माकडाची शाळा
एका माकडाने काढली प्राथमिक शाळा
सिंह, वाघोबासह सारेच वनचर झाले गोळा
माकड झाडावर चढून म्हणाले, श्री गणेश बोला
हत्ती झाड हलवत म्हणाले मास्तर खाली चला
माकड खाली उतरुन म्हणाले चला पाढे काढा
आधी शिकवा गाणे खिंकाळत म्हणाला घोडा
माकड रागावून म्हणाले चला शिकवतो पाढा
आधी न्याहारी मगच शाळा म्हणाला रानरेडा
माकड वैतागत म्हणाले आधी जरा शांत बसा
शिकवण्यापूर्वी थोड गोड हसा म्हणे ससा
माकड फिस्करात म्हणाले करू नका दंगा
अस्वल नाचत म्हणाले मास्तर थोड थांबा
माकड कंटाळून म्हणाले गप्प बसा काढेन काठी
सिंह गर्जना करत म्हणाला आधी शब्द घ्या पाठी
तरीही माकड चित्कारत म्हणाले उपटीन पहा आता कान
ते ऐकताच एका कोल्हाने माकडांची धरली पाठून मान
शाळा माकडोबांची तिथेच पटकन सुटली
वाघाच्या डरकाळीने मास्तरांची वाचाच बसली