can you recommend any other blogs/websites/forums that deal with the same subjects?
    Appreciate it!

  4. Rebecca

    Fantastic items from you, man. I have understand your stuff previous to and you are simply too wonderful.
    I really like what you’ve bought right here, really like what you’re stating and the way
    in which by which you are saying it. You are making it entertaining and you
    continue to care for to keep it wise. I can not wait to learn far more from you.

    This is really a great web site.

  5. easwiki.net

    You need to be a part of a contest ffor one of the highest quality sites online.
    I am going to highly recommend this web site!

  6. Hester

    Very nice post. I just stumbled upon your blog and wished to
    say that I’ve truly loved surfing around your blog posts.
    After all I’ll be subscribing in your feed and I am hoping you
    write again very soon!

  7. Julianne

    Very rapidly this site will be famous amid all blog viewers, due to it’s nice articles

  8. Alissa

    Hi there! I’m at work surfing around your blog from my new
    iphone 4! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Carry on the outstanding work!

  9. can you win real money on cash frenzy

    Excellent pieces. Keep posting such kind of info on your site.

    Im really impressed by your site.
    Hey there, You have done a fantastic job. I will certainly digg it and in my view
    recommend to my friends. I’m sure they’ll be benefited from this website.

  10. best baseball betting podcast

    Thank you for the auspicious writeup. It in fact was a
    amusement account it. Look advanced to more added agreeable from you!
    By the way, how can we communicate?

  11. sports book podcast

    Terrific post however I was wondering if you could write a
    litte more on this subject? I’d be very grateful if you could elaborate a little bit more.
    Many thanks!

  12. bandit machine

    It’s hard to find educated people on this topic, however, you seem like you
    know what you’re talking about! Thanks

  13. mohegan sun directions

    I am extremely inspired with your writing abilities as neatly as with the
    layout in your blog. Is that this a paid subject or did you customize it yourself?

    Anyway keep up the nice high quality writing, it is uncommon to peer a nice weblog like this one today..

  14. how to gamble bitcoin

    Yes! Finally something about how to gamble bitcoin.

  15. situs judi slot online terpercaya 2019

    Your mode of describing all in this paragraph is genuinely fastidious, every one be capable of simply be aware of it, Thanks a lot.

  16. judi sabung ayam online

    Heya i am for the first time here. I came across this board and I in finding It really
    helpful & it helped me out a lot. I hope to present something back and help others such as you aided me.

  17. mohegan sun tuscany

    Hi there, I found your website by way of Google whilst looking for
    a related matter, your website got here up, it looks good.
    I have bookmarked it in my google bookmarks.
    Hi there, just was alert to your blog thru Google, and found that it’s
    truly informative. I’m going to be careful for brussels.
    I’ll be grateful if you happen to continue this in future.
    A lot of folks shall be benefited out of your writing. Cheers!

Comments are closed.