महात्मा
ओढून ताणून कुणी बनत नसतो महात्मा
दुसऱ्यासाठी कण कण जाळावा लागतो आत्मा
द्यावा लागतो वेळ जाणावे लागते गरिबाचे दुःख
समर्पित भावनेने सेवेसाठी आटवावे लागते रक्त
त्यागावा लागतो अहंकार गिलावा लागतो क्रोध
गाळावा लागतो “मी पणा” जळावा लागतो दंभ
टिकवावा लागतो जीवनाचा रंग जुळवावा लागतो सुर
दुसऱ्याचे जीवन उजळविण्यासाठी व्हावं लागतं कापूर
करावे लागते शरीराचे चंदन अन् सुगंधित दुसऱ्याचं मन
मनाच्या कुपीत साठवावं लागत मौलिक विचारधन
मलीनता घालविण्यासाठी व्हावं लागतं कधी साबण
कधी होऊनी हळवा प्राजक्त सजवावं लागतं अंगण
टिकविण्यापेक्षा दुसऱ्यासाठी उधळावं लागतं जीवन
क्षमाशील व्हावं लागतं तेव्हा कुठं येत माणसाला देवपण
अतिशय सुंदर व छान
अतिशय सुंदर विवेचन !
Comment दिल्याबद्दल श्री कुरणे आणि अशोक यांचे धन्यवाद.
खूप सुंदर
Beautiful Sir?